इश्क - Marathi love stori

User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

Re: इश्क - Marathi love stori

Post by rangila »

16
ईटरनीटी…
ए प्युअर ब्लिस्स…
तो क्षण किती वेळाचा होता दोघांनाही ठाऊक नाही.
कदाचीत काही सेकंद..
कदाचीत एखादा मिनिटं..
कदाचीत कित्तेक मिनिटंही…
जणू सर्व काळ त्या क्षणापुरता थांबुन गेला होता. समुद्राच्या लाटा, वार्यालच्या झुळुकीने हलणार्या नाराळाच्या झाड्यांच्या झावळ्या, एकसंध आकारात उडणारे पक्षांचे थवे.. सर्व काही..
राधा आणि कबीर भानावर आल्यावर एकमेकांपासुन दुर झाले.
“वॉव्व.. आय… आय नीड अ बिअर…”, खाली मान घालुन कपाळ चोळत कबीर म्हणाला..
“का रे? टेस्ट आवडली नाही का?”, पहील्यासारखेच खळखळुन हसत राधा म्हणाली..
“तु ना.. खरंच.. अशक्य आहेस…” कबीर..
“तु मला ओळखलं कुठे आहेस अजुन? चल जाऊ या? उशीर होतोय.. अजुन ६ तासाचा ड्राईव्ह आहे…”, असं म्हणुन राधा कारकडे जाऊ लागली.
कबिर अजुनही तिच्या पाठमोर्याज आकृतीकडे बघत होता. राधा अगदी तश्शीच दिसत होती जशी त्याने त्याच्या पुस्तकात ‘मीरा’ रंगवली होती.
अचानक त्याच्या डोक्यात प्रकाश पडला..
“राधाssss..”, त्याने जोरात हाक मारुन राधाला थांबवलं आणि तो धावत धावत तिच्या जवळ गेला.
“काय झालं?”, राधा वाळूमध्ये बसुन त्यातले शंख शिंपले गोळा करत होती..
“हे.. हे तु सर्व आधीच प्लॅन केलं होतंस ना?”
’हे म्हणजे? शंख-शिंपले? त्यात काय प्लॅन करायचंय, दिसले म्हणुन घेतेय.. तुला नाही आवडंत?”
“शंख-शिंपले नाहीत स्ट्युपीड… किस्स.. तु आधीच प्लॅन केला होतास ना?”, कबिर वैतागुन म्हणाला
“ऑफ़कोर्स नॉट.. इट वॉज स्पॉन्टॅनिअस…”
“ओह नो.. इट वॉज प्लॅन्ड.. तु हे नक्कीच आधीच ठरवलं होतंस राधा..”, कबिर खात्रीने म्हणाला..
“नाही कबिर.. हे असं कुणी आधीच ठरवुन करतं का?”
“हो.. तु केलं आहेस.. नाही तर तुझे कपडे.. तुझी हेअर-स्टाईल.. तुझे डायलॉग्ज.. सगळंच कसं त्या कथेनुरुप होतं..”
“ओह.. ओह खरंच की कबिर.. योगायोग अजुन काय..”, अडखळत राधा म्हणाली
“यु वेअर रॉंग राधा.. मी तुला चांगला ओळखतो…
“नो कबिर.. बट एनिवेज.. तुला तसं वाटतं तर तसं..सो व्हॉट…?”
“देन इट वॉज नॉट ए किस्स टु से थॅंक्यु…”
“अज्जीब्बात नाही.. आणि भारतात, अजुन तरी थॅंक्सचा किस्स गालावर देतात.. ओठांवर नाही..”
“तेच मला म्हणायचंय.. मग तु मला किस का केलंस?”, आपला पॉईंट प्रुव्ह झाल्यासारखा कबिर म्हणाला..
राधा आपले कपडे झटकत उठुन उभी राहीली… “आपण हे गाडीत बोलुयात का? सुर्य ऑलमोस्ट बुडालाय समुद्रात…”
“नाही.. मला आत्ता.. इथे.. ह्या क्षणालाच उत्तर पाहीजे.. आजचा दिवस खुप मस्त गेला राधा.. आपल्या दोघांसाठी.. लेट्स पुट अ क्रिम ऑन इट.. पट्कन सांग सुर्य पुर्ण अस्ताला जाण्याआधी..”, कबिर
“तु काय वकीलीचं ट्रेनिंग घेऊन आला आहेस का आज? आधी तिकडे पोलिस-स्टेशनमध्ये कसले एकावर एक फंडे मारत होतास.. आणि इथे प्रश्नावर प्रश्न…”
“विषय बदलु नकोस.. राधा सुर्य मावळतो आहे.. प्लिज बोल..”
“अरे काय चाल्लंय.. सुर्य मावळतो.. सुर्य मावळतोय.. चल प्लिज जाऊयात इथुन…”
राधाच्या मनामध्ये चाललेला गोंधळ तिच्या चेहर्याळवर स्पष्ट दिसत होता.
“कबिर तु म्हणालास ना तु ओळखतोस मला? मग झालं तर.. तुला उत्तर माहीती असेलच ना?”
“माहीती आहे.. पण मला तुझ्याकडुन ऐकायचंय राधा..”
“का पण? समजुन घे ना तु?”
“हे बघ राधा.. मी एक लेखक आहे. आणि पुस्तकांमध्ये प्रत्येक गोष्ट पात्रांच्या तोंडुन यावी लागते. वाचक समजुन घेतील, त्यांना कळेल वगैरे गोष्टींना अर्थ नसतो. चित्रपटांमध्ये हाव-भाव करुन सांगता येतं, पुस्तकांत नाही..”
“हे पुस्तक नाहीए ना पण…”
“कमॉन राधा.. किस करताना तु लाजली नाहीस.. मग आता काय होतंय एव्हढं…”
“हे सगळं आत्ताच बोलायला हवं का?”, राधा
“हो.. आत्ताच.. तुझा काही भरवसा नाही, त्या दिवशी सारखी रात्रीतुन गायब होशील…”, कबिर चिडुन म्हणाला..
राधा पुन्हा एकदा खळखळुन हासली… तिने एक दीर्घ श्वास घेतला.., कबिरचे दोन्ही हात हातात घेतले आणि मान खाली घालुन ती कबिरच्या जवळ जाउन थांबली..
तिची नजर अजुनही जमीनीकडेच खिळलेली होती. मनात येणारे हासु दाबण्याच्या प्रयत्नात तिचे चिक-बोन्स फुगुन वर आले होते. सुर्यास्ताच्या प्रकाशाने का अजुन कश्याने कुणास ठाऊक पण तिच्या गालावर एक लालसर छटा पसरली होती.
“आय…..”..मोठ्या प्रयत्नांनी तिने पहीला शब्द उच्चारला..
जणु काही मनातल्या मनात एक ते दहा आकडे म्हणुन होइपर्यंत राधा थांबली आणि मग पुढे म्हणाली…
“लव्ह…..”
ह्यावेळी मनातल्या आकड्यांची संख्या एक ते किती होती कुणास ठाऊक… पण तिने बर्याचच वेळानंतर कबिरकडे बघीतले. तिची ती नजर.. ज्याने कबिरच्या काळजाचा अनेक-वेळा वेध घेतला होता, ज्याने कबिरला तिच्यासाठी वेडापिसा बनवले होते, जिच्यासाठी कबिर खरोखरच सगळं जग मागे सोडुन यायला तयार होता..
ती बराच वेळ कबिरच्या डोळ्यात काही तरी शोधत होती. त्या क्षणामध्ये कबिरला तिची नजर जणु त्याच्या डोळ्यामार्गे त्याच्या मनामध्ये, तिच्यासाठी लिहीलेल्या भावना वाचते आहे असेच वाटुन गेले.
जेंव्हा तिची खात्री पटली तेंव्हा राधा पुढे म्हणाली…
“….. यु”
कबिरने तिला जवळ ओढले आणि घट्ट मिठी मारली. त्याला आयुष्याकडुन अजुन काहीही नको होते. जे त्याला हवं होतं, ज्यासाठी तो गेले काही महीने तडफडत होता.. ते त्याला मिळालं होतं. त्याने आकाशाकडे पाहीलं आणि दोन बोटं कपाळाला टेकवुन सलाम ठोकला.
अर्थात.. पुढे काय होणार आहे ह्याची त्याला त्या क्षणी कल्पना नव्हती…

अंधार पडायला लागला तसं दोघंही कारपाशी परतले.
कबिरने राधाला थांबवले, स्वतः दार उघडले आणि राधाला आत बसायची खुण केली..
“अरे बापरे.. इतका रिस्पेक्ट… आय एम फ्लॅटर्ड..”, गाडीत बसतं राधा म्हणाली.
“ये तो शुरुवात है.. आगे आगे देखो होता है क्या..”, असं म्हणुन कबिरने गाडी सुरु केली आणि दोघंही गोव्याला जायला निघाले..
गाडीमध्ये कोणीच कुणाशी बोलत नव्हतं. त्याच दिवशी सकाळी दोघं एकमेकांशी इतकं काही काही बोलत होते, पण आता मात्र बोलायला शब्दच सापडत नव्हते.
कबिरला तर शरीर पिसासारखं हलकं हलकं झाल्यासारखं वाटत होतं. म्युझिक-सिस्टीमवर अर्जित-सिंगची गाणी वाजत होती. प्रत्येक गाण, गाण्यातले प्रत्येक शब्द कबिरला जणु आपल्यासाठीच लिहीले आहेत असंच वाटत होतं.

चोहोबाजुला गर्द झाडी, थंडगार वारा.. कबिरला हा प्रवास कधीच संपु नये असंच वाटत होतं.
दुसर्याु दिवशी मस्त बाईक घेऊन राधाबरोबर गोवा फिरण्याची स्वप्न रंगवण्यात कबिर बुडुन गेला होता. फोन वाजला तसा तो भानावर आला.
मोनिकाचा फोन होता.
कबिरने काही क्षण फोनकडे बघीतले आणि फोन बंद करुन ठेवुन दिला.
परंतु थोड्यावेळाने पुन्हा फोन वाजला.
“अरे फोन वाजतोय.. घे ना..”, राधा कबिरला म्हणाली..
क्षणभर चलबिचल झाल्यावर कबिर म्हणाला… “मोनिकाचा आहे.. काय करु? घेऊ का नको घेऊ?”
“तुझी मर्जी.. मी काय सांगु?”, खांदे उडवुन राधा म्हणाली.
कबिरने गाडी कडेला लावली आणि फोन उचलला.
“हॅल्लो.. कबिर! कुठे आहेस?”, मोनिका
“गोव्याला.. का? काय झालं?”, कबिर
“कुणाबरोबर?”, मोनिका
“काय झालं काय?”, कबिर
“कबिर.. मी विचारलं, कुणाबरोबर आहेस?”
“राधा…”
“कबिर.. तुला काहीच वाटत नाही का रे? का माझ्या मनाची काहीच पर्वा नाहीए तुला? इतका निर्दयी कसा असु शकतोस तु?” , मोनिका
“निर्दयी? आणि मी? आणि तु मला असं अचानक सोडुन निघुन गेली होतीस तेंव्हाचं काय?”, कबिर
“कबिर.. मी दहा वेळा माफी मागीतली तुझी.. अजुन दहा हजार वेळा सॉरी म्हणायला तयार आहे? तु जरा पण आपल्या दोघांबद्दल विचार करणार नाहीयेस का?”
“मोनिका.. मला वाटतं ती वेळ आता निघुन गेली आहे..मी तुला तेंव्हा पण सांगीतलं आणि आता पण सांगतोय.. आपण त्यां त्याच गोष्टींवर बोलुन खरंच काही अर्थ नाहीए…”
“पण कबिर…”
“मोनिका प्लिज.. आय एम इन रिअल्ली गुड मुड राईट नाऊ, अॅ न्ड आय डोन्ट वॉंन्ट टु स्पॉईल इट.. आपण मी परत आल्यावर बोलुयात ओके.. बाय..”, असं म्हणुन मोनिकाला बोलायची संधी न देता कबिरने फोन बंद केला..

