अश्लील शैली

Post Reply
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15829
Joined: 10 Oct 2014 07:07

अश्लील शैली

Post by rajsharma »

अश्लील शैली

मुंबईपासून लांबच्या स्टेशनवर एक चाळ होती. शांती नाव तीच. नाव शांती असली तरी कायम अशांत असलेली. पागडी पद्धतीने राहणारी बिऱ्हाड. शेजारच्या घरातून मटणाचा वास आला की बाजूच्या घरातील नवराबायको मध्ये कमाई वरून भांडण. जवळजवळ सगळ्या बिऱ्हाडांची आपसात भांडण, पण सणवार आले की सगळे एकत्र, अस काहीसं संमिश्र वातावरण होत शांतीमध्ये.

तर आमच्या सावंत काकू ह्या चाळीत रहात. चाळीमधला सर्वात ऍक्टिव्ह ‘सी सी टीव्ही कॅमेरा’. कोणाच्या घरी कोण आलं, आज कोणाच्या घरी काय जेवण बनवलंय, कोणाचं कोणाशी आणि कशावरून भांडण झालं ह्याची सगळी माहिती त्यांना होती म्हणून त्यांना खाजगीत ‘सी सी टीव्ही’ हे टोपण नाव होत.

एक दिवस उन्हाळी दुपारची वेळ होती. अशांत असलीतरी चाळ दुपारी चिडीचूप होती. कडक उन्हामुळे शक्यतो कोणी बाहेर निघत नसे. सावंत काकू दोरीवर वाळायला घातलेले कपडे बघण्यासाठी घराच्या बाहेर गेल्या आणि त्यांनी सहज समोर बघितलं.

समोरच्या जिन्यात कोणीतरी उभं होत. एक मुलगा आणि एक मुलगी इकडे तिकडे बघत घाबरत एकमेकांशी बोलत होते. त्यांना बघताच काकूंचा सी सी टीव्ही कॅमेरा एकदम जागृत झाला आणि दोरीवरचे कपडे तसेच सोडून समोरच्या खबरेच लाईव्ह फुटेज घेण्यासाठी त्या दबकत जिन्याजवळ गेल्या.

त्या दोघांमध्ये हळू आवाजात संभाषण चालू होतं. त्याने विचारलं, “मग काय ठरवलंय?”

तीने उत्तर दिलं, “काही कळत नाही आहे काय करू ते.”

तो बोलला, “काय तो निर्णय लवकर घे. दिवस फार कमी उरलेत.”

दिवस कमी उरले आहेत हे वाक्य कानावर पडताच काकूंच्या भुवया वरती झाल्या आणि आता ती काय उत्तर देतेय, हे ऐकण्यासाठी त्यांचे प्राण कानात एकवटले.

ती थोड्या रडक्या आवाजात बोलली, “हो रे! उशीर केला तर सगळं संपेल. मग मी जगू शकणार नाही. मी जीवाचं काहीतरी बरं वाईट करून…”

तिला मध्येच तोडत तो जरा मोठ्या आवाजात तिला बोलला, “अग अशी टोकाची भूमिका घेवू नकोस. आपण ह्यातून काहीतरी मार्ग काढू. अश्या गोष्टींतून बाहेर यायचे इतरही बरेच मार्ग आहेत”

ती बोलली, “पण आता खूप उशीर झाला आहे. आजचं काहीतरी शेवटचा निर्णय घ्यायला हवा.”

वरतून कोणीतरी खाली यायची चाहूल लागली तस तो बोलला, “ओके! ओके! ठीक आहे. मी काहीतरी मार्ग काढतो. कोणीतरी येत आहे. तू जा आता. मी तुला नंतर कॉन्टॅक्ट करतो.” अस बोलून तो गडबडीत खाली पळाला. तीने वरच्या मजल्यावर धूम ठोकली.

वरतून दुसऱ्या माळ्यावरचे अण्णा खाली येत होते. वर जाणाऱ्या तिला म्हणजे सुमनला त्यांनी विचारलं, “काय ग सुमे? कुठे पळत चालली आहेस?”

