इश्क - Marathi love stori

Post Reply
User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

इश्क - Marathi love stori

Post by rangila »

इश्क - Marathi love stori


कोरेगाव पार्कातल्या क्रॉसवर्डच्या बाहेर ‘मिडनाईट-ब्लॅक’ रंगातली फोर्ड-ईको-स्पोर्ट गाडी येऊन थांबली. दार उघडुन एक साधारण तिशीच्या आसपासचा एक युवक उतरला. गाडीच्या रंगाशीच सार्धम्य सांगणारा काळा कुळकुळीत सॅटीनचा शर्ट, ग्रे रंगाचं स्पोर्ट्स जॅकेट, पायात क्रोकोडाईल शुज, बारीक फ्रेमचा चंदेरी चष्मा आणि जेल लावुन मागे वळवलेले केसं. दाराशीच उभ्या असलेल्या बॉयला व्हॅलेसाठी गाडीची किल्ली देऊन तो क्रॉसवर्डमधील एका कोपर्याेकडे वळला.
कोपर्या्त जमलेली ८-१०च लोकं बघुन त्या तरूणाच्या चेहर्यायवरील हास्य किंचीत मावळले.
त्याला आलेले बघताच गळ्यात मोठ्ठालं ओळखपत्र, कानाला ब्ल्यु-टूथ हेड्सेट लावून वावरणारा संयोजक टाईप्स एक युवक धावतच दाराकडे आला.
“वेलकम कबीर सर.. प्लिज वेलकम..”, तो संयोजक त्या तरुणाशी हातमिळवणी करत म्हणाला.
“जित.. अरे काय? इतकीच लोकं?”, काहीश्या नाराजीच्या स्वरात कबीर म्हणाला
कबीर, एक नविनच नावारुपाला आलेला लेखक. वर्षभरातच प्रकाशीत झालेली त्याची पहीली दोन पुस्तंक सुपर-हिट ठरली होती. गुन्हेगारी कथांमधील नविन उगवता तारा म्हणुन मेहतांचा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्याने पटकावला होता. पहीले बॅंक-रॉबरी आणि दुसरे किडनॅपींगवर बेतलेली त्याची दोन्ही पुस्तकं हातोहात खपली होती. अनेकांनी ती पुस्तकं एकाच बैठकीत वाचुन काढली होती. शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणुन धरणार्याट त्याच्या कथा उत्सुकतेचा विषय ठरल्या होत्या. त्यामानाने त्याचे तिसरे पुस्तक म्हणावे तसे प्रसिध्द होऊ शकले नाही. आणि आज कबीरचे चौथे पुस्तक प्रकाशीत होत होते.
परंतु प्रकाशनासाठी जमलेली जेमतेम ८-१० लोकं पाहून कबीर काहीसा निराशच झाला होता.
“जित.. इतकीच लोकं?”, कबीर
“आय एम सॉरी सर.. अॅजड्व्हरटाईज तर व्यवस्थीत केले होते पण… येतील सर.. अजुन येतील लोकं..”, जित उसने अवसान आणून म्हणाला
“एनीबडी फ्रॉम मिडीय़ा?”, कबीर
“नो सर..”, खाली मान घालून जित पुटपुटला..
“ओके! व्हेअर ईज रोहन?”, कबीरने विचारलं.
“येतोय सर तो, सेकंड फ्लोअर-वर आहे, मी इन्फॉर्म केलंय त्यांना तुम्ही आला आहात म्हणुन..”, जित म्हणाला
“वेल देन.. शुड वुई प्रोसीड?”, कबीर जॅकेटची बटणं ठिक करत म्हणाला..
“वन सेकंद सर..”, असं म्हणुन जितने आपला फोन लावला… आणि म्हणाला.. “कबीर इज मेकींग एन्ट्री, स्पॉटलाईट अॅ न्ड क्लॅपींग्ज प्लिज…”
दोन सेकंद थांबुन जितने कबीरला चलण्याची खुण केली. त्याचबरोबर एक मोठ्ठा स्पॉटलाईट कबीरवर येऊन स्थिरावला. पाठोपाठ स्टेजवरच्या निळ्या साडीतील एका तरूणीने केलेली अनांन्समेट आणि काही मोजक्या टाळ्यांच्या गजरात कबीर स्टेजवर चढला.
समोरच्या प्रेक्षकांत फारसं कोणी उत्साही दिसत नव्हते. पहील्या रांगेत तर बहुदा दोन चार रिकामे-पेन्शनरच येऊन बसले होते. त्यांना बघुन कबीरचे धाबे दणाणलेच. मागच्या प्रकाशनाच्या वेळी अश्याच एका वयस्कर माणसाने कबीरच्या पुस्तकातील अनावश्यक अश्लीलतेबद्दल चार खडे बोल सुनावले होते. आणि ह्यावेळी त्यावरुन किंचीतही बोध न घेता कबीरने ह्याही पुस्तकात नेहमीचे गरम प्रसंग घुसडले होतेच. कपाळावर मोठ्ठ कुंकु लावलेली एक स्त्री, दोन तिशीच्या आसपासचे तरुण आणि ५-६ कॉलेज युवक-युवतींचा ग्रुप.. बस्स…
“थॅंक्यु माय फ्रेंड्स…”, कबीरने माईकचा ताबा घेतला…”मला माहीती आहे, मला थोडा उशीरच झाला यायला.. त्याबद्दल मनापासुन दिलगीर आहे. मागच्या माझ्या तिन पुस्तकांना जो तुम्ही भरभरुन प्रतिसाद दिलात तसाच ह्या नव्या-कोर्याआ चौथ्या पुस्तकाला मिळेल