राधा इतका वेळ त्यांच बोलण ऐकत होती.
कबिरने राधाकडे बघीतलं. राधा थोडी अपसेट दिसत होती.
“तुला नाही आवडलं का तिने फोन केलेला?”, कबिर हसत म्हणाला..
राधा काहीच बोलली नाही.
“समबडी इज बिकमींग पझेसिव्ह..”, हसत हसत कबिर म्हणाला
राधा खिडकीतुन खाली दिसणारा समुद्र बघत होती.
“ओके.. दोन मिनीटं खाली उतर…”, कबिर राधाला म्हणाला.
“कबिर प्लिज.. आधीच उशीर झालाय.. इथे असं आडवळणावर नको थांबुयात..”, राधा
“फक्त दोनच मिनीटं.. थोडे पाय मोकळे होतील…”, कबिर
राधा आणि कबिर दोघंही खाली उतरले.
एखाद्या परिकथेमध्ये वर्णावे तसं ते दृश्य होतं. एव्हाना सर्वत्र अंधार पडला आणि पोर्णिमेच्या चंद्राच्या चांदण्याने रस्ता न्हाऊन निघाला. घाटातुन खाली दुरवर पसरलेल्या समुद्राचं चांद्रप्रकाशात चमचमणारं पाणी सुंदर दिसत होतं. सर्वत्र निरव शांतता होती.
कबिर राधाच्या समोर आला आणि एक पाय वाकवुन गुडघ्यावर खाली बसुन राधाचा हात हातात घेत म्हणाला..
“लेट्स गेट मॅरीड राधा….”
“एक्स्युज मी? व्हॉट?”, राधा म्हणाली..
“आय सेड.. लेट्स गेट मॅरीड”, कबीर
“पण तुला माहीते.. ते शक्य नाहीए…”, कबिरच्या हातातुन हात सोडवुन घेत राधा म्हणाली
“हो म्हणजे.. आय नो.. यु आर स्टील मॅरीड.. तुमचा डिव्होर्स झाला नाहीए.. पण आज ना उद्या होईलच ना…”, कबिर
“नो कबिर.. प्रश्न डिव्होर्सचा नाहीचे…”
“मग?”, कबिर उठुन उभा राहीला
“आय डोंन्ट वॉंट टु बी इन रिलेशनशिप..”, राधा म्हणाली..
“आय डोंन्ट गेट ईट… काल तु मला किस केलंस.. स्वतःहुन ‘आय-लव्ह-यु’ म्हणालीस.. मग?”, कबिर
“मग? आय लsssव्ह यु…”, लव्ह शब्दावर जोर देत राधा म्हणाली.. “आय स्टील लव्ह यु कबिर.. पण ह्याचा अर्थ असा नाही होतं की आपण लग्न करावं”
“मला तु आवडतेस… तुलाही मी आवडतो.. मग लग्न करण्यात प्रॉब्लेम काय आहे?”, गोंधळुन कबिर म्हणाला
“कबिर.. मी आधीच्या लग्नातुन बाहेर का पडले ते तुला माहीती आहे ना.. मी..मला स्वातंत्र्य हवंय कबिर.. आय वॉंन्ट टु लिव्ह लाईफ़ ऑन माय टर्म्स…”
“ठिक आहे ना मग.. मी तुला प्रॉमीस करतो की तुला.. किंवा तुझ्या स्वातंत्र्यात मी कधीच येणार नाही.. तुला तुझं आयुष्य जसं जगायचंय तसं जगायला तु मोकळी आहेस..”, कबिर
“ओके.. काल तु वकिल झाला होतास.. आता मी वकिल होते..”, कबिरला थांबवत राधा म्हणाली..”तुला ऐकायचंय ना मला रिलेशनशिप का नकोय.. किंवा आपलं लग्न का शक्य नाहीए… तर ऐक…”
“सगळ्यांत पहील्यांदा.. मगाशी तुला मोनिकाचा फोन आला होता… यु नो.. फ़ॉर ए सेकंद आय फेल्ट `जे’, मला नाही आवडलं तिचा फोन आलेलं..”
“अग पण दॅट्स ओके.. इट्स नॅचरल.. रिलेशनशीप मध्ये असं होतंच.. त्यात काय एव्हढं? दॅट्स हाऊ इट इज टु बी इन रिलेशनशिप”, कबिर म्हणाला
“अॅंशन्ड दॅट इज द एक्झॅक्ट रिझन आय डोंन्ट वॉंन्ट एनी रिलेशनशिप कबिर.. हे अस्ं आयुष्यात प्रत्येकवेळेस कधी मी तर कधी तु माझ्या बाबतीत पझेसिव्ह व्हायचं..! कश्यासाठी?”
कबिर काहीच बोलला नाही..
“मी जेंव्हा जेंव्हा तुझ्याकडे बघते कबिर.. तुझ्या चेहर्याावर फक्त एकच भाव असतात.. लेट्स गेट मॅरीड.. लेट्स हॅव किड्स… माझ्या स्वप्नात ते आयुष्य नाहीए कबिर जे तु बघतो आहेस. माझी स्वप्न वेगळी आहेत..”
“ओके.. काय स्वप्न आहेत तुझी?”
“मला सगळं जग फिरायचंय.. मला प्रत्येक वेळी नविन ओळखी हव्यात.. त्याच त्याच लोकांबरोबर मला अख्खं आयुष्य घालवणं मान्य नाही. रुटीन लाईफ़ माझ्या लेखी नाही कबिर.. तुला माहीते, मी परत आल्यावर काही दिवसांनी जेंव्हा मला डिव्होर्सचं कळलं तेंव्हाच मी ठरवलं किंवा खरं तर त्या आधीच मी ठरवलं होतं की ह्या घरातुन बाहेर पडायचं. सो व्हॉट आदर ऑप्शन्स आय हॅव.. मला आई-वडीलांनी दुर लोटलं होतं. मित्र-मैत्रींणीनीही माझ्याशी नातं तोडलं होतं. मला माझ्या पायावर उभं रहाणं आवश्यक होतं. मी माझ्यासाठी जॉब शोधायचं ठरवलं.
विचार केला, कुठलं काम असेल जे मी आनंदाने आणि एकाग्रतेने करु शकेन? आणि मग मनात विचार आला.. व्हाय नॉट ट्राय इन ट्रॅव्हल कंपनी. मी स्ट्रॉबेरी-टुर्समध्ये इंटर्व्ह्यु दिला.. आय ट्राईड माय बेस्ट टु कंन्व्हींन्स देम.. खुप अवघड होतं कबिर.. आय मीन कुठली टुरीस्ट कंपनी एका तुरुंगाची हवा खाऊन आलेल्या, ड्रग्ज अॅरडीक्टचा शिक्का असलेल्या व्यक्तीला कामावर घेईल. दे वॉंन्टेड टु बिलीव्ह मी.. पण…”
राधा दोन क्षण थांबली..
“काल पोलिस-स्टेशनमध्ये मला क्लिन चिट मिळाल्यावर मी त्या ट्रॅव्हल कंपनीच्या ऑफीसमध्ये फोन केला होता…”
“वेट व्हॉट..? तु काल फोन केला होतास त्यांना? कधी? आणि मला नाही सांगीतलंस ते?”, कबिर तिचं बोलण तोडत म्हणाला..
“ते बघ.. बघीतलंस.. तु स्वतःच बघ.. तु नकळत एक्स्पेक्ट केलंस ना माझ्याकडुन की मी तुला सगळ्ं सांगाव, माझे निर्णय तुला विचारुन घ्यावेत…”
कबिर खजील झाला.. त्याने काही न बोलता मान खाली घातली..
“मला माहीते तु मुद्दाम नाही केलेस, किंवा तु अनुरागसारखा पण नक्कीच नाही.. पण हे सगळं होतंच अरे रिलेशनशिपमध्ये.. आणि तेच मला नकोय.. एनिवेज.. तर मी त्यांना सांगीतलं क्लिन-चिट बद्दल.. पोलिसांकडुन ऑफीशीअल क्लिन-चिट मिळेल दोन-चार दिवसांत ती पण त्यांना फॅक्स करेन.. अॅीन्ड दॅट लेडी वॉज हॅप्पी.. शी इज रेडी टु टेक मी ऑन पेरोल.. अर्थात एकदम ‘टुर-लिड’ ची पोस्ट नाही मिळणार.. पण ‘टुर-ऑपरेटर’ची नक्कीच मिळेल.. इफ़ एव्हरीथींग गोज वेल.. देन…”, राधा काही क्षण थांबली..
“देन??”, कबिरने विचारलं..
“देन मोस्टली आय विल बी फ्लाईंग टु इटली ऑन माय फ़र्स्ट टुर असाईनमेंट..”, राधाच्या चेहर्या.वरुन आनंद ओसंडुन वाहात होता.
कबिर काही तरी बोलणार होता, पण त्याने शब्द गिळुन टाकले…
थोडा वेळ विचार करुन तो म्हणाला.. “तु जे म्हणते आहेस ना.. ते काही अंशी मला पटतंय राधा.. गुड की तु तुझ्या आयुष्याबद्दल.. आयुष्याकडुन असलेल्या अपेक्षांबद्दल फर्म आहेस.. पण मग काल…”
“काल काय कबिर.? काल मी तुला आय-लव्ह-यु म्हणाले असंच ना? अरे तुच सांग त्याचा अर्थ काय होतो? माझं तुझ्यावर प्रेम आहे.. हाच ना? मग आहेच ना, मी नाही म्हणतच नाहीए.. पण ह्याचा अर्थ असा कधी होतो की `लेट्स-हॅव-सेक्स’.. `लेट्स-गेट-मॅरीड’, `लेट्स-स्टार्ट-ए-फॅमीली’, `यु-लिसन-टु-मी’ वगैरे? हा अर्थ आपण जोडतो त्याला हो ना?”
“हे बघ, तु ब्लाईंडली मी म्हणतेय म्हणुन अॅळक्सेप्ट कर असं मी म्हणत नाहिए, पण मला जेन्युईनली असं वाटतंय की तुला माझं मत, माझे विचार समावेत, पटावेत..”
कबिरचा जे घडतंय, आपण जे ऐकतोय, त्यावर विश्वासच बसत नव्हता. खांदे पाडुन तो गाडीला टेकुन उभा राहीला
“ओके.. समजा.. समजा मी तयार झाले लग्नाला.. तरी तुझे आई-बाबा तयार होतील आपल्या लग्नाला? एक डिव्होर्सी, तुरुंगात गेलेली.. ड्रग्ज्सच्या नशेत झोकांड्या खाताना अख्या नॅशनल टीव्हीवर झळकलेली.. आपला वंश कधीच पुढे न्हेऊ शकणारी मुलगी त्यांना…..”
“व्हॉट?? व्हॉट?? आता हे काय अजुन नविन…”, कबिर उसळत म्हणाला..
राधा स्वतःशीच हसली.. “कसली विचीत्र आहे ना मी.. ऐकावं ते नवलंच नाही.. तुला आठवतं मी म्हणलं होतं माझं आणि अनुरागचं डिव्होर्सचं कारण मी घर सोडुन जाणं नाहीये, समथींग पर्सनल आहे.. आठवतं?”
“हम्म..”, कबिर म्हणाला
“वेल हेच ते कारण.. त्या दिवशी मला पोलिसांनी पकडल्यावर मला मेडीकल टेस्टला न्हेलं होतं. युझवल प्रोसीजर असते ती. अॅिटेंप्टेड रेपची केस होती, सो मला गायनॅककडे पण न्हेलं होतं.. जस्ट टु मेक शुअर की रेप झाला नाहीए .. युजवल प्रोसीजर… नंतर नंतर जामीनावर मी सुटले, आम्ही घरी आल्यावर, काही दिवसांनी पोलिसांनी त्यांचे मेडीकल रिपोर्ट्स कुरीअर केले.. अर्थात अनुरागनेच ते मागीतले होते.. जस्ट टु मेक शुअर…”
तर.. बिसाईड्स रेप झाला नाहीए बरोबर त्या टेस्टमध्येच असाही रिपोर्ट आला की मी कधीच कन्सीव्ह नाही करु शकणार.. जेनेटीक डिसॉर्डर आहे.. पहील्यापासुनच.. अर्थात आम्हाला कुणालाच हे माहीत नव्हते. पण अनुरागला मुल होऊ शकणार नाही हे कळल्यावर त्याचा माझ्यातला उरला-सुरला इंटरेस्टही संपला. ती पोलिस-केस वगैरे एक कारण आहे डिव्होर्सचं. खरं कारण हे आहे कबिर…”
बोलता बोलता राधाच्या डोळ्यात अश्रु उभे राहीले…
“ओह.. आय एम सो सॉरी…”, कबिर..
“आठवतं.. आपली सगळ्यांत पहीली भेट.. त्या मेडीकल शॉपमध्ये.. त्या वेळी आम्ही गेले सहा महीने बेबी साठी ट्राय करत होतो.. नंतर मी पळुन गेले आणि इथे आल्यावर त्या आठवड्यात यु नो.. आय मिस्ड माय पिरीएड्स.. अर्थात थोडं लेट झाले.. त्यात मला उलट्या होत होत्या.. मी सॉल्लीड घाबरले.. मला वाटलं की मी घर सोडुन यायला आणि मी कन्सीव्ह व्हायला एकचं वेळ आली का.. बट लकीली तसं काही नव्हतं.. जस्ट फुड-पॉईझनींग होतं.. एनीवेज.. डोन्ट बी सॉरी..
तर तु सांग तुझे आई-बाबांना चालेल अशी मुलगी सुन म्हणुन.. त्यांच जाऊ देत.. तु किती दिवस जुळवुन घेशील माझ्याशी. माझं सौदर्य अजुन १५-२० वर्ष.. पुढं काय? माझ्या शरीराचा अणु आणि रेणू स्वातंत्र्यासाठी झगडत राहील.. तुला जशी आदर्श पत्नी हवी तशी मी कधीच होऊ शकणार नाही कबिर..”
“मी..समजावीन आई-बाबांना.. आपण दत्तक घेऊ मुलं..”, कबिर शेवटचं अस्त्र काढत म्हणाला
“पण का कबिर? का तु अॅ-डजस्टमेंट करावीस…? यु नो व्हॉट.. यु आर सो स्विट.. यु डिझर्व्ह ए मॅरेज-मटेरीअल गर्ल. बाहेर अश्या हजारो मुली आहेत हु बिलीव्ह इन ट्रु लव्ह.. अॅटन्ड लुकींग फ़ॉर बॉईज लाईक यु.. कश्याला माझ्यासाठी तु कॉम्प्रमाईज करतोस..? हे बघ उगाच भावनेच्या भरात निर्णय नको घेऊस.. निट विचार कर… मोनिका खरंच चांगली मुलगी आहे, एकदा तिच्या हातुन चुक घडली असेल.. त्याची जन्मभरासाठी तिला शिक्षा देऊ नकोस..”
कबिर काहीच बोलला नाही.
“एनिवेज.. आपण सोफी ऑन्टीकडे नको जाऊया.. लेट्स गो होम कबिर…”, राधा..
“पण का? जाऊ या की.. मे बी तुझा मुड ठिक होईल..”, कबिर
“नको कबिर.. खरंच.. लेट्स गो होम.. मला बाकीची पण बरीच काम आहेत.. उद्या त्या स्ट्रॉबेरी टुर्सला भेटुन नोकरी तरी पदरात पाडुन घेते..”, कबिरच्या संमतीची वाट न बघता राधा गाडीत जाऊन बसली..
कबिरने एकवार आकाशाकडे बघीतले आणि मग गाडीत बसुन त्याने गाडी माघारी वळवली…
[क्रमशः]