त्यांच्या प्रश्नाने सुमी थोडी गोंधळली पण स्वतःला सावरत बोलली, “काही नाही अण्णा! खाली एक कुत्रा होता त्याला बघून पळत आले.”

अण्णा हसत खाली जात बोलले, “काय सुमे! आता लग्नाचं वय झालं तुझं आणि कुत्र्याला घाबरते.”

अण्णा खाली आले तश्या सावंत काकू आपल्या घराजवळ जावू लागल्या आणि मनात बोलू लागल्या, “हा बेवडा अण्णा मध्येच कुठे तडमडला. नेमका क्लायमॅक्सच्या वेळीच टपकला. दारू आणायला जात असेल मेला.” अण्णांच्या नावाने दातओठ खात काकू घरात गेल्या.

घरी गेल्यावर काकुंच काही लक्ष लागेना कामात. सारख त्यांना डोळ्यासमोर सुमी आणि संजू दिसत होते. दोन्ही पोर चांगली हुशार व्यवस्थित वागणारी मग काय चाललं होतं दोघांत? तीच बोलणं काकूंना आठवलं. “उशीर केला तर सगळं संपेल.” म्हणजे नेमकं काय? कसला उशीर? काय चूक केली सुमीने? असे नानाविध प्रश्न काकूंच्या मनात आले.

कशीतरी दुपारची काम उरकून काकू थोड्या वामकुक्षी करायला पलंगावर पहुडल्या पण त्यांचा डोळा लागेना. त्या सारख्या कुशी बदलत होत्या पण त्यांना झोप येत नव्हती. संजू-सुमी त्यांच्या झोपेसमोर राहू-केतू सारखे आडवे उभे राहिले होते. आता काकूंच्या हलकं हलकं पोटात दुखू लागलं. शेवटी त्यांनी मनाशी काहीतरी ठरवलं.

काकू घराच्या बाहेर पडल्या आणि बाजूला दोन घर सोडून परबांच्या घरात शिरल्या. शिरताना बोलल्या, “परब वहिनी, आहात का घरी?”

परब वहिनींचा नुकताच डोळा लागला होता. सामंत काकूंच्या खणखणीत आवाजाने त्या उठून बसल्या. थोड्या वैतागला होत्या पण चेहऱ्यावर तसे न दाखवता बोलल्या, “या या सावंत वहिनी, बसा!”

सावंत काकू बोलल्या “तुमची झोप मोड झाली वाटत.”

कसातरी चेहऱ्यावरचा राग लपवत परब काकू उसनं हसू आणून बोलल्या, “नाही हो झोपली नव्हती नुसती पडली होती.”

सावंत काकूंनी घरात येताच दरवाजा आतून बंद केला. त्यांची ही कृती बघून परब काकूंनी ओळखलं काहीतरी खास काम असणार सावंत वहिनींच. पोट धरून त्या परब काकूंच्या बाजूला बसल्या.

पोट धरलेले बघून परब काकूंना वाटलं की सावंत काकूंच्या कदाचित पोटात दुखत असेल. सावंत काकू बोलायच्या आतच त्या बोलल्या “पोट दुखतंय का? ओवा-सोडा काय देवू का?”

त्यांना समजावत सावंत काकू बोलल्या, “अहो, अशी खबर आहे की ती ऐकल्यावर तुमच्या पण पोटात दुखेल.”
Read my all running stories

(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15829
Joined: 10 Oct 2014 07:07

Re: अश्लील शैली

Post by rajsharma »

खबरा काढण्यात सावंत वहिनींचा हात कोण धरू शकतं नाही हे परब काकूंना चांगलाच माहीत होतं आणि इतक्या दुपारी त्या आल्या म्हणजे खबर काहीतरी खासच असणार हे परब वहिनींनी ओळखल आणि सरसावून बसत त्या बोलल्या, “सांगा ना वहिनी काय खबर आहे?”

