'आधार-आश्रम' असं त्या एनजीओचं नाब. आजूबाजूला विस्तीर्ण हिरबळ... पावसामुळे ती हिरवळ अजूनच गर्द झाली होती. जवळपास एका एकरात ते आश्चम विस्तारलं होतं. प्रांगणात लहान-मोठे असे शंभर-दीडशे मुलं होती.... काही खेळत होती तर काही बसली होती... सगळी आजूबाजूच्या वस्तीतील वाटत होती. तो आत जाताच बऱ्याच मुलांनी त्याच्या भोवती गराडा घातला. तितक्यात एक माणूस धावत बाहेर आला आणि सगळ्यांना आत पिटाळलं.
"कोण पायजे सायेब?.." त्याने विचारलं. बहुतेक आश्रमाचा कर्मचारी असावा... त्याच्या खिशावर 'आधार-आश्रम' चं लेबल होतं.
"रेवती... आय मिन गायकवाड मॅडम? ..."
"या या... अजून आल्या नाही त्या... चला तुमास्त्री त्यांच्या कादरवरच सोडतो..." त्याच्या मागे मागे नरेन चालू लागला.
इतक्या वर्षांनी ती दिसेल याची धाकधूक मनात लागली होती. ती कसे रिऍक्ट करेल?... त्याला पाहिल्यावर काय बोलेल?... असे नानाविध प्रश्न डोक्यात घुमत होते... शेवटी ते एका घराजवळ थांबले... थोडं छोटसंच होतं म्हणा... बहुतेक सिंगल बेडरूमचे. घर दाखवून तो माणूस निघून गेला. दाराजवळ जाऊन बराच वेळ तो उभा राहिला... आजूबाजूला त्याच आकाराची आणखी सहा सात घरे होते... बहुतेक बाकीचा स्टाफ असावा शेवटी निर्धार पक्का करून त्याने दाराची कडी बाजवली. आतून काहीच आवाज ऐकू नाही आला... पण काही वेळाने दार उघडत असल्याची जाणीव त्याला झाली तसे त्याचे हृदय धकधक करू लागले. श्वास जड होऊ लागले. दार उघडले... आत सात आठ वर्षांची एक गोड मुलगी उभी होती. "कोण हुन तुम्हाला? ..." त्याच्याकडे पाहत तिने विचारलं.
"मी... मी..." त्याच्या तोंडून आवाज फुटेना.
कोण आहे रैना... 'आतून कोणीतरी मुलीला विचारलं.
"मला नाही माहित तूच बघ..." म्हणत ते बछडं आत पळालं.
"क... क... कोण?..." ती दारावर आली आणि तोंडातले शब्द तोंडातच राहिले, "... तू... इथे?..."
तो असा अचानक तिच्या समोर येईल हे तिच्या ध्यानीमनीही नव्हते... त्याला आपण परत भेटू यात्रा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. दोघेही एकमेकांकडे पाहत दारातच उभे होते. त्याच्या मनात प्रश्न... तिच्याकडे पाहत जणू मूकपणे त्या प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करत होता. एका साध्या कॉटन साडीवर आणि ढोपरापर्यंत येत असलेल्या ब्लाऊजवर ती अजूनही तशीच सुंदर दिसत होती... डोळ्यात तीच चमक, तोच कॉन्फिडन्स अजूनही झळकत होता. तिच्या नजरेतून पाहिलं तर तो आधीपेक्षा बराच बारीक झाला होता... तब्येत खालावली होती... गाल खोल गेले होते... डोळ्यावर चष्मा सुद्धा आला होता.
"मम..." त्याच्या तोंडून निघाले.
"कम... इन्साईड..." भानावर येत ती बोलली आणि बाजुला होत त्याला आत घेत दार टेकबलं, ".. रैना बेटा पाणी घे आतून..."
काही वेळातच ती मुलगी हातात पाण्याचा ग्लास घेऊन आली... त्याच्याकडे पाहत त्याला पाणी दिले..
"मम्मा... हू इज ही?..." तिच्याकडे पाहत तिने प्रश्न केला.
"पलास घेऊन आत जा... पळ" तिची आज्ञा पळत ती पुन्हा आत गेली.
"मम्मा ?..."
"हमाम... तुझीच आहे..."
"मॅम?... पण अचानक असं काय झालं?... आणि इथे ह्या जंगलात?... का? ... आय मिन..." त्याचे सगळे प्रश्न ती शांतपणे ऐकत होती.
"सांगते... सगळं सांगते..." म्हणत ती सांगू लागली.
शनिवारी तू गेल्यावर जवळपास एका तासाने मला एक पत्र मिळाले. वर्तमानपन्नाच्या कटिंग्स सोबत एक लांबलचक पत्र होतं. मेळघाटमध्ये होत असलेल्या लहान मुलांच्या कुपोषणाबाबतीत एक अह्वाल होता आणि सरकार किती दुर्लक्ष करतंय या गोष्टीवर हे सुद्धा त्यात नमूद केलं होतं... तुला कदाचित माहित नसेल माझा जन्म सुद्धा याच भागात झाला. इथेच मी लहानाची मोठी झाले पण वडील सरकारी विभागात असल्याने मला सर्व सुखसोयी मिळाल्या... इतर मुलांसारखे माझे हाल झाले नाहीत. इथले हाल मी लहानपणापासूनच पाहत होते... डोळ्यादेखत लहान लहान मुले भुकेने मारताना पाहिले... जी जगायची त्यांची अवस्था मेल्याहुनही वाईंट... मी पंधरा वर्षांची असतानाच बाबांची बदली नागपुरात झाली आणि मी कायमचीच तिथली होऊन बसले. कालांतराने मला या सर्व गोष्टींचा विसर पडला आणि कामाच्या व्यस्ततेत आणि वैयक्तिक घटनांनी हे सगळं विसरलेसुद्धा.
ते पत्र वाचून आणि त्यातील कटिंग्स वाचून मी भांबावून गेले... खरं सांगायचं झालं तर ते पत्र चुकीने माझ्या पत्त्यावर आले होते. कारण ज्याला ते पत्र जाणार होते तिचे नाव रेवती गायतोंडे होतं... पण पोस्टमनने चुकीने ते माझ्या दारात टाकलं...माझ्या मते खऱ्या पत्त्यावर!!! ... अचानक जीवनात काहीतरी करायचा विचार चमकला. त्वरित बिचार पक्का केला आणि सगळं सोडून इथे आले.