User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

Re: इश्क - Marathi love stori

Post by rangila »


17
कबिर आणि राधा साधारण ३-३.३० तास ड्राईव्ह मध्ये एकमेकांशी एक शब्दही बोलले नाहीत.
शेवटी बर्याधचवेळानंतर राधा म्हणाली, “आय एम सॉरी!”
“सॉरी? सॉरी कशाबद्दल? बिचबद्दल…. की त्या घाटाबद्दल?”, कुत्सीतपणे कबिर म्हणाला
“दोन्हीबद्दल…”, राधा
“म्हणजे? तुला म्हणायचंय की दोन्ही बाबतीत चुकलीस?”
“नाही.. मी चुकीची नक्कीच नाही वागले.. पण तु हर्ट झालास.. म्हणुन सॉरी..”
“ओह.. सो तुला वाटत नाहीए तु चुकलीएस.. मग तुला काय करायचंय कोण हर्ट झालं आणि कोण नाही. तु बरोबर आहेस ना.. मग झालं तर…”
“नाही, तसं नाही. सगळ्यांत पहीलं म्हणजे मी माझ्या भावनांना आवरायला पाहीजे होतं.. निदान तुझ्या बाबतीत. मी प्रेझेंट मधे जगणारी मुलगी आहे कबिर.. त्या क्षणी जे वाटलं ते करते. आधी काय घडलं होतं.. किंवा पुढे काय होईल ह्याचा फारसा विचार नाही करत. पण तु तसा नाहीएस.. तु कुठली पण गोष्ट मनाला लाऊन घेतोस.. सो त्यावेळीच मी स्वतःला थांबवलं असतं.. तर तो घाटातला प्रसंग टाळता आला असता…”, राधा
“एनिवेज.. जे झालं ते चांगलंच झालं ना.. वन्स अॅान्ड फ़ॉर ऑल.. आपण दोघंही आता एकमेकांच्या बाबतीत सुपर क्लिअर आहोत.. सो गुड फ़ॉर बोथ ऑफ़ अस… “, कबिर
“हम्म.. खरंय.. बर.. थोडा ब्रेक घेऊया का?.. तु सकाळपासुन ड्राईव्हच करतो आहेस… २.३० वाजलेत.. पुढे पेट्रोल पंप आहे एक.. मॅक्डोनाल्ड पण आहे.. मागेच एक बोर्ड होता.. थांबुयात तिथे?”
“ओके…”
पाच एक किलोमीटरवरच्या पेट्रोल-पंपावर कबिरने गाडी आतमध्ये वळवली.
“काय घेशील… बर्गर-फ़्राईज-कोकच आणु का दुसरं काही?”, राधा
“मी आणतो ना, बस तु..”, कबिर
“प्लिज.. उगाच फॉर्मॅलीटी नको.. आणते मी..”, गाडीतुन उतरत राधा म्हणाली..
“अरे पण रात्री..अपरात्री.. मी येतो बरोबर फ़ार तर..”
“कबिर.. रिअली.. इट्स ओके.. मला फ़्रेश व्हायला जायचंच आहे.. मी आणते…”, असं म्हणुन राधा निघुन गेली.
कबिरही गाडीतुन खाली उतरला. बाहेरचा गार वारा लागल्यावर त्याला थोडं बरं वाटलं. गाडीतल्या त्या ए/सीने त्याचं डोकं भणभणायला लागलं होतं. दोन्ही हात-पाय ताणुन त्याने अंग मोकळं केलं. दोन तिन चालत चकरा मारल्यावर त्याला थोडं मोकळं वाटलं. मॅक्डोनाल्डच्या काचेच्या तावदानातुन त्याने आतमध्ये नजर टाकली तेंव्हा काऊंटरवर राधा ऑर्डर देत होती.
“का आवडतेस तु राधा मला एव्हढी?”, त्याने स्वतःलाच प्रश्न केला…”तु सांगीतलेली कुठलीच गोष्ट तु म्हणतेस तशी मला किंवा माझ्या आई-वडीलांनाही आवडणारी, पटणारी नाही. दोघांनीही जुळवुन घ्यायचं ठरवलं तरीही ही दरी इतकी मोठ्ठी आहे की आपण कधी एकत्र येण्यापेक्षा समांतरच राहुन जाऊ.. सगळं मान्य आहे मला हे.. पण तरीही.. तरीही.. तुला विसरण सोडाच.. तुला विसरायचा प्रयत्न करणं.. किंवा.. तुला विसरायचा प्रयत्न करायचा आहे ह्या विचाराने सुध्दा वेदना होताएत…”
कबिरच मन राधाला विसरायला लागणार आहे ह्या विचारानेच बगावतीवर उतरलं होतं. त्याच्या मनाचा कुठलाही कोपरा राधाला विसरायला तयार नव्हता.
कबिरने लक्ष विचलीत करण्यासाठी मोबाईलमध्ये डोकं खुपसलं…व्हॉट्स-अप चालु झाले तसे अनेक मेसेजेस इन-बॉक्स येऊन पडले. त्यात एक मेसेज रोहनचा ही होता.
कबिरने रोहनचा मेसेज ओपन केला…
“अभिनंदन.. अभिनंदन.. त्रिवार अभीनंदन.. शेवटी तुला जे पाहीजे ते मिळालं… बिग पार्टी तु आल्यावर..” रोहनने सोबतच पार्टी, फुलं, केक वगैरेंचे इमोटीकॉन्सही पाठवले होते.
कबिरला आठवलं.. त्या दिवशी संध्याकाळी बिचवरुनच त्याने पट्कन रोहनला मेसेज केला होता.. राधाच्या किस आणि आय-लव्ह-यु बद्दल… आता मात्र त्याला पश्चाताप झाला. आपण उगाचच त्याला सांगायची घाई केली असंच त्याला त्या क्षणी वाटलं. त्याचं सहज लक्ष रोहनच्या स्टेटस कडे गेलं आणि त्याला आश्चर्यंच वाटलं.. रोहन ऑनलाईन होता.
“हा इतक्या उशीरा काय करतोय ऑनलाईन..?”, त्याच्या मनात विचार येऊन गेला.
एकदा त्याला पिंग करावं असं कबिरला वाटलं.. पण मग त्याला झाला गेला सगळाच प्रकार सांगत बसावं लागलं असतं आणि कबिर आत्ता त्या मुड मध्ये नव्हता.. म्हणुन मग त्याने सोडुन दिलं.
एव्हढ्यात राधा ऑर्डर घेऊन पोहोचली..
“काय रे? कसला विचार करतोएस..?”
“अगं. हा रोहन.. अजुन ऑनलाईन आहे…”
“रोहन?.. तुझा मिडिआ-मॅनेजर का कोण तो.. तोच का?”
“हम्म तोच..काय करत असेल इतक्या रात्री?”
“तुला काय रे चांभार चौकश्या..? प्रेमात वगैरे पडला असेल कुणाच्या तरी तो.. घे… पिरी-पिरी मसाला चालतो ना फ़्राईजवर?”, हातातले पार्सल कबिरला देत राधा म्हणाली..
“हम्म…”
“मग.. प्लॅन काय आहे आता?”,५-१० मिनिटं शांततेत खाण्यात गेल्यावर कबिर म्हणाला..
“अम्म.. आपण पोहोचलो की लगेचच दुपारी वगैरे मी स्ट्रॉबेरी-टुर्सना भेटेन.. मला तो जॉब हव्वाच आहे.. सगळे पोलिस-रिपोर्ट्स जमा करेन.. बहुदा २-४ दिवसांत मिळेल त्यांचं ऑफ़र लेटर.. तो पर्यंत मला घर शोधायचं आहे.. तुझ्या माहीतीत असेल कुठे रेंन्टवर तर सांग ना…”, राधा
“काय बजेट आहे तुझं?”. कबिर
“तसा बजेटचा काही प्रॉब्लेम नाही यायचा.. माझ्या पगाराचे पैसे असतील.. शिवाय डिव्होर्सनंतर चांगली पोटगी मिळेलच.. केवळ तेव्हढेच पैसे इ.एम.आय म्हणुन वापरले तरी नविन घर घेता येईल मला.. पण माझंच अजुन ‘पुढे काय’ नक्की नाहीए.. सो इन्व्हेस्ट आत्ता तरी नाही करायचंय मला कुठे…”
“मी एक सुचवु का? म्हणजे बघ पटलं तर.. नाही तर दे सोडुन..”
“हम्म बोल..”
“तु माझ्याच घरात का नाही रहात? माझा ३ बि.एच.के. आहे.. मी एकटाच रहातो मोठ्या घरात…”
राधाने त्याच्याकडे चमकुन बघीतलं..
“तु त्या हिप्पींबरोबर रहात होतीसच की.. मी काय तितका वाईट नाहीए.. शिवाय.. तुझी वेगळी खोली असेल.. तुझी प्रायव्हसी तुला मिळेल ह्याची काळजी घेईन मी…. खरं तर एव्हढं मोठ्ठ घर.. मोना गेल्यावर खायला उठतं.. आपलं बाकी काही असलं नसलं तरीही तसं बरं जमतं.. जोपर्यंत तुला मनासारखं घर मिळत नाही तोपर्यंत रहा पाहीजे तर..”
“हम्म.. ऑफ़र तशी टेंप्टींग आहे..”, बर्गरचा मोठ्ठा तुकडा तोंडात कोंबत राधा म्हणाली.. “पण नको.. थॅंक्स..”
“पण का? काय प्रॉब्लेम आहे?”, वैतागुन कबिर म्हणाला..”माझ्या प्रत्येक गोष्टीला नाहीच म्हणायचं ठरवलं आहेस का तु?”
“तसं नाही रे.. पण हे बघ.. मी एक दिवस काय तुझ्याबरोबर फिरले तर नको ते करुन आणि नको ते बोलुन बसले.. एकत्र रहायला लागलो तर.. माहीत नाही काय होईल.. त्यापेक्षा नकोच..”
“अरे असं कसं काहीही होईल.. आपण काय लहान आहोत का?”, कबिर काही आपला हट्ट सोडायला तयार नव्हता..
“ए चल.. झालं असेल तर निघु..”, कबिरचा विषय टाळत राधा म्हणाली आणि ती गाडीत जाऊन बसली..
कबिरने काही क्षण राधाकडे निरखुन बघीतलं. ह्या विषयावर पुढे काही बोलण्यात आत्ता तरी अर्थ नाही हे त्याच्या लक्षात आलं. त्याने हातातल्या वाळुन गेलेल्या बर्गरकडे बघीतलं. त्याला खाण्यात कसलाही इंटरेस्ट राहीला नव्हता. उरलेला बर्गर आणि कोक त्याने शेजारच्या डस्ट-बीन मध्ये टाकुन दिले आणि हात झटकुन तो गाडीत बसला.
राधा मोबाईलवर मेसेज करण्यात मग्न होती. त्याने गाडी चालु केली आणि तो घराकडे परतायला निघाला.