सावंत काकूंनी आपल्या वार्ताहार शैलीत थोड्यावेळा पूर्वीचा प्रसंग परब काकूंना सविस्तर सांगितला. त्यात सावंत काकूंनी आपली वाक्य जोडली म्हणजे त्यांना संजू-सुमीच बोलणं ऐकतांना ते दोघ दिसत नव्हते पण त्यांनी परब काकूंना सांगताना अस सांगितलं की जस काय ती दोघ सावंत काकूंना स्पष्ट दिसत होती आणि सुमीने पोटावर हात ठेवून, “उशीर केला तर सगळं संपेल.” हे वाक्य उच्चारला अस सांगितलं.

परब काकू त्यांचं बोलणं तोंड ‘आ’ करून ऐकत होत्या. कधी ‘आ’ केलेल्या तोंडावर हात ठेवत होत्या. तर कधी कपाळाला हात लावत होत्या. एका दमात काकूंनी परब काकूंना त्या प्रसंगाच रसभरीत वर्णन केलं.

सावंत काकू बोलल्या “वहिनी थोडं पाणी देता का? आता कुठे माझ्या पोटात दुखायच थांबलं.”

परब काकू पटकन बोलल्या “तुमच थांबल पण माझ्या पोटात दुखायला चालू झालं ना!” दोघी मोठ्याने हसल्या.

सावंत काकूंनी विचारलं, “सांगा वहिनी ह्याचा काय अर्थ समजायचा?”

परब काकू बोलल्या, “मला वाटत दोघांचं लफडं असावा म्हणजे प्रेमप्रकरण वैगरे…”

सावंत काकू बोलल्या, “मला पण असाच संशय येतोय पण नक्की काय ते कळत नाही आहे.”

दोघींचा एकच अंदाज होता झाल्या प्रकाराबद्दल पण समोरच्याच्या तोंडून ती गोष्ट निघावी अशी दोघींची अपेक्षा होती. दोघी एकमेकींना स्वतःच्या मताचा काही अंदाज देत नव्हत्या.

शेवटी परब काकू बोलल्या, “आपण देसाई वहिनींना ही गोष्ट सांगूया का?” सावंत काकूंना त्यांचं बोलणं पटलं आणि दोघी देसाईंच्या घराकडे निघाल्या.

तिसऱ्या माळ्यावर कोपऱ्यात देसाईंची रूम होती. पण आज दोन्ही काकू एका दमात तीन मजले चढून गेल्या. दोघींच्या नवऱ्यांनी जर त्यांची लगबग बघितली असती तर ‘सांधेदुखी ही अंधश्रद्धा आहे’ अस त्यांना वाटलं असत.

देसाई काकू म्हणजे बायकांमधली अश्लील संभाषणाची डिक्शनरी. बेधडक बायकांमध्ये अश्लील डायलॉग मारून सगळ्यांचा हशा आणि टाळ्या मिळवणारी.

परब काकूंनी दार थोटावल. पाच मिनिटांनी दार उघडलं आणि ह्या दोघींना बघून मिस्टर देसाई घरच्या बाहेर गेले. ते गेल्यावर आपल्या अश्लील शैलीत देसाई काकू बोलल्या, “बरं झालं पाच मिनिटं उशिरा आलात नाहीतर आम्हाला डिस्टर्ब झाला असता.” त्यांचं बोलणं ऐकून तिघीही खळखळून हसू लागल्या.

दोघी एकत्र आल्या आहेत म्हणजे काहीतरी खास बात असणार हे ओळखून देसाई काकूंनी लगेच घराचा दरवाजा लावून घेतला आणि सरळ मुद्याला हात घालत विचारलं, “काय खबर आहे?”

ह्यावेळी परब काकूंनी पुढाकार घेत सांगायला सुरुवात केली. “ह्या सावंत वहिनी… दुपारी… संजू-सुमी… फार उशीर होईल..” अस सगळं सविस्तर आणि आपली चार वाक्य त्यात जोडत झालेला प्रकार सांगितला.

त्यांचं बोलणं ऐकून देसाई काकू आपल्या त्याच शैलीमध्ये बोलल्या, “पाय घसरला वाटत सुमीचा. दिवस पुढे गेले वाटतं. ह्या आजकालच्या मुलांना इतकी सुविधा असून सुध्दा…”

त्यांना मध्येच तोडत सावंत काकू बोलल्या, “मी परब वहिनींना पण हेच बोलत होते पण त्यांना माझ बोलणं कळलंच नाही.” परब काकू मनात विचार करत राहिल्या की ह्या कधी अस मला स्पष्ट बोलल्या होत्या.

