हमारी अधुरी कहानी...
लेखिका - रेखा.
++++++++++++++++
"साहेब... प्रधानसाहेबांनी बलवलं जी..." कामात गुंग असलेल्या नरेनच्या कानावर शब्द पडले तशी त्याने मान वर केली. समोर ऑफिसचा प्युन राघब उभा होता. नेहमीसारखा तोंडात मावा (नागपुरी भाषेत.... खरीं) चघळत उभा होता.
"साल्या रच्या... तुला कितीदा सांगायचं खर्रा खाऊन माह्या समोर नाही यायचं म्हणून... साली नुसती त्या तंबाखूची वास... आणि काय म्हणतो बॉस?..." त्याच्या सवयीवर नरेनने झापत त्याला विचारले.
"आतं मले का मालूम जी... तुम्हीच पहा काय काम हाय तर?... आन तिले बी बलवलं..."
"कोण बे?..."
"अनि... ती... दोन टेबलाबाजुची..."
"अवंतिका?..."
"व्हय... जाबा लवकर... ती जाऊन पाच मिनिटं झाली... अन माह्या खवर असं बोलत नका जाऊ जी..." जाताजाता राघव म्हणाला.
"मग ऑफिसात खाऊन नाही फिरायचं अन माझ्याजबळ तर बिलकुल न्हायी..." म्हणत तो उभा झाला, तोबर राचब निघून गेला होता.
नरेन विचार करतच प्रधानसाहेबांच्या कॅबिनकडे जाऊ लागला. त्याच्या बरोबरीतल्या कलिग्जमध्ये नरेन तसा टॉप परफॉर्मर होता पण दोन वर्षांआधी अवंतिका आल्यापासून त्याचे बरेचशे प्रोजेक्ट्स तिला सोपवण्यात आले... आणि बहाणा दिला त्याच्यावरील ओव्हरबर्डनचा. ती यायच्या आधी सर्वात जास्त प्रोजेक्ट्स तो आणि त्याची टीम सांभाळायची पण आता खूप काही बदललं होतं... तशी त्याच्यापेक्षा ज्युनिअर होती पण तिला मिळत असलेल्या स्पेशल वागणुकीमुळे त्याला संतापसुद्धा यायचा... पण काय करणार?... आता नोकरी म्हटल्यावर सगळं आपल्या मनासारखं होत नाही ना... त्यातच मागच्या वर्षी त्याच्याऐवजी तिला प्रमोशन देऊन त्याच्या बरोबरीत आणलं होतं... आणि त्यामुळे तो जरा जास्तच व्यथित झाला होता.
।
स
प्रधानच्या आधी कुलकर्णी त्याचा बॉस होता. एका तर्हेने कुलकर्णीचा शिष्य म्हटलं तरी वावगं ठरणार नाही... कुलकर्णीच्या हाताखाली तो बरंच काही शिकला होता पण कंपनीने कुलकर्णीला दुसऱ्या ठिकाणी ट्रान्स्फर केले आणि त्यानंतर कुलकर्णीच्या जागी प्रधान आला. त्या गोष्टीला आता तीन वर्षे झाली होती. प्रधान आल्याचा दोन-तीन महिन्यातच त्याने नरेनच्या टीमचेसुद्धा इतर डिपार्टमेंटमध्ये ट्रान्सफर केले... नवीन अपाँच्ची नेटीच्या नावाखाली!!! ... हे सगळं होते ना होते तेच तो आल्यान्या आठ-दहा महिन्यात अतिकाने कंपनीत प्रवेश केला
होता.
अवंतिका आली त्याच्या दोन महिन्यातच नरेनचा ज्युनिअर रोहनला लो-परफॉर्मरच्या नावाखाली दुसरीकडे हकालपट्टी करण्यात आली. आता झुंज होती ती त्याच्यात आणि अतिकात. बाकी कलिग्ज आपापल्या कुवतीनुसार काम करायचे पण एखादे नवीन प्रोजेक्ट आले की ते या दोघांपैकी कोण्या एकाच्या हातातच पडायचे. त्यामुळे त्या दोघांत न दिसणारी स्पर्धा होतीच आणि प्रश्नानसाहेबांमुळे ती स्पर्धा त्याच्यासाठी थोडी कठीण झाली होती कारण प्रधानचा कल नेहमीच अवंतिकाकडे असायचा पण कामातील एक्सपर्टाईज नरेनकडे असल्याने प्रधानलासुद्धा बरेचदा विचार करूनच तो प्रोजेक्ट द्यावा लागायचा... पण इतकं असलं तरी अनंतिका त्याची एक नंबर पिटू होती. त्यामुळे त्यांच्या लेव्हलच्या बऱ्याचशा गोष्टी प्रधानपर्यंतसुद्धा पोहोचायच्या आणि त्यामुळे बरेचदा नरेनला व बाकीच्यांना त्याचे बोलणे ऐकाने लागायचे.