दुसर्याब दिवशी कबिर थोडा उशीराच ऑफीसमध्ये गेला तेंव्हा रोहन त्याची वाटच बघत होता. कबिरला बघताच तो आनंदाने उभा राहीला, पण तो काही बोलणार त्याच्या आधीच कबिरने त्याला थांबवले.
“प्लिज काही बोलु नकोस…”
“का रे? काय झालं? पहील्याच दिवशी वहीनींशी भांडलास की काय?”, कबिरचा पडलेला चेहरा पाहुन रोहनने विचारले.
“वहीनी?? हा हा हा…”, निराशाजनक स्वरात हसत कबिर म्हणाला…
“जरा कळेल असं बोलशील का?” कबिरच्या केबीनमध्ये त्याच्या समोरची खुर्ची ओढुन त्यावर बसत रोहन म्हणाला..
पुढच्या तासाभरात कबिरने त्याला इथुन निघुन.. ते इथे परतेपर्यंतचा सर्व प्रवास ऐकवला.
“कठीण आहे बाबा तुझं खरंच.. काय नशीब घेऊन आला आहेस तु…”, रोहन काहीश्या त्रासीक स्वरात म्हणाला.. “मोनिका मिळाली.. मोनिकाने तुला सोडलं.. तु गोव्याला गेलास.. राधा मिळाली.. राधा हरवली.. मग परत राधा मिळाली.. कुठे? तर पोलिस स्टेशनमध्ये.. मग परत राधा मिळाली.. मग तिने तुला किस्स केलं.. आय.लव्ह.यु. म्हणाली.. आणि मग? तरीही राधा परत हरवली…? अरे काय चाल्लंय काय??”
“मी तरी काय करु तुच सांग, खरंच माझी कुंडली तपासुन घ्यायची वेळ आली आहे..”
“मग आता काय? परत आपला मोर्चा मोनिकाकडे का? ती आहेचे रिकामी तुझ्यासाठी नाही का?”, रोहन
“मोनिका? ती कुठुन मध्येच उगवली? आणि तु का इतका चिडतो आहेस?”
“नाही तर काय? तुझंच नक्की ठरत नाहीए राधा की मोनिका..”
“पण मी मोनाबद्दल काहीच बोललो नाहीए..”
“नाही कस? मध्ये तुम्ही दोघं भेटत नव्हतात परत?”
“आम्ही दोघं नाही, ती.. ती भेटत होती मला..”
“मग तु नाही म्हणु शकला असतास तिला भेटायला.. कश्याला तिला तंगवुन ठेवतोस.. सरळ सांग तिला की मला तुझ्यात इंटरेस्ट नाही म्हणुन…”
“ते माझं मी बघेन.. पण तु का एव्हढी तिची बाजु घेतो आहेस..?”
“म्हणजे काय? तु वापरतो आहेस मोनिकाला.. राधा नसली की तिच्याकडे.. राधा असली की कोण मोना ! असा प्रकार आहे तुझा…”
“हे बघ रोहन..”, कबिर काही बोलणार एव्हढ्यात त्याच्या डेस्कवरचा फोन वाजला आणि दोघांच बोलणं तिथेच खुंटलं..

त्या दिवशी घरी आल्यावर कबिरने रोहनच्या बोलण्याचा खुप विचार केला. रोहन म्हणत होता तसं खरोखरंच तो वागत होता का? मुद्दाम नक्कीच नाही.. पण नकळत?
एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवुन तो मोनाला दुखवत होता का?
पहील्यासारखं प्रेम त्याला मोनाबद्दल नक्कीच वाटत नव्हतं आणि राधा भेटल्यानंतर ते प्रेम मोनाबद्दल भविष्यात पुन्हा कधी मनामध्ये निर्माण होईल ह्याची धुसर आशाही त्याला वाटत नव्हती. अर्थात त्याने कधी हे स्पष्टपणे मोनिकाला सांगीतलेही नव्हते. कदाचीत रोहन म्हणतो तसं मोनिका अजुनही त्याची वाट बघत असेल.
कबिरने बराच विचार केला आणि मग त्याने मोनिकाला फोन लावला..
“हाय कबिर.. व्हॉट अ प्लिजंट सर्प्राईज…”, मोनिका आनंदाने म्हणाली..
“हाय मोना.. कशी आहेस?”
“मी मस्त.. बोल.. कशी आठवण काढलीस?”
कबिरला खरं तर असं फोनवर ब्रेक-अप करणं बरोबर वाटत नव्हतं. निदान शेवटचं का होईना… प्रत्यक्ष भेटुन ह्या गोष्टी स्पष्ट कराव्यात अशी त्याची इच्छा होती. पण .. पण कदाचीत तो प्रत्यक्षात मोनाला समजावुन सांगण्यात यशस्वी झाला नसता.. तिच्या निरागस चेहर्या समोर त्याचे शब्द घश्यातच अडकले असते..
“मोना थोडं बोलायचं होतं..”, काहीसा गंभीर होत म्हणाला..”
“बोलं ना.. ब्रेक-अप करायंचंय?”, अगदी सहजतेने मोनिका म्हणाली खरी, पण कबिरच्या पायाखालची जमीनच सरकली.
“ब्रेक तर केंव्हाचं झालं ना आपलं? तुच तर केलं होतंस”, कबिर म्हणाला…
“हो ना? मग कश्यासाठी बरं फोन केलास तु?”
“हे बघ मोना.. मला माहीती आहे.. तुला अजुनही वाटतं की आपण दोघांनी पुन्हा एकदा एकत्र यावं.. तुझ्या जागी मी असतो तर कदाचीत मलाही तसंच वाटलं असतं…”
“माझ्या जागी म्हणजे? म्हणजे अशी मी एकटी.. बेसहारा..अबला.. माझ्या आयुष्यात कोणीच नाही… असं?”
“नाही.. तसं नाही.. म्हणजे तुला तुझी चुक उमगली आहे.. आधीचा ब्रेक-अप हा आपल्या चुकीने झाला होता तर..”
“आहे ना मान्य तुला.. की मी माझी चुक कबुलली आहे.. मग का पुन्हा पुन्हा आठवण करुन देतो आहेस…?”
“तु भांडणारच आहेस? का मला बोलुन देणारेस?”
“ओके.. बोल..”
“मला असं वाटतं की आपल्यात असलेलं प्रेम केंव्हाच संपलं आहे.. निदान माझ्याबाजुने तरी.. मग त्याला ओढुन-ताणुन.. माफ़ीच्या चिकटपट्या लावुन उगाच प्रयत्नांनी उभं करण्यात काय अर्थ आहे?”
“तुला हे खरंच असं वाटतं आहे का? राधा..”
“राधाला मध्ये आणु नकोस मोना.. तिचा यामध्ये काहीच संबंध नाही.. आपण आपल्या दोघांबद्दल बोलतो आहोत.. आणि तो विषय आपल्या दोघांमध्येच रहावा.. प्लिज..”
“…”
“मला वाटतं उगाच कॉम्प्रमाईज करुन.. एकमेकांवर आपल्या अपेक्षा लादुन, प्रयत्न करुन पाहुयात म्हणत हे नातं टिकवण्याचा काय उपयोग.. प्रेम ही प्रयत्न करुन निर्माण होणारी गोष्ट नाही ना मोना..”
“नाही? मग तु राधाच्या बाबतीत ‘प्रयत्न’ ह्या शब्दापासुन कोसो-दुर आहेस तर…”
“मोना प्लिज.. राधाला ह्यात नको आणुस.. परत सांगतोय..”
“एनिवेज.. तु ठरवंलच आहेस सगळं तर बोलुन तरी काय उपयोग पुढे..”, मोनिकाचा आवाज बोलताना कापरा झाला होता..
“मोना.. ऐक ना.. मी फक्त एव्हढंच म्हणतो आहे की.. आपण आपल्यातुन प्रेम हा शब्दच बाद करुयात ना… आपण एकमेकांचे चांगले मित्र तर होऊ शकतो..”
“प्लिज कबिर.. मला हे असलं फ्रेंड-झोनच प्रकरण जमत नाही.. म्हणजे.. असं नाही की उद्या तु मला रस्त्यात दिसलास तर मी रस्ता बदलुन पळुन वगैरे जाईन.. एनिवेज.. सो कबिर.. ऑल-द-बेस्ट.. तुला तुझं प्रेम जरुर मिळो ही मी तुझ्यासाठी रोज प्रार्थना करेन..”
“कश्याला अशी निरवा-निरवीची भाषा करतेस.. तु पण इथेच आहेस.. मी पण इथेच आहे.. नसेल ते फक्त आपल्यातले तुला अपेक्षीत असलेले नातं.. इतकंच..”
“इतकंच? फक्त ‘इतकंच’ कबिर?”, मोनिका अचानक संतापुन म्हणाली..
“मी तुझं पुस्तक वाचल्ं कबिर.. राधाबद्दलच्या तुझ्या भावना तु ‘इतकंच’ ह्या एका शब्दात मांडु शकतोस? नाही ना?.. माफ़ कर.. तु नाही म्हणलास तरीही मी पुन्हा पुन्हा राधाचा विषय काढते आहे… पण मला असं वाटतं आज मी जेथे आहे.. तेथेच तु सुध्दा आहेस.. मला माहीते तेंव्हा मी चुकले.. मी हजार काय लाख वेळा ती चुक मान्य करेन.. केली आहे.. तुझं प्रेम समजण्याइतकी मी मॅच्युअर नव्हते.. तु माझ्यावर निस्वार्थी प्रेम करत राहीलास आणि मी सेल्फीशपणे तुझ्याकडुन फक्त अपेक्षा करत राहीले.. तुला तुझं माझ्याकडुन अपेक्षीत असलेलं प्रेम तुला मिळावं, आपण एकमेकांच्या चुका विसरुन एकत्र यावं एव्हढंच मला वाटत होतं.. बट यु आर राईट.. मी कितीही प्रयत्न केले तरीही तुझ्यातलं माझ्यासाठीचं आटलेलं प्रेम कितीही प्रयत्न केले तरी कदाचीत मी परत निर्माण करु शकणार नाही.. अॅंन्ड आय डोन्ट वॉंन्ट टु लुक लाईक अ बिच.. तुझ्याकडे प्रेमाची भिक मांगणारी.. मलाही माझा सेल्फ एस्टीम जपायला हवा आणि त्याचबरोबर तुझ्या भावनांचा तुझ्या मतांचा आदर करायला हवा.. सो.. गुड बाय रायटर.. तुला तुझा मार्ग मोकळा आहे.. ह्यापुढे तुझ्या आयुष्यात मोना येणार नाही….”
कबिरने बोलण्यासाठी तोंड उघडले.. पण त्याच्या तोंडातुन शब्दच फुटेना… दुःखाने त्याचा कंठ दाटुन आला होता.. त्याने बोलण्याचा प्रयत्न केला, पण फोन कधीचाच बंद झाला होता…
कबिरने फोन ठेवुन दिला आणि तो खिडकीत उभा राहीला… खिडकीचं दार उघडताच गरम हवेचा एक झोत आतमध्ये आला. मार्चमहीना सुरु झाला होता आणि आधीच ‘मे’महीन्याचा उन्हाळा जाणवु लागला होता. झाडांची पानगळ सुरु झाली होती.. रखरखलेल्या रस्त्यांवरुन पाला-पाचोळा आणि धुळ उडवत गाड्या वेगाने धावत होत्या…
दुरवर कबिरची नजर आकाशात उडणार्या. पतंगावर स्थिरावली.. वार्या च्या लहरींबरोबर सरसरुन उंच-उंच जाणारा पतंग.. अचानक कटला जातो.. त्याच्याशी बांधल्या गेलेल्या मांज्याचा आणि त्याचा संबंध तुटतो आणि तो पतंग बेभान, स्वैर होतो.. वार्यािच्या लहरींवर स्वार होऊन मनसोक्त तरंगणारा तो पतंग आता त्याच वार्यागच्या लहरींनी भरकटुन जातो.. जो वारा त्याला उंच उंच न्हेत असतो.. तोच वारा आता त्या पतंगाची चिरफाड करु लागतो..
दिशाहीन पतंग हेलकावे खात कबिरच्या नजरेआड होतो.. कबिरची नजर मात्र अजुनही त्या निळाशार आकाशात अजुनही भरकटत रहाते.. दिशाहीन…

[क्रमशः]



User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

Re: इश्क - Marathi love stori

Post by rangila »

18
“मग.. पुढे काय करायचं ठरवलं आहेस?”, कडक कॉफीचा घोट घेता घेता मेहतांनी कबिरला विचारलं.
“कश्याबद्दल?”, कबिरने न कळुन विचारलं
“कश्याबद्दल काय.. तु पुस्तकाचा दुसरा भाग लिहीणार आहेस ना.. त्याबद्दल.. काही विचार केला आहेस का?”
“ओह.. हा.. ते… नाही.. अजुन काही विचार नाही केलाय…”
“मग कर की सुरु आता.. आत्ता विचार चालु केलास तर ४-६ महीन्यात थोडीफार सुरुवात होईल…”
“हम्म.. बरं, आपल्या सगळ्या एडीशन्स संपल्या का?”
“अरे हा.. बरं झालं आठवण केलीस.. आपण तिसरी एडिशन जरा जास्तीच मोठ्ठी काढली होती.. पण थोडा आता सेल कमी झालाय.. पुस्तकही दुकानात पडुन आहेत.. तर आमच्या मार्केटींग टीमने एक नविन कल्पना काढली आहे.. विक्री वाढवण्यासाठी…”
“काय?”
“तु ते पुस्तकाच्या शेवटी तुझा फोन नंबर टाकला होतास बघ.. नंतर तुला अनेक फोन आले होते.. बरोबर..?”
“हो.. जरा खुप जास्तीच आले होते…”
“आपण त्या फोन नंबरमधुन एक लकी ड्रॉ काढायचा.. म्हणजे त्याच असं नाही.. पण आपण ही लकी-ड्रॉची जाहीरात केली की अजुन जे फोन येतील ते आणि आधीच ह्यामधुन…”
“आणि.. काय कार वगैरे देताय की काय?”, हसत हसत कबिर म्हणाला..
“नाही रे.. जो नंबर निघेल त्याच्या. किंवा तीच्याबरोबर तु डिनर डेटला जायचंस…”
“ओह प्लिज हा.. मी असलं काहीही करणार नाहीए..”, मेहतांना थांबवत कबिर म्हणाला..
“अरे.. असं काय करतोएस.. बिल आम्ही भरणारे…”, हसत मेहता म्हणाले..
“बिलाचा प्रश्न नाही.. पण लकी ड्रॉ मध्ये कुणी जख्ख आजोबा.. कजाग काकु.. एखादा टोंणगा निघाला तर? फ़ार पकवतात हो लोकं.. मी नाही डिनर डेटला वगैरे जाणार..”
“अरे नाही निघणार.. तुला आवडेल अशी.. तुला शोभेल अशी.. सुंदर.. डिसेंट मुलीला आपण सिलेक्ट करु.. ओके?”
“असं कसं करता येईल..?”
“का नाही येणार? अरे थोडे पैसे दिले की सगळा डेटा आजकाल ह्या टेलिफोन कंपन्या विकतात.. आणि ते तरी कश्याला.. माझ्या स्वतःच्या कित्तेक ओळखी आहेत.. पैसे न भरताही प्रत्येक फोन नंबरची कुंडली मिळेल आपल्याला.. त्यावरुन काढु आपण.. तु ठरव फ़ार तर..कुणाला शॉर्ट-लिस्ट करायचं ते.. मग तर झालं..?”
कबिरला त्यातल्या त्यात हा पर्याय बरा वाटला…
“काय हरकत आहे..”, त्याने स्वतःशीच विचार केला.. तश्याही बर्यातचश्या संध्याकाळ त्याने एकट्याने घरात टीव्हीसमोर बसुन घालवल्या हो्त्या
फ़ारसे आढेवेढे न घेता तो तयार झाला..

डेली-न्युजपेपरमध्ये जाहीरात येऊन गेल्यानंतर मध्ये आटलेला फोन्सचा ओघ पुन्हा सुरु झाला.
कबिरकडे भरपुर वेळ होता.. त्यामुळे तो येणार्या फोन्सवर अगदी मनापासुन गप्पा मारत होता. पुस्तक कधी वाचले? कुठला भाग जास्ती आवडला? आधी कोण-कोणती पुस्तकं वाचली.. वगैरे चौकश्या तो करत असे. ह्या फोन्सच्या माध्यमातुन त्याला एक नव्याने हुरुप आला होता. शहराच्या.. राज्याच्या… काही अंशी देशाच्या कानाकोपर्याातुन फोन आला की त्याला फ़ार आनंद वाटे. आपण जे लिहीतो ते लोकांना आवडते आहे.. आपली गोष्ट कुणाला ना कुणाला अगदी त्यांचीच गोष्ट वाटते आहे हे ऐकुन तो भारावुन जाई. त्यातल्या त्यात फ़ोनवरुन जो आवाज चांगला वाटे.. जिच्याशी बोलताना त्याला छान वाटे असे नंबर तो कागदावर लिहून ठेवत होता जेणेकरुन अश्याच लोकांचा डेटा फोन-कंपनीतुन मागवता येईल..
असंच एकदा घरातल्या आराम-खुर्चीत रेलुन तो पुढच्या भागात काय लिहावं ह्याचा विचार करत असतानाच त्याचा फोन वाजला..
“हॅल्लो.. कबिर..”, पलीकडुन एक गोड आवाज कानावर पडला..
“बोलतोय…”, नकळत कबिर खुर्चीत सरळ होऊन बसला..
“कबिर, मी रती बोलतेय.. तुम्ही क्रेडीट कार्ड वापरता का?”
“डॅम इट..”, कबिर स्वतःशीच चरफ़डला… “सॉरी.. मला नकोय क्रेडीट कार्ड.. थॅंक्स..”
पलिकडुन खिदळण्याचा आवाज आला तसा कबिर फोन ठेवता ठेवता थांबला..
“सॉरी.. सॉरी.. मी क्रेडीट कार्डसाठी नाही फोन केला.. खरंच सॉरी.. मस्करी केली..”
“कोण बोलतंय?”, कबिरने काहीसं चिडून विचारलं..
“सांगीतलं तर.. रती बोलतेय… मी पुस्तक वाचलं तुमचं…”, पलिकडुन पुन्हा तोच गोड आवाज..
“तरीपण मला क्रेडीट कार्ड नकोय…”, ह्यावेळी मस्करी करत कबिर म्हणाला..
काही क्षण दोघंही हसण्यात गुंग झाले…
“नाही.. तुम्ही डेट वर न्हेणार आणि ऐनवेळी पैसे नाहीत बिल भरायला म्हणालात तर.. म्हणुन म्हणलं आधी विचारावं, क्रेडीट कार्ड वापरता का…”, रती हसु थांबवत म्हणाली..
“ए प्लिज.. कबिर म्हणालीस तरी चालेल..”, कबिर…
“ओके.. कबिर..”
“गुड.. सो कशी वाटली गोष्ट.. इश्क ची?”, कबिरने विचारलं आणि मग पुढची ५-१० मिनीटं दोघंही पुस्तकातल्या विवीध भागांबद्दल बोलत राहीले…
“मग.. तुला काय वाटतं.. आपल्या हिरोने पुढच्या भागात काय करायला हवं? मीराची वाट बघणं योग्य आहे की त्याने मुव्ह ऑन करावं?”
“मला वाटतं.. त्याने त्याच्या आधीच्या गर्ल-फ्रेंडकडे परत जावं..”, रती
“का?”, कबिरला हे उत्तर अगदीच अनपेक्षीत होतं..
“का नाही?”, रतीने प्रतीप्रश्न केला..
“त्याच्या आधीच्या गर्लफ्रेंडनेच त्याला सोडलं होतं.. ते पण तिच्या स्वार्थासाठी.. अनपेक्षीत अपेक्षा ठेवुन.. नायकाने तीची खुप वाट बघीतली.. नाही असं नाही.. पण प्रत्येक गोष्टीला अंत असतो.. आणि शेवटी झालं ते चांगलंच झालं ना.. मीराच्या रुपाने त्याला पुन्हा एकदा प्रेम मिळालं, पहाताक्षणी तो तिच्या प्रेमात पडला आणि प्रत्येक भेटीत तो तिच्याकडे अधीकच ओढला गेला. अर्थात मीराच्या तिच्या आयुष्याकडुन असलेल्या अपेक्षा वेगळ्या होत्या म्हणुन ती कदाचीत त्याच्या आयुष्यातुन निघुन गेलीही असेल.. पण असंही होऊ शकतं ना की.. त्याच्यापासुन दुर राहील्यावरच मीराला प्रेमाची जाणीव होईल आणि ती परत येईल… म्हणजे मला तरी असं वाटतं.. तुला नाही वाटत ज्याच्यावर आपण मनापासुन प्रेम करतो त्याने आपल्या प्रेमाचा स्विकार करावा.. आपल्या आयुष्याचा साथीदार म्हणुन तोच मिळावा म्हणुन?”
“कबिर, जरं का तुझं शेवटचं वाक्य खरं असेल ना तर.. त्याची गर्लफ्रेंड सुध्दा हेच तर मागते आहे त्याच्याकडुन…”
“पण.. तिनेच तर त्याला सोडलं होतं..”, रतीचं वाक्य मध्येच तोडत कबिर म्हणाला..
“कबिर.. तुझ्याकडे फक्त हे एकच कारण आहे का? का तु दुसरं पण काही बोलणार आहेस?”
कबिर काहीच बोलला नाही..
“कबिर.. यु नो व्हॉट अ ट्रु जंटलमन इज?”
“व्हॉट?”
“ट्रु जंटलमन तोच असतो जो स्त्रीचा आदर करतो.. तिच्या भावनांचा आदर करतो.. तिच्या मतांचा आदर करतो.. आणि तुझ्या कथेचा नायक जर त्याच्या पुर्वीच्या गर्लफ्रेंडकडे परत गेला ना तर तो एकावेळी दोन्ही स्त्रीयांच्या भावना सांभाळेल. एकीकडे त्याच्या गर्लफ्रेंडच्या प्रेमाला तो होकार देईल तर दुसरीकडे मीराच्या मतांचा आदर करुन तिला हवं असलेलं आयुष्य तिला मिळावं म्हणुन तिच्या मार्गातुन बाजुला होईल..”
“मान्य.. पण म्हणुन त्याने स्वतःच मन मारुन परत तिच्याकडे जावं असं तुला म्हणायचं आहे का?”
“मन मारुन? नाही कबिर मला नाही वाटत त्याला मन मारुन म्हणतात.. अर्थात तु लेखक आहेस.. ती पात्र तु रंगवलेली आहेस.. सो तुझ्या पात्रांचा स्वभाव काय आहे.. त्यांच्या मनात काय चाललं आहे हे तुला अधीक माहीती.. पण माझ्या लेखी त्याला `इगो विसरणं’ म्हणत असावेत.. मला वाटतं त्याच्या गर्लफ्रेंडने सोडल्याच्या दुःखापेक्षा त्याचा इगो परत जाण्याच्या मार्गात अधीक येतोय.. मी चुकही असेन.. पण मला तरी असं वाटतं..”
कबिर क्षणभर खरोखरंच चकीत झाला.. मोनिकाकडे परत जाण्यात आपलं दुःख आड येतंय? का खरंच आपल्या मनात कुठेतरी खोलवर इगो दडुन बसलाय? हा विचार त्याच्या मनाला स्पर्शुन गेला..
“क्षणभर हेही मान्य की कदाचीत त्याचा इगो असेल.. पण बाकीच्या गोष्टींच काय.. अश्या इतरही अनेक गोष्टी होत्या ज्या त्याला पसंद नव्हत्या.. त्या पेज-थ्री पार्टीज.. ते अपेक्षांच ओझं?”
“कबिर.. तु तो जुना बॉबी सिनेमा पाहीला आहेस..”, काही क्षण शांततेत गेल्यावर रती म्हणाली..
“डिंपलचा ना? हो पाहीलाय…”
“त्यात एक मस्त डायलॉग आहे बघ.. कोई प्यार करे तो तुमसे करे, तुम जैसे हो वैसे करे। कोई तुमको बदल कर प्यार करे तो वो प्यार नहीं, सौदा है.. और सायबा.. प्यार मै सौदा नही होता… आठवतोय ना…?”
नकळत कबिरच्या चेहर्या वर हास्याची एक लकेर येऊन गेली.. कित्तेक दिवसांनी.. कित्तेक दिवसांनी कबिर हसला होता…
त्याने घड्याळात नजर टाकली.. गेला अर्ध्या तासाहुनही अधीक काळ तो ह्या रतीशी फोनवर बोलत होता…
“मला आवडेल तुझ्याशी ह्या विषयावर अधीक बोलायला रती.. मला वाटतं.. प्रत्यक्ष भेटलोच तर तेंव्हा बोलायला थोडं ठेवुया नाही का?”, कबिर म्हणाला..
“ऑफ़कोर्स.. मी तयार आहे..”, रती
“डन देन.. होप सो.. यु विल बी द लकी विनर.. आणि आपण इथुनच पुढे आपला वाद सुरु करु.. व्हॉट से…?”
“आमेन…”, हसत हसत रती म्हणाली…
“बाय देन..”
“बाय…”
कबिरने फ़ार कष्टाने फोन बंद केला.. अजुन कित्तीतरी वेळ तो रतीशी बोलु शकला असता.. त्याला बोलायचं होतं.. आणि तो बोलणारही होता.. त्याने रतीचा नंबर ठळक अक्षरांनी कागदावर लिहीला आणि मग मेहतांना मेसेज केला..
“लकी विनर शोधायची गरज नाही.. मला लकी विनर मिळाला आहे.. सोबत नंबर पाठवत आहे…”
पुढचे काही तास तो पुर्णपणे राधाला.. मोनाला विसरुन गेला होता. पुढचा एक तास तो पुन्हा पुन्हा रतीबरोबरंच संभाषण आठवत होता. इतक्या फोन कॉल्समध्ये पहील्यांदा कुणीतरी त्याच्याशी वाद घातला होता.. मुद्देसुद संभाषण केले होते.. उगाचच आपलं ते नेहमीचंच `मी तुमचं पुस्तक वाचलं.. खुप छान आहे’ वगैरेंचा त्याला कंटाळा आला होता. रतीने त्याला त्याच्याच लेखनाचा विचार करायला लावला होता.. इतके आठवडे गंज लागुन पडलेला त्याचा मेंदु आळस झटकुन जागा झाला होता.. फ़्रेश झाला होता..
आता फ़क्त त्याला ती संध्याकाळ डोळ्यासमोर दिसत होती जेंव्हा तो रतीला प्रत्यक्षात भेटणार होता…
नकळत रतीच्या विचाराने त्याच्या अंगावर शहारा आला…
“राधा….”.. कबीर जवळ जवळ किंचाळतच ओरडला.. “हाऊ कॅन यु डू धिस…”
“हे बघ कबिर.. माझ्या आयुष्यात मी कसं वागायचं.. काय करायचं हे तु सांगायची खरंच गरज नाही..”, काहीसं चिडुन राधा म्हणाली..
“पण.. पण तु म्हणाली होतीस.. रिलेशन्स.. लग्न.. हे तुझ्या तत्वात बसत नाही.. मग…”
“कबिर.. कमॉन.. ते फक्त मी तुला शांत करण्यासाठी.. तुझ्या मनातुन माझा विचार काढुन टाकण्यासाठी म्हणाले होते…
“म्हणजे.. तु माझ्याशी खोटं बोललीस??” कबिर संतापाने थरथरत होता..
“कबिर.. खरंच तु अजुनही लहान आहेस अरे.. आयुष्याचा अर्थ अजुन तुला समजलाच नाहीए.. अरे ह्यातच खरी आयुष्याची मज्जा आहे… असं प्लॅन करुन जगण्यात काय अर्थ आहे.. आयुष्य जसं आलं तसं मी जगते.. त्या क्षणाला जे वाटलं.. जे पटलं ते मी करते.. इतके दिवस.. तु माझ्या टच मध्ये नसलास तरीही रोहन होता.. मी माझे प्रत्येक विचार.. त्याच्याशी शेअर करत होते.. का? मला नाही माहीत.. पण त्याच्याशी बोलल्यावर मला खुप मोकळं वाटायचं..
तो पण शांतपणे माझं सगळं ऐकुन घ्यायचा.. आधी एक मन मोकळं करण्याचा मार्ग म्हणुन मी त्याच्याशी बोलत राहीले.. आणि.. आणि अरे हे कधी झालं कळालंच नाही रे….”, राधा नरमाईच्या स्वरात सांगत होती..
“व्हॉट द हेल.. तु त्याच्या इतक्या प्रेमात पडलीस की तुम्ही लग्न करण्याचं ठरवावं इतपत.. आणि तरीही तुला कळालं नाही म्हणतेस.. आणि तु.. रोहन.. तुला मी माझा सगळ्यात जवळचा मित्र समजत होतो… तुला सगळं सगळं सांगत होतो.. आणि तु.. माझ्या पाठीमागे हे असं…”
“कबिर यार.. हे बघ.. खरंच कळलं नाही आमची दोघांच कधी मनं जुळली ते.. तु हे मान्य का करत नाहीस की राधाला तु आवडत नव्हताच.. मी नसतो तरी तु तिच्या आयुष्यात आला नसतास हे सत्य आहे…”
“हे ठरवणारा तु कोण? तु खेळला आहेस माझ्या आयुष्याशी..”
“आणि तु?? तु नाही खेळलास मोनाच्या आयुष्याशी??? आधी मोना.. मग राधा.. आणि आता रती.. खेळत मी नाही तु आहेस.. एकाच वेळी अनेकांच्या आयुष्याशी कबिर..”



User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

Re: इश्क - Marathi love stori

Post by rangila »

19
मेहतांनी ‘ड्रॉ’ ची तारीख एक महीन्यांनी ठेवली होती. तो महीना कबिरसाठी अंत पहाणारा ठरत होता. कबिर अक्षरशः एक एक दिवस मोजुन काढत होता. रतीबद्दल.. तिला भेटण्याबद्दल त्याला उत्सुकता का वाटत होती हे त्यालाच कळत नव्हते, परंतु बर्याबचदा असं होतं ना की काही व्यक्ती एका भेटीतच ओळखीच्या वाटतात तर काही अनेक भेटींनंतरही अनोळखी. राधाच्याबाबतीत कबीरची ही भावना खुप जास्ती स्ट्रॉंग होती, पण कदाचीत तेंव्हा तो तिला प्रत्यक्षात भेटला होता. रतीशी तर तो फक्त फोनवरच बोलला होता.
त्या दिवसानंतर रतीला पुन्हा फोन करण्याचा त्याला अनेकवार मोह झाला. परंतु त्याचे दुसरे मन त्याला साथ देईना. शेवटी काहीही झालं तरी ह्या घडीला तो एक प्रतीथयश लेखक होता आणि असा फोन करणं त्याला योग्य वाटेना. अनेकवेळा रतीला लावण्यासाठी उचललेला फोन त्याने नाईलाजाने ठेवुन दिला होता.
रती दिसते तरी कशी ह्याची तर त्याला सॉल्लीड उत्सुकता होती. शेवटी त्याने मेहतांना फोन लावला..
“मेहता.. ते फोन रेकॉर्ड्सचे डिटेल्स तुम्हाला मिळतात म्हणाला होतात ना?”
“हो.. का रे? रतीचे डिटेल्स हवेत का?”
“हो.. “, काहीसा ओशाळत कबिर म्हणाला.. “मला तिचा फोटो हवा होता..”
“मला माहीती होतं तु विचारशील.. त्या दिवशी तु तिचा नंबर मेसेज केल्यानंतर लगेचच मी चौकशी केली होती.. पण..”
“पण? पण काय?”
“बहुतेक.. तिचे डिटेल्स नाही मिळु शकणार असं दिसतंय..”
“का? काय झालं?”
“अरे तिने तिचा नंबर प्रायव्हेट म्हणुन नोंदवला आहे.. शिवाय तिचे वडील सैन्यात आहेत.. असे रेकॉर्ड्सची गोपनियता बाळगली जातेच.. आणि त्यातच तिने तिचा नंबर प्रायव्हेट केला आहे.. सो एकुण प्रकार कठीण दिसतोय..”
“पण तुम्ही म्हणालात ना ओळखीची आहेत लोक..”
“आहेत ना.. मी नाकारतच नाहीए.. पण काही गोष्टींना मर्यादा असते कबिर… आणि आजकाल हे `हनी-ट्रॅप’चे प्रकार वाढल्यापासुन फ़ार सावधानता बाळगावी लागतेय त्यांना.. ओपन नंबर असता तर काहीच प्रश्न नव्हता कबिर… पण तरीही मी प्रयत्न करतोय.. मिळाले डिटेल्स की पहीले तुलाच देणार…”
“हम्म.. प्लिज.. थॅंक्स…” असं म्हणुन निराशेने कबिरने फोन ठेवुन दिला…

राधा आणि मोनिका कबिरच्या आयुष्यातुन जणु अदृष्यच झाल्या होत्या. मोनिकाकडुन तरी निदान इतक्यात काही संपर्क होइल ह्याची कबिरला आशा नव्हती.. पण.. पण निदान राधाचा एकदातरी फोन येईल असे त्याला वाटत होते.. त्या ’स्ट्रॉबेरी हॉलीडेजचे’ पुढे काय झाले? नोकरी मिळाली की नाही?, गोकर्ण-पोलिस-स्टेशनमधुन क्लिनचीटचे ऑफीशीअल पेपर्स मिळाले का? अनुरागशी डायव्होर्सचं पुढं काही घडलं का? असे एक ना अनेक प्रश्न त्याला होते. पण ह्या वेळी त्याने राधाला फोन न करण्याचं ठरवलं होतं. आपली तिच्या आयुष्यात काही किंमत असेल तर ती करेलच फोन असाच काहीसा विचार त्याने केला होता.
मार्च उलटुन एप्रील सुरु झाला होता आणि त्या रखरखत्या उन्हाळ्यात कबिरचे आयुष्यही रखरखीत बनले होते.
दिवसांमागुन दिवस जात होते आणि शेवटी तो ड्रॉचा रिझल्ट मेहतांनी ठरल्याप्रमाणे प्रसिध्द केला.
“कबिर.. मला वाटतं तुच तिला फोन करुन ती विजेती असल्याची बातमी सांगावीस..”, मेहता कबिरला म्हणाले होते.. आणि कबिरने ही अगदी पडत्या फळाची आज्ञा मानुन मान्यता दिली होती.
“ठिक आहे मग.. मी ब्ल्यु-डायमंडला करतो बुकींग.. शुक्रवारी संध्याकाळी.. त्यांचा कपल्स-लाऊंज मस्तच आहे…”, मेहता म्हणाले..
“ओके..”, असं म्हणुन कबिरने फोन बंद केला..
“काय रे? काय झालं?”, कबिरच्या चेहर्याकवरचा आनंद बघुन रोहनने विचारलं.
“डेट.. रतीबरोबर…७.३०.. ब्ल्यु डायमंड.. शुक्रवार…”.. कबिर म्हणाला..
टिक टिक वाजते डोक्यात.. धडधड वाढते ठोक्यात.. अशी कबिरची अवस्था झाली होती.. धडधडत्या हृदयाला दीर्घ श्वास घेऊन त्याने शांत करायचा प्रयत्न केला आणि रतीचा नंबर फिरवला..
“हॅल्लो..”, बराचवेळ रींग वाजल्यावर पलीकडुन तो गोड.. अती गोड आवाज कबिरच्या कानावर पडला…
“रती?”, कबिरने आपला आवाज शक्यतो स्थिर ठेवत विचारले..
“कोण बोलतेय?”, रती..
“रती.. कबिर बोलतोय… माझं क्रेडीट कार्ड आलंय.. कधी भेटायचं?”
“डोन्ट टेल मी… तो ड्रॉ मी जिंकले…??”, एखाद्या लहान मुलीला महागडी बार्बी-डॉल मिळाल्याच्या आनंदात रती म्हणाली..
“येस्स.. यु आर द विनर… शुक्रवारी संध्याकाळी, ७.३०,ब्ल्यु-डायमंड??”
“अम्मं.. ब्ल्यु डायमंड? नको.. त्यापेक्षा.. ‘पाशा’ला भेटुया? जे.डब्ल्यु.मेरीयॉट रुफ-टॉप?”
“चालेल.. कधी गेलो नाहीए मी तिथे.. पण चांगले रिव्ह्युज आहेत.. कधी?”, कबिर..
“परवाच शुक्रवारी? ७.३०?”
“डन..”, कबिर क्षणाचाही विलंब न करता म्हणाला..
“ओके.. भेटु मग…”, असं म्हणुन रतीने फोन बंद केला..
आयुष्यात जणु पहील्यांदाच कुठल्यातरी मुलीशी बोलावं आणि डेट फ़िक्स व्हावी तसं कबिरला वाटत होतं.

शुक्रवारी साधारणपणे ७लाच कबिर मेरीयॉटला पोहोचला.
पोर्चमध्ये उभ्या असलेल्या महागड्या कार्स.. लॉबी सुटा-बुटातले कॉर्पोरेट्स, बिझीनेस मिट्ससाठी आलेले फॉरेनर्स, तोकड्या/ट्रेंडी कपड्यांमध्ये वावरणारे पार्टी-फ़्रिक्सने गजबजुन गेली होती.
कबिरने घड्याळात नजर टाकली.. रतीला यायला किमान अर्धातास होता…
कबिर इतक्या लवकर आल्याबद्दल स्वतःवरच चरफडला. जवळचेच मॅगझीन उचलुन तो लॉबीतल्या सोफ्यावर विसावला. पाच-एक मिनीटंच झाली असतील तोच त्याचा फोन वाजला..
“हॅल्लो.. कबिर?”, पलिकडुन एका स्त्रीचा आवाज आला..
“येस्स.. बोलतोय..”
“सर.. मी ब्ल्यु-डायमंड मधुन बोलतेय.. तुमचं ७.३० ला बुकींग आहे ते कन्फ़र्म करायला फोन केला होता.. शिवाय रेड-वाईन आणि चॉकोलेट्सची व्यवस्थाही केलेली आहे…”
कबिरने स्वतःचीच जीभ चावली.. ब्ल्यु-डायमंडचं बुकींग रद्द करायचंच तो विसरला होता.. पण त्याहीपेक्षा त्याने मेरीयॉटमध्येही बुकींग केले नव्हते…
मेहतांना त्यावेळीच त्याने कल्पना दिली असती, तर त्यांनी बुकिंग बदलली असती.. पण रतीच्या विचारात धांदरट झालेला कबिर पुर्णपणे हे विसरुन गेला होता.
“अं..माफ़ करा.. आजचं बुकिंग रद्द होऊ शकेल का?”, कबिर दिलगीरीच्या स्वरात म्हणाला..
“एनी प्रॉब्लेम सर?”
“अं.. येस.. मला बिझीनेस मिटींगसाठी अचानक बाहेर-गावी जावं लागतंय.. सो शक्य असेल तर.. प्लिज.. ऑनेस्ट रिक्वेस्ट..”
“नो प्रॉब्लेम सर.. पण बुकींगचे पैसे रिफ़ंड नाही होणार..”
“नॉट अ प्रॉब्लेम..थॅंक्यु सो मच…”
एक काम झालं होतं.. आता मेरीयॉटला बुकींग करणं गरजेचं होतं.
त्याने इकडे-तिकडे नजर टाकली.. समोरच रिसेप्शनचं मोठ्ठं डेस्क होतं. कानाल हेडफोन-माईक लावुन एक मरुन-रंगाची साडी घातलेली तरुणी फोनवर बोलत बसली होती. मधुनच ती सहकार्यांाना खाणा-खुणा करुन कामांच नियोजन करत होती.
कबिर तडक रिसेप्शनपाशी गेला. त्या तरुणीचं फोनवरंच संभाषण होईपर्यंत तो थांबला आणि मग म्हणाला..
“अं.. मॅडम.. पाशाचं बुकींग करायचं आहे.. अ टेबल फ़ॉर टु..”.. आपलं स्पोर्ट्स जॅकेट निट करत तो म्हणाला..
“शुअर सर.. मे आय नो युअर गुड नेम?”, त्या तरुणीने विचारलं…
“कबिर…”
त्या तरुणीने एकवार त्याच्याकडे पाहीलं आणि मग संगणकावर काहीतरी टाईप करायला लागली.. आणि मग अचानक थांबुन परत कबिरला म्हणाली.. “सर.. देअर इज ऑलरेडी अ बुकिंग ऑन युअर नेम..”
“कसं शक्य आहे.. मी तर पुर्ण विसरुन गेलो होतो.. कुणी केलंय बुकिंग?”, आश्चर्यचकीत होत कबिर म्हणाला..
“रतीच्या नावाने बुकींग दिसतं आहे सर..”
“ओह.. दॅट्स ग्रेट.. थॅंक गॉड…”
“सर तुम्ही वर जाऊ शकता.. टॉप फ्लोअर..”, कोपर्यालतल्या लिफ़्ट्कडे बोट दाखवत ती तरुणी म्हणाली..
“थॅंक्स..”, असं म्हणुन कबिर लिफ़्टकडे जाण्यासाठी वळला..
“ह्या हॉटेल्सवाल्यांना इतक्या सुंदर-सुंदर मुली मिळतात कुठुन..?” असा विचार त्याच्या मनात तरळुन गेला आणि तो लिफ़्टमध्ये शिरला..

‘पाशा’ कबिरला वाटले होते त्याहीपेक्षा सुंदर होते. १६व्या मजल्यावरच्या टेरेसवर ‘पाशा’ सजवले होते. सर्वत्र पांढरे-शुभ्र सोफा आणि खुर्च्या विसावल्या होत्या. टेरेसच्या कोपर्यांवत डेरेदार फांद्या असलेली झाडं लावलेली होती आणि त्या फांद्यांना रंगीत बॉटल्स लावलेल्या होत्या.. त्या बॉटल्समध्ये सोडलेल्या एल.ई.डी दिव्यांमुळे सर्वत्र मंद प्रकाश पसरलेला होता. त्या बाटल्या जणु अनेक काजवे सामावुन घेतल्याप्रमाणे दिसत होत्या. आकाशात मस्त निळसर रंग पसरला होता. मंद इंन्स्ट्रुमेंटल संगीत वातावरणाची रंगत अजुनच वाढवत होता.
कबिरने घड्याळात पाहीले ७.२५ होऊन गेले होते. कबिरने काऊंटरवर चौकशी करुन बुक केलंलं टेबल जाणुन घेतलं आणि तो तेथे जाऊन बसला.
घड्याळाचा काटा इंचाइंचाने पुढे सरकत होता. कबिर जेथे बसला होता तेथुन एंन्ट्रंन्स स्पष्ट दिसत होता.
७.३० वाजले तसा कबिर सावरुन बसला. केसांतुन हात फिरवुन त्याने हेअर-स्टाईल ठिक केली आणि खुर्चीत रेलुन तो रतीची वाट पाहु लागला.
७.३५…
७.४०…
७.४५ झाले तरीही रतीचा काहीच पत्ता नव्हता. तिला फोन करायची एक प्रबळ इच्छा त्याच्या मनात येऊन गेली पण अजुन ५ मिनीटं वाट पहायचं ठरवुन त्याने हाती घेतलेला फोन खाली ठेवुन दिला.
कबिर कंटाळुन ५ मिनीटं संपायची वाट बघत बसला होता. त्याचं लक्ष वेधलं गेलं ते लॉबी-मध्ये भेटलेल्या रिसेप्शनीस्टकडे. खाली असताना बांधलेले केस तिने आता मोकळे सोडले होते. मरुन रंगाची ती साडी तिच्या कमनीय बांध्याला घट्ट बिलगुन बसली होती. तिथल्या वेटर्सना काही-बाही कामं सांगण्यात ती मग्न होती. कबिर तिच्याकडे बघण्यात गुंग झाला होता.
अचानक तिने मागे वळुन कबिरकडे बघीतलं.. बहुदा कबिर तिच्याकडे बघत होता हे तिला जाणवलं असावं.. तसा कबिर एकदम चपापला..
मिनीटभर त्या वेटरशी बोलुन ती तरुणी वळाली आणि कबिर जिथे बसला होता तेथे येऊ लागली.
कबिरने तिच्याकडे लक्ष नाही असं दाखवुन फोन उचलला आणि रतीचा नंबर फ़िरवणार इतक्यात ती तरुणी कबिरसमोर येऊन उभी राहीली..
आपण तिच्याकडे बघत होतो हे तिच्या लक्षात आलंय आणि आता आपल्याला उपदेशाचे डोस ऐकावे लागणार हे लक्षात येताच त्याचा घसा कोरडा पडला..
“सॉरी.. मला उशीर झाला थोडा…”, ती तरुणी कबिरकडे बघुन हसत म्हणाली…
“एस्क्युज मी?”, गोंधळुन कबिर म्हणाला..
“ओह.. सॉरी.. मी रती…”, आपला हात पुढे करत ती तरुणी म्हणाली..
“तु रती?”, कबिर अजुनही गोंधळलेलाच होता…
“हो.. का? अजुन दुसरी कोणी येणार होती का?”
“नाही म्हणजे.. तु तेथे खाली…”
“मग? मी काम करते इथे.. नको होतं का करायला?”, मिस्कील हसत रती म्हणाली..
“नाही तसं काही नाही..”, कसंनुसं हसत कबिर म्हणाला..
“कबिर.. मी शेक-हॅन्डसाठी दोन मिनीटं झाली हात पुढे केलाय…”, आपले डोळे मोठ्ठे करत रती म्हणाली..
कबिरला आपल्या बावळपणाचा रागच आला…
“ओह येस.. मी कबिर..”, तिच्याशी हातमिळवणी करत कबिर म्हणाला.. “प्लिज.. हॅव अ सिट..”
समोरची खुर्ची कबिरने हाताने मागे ओढुन तिला बसायची खुण केली..
रती काही बोलणार इतक्यात तिचा फोन वाजला..
“एक्स्युज मी.. मला घ्यावा लागेल हा फोन.. जस्ट अ मिनीटं”, असं म्हणुन तिने फोन घेतला.
ती फोनवर बोलण्यात मग्न होती तेंव्हा कबिरला तिला जवळुन बघण्याचा चान्स मिळाला..
डोळ्यांना फिक्क्ट निळसर चंदेरी रंगाचे आयलायनर लाऊन स्मोकी-आईजच्या मेक-अप मुळे तिचे डोळे तिच्या चेहर्यानवर आखीव-रेखीव भासत होते. ओठांना गुलाबी रंगाचं लिप्स्टीक, गालावर हलकेच केलेला ब्लश तिचे रुप अजुनच खुलवत होता. बोलता बोलता तिने आपले केस कानांच्या मागे सरकवले.
कबिर तिच्या लक्षात येऊ नये ह्याचा प्रयत्न करत तिच्याकडे बघण्यात गुंग झाला होता..
तिचा फोन संपल्यावर कबिर म्हणाला…”अभिनंदन, लकी-ड्रॉ साठी..”
“थँक्यु..”, मान किंचीतशी तिरपी खाली वाकवत रती म्हणाली
“अॅकन्ड थॅंक्स टु मेहता.. त्यांच्यामुळे आपण आज पहिल्यांदा भेटतोय..”, कबिर
“पहील्यांदा? सो मिन कबिर.. आपण भेटलोय आधी…”, हसत हसत रती म्हणाली..
“काय? केंव्हा? कधी? काहीही काय?”, कबिर
“हो.. खरंच.. तुझं ते बुक-लॉंच होतं.. क्रॉसवर्डमध्ये.. मी आणि माझी मैत्रीण आलो होतो तेंव्हा.. तुझी सही असलेलं पुस्तक पण आहे माझ्याकडे..”, रती
“रिअली? पण तेंव्हा आपण काही बोललो होतो असं आठवत नाही..”
“हम्म.. खरं तर माझी मैत्रीण खुप म्हणत होती मला बोल बोल म्हणुन.. पण अरे, खरं तर मी थोडी शाय-टाईप्स आहे.. म्हणजे तेंव्हा तरी होते जरा जास्तच.. आता इथे रिसेप्शनला जॉब घेतल्यापासुन जरा जास्तच बडबडी झालेय मी..”, रती म्हणाली..
“मग तर फ़ारच छान.. मला बडबडी लोकं खुप आवडतात.. आज आपल्याकडे खुप वेळ आहे.. सो…”
“बघ हं.. कंटाळशील.. म्हणशील.. कित्ती बोलते ही…”
“बघुच कोण पहीलं कंटाळतं ते…”, कबिर हसत हसत म्हणाला..
“हरकत नाही.. अॅ पीटायजर ऑर्डर करु आधी..”, असं म्हणुन रतीने वेटरला हात केला..
कबिर आणि रती त्या रोमॅन्टीक वातावरणात एकमेकांशी गप्पा मारण्यात मग्न होते तेंव्हा राधा इंटरनॅशनल-एअरपोर्टवर टुर-ऑपरेटर म्हणुन आपल्या पहील्या-वहील्या असाईनमेंटसाठी एअर-इटलीची वाट बघत उभी होती.. तर रोहन..


User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

Re: इश्क - Marathi love stori

Post by rangila »


20
कबिर मेन्यु-कार्ड बघण्यात मग्न होता तेंव्हा त्याच्या समोर एक नेपाळी किंवा तत्सम दिसणारी एक मुलगी येऊन उभी राहीली. तिच्या हातामध्ये पिवळ्याधम्मक लिली फुलांचा एक मोठ्ठा गुच्छ होता.
कबिरने प्रश्नार्थक नजरेने रतीकडे बघीतलं.
रती हसत उभी राहीली आणि तिने तो गुच्छ त्या मुलीकडुन घेऊन कबिरच्या पुढे धरला.. “हे घे.. तुझ्यासाठी…”
“अगं गेस्ट तु आहेस, मी नाही..”, उठुन उभं रहात कबीर म्हणाला..
“घे रे.. एका मोठ्या लेखकाला भेटतेय.. एव्हढं तर करायलाच हवं ना?”
“ओहो… मोठ्ठा लेखक म्हणे… थॅंक्स.. मस्त आहेत फुलं..”, आधी रतीकडे आणि मग त्या मुलीकडे बघत कबीर म्हणाला..
“थॅंक्यु सर..मॅडमने सांगीतलं होतं, फुलं चांगलीच हवीत.. आजचा स्पेशल डे आहे…”, ती मुलगी हसत हसत म्हणाली..
“हॅना…ssss”, डोळे मोठ्ठे करुन रती तिला म्हणाली..
“.. आणि मॅडम असं पण म्हणाल्या की सर्व्हीस निट हवीय आणि कुणाचा डिस्टर्बन्स नकोय…”, हॅना म्हणाली..
“ए.. गधडे, चोमडे, मॅडम काय गं? जा तुझी कामं कर, शिफ़्ट संपली नाहीए तुझी.. बघते तुला उद्या…”
“ओके मॅडम…”
“आणि सॅमला पाठव, अॅमपीटायझर्स ऑर्डर करायची आहेत…”
“तुझ्याबरोबरच असते का हॅना?”, ती गेल्यावर कबिर म्हणाला..
“हो.. आम्ही एकत्रच जॉईन झालो इथे.. एक वर्ष झालं आता…पण..फ़ारच बडबड करत होती आज…. बघतेच तिला आता उद्या…” काहीसं फणकारुन रती म्हणाली
“ए, पण रिअल्ली थॅंक्स फ़ॉर द फ्लॉवर्स..”, कबिर फुलांना न्याहाळत म्हणाला..
एव्हढ्यात वेटर ऑर्डर घ्यायला आला…
“ड्रिंक्स मध्ये काय घेणार?”, कबिरने रतीला विचारले..
“सॉरी.. मी ड्रिंक्स घेत नाही..”,रती म्हणाली..
“रिअल्ली?”
“हम्म.. पण तु कर ऑर्डर…”
“प्लिज.. एका सुंदर मुलीसमोर बसुन एकटा दारु ढोसण्याइतपत मी बेवडा नाहीए, आणि तेव्हढे संस्कार आहेत अजुन माझ्यावर.. तु नाही तर मी पण नाही..”
दोघांनी मिळुन पुढची ऑर्डर दिली आणि मग रती म्हणाली.. “सो पुस्तकाबद्दल आपण बोलत होतो… आपण कुठे होतो?”
“आपण बॉबी बद्दल बोलत होतो..”, कबिर
“बॉबी..”
“हम्म.. तु तो डायलॉग मारलास ना..प्यार मै सौदा वगैरे.. तिथे..”
“ओह हा…आठवलं..”
“एक मिनीट, पण त्याआधी, मला जाणुन घ्यायचं आहे.. लकी ड्रॉची विनर कोण आहे? कशी आहे? मला तुझ्याबद्दल काहीच माहीत नाही..”, कबिर तिला थांबवत म्हणाला
“अम्म.. मी कशी आहे! एका वाक्यात सांगायचं तर ‘खुद की फेव्हरेट हुं!”, थोडीशी स्वप्नाळू आहे, स्वप्न बघायला खुप आवडतात, सिनेमे बघायला, पुस्तक वाचायला आवडतात… प्रेमावर गाढ विश्वास आहे.. कधी अजुन कुणाच्या रिअल-लाईफ़मध्ये प्रेमात नाही पडले.. पण जेंव्हा पडेन तेंव्हा त्यानेच प्रपोज करावं वगैरे जुनाट विचार बाजुला सारुन सरळ प्रप्रोज करेन.. किंबहुना.. मला प्रपोज करायला मिळावं ही एकमेव अपेक्षा मला प्रेमाच्या बाबतीत आयुष्याकडुन आहे.. अम्म.. करीअर वगैरे फ़ारसं मला भावत नाही.. त्यापेक्षा मस्त लग्न करुन संसार थाटायला मला खुप आवडेल.. ज्याच्याशी मी लग्न करेन ना कबिर.. तो खरंच खुप लक्की असेल.. खुप छान घर सांभाळेन मी त्याचं. इथे हॉटेलमध्ये कधी कधी जास्त वेळ थांबुन इथल्या शेफ कडुन मी स्वयंपाकही शिकतेय.. आय डोंन्ट ड्रिंक.. आय डोंन्ट स्मोक.. मी एकदम परफ़ेक्ट हाऊसवाईफ़ असेन…”
रती स्वतःबद्दल भरभरुन बोलत होती, आणि कबिर मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता.
“थोडक्यात सांगायचं ना.. तर तुझ्या पुस्तकातल्या त्या मीराच्या अगदी विरुध्द आहे मी. स्वतःच्या नवर्याळला सोडुन, सारखं स्वातंत्र्य स्वातंत्र्य हवंय म्हणुन स्वातंत्र्य मिळत नसतं.. नातेवाईकांच्या गोतावळ्यात, स्वतःच्या मुलांबरोबर, नवर्यारबरोबरही आपण आपलं स्वातंत्र्य जपु शकतो..”
“एक्स्झाक्टली..”, कबिर एक्साईट होऊन म्हणाला..
अचानक रतीने कबिरच्या डोळ्यात डोळे घालुन बघीतलं आणि म्हणाली.. “कबिर.. तुझं हे पुस्तक.. सत्य घटनांवर आधारीत आहे ना? कदाचीत.. तुझ्याच आयुष्यात घडुन गेलेल्या?”
रतीच्या त्या प्रश्नाने कबिर पुरता गोंधळुन गेला.. त्याला काय बोलावं तेच सुचेना..”असेलही.. कदाचीत नसेलही..”, शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला..
“मला माहीते कबीर.. मीरा सोडुन गेल्याचं दुःख तुझ्या चेहर्याणवर स्पष्ट दिसतं आहे.. पुस्तकाचा शेवट जेथे झाला त्यानंतर पुढे काही घडलं का नाही, ते मला माहीत नाही.. पण मीरा तुझ्या आयुष्यात नाहीए हे नक्की.. हो ना?”
“काहीही हं रती..”, कबिर ओढुन ताणुन हसत म्हणाला.. “मी एक लेखक आहे.. आणि लेखकाने लिहीलेली प्रत्येक गोष्ट त्याच्या आयुष्यात घडलेली असेलच असं काही नाही..”
“प्रत्येक गोष्ट नक्कीच नाही..पण ही असेल असं समहाऊ मला वाटतंय.. आणि म्हणुनच तु अजुनही मीराला शोधतो आहेस.. कदाचीत ती इथे नसेल तर तिला इतरांमध्ये.. कदाचीत माझ्यामध्येही शोधत असशील…हो ना?”
वेटर ऑर्डर घेऊन आला तसा तो प्रश्न तेथेच अर्धवट राहीला..
“एनीवेज.. माझं सोड.. आपण पुस्तकाबद्दल बोलुयात?”, ऑर्डर टेबलावर मांडुन वेटर निघुन गेल्यावर कबीर म्हणाला..
“जशी तुझी इच्छा, तुला तुझं वैयक्तीक आयुष्य, तुझी प्रायव्हसी जपायचा पुर्ण अधीकार आहे..”
“हम्म…”, आपल्या प्लेटमध्ये ऑर्डर वाढुन घेत कबीर म्हणाला..
“मग.. तु पुढच्या पार्टवर काम सुरु केलंस?”, काही वेळ शांततेत खाल्यावर रती म्हणाली
“तसा थोडा विचार केलेला आहे.. पण अजुन लिहायला अशी सुरुवात केली नाही.. तुला काय वाटतं? काय व्हायला हवं पुढे?”?
“अम्म.. म्हणजे कथेचा जो नायक आहे.. त्याबद्दल पुर्ण माहीती नाही पुस्तकात.. म्हणजे हे बघ.. शेवटी आपल्या भारतीय संस्कृतीत.. प्रेम जमलं की त्याच्या शेवट बहुतांशी लग्नातच होतो.. कथेच्या नायकाची मीराकडुन तिच अपेक्षा आहे का? पुस्तकात म्हणल्याप्रमाणे मीराचे आधी लग्न झालेले आहे.. नायक ह्यासाठी तयार आहे का? त्याच्या घरचे हे लग्न मान्य करणार आहेत का?”
“नुसतं इतकंच नाही.. अजुनही असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत..”, कबीर स्वतःशीच बडबडला..
“दुसरी गोष्ट त्याच्या पहील्या गर्ल-फ्रेंडशी असलेलं त्यांच नात तुटलं.. जरी ते नातं, तिने तोडलं असलं तरी तु म्हणल्याप्रमाणे तिचं वागणं, तिची लाईफ़-स्टाईल आपल्या नायकालाही पटत नव्हतीच ना.. मग मीराचे हे स्वच्छंदी वागणं तो मान्य करेल.. तिच्याशी जुळवुन घेऊ शकेल?”
“आणि मीराचं काय? म्हणजे ती जर नायकाचं प्रेम ती स्विकारत नसेल तर नायकाने काय करावं?”, कबीर
“तु लेखक आहेस.. तुला माहीती पाहीजे..”, हसत रती म्हणाली…
“हो म्हणजे.. तुझं काय मत आहे?”
“अम्म.. मला वाटतं तिच्या पहील्या लग्नात ती दुखावली गेली आहे.. तिचा नात्यांवरचा, प्रेमावरचा विश्वास काहीसा ढासळला आहे.. मला वाटतं नायकाने तिला थोडी मोकळीक द्यावी. तो जितका तिच्या जवळ जायचा प्रयत्न करेल तितकी ती दुरावत जाईल. जर तिच्या मनात सुध्दा प्रेम असेल तर आज ना उद्या तिला ह्याची नक्की जाणीव होईल…”
“तुला वाटतं असं…?”, कबीर
रती बराच वेळ कबीरचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत होती. कबीरला ते असह्य झालं आणि त्याने नजर दुसरीकडे वळवली.

नंतरचा वेळ मात्र त्यांनी पुस्तक सोडुन इतर विषयांवर गप्पा मारण्यात घालवला. मीराचा विषय निघाल्यावर कबीर काहीसा अपसेट झाला होता हे रतीने ताडले आणि मग तिनेच विषय बदलला. तिच्या मनमोकळ्या स्वभावाने कबीर पुन्हा जुन विसरुन तिच्या गप्पांमध्ये सामील झाला.
थोड्या-थोड्यावेळाने कोण-ना-कोणतरी सतत येऊन काही कमी नाही ना ह्याची खात्री करुन जात होते. रतीनेच खरं तर ती संध्याकाळ कबीरसाठी स्पेशल बनवली होती. शेवटी बिल भरुन झाल्यावर दोघंही बाहेर पडले.
“आता परत कामं? का आता घरी?”, कबीरने विचारलं.
“नाही आता घरी..”
“सोडु का घरी? कशी जाणारेस?”, कबीर
“माझी नॅनो आहे ना..”
“नॅनो..??”
“हो..का? चांगली आहे गाडी…”
दोघं गेटपाशीच गप्पा मारत उभे होते तोच कबीरच लक्ष गेटच्याच थोडं पुढे एका गडद-निळसर रंगाचा ब्लेझर, हातात फुल घेऊन उभ्या असलेल्या तरुणाकडे गेले आणि तो म्हणाला…”रोहन.. तु? इथे?”
कबीरला इथे बघताच रोहन पुरता गोंधळुन गेला.. काय करावं हे न समजुन तो जागच्या जागीच थिजुन उभा राहीला..
“कबीर.. तु? तु तर ब्ल्यु-डायमंडला जाणार होतास ना?”
एव्हाना रतीपण तिथे येऊन थांबली.
कबीरने रतीची आणि रोहनची ओळख करुन दिली.
“हो अरे.. पणे हिने ऐन वेळी बदलले.. पण तु काय करतो आहेस इथे.. आणि हातात फुलं वगैरे.. कोणी येणार आहे की काय?”, डोळे मिचकावत कबीर म्हणाला..
“हो म्हणजे.. नाही..”
“अरे असा बावचळल्यासारखा काय वागतो आहेस.. आहे तर आहे.. त्यात काय एव्हढं? माझ्यापासुन लपवत होतास ना.. पकडला कि नाही?”
“नाही रे.. अगदीच तसं काही नाही..”
“नाही कसं.. त्या दिवशीच मी राधाला म्हणालो होतो.. तु रात्री दीडवाजता ऑनलाईन दिसलास तेंव्हा.. कुछ तो गडबड है..”
“बरं, चल मी निघतो.. आत जातो आता..”
“अरे थांब.. जरा मला तरी बघु देत कोण आहे ती..”
“तुला काय बघायचंय.. तुला माहीते कोण आहे ती…”
“कबीर.. तु? इथे?”, कबीर पुढे काही बोलणार इतक्यात मागुन परीचीत आवाज आला..
कबीरने वळुन मागे बघीतले…त्याच्या समोर मोनिका उभी होती..
“ओह माय गॉड…”, कपाळाला हात लावत हसत कबीर म्हणाला.. “केंव्हापासुन चालु आहे हे…”
“कबीर.. प्लिज. चिडू नकोस.. ऐक..”, रोहन समजावणीच्या स्वरात म्हणाला..
“ए.. अरे चिडलो वगैरे नाहिए मी..आय एम रिअल्ली हॅपी फ़ॉर बोथ ऑफ़ यु…गो ऑन.. एन्जॉय.. तुमची संध्याकाळ आहे.. जा वेळ नका घालवु..”
“कबीर.. चिडला नाहीस ना…”,मोनिका
“वेडी आहेस का? मी कश्याला चिडू.. तुझं आयुष्य जगण्यास तु मोकळी आहेस.. रोहन खुप चांगला मुलगा आहे…जा पळा पट्कन…”, कबीर..
“आपण नंतर बोलु ह्या विषयावर..”, रोहन कबीरला म्हणाला आणि दोघंही बाय करुन निघुन गेले.
कबीर दोघंही नजरेआड होईपर्यंत त्यांच्याकडे बघत उभा होता..
बर्यादचवेळानंतर त्याला रती अजुनही बरोबर असल्याची जाणीव झाली.. त्याने स्वतःला सावरले..
“इफ़ आय एम नॉट रॉग.. मोनिका तुझी एक्स-गर्लफ्रेंड राईट?”, रती म्हणाली..
“हम्म..”, काहीस थांबुन कबीर म्हणाला..
“हम्म.. जसं पुस्तकात लिहीलं आहे तसं.. आणि जर तुझी एक्स-गर्लफ्रेंड आहे.. तर मीरा पण आहे… हो ना…”
कबिरला खोटं बोलण्याचा काहीच मार्ग सापडेना..
त्याने काही न बोलता.. नुसती मान हलवली…
“आणि लास्ट-बट-नॉट-द-लिस्ट.. ही राधा.. म्हणजेच मीरा.. हो ना?”
कबीर जमीनीकडे बघत उभा होता.. म्हणुन किंचीत कमरेत खाली वाकुन रतीने त्याच्या चेहर्याेकडे बघत विचारलं…
कबीरच्या मनात असंख्य भावनांचा कल्लोळ उडाला होता..राधा कुठे होती हे त्यालाच ठाऊक नव्हते.. आणि मोनिका आता ऑफ़ीशीअली त्याच्या आयुष्यातुन निघुन गेली होती. असं नाही की.. त्याला मोनिका त्याच्या आयुष्यात परत हवी होती.. पण तरीही.. काही क्षणापर्यंत त्याची होती… रोहनबरोबर तिला पाहुन त्याला पहील्यांदा आपल्या एकटेपणाची जाणीव झाली…
“शुड वुई जस्ट से बाय?”, खालीच बघत कबीर म्हणाला..
“हम्म.. ओके.. पण मला परत भेटायचंय तुला.. भेटशील?”
“ओके..”
“बाय देन.. टेक केअर कबीर..”, रती म्हणाली..
कबीर काही न बोलता माघारी वळला….
[क्रमशः]

Post Reply