तिघींची ह्या प्रसंगावर तीन तास खलबत झाली. सावंत काकू बोलत होत्या, “आमचा किरण जरा उनाडक्या करतो पण असल्या गोष्टींपासून लांबच असतो.”

देसाई काकू बोलल्या, “आमची राधा कधी कुठच्या मुलाकडे वर मान करून बघत नाही. अश्या गोष्टी तर तिला अजून माहीतच नसतील.”

परब काकू बोलल्या, “आमची दोन्ही पोर रूपा आणि चिन्मय पण साधीच आहेत हो. आपले तसे संस्कारच आहेत ना.”

शेवटी सावंत काकू दुखऱ्या नसेवर हात ठेवत बोलल्या, “आपण सुमीच्या घरी सांगायचं का हे सगळं?”

त्यांचं बोलणं ऐकून दोघी विचारात पडल्या. मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची? कस सांगायचं त्यांना? पण कसं असतं की दुसऱ्याच्या पॅन्टला पडलेलं ठिगळ चारचौघात त्याला दाखवून द्यायची लोकांना भारी हौस असते आणि असा आलेला चान्स तिघींना सोडायचा नव्हता.

सुमनच्या घरी हे सगळं कोणी सांगायचं हा यक्ष प्रश्न तिघींसमोर होता. परब आणि देसाई काकुंच एकमत होत की सावंत काकूंनी त्या दोघांना बोलताना बघितलं होत तर त्यांनीच सुमीच्या घरी कळवाव. पण सावंत काकू तयार नव्हत्या.

अस सरळ सांगितलं तर त्यांना राग येईल आणि कदाचित सुमीच्या घरचे भांडण काढतील ह्याची भीती काकूंना होती. योग्य वेळ बघून तिघींनी एकत्र सुमीच्या घरी कळवायच अस तिघींनी ठरवलं आणि शेवटी एकदाची संध्याकाळी पाच वाजता तिघींची बैठक संपली.

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
Read my all running stories

(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15829
Joined: 10 Oct 2014 07:07

Re: अश्लील शैली

Post by rajsharma »

दोन दिवस शांततेत गेले. तिघींच सुमीच्या घरावर लक्ष होत. पण काही विशेष हालचाल नव्हती. सावंत काकूंना आपली खबर खोटी निघते की काय ह्या बद्दल मनात धाकधूक होवू लागली.

तिसऱ्या दिवशी मात्र सकाळपासूनच सुमीच्या घरात गडबड दिसू लागली. तीन चार वेळा सुमीचा भाऊ आणि वडील बाहेर जावून आले. येता जाता त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते आणि ही गोष्ट ‘सी सी टीव्ही’ काकूने बरोबर कॅच केली.

आता हीच योग्य वेळ आहे, सुमीच्या घरी जावून, त्यादिवशीच्या प्रसंगाबद्दल तिखट-मीठ लावून सांगायची, हे सावंत काकूंनी बरोबर हेरलं. परब आणि देसाई काकूंना घेवून त्यांनी सुमीच घर गाठलं.

संध्याकाळचे सहा वाजले होते. सुमीचा भाऊ आणि वडील परत घरातून बाहेर गेले आणि हीच योग्यवेळ साधून तिघी सुमीच्या घरी गेल्या. सावंत काकूंनी दरवाजा हलकासा थोटवला. सुमीच्या आईने म्हणजे निकम काकूंनी पटकन दरवाजा उघडला.

त्यांच्या चेहऱ्यावर हलकस हसू होत पण दरवाजात ह्या तिघींना बघताच त्यांचा चेहरा पडला. कदाचित दुसरं कोणीतरी अपेक्षित माणूस आलं आहे असं समजून त्यांनी दरवाजा खोलला असावा. त्यांच्या चेहऱ्याचा हावभाव बदललेला बघून तिघींना खात्री पटली की नक्कीच सुमीची काहीतरी गडबड झाली असेल.

चेहऱ्यावर उसनं हसू आणत निकम काकूंनी त्यांना आत बोलावलं. तिघी आत येताच काकूंनी दरवाजा बंद करून घेतला. पहिली पाच मिनिटं कोणी काही बोललं नाही. तिघीजणी एकमेकींना इशारा करत होत्या पण कोणीपण बोलायला सुरुवात करत नव्हतं.

शेवटी सावंत काकूंनी धीर एकवटत तिर सोडला, “सुमी कुठे दिसत नाही आहे?”

सावंतकाकूंचा हा तिर निकम काकूंच्या बरोबर वर्मी लागला आणि पदर डोळ्याला लावून निकम काकू हुंदके देवू लागल्या. तिघीजणी उठून, “काय झालं? काय झालं?” असं विचारत त्यांची सांत्वन करू लागल्या.

निकम काकू सांगू लागल्या, “काल रात्री सुमी उलट्या करत होती.”

उलट्या म्हटल्यावर तिघीं एकमेकींकडे बघू लागल्या. काकू पुढे सांगू लागल्या, “सुमी आज सकाळी लवकर घरच्या बाहेर पडली आणि अजून तिचा पत्ता नाही आहे. सकाळपासून तिचा मोबाईल स्विच ऑफ लागत आहे. कुठे गेली असेल पोर? काय झालं असेल तिला? काहीच कळायला मार्ग नाही आहे.” असं बोलून निकम काकू रडू लागल्या.

“रडू नका येईल ती सुखरूप,” परब काकू बोलल्या.

थोड्या शांत झाल्यावर निकम काकू बोलल्या, “आज सुमीला बघायला पाहुणे येणार होते. सुमीचा काही पत्ता नाही म्हटल्यावर आम्ही त्यांना नका येवू अस कळवलं. दिनू आणि हे सकाळपासून बऱ्याच ठिकाणी तिचा शोध घेवून आले पण सुमीचा काही ठाव ठिकाणा लागला नाही. कुठे गेली पोर काय माहीत.”

सावंत काकूंनी जरा भीतभीत विषयाला हात घालायचा अस ठरवलं आणि बोलल्या, “निकम वहिनी, राग येणार नसेल तर एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. म्हणजे त्या गोष्टीचा सुमीच्या गायब होण्याशी काही संबंध आहे की नाही हे माहीत नाही पण…”

त्यांचं बोलणं मध्येच तोडत निकम काकू बोलल्या, “सुमीला शोधायला त्या गोष्टीमुळे मदत होणार असेल तर लवकर सांगा. मला राग येणार नाही.”

सावंत काकू सांगू लागल्या “त्यादिवशी दुपारी… जिन्यावर… संजू-सुमी… फार उशीर होईल..वैगरे.. वैगरे..” सगळं सविस्तर सांगून झाल्यावर सावंत काकू बोलल्या, “आपण संजूला विचारलं तर सुमीचा काहीतरी ठावठिकाणा लागेल अस मला वाटत. सुमी माझ्या मुलीसारखी आहे. वहिनी मला पण तिची खुप काळजी वाटत आहे.”

निकम काकूंना सावंत काकूंच्या बोलण्याचा राग आला होता पण सावंत काकुंच बोललं सध्य परिस्थितीला पूरक वाटत होतं. शेवटी नाईलाजाने कोणालातरी संजूला बोलावून आणायला त्यांनी सांगितलं. पण संजू सकाळीच लवकर घरातून बाहेर गेला आहे आणि त्याचा मोबाईल पण स्विच ऑफ लागत आहे अशी माहिती मिळाली.

आता सगळ्यांना खात्री पटू लागली की सुमी गायब होण्याच्या मागे संजूचा काहीतरी हात आहे. एव्हाना हळूहळू सुमी गायब झाल्याची खबर चाळीमध्ये पसरू लागली. त्याच बरोबर संजू सुध्दा गायब असल्यामुळे तर्कवितर्क ना उधाण आलं होतं. सावंत काकू रिपोर्टरच एक मोठं मिशन पूर्ण झाल्यासारख्या चाळीमध्ये वावरत होत्या. त्या स्वतःच्या कामगिरीवर भलत्याच खुश झाल्या होत्या.

रात्री नऊ वाजले. निकम कुटुंबियांनी आता पोलीस तक्रार करायचा निर्णय घेतला. सगळी चाळ निकमांच्या घराच्या अवतीभवती जमली होती. तितक्यात एक रिक्षा चाळीच्या गेटच्या आत येवून थांबली आणि आतून संजू उतरला. हातात मोठा हार होता आणि मिठाईचा पुडा होता.

त्याला बघताच पूर्ण चाळ खाली उतरली. दिनू आणि निकम काका धावत खाली गेले आणि संजूला धरत त्यांनी सुमीबद्दल त्याला विचारायला सुरुवात केली. संजू त्यांच्या प्रश्नांची नीट उत्तर देत नव्हता. त्यामुळे ते अधिकच चिडले. पोलिसांना बोलावून त्याला त्यांच्या ताब्यात द्यायचा ते विचार करू लागले.

संजूला निकम कुटुंबीयांनी धरल्याबरोबर संजूच्या घरचे पुढे सरसावले आणि त्यांची निकम कुटुंबाबरोबर तू तू मै मै चालू झाली. सावंत काकूंनी त्यांच्या मधेच जात सुमी-संजूच्या त्यादिवशीच्या भेटीचा प्रसंग सगळ्यांसमोर सांगितला आणि आगीत तेल ओतायचे काम चोख बजावले.

चाळीत एकच गोंधळ चालू झाला. सगळेच संजू दोषी असल्यासारखे निकमांच्या बाजूने बोलू लागले आणि अचानक एक ओलाची कार हॉर्न वाजवून चाळीच्या आवारात शिरली.
Read my all running stories

(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15829
Joined: 10 Oct 2014 07:07

Re: अश्लील शैली

Post by rajsharma »

हॉर्नच्या आवाजाने सगळे शांत झाले. कार थांबली आणि त्यातून सुमी उतरली. तिच्या मागून किरण बाहेर आला. सुंदर असा शेरवानी घातलेला किरण आणि त्याच्या बाजूला पैठणी घातलेली नाजूक सुंदर सुमी.

दोघंही हातात लग्नाचे हार घेवून उभे राहिले. त्यांना बघताच सगळे आश्चर्याने तोंडाचा आ वासून बघत राहिले. चाळीमध्ये एका क्षणात स्मशान शांतता पसरली. पाच मिनिटं कोणी बोललं नाही. सगळ्यांना त्या दोघांना बघून शॉक लागला होता.

अजून एक ओला कार चाळीत शिरली. आता ह्यातुन कोण आलं आहे हे बघण्यासाठी सगळ्यांचे डोळे त्या कारवर केंद्रित झाले. कार मधून राधा, रूपा आणि चिन्मय उतरले. आता हे कुठून आले? हा नवीन प्रश्न सगळ्यांना पडला.

निकम कुटुंबीयांनी संजूला धरून ठेवलं होतं पण किरण-सुमीला बघताच त्याला पटकन सोडल. संजू आपले नवीन कपडे आणि केस एका हाताने नीट करत ऐटीत चाळीच्या आत शिरला आणि किरणच्या घराच्या दिशेने गेला. सगळे संजूच्या कृतीकडे बघू लागले.

संजूने हातातला मोठा हार दरवाज्याच्या चौकटीला तोरणासारखा बांधला. हातातील मिठाईचा पुडा फोडत त्याने त्यातला एक पेढा एका छोट्या मुलाला भरवला आणि तो पुडा त्या मुलाच्या हातात देत सगळ्यांना वाटायला सांगितला.

सावंत काकू पुरत्या गोंधळल्या होत्या. त्या एकदा संजूकडे बघत होत्या आणि एकदा किरण-सुमीकडे बघत होत्या. त्यांनी जे लपून ऐकलं होतं, अंदाज बांधले होते त्याच्या अगदी विपरीत समोर दिसत होतं. परब, देसाई आणि निकम काकू रागाने सावंत काकूंकडे बघत होत्या.

संजू, किरण, सुमी, राधा, रूपा आणि चिन्मय एकत्र एका बाजूला येवून उभे राहिले. सावंत काकू त्यांच्या जवळ जात संजूला विचारू लागल्या, “मी तुला आणि सुमीला त्यादिवशी लपूनछपून बोलताना बघितलं होत. तु बोलत होतास की लवकर निर्णय घे आणि ही बोलत होती की आता फार उशीर झाला आहे. काय बोलत होता तुम्ही? तसेच काल रात्री सुमीला उलट्या होत होत्या ह्याचा अर्थ काय?”

संजू हलकासा हसून बोलला, “काकू मी सुमीला लग्नाबद्दल लवकर निर्णय घे हे सांगत होतो आणि ते पण माझ्या आणि सुमीच्या नाही तर किरण-सुमीच्या लग्नाबद्दल बोलत होतो.”

सुमी बोलली, “मला बघायला आज पाहुणे येणार होते आणि कदाचित आजच माझं लग्न ठरवलं असत घरच्यांनी. म्हणून मी त्यादिवशी बोलत होते की आता फार उशीर झाला आहे. मला काल रात्री उलट्या होत होत्या हे खरं आहे पण ते आजच्या लग्नाच्या निर्णयाबद्द्ल विचार करून मला झोप लागत नव्हती आणि त्यामुळे मला ऍसिडिटी झाली होती.”

सावंत काकू बोलल्या, “पण आम्ही कसा विश्वास ठेवायचा तुमच्या दोघांच्या बोलण्यावर?”

इतका वेळ गप्प असलेला किरण अचानक बोलला, “विश्वास ठेवावा लागेल आई, कारण त्यावेळी मी पण तिकडेच होतो. आम्ही तिघे बोलत होतो आणि जेव्हा तू आमचं बोलणं लपून ऐकलंस त्यावेळी नेमका मी गप्प होतो. त्यामुळे तुला हे दोघंच बोलत आहे अस वाटलं. अण्णा वरतून खाली येत होते म्हणून मी पिंपाच्या मागे लपलो. सुमी वरती पळाली आणि संजू खाली पळाला.”

राधा बोलली, “आम्हाला सगळ्यांना किरण आणि सुमीच्या प्रेमाबद्दल माहीत होतं. दोघंही शिकलेली आणि चांगली नोकरी करणारे आहेत. मग आम्ही ठरवलं की त्यांना कोर्ट म्यारेज करण्यासाठी मदत करायची. म्हणून आम्ही चौघे म्हणजे मी, संजू, रूपा आणि चिन्मय त्यांच्या लग्नाला साक्षीदार म्हणून सही करण्यासाठी गेलो होतो.”

चिन्मय बोलला, “म्यारेज कोर्टातील गर्दी आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी संजू सकाळपासूनच कोर्टात होता. म्हणून तो सकाळी लवकर घरातून बाहेर पडला होता. कोर्टात असल्यामुळे त्याने मोबाईल बंद ठेवला होता.”

रूपा बोलली, “सुमीला पण आम्ही मोबाईल सकाळपासून बंद ठेवायला सांगितला होता. सुमीला पैठणी नेसवून तयार करण्यासाठी मी तिला माझ्या मैत्रिणीच्या ब्युटी पार्लर मध्ये घेवून गेली होती आणि चिन्मयने किरणला आपल्या मित्राच्या घरी नेवून त्याला तय्यार केल.”

सावंत काकू, परब काकू आणि देसाई काकू ह्यांची तोंडात मारल्यासारखी स्थिती झाली होती. आपली मुलं कशी आहेत आणि आपण त्यांच्याबद्दल किती चुकीचा विचार करत होतो ह्याविचाराने त्या खजील झाल्या.

किरण-सुमी सावंत काकूंच्या पाया पडले. सावंत काकूंनी प्रेमाने दोघांना मिठीत घेतलं आणि मनोमन सी सी टीव्हीची सर्व्हिस आता कायमची बंद करत आहे, असं जाहीर केलं.


,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
Read my all running stories

(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
Post Reply