नरेनच्या कानावर आणखी एक उड़ती बातमी पोहोचली की कुलकर्णी व प्रधान सुरुवातीला एकाच कंपनीत होते आणि तेव्हापासून त्यांच्यात चढाओढ आहे... आणि बहुतेक कुलकर्णीवरचा राग तो आपल्यावर काढत असावा असे त्याला बरेचदा बाटायचे... पण ते केवळ त्याचे मत होते. पण काहीही का असेना?... त्यांच्यात एकूणच सगळं काही "ऑल-बेल" नव्हतंच. थोडा आऊट-स्पोकन असल्याने बरेचदा त्यांच्यात वादसुद्धा झाले होते आणि त्याचा बदला प्रधानाने त्याचे प्रमोशन डावलून घेतला होता. विचारात मग्न असतानाच तो प्रधान साहेबांच्या को बनजवळ पोहोचला आणि दारावर नॉक केलं.
"कम इन..." आतून प्रधान साहेबांचा आवाज आला तसा तो दार उघडत आत शिरला, "... या मिस्टर नरेन... टेक असीट.."
"थेंक यु सर..." म्हणत तो एका खुर्चीवर बसला आणि शेजारी बसलेल्या अतिकावर एक जळजळीत कटाक्ष टाकला.
"नरेन अँड अबंतिका... लिसन केयरफुली गाईंज..." दोघांकडे पाहत प्रधान बोलू लागले...
कॅबिनमध्ये बराच वेळ फक्त प्रधानच बोलत होते. अवंतिका आणि नरेन केवळ हो की नाही इतकंच काहीतरी बोलत होते नाही तर केवळ मान हलवत होते. तिघांची मिटिंग जवळपास पंचेचाळीस मिनिटे चालली. मुद्दा होता दिल्लीमध्ये संपन्न होणाला एक्झिबिशन बद्दल. आजकाल रियल इस्टेट इंडस्त्री मधील जीवघेण्या प्रतिस्पर्धेत स्वतःच्या कंपनीचे भवितव्य टिकवून ठेवणे म्हणजे खूप चॅलेंजिंग काम. दिल्ली व उत्तर भारतात कंपनीचे नाब पसरवण्यास हा खूप चांगला मोक्का होता आणि कंपनीने त्याची जबाबदारी प्रधानबर टाकली. प्रधानसमोर केवळ दोनच ऑप्शन होते... नरेन आणि अतिका.
[
नरेनच्या काबिलीयतबर त्याचा पूर्ण विश्वास होता पण मनापासून तो त्याला आवडत नव्हता... कारण... नरेनचा एक्स-बॉस कुलकर्णी आणि अवंतिका ते काम नीट करू शकणार नाही हेसुद्धा प्रधान ओळखून होता. म्हणून त्याने पूर्ण विचार करूनच त्या दोघांनाही दिल्लीला पाठवायचे ठरवले. त्या गोष्टीमुळे त्याचे दोन ध्येय साध्य होणार होते. एक तर अतिकामुळे त्याला सर्व गोष्टी ऑफिसात बसल्याबसल्या कळणार होत्या आणि दुसरं म्हणजे काही गडबड झाली तर सर्व खापर नरेनच्या डोक्यावर फोडून त्याला बाहेरचा मार्ग दाखवू शकणार होता जेणेकरून चेल्यामुळे गुरूचा... म्हणजे कुलकर्णीचा अपमान करण्याची आणि त्यांना खाली दाखवण्याची आयती संधी त्याला मिळणार होती.
प
सर्व गोष्टींनी अनभिज्ञ अतिका आणि नरेन मीटिंगनंतर दिल्लीच्या एक्झिबिशनच्या कामाला लागले याआधी नरेनने दोन-चार एक्झिबिशनमध्ये कपनीचे प्रतिनिधित्व केले होते त्यामुळे त्याला ह्या सर्वांची जाणकारी होती. त्याने आपल्या आणि अवंतिकाच्या टीममधील मिळून एकूण सहा जणांची टीम तयार केली आणि प्रत्येकाला त्यांचे काम योग्यरीत्या समजावले.
एक्झिबिशनच्या एका दिवसाआधी अवंतिका बगळून सर्व टीम दिल्लीला पोहोचली. प्रधानसाहेबांच्या मेहरबानीने अतिका एक्झिबिशनच्या ऐन दोन तास आधी पोहोचली आणि अशी मिरवू लागली जशी ती स्वतः त्या सगळ्यांची बॉस आहे. नरेनला या सगळ्या गोष्टींची कल्पना आली पण त्याने काहीही रिऍक्ट न करता टीमला शांत राहण्यास सुचवले आणि सगळे लक्ष आपापल्या कामात लावण्यास सुचवले.
पहिला दिवस खूप चांगला गेला. एक्झिबिशनमध्ये आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या कंपनीच्या मॉडेल्सची खूप वाहवा केली शिवाय ग्राहकांनी त्यांना दिल्ली, एनसीआर आणि उत्तर भारतातील भविष्यातील योजनांविषयी विचारपूसही केली. टीमने अत्यंत सोप्या शब्दात त्यांना त्यांचे कंपनीच्या प्रोजेक्ट्सबद्दल माहिती पुरवली. तेसुद्धा एक एक करून एक्झिबिशनमध्ये फिरले... अर्थात त्याला अवंतिकाचा विरोध होता पण नरेनने त्यांना मोकळीक दिली... एक्झिबिशन पाहून काहीतरी शिकायला मिळेल हे सांगत त्याने तिचा विरोध मोडून काढला. त्यामुळे दोघात थोडीशी बाचाबाची झाली पण तो लीड करत असल्याने तिला माघार पत्करावी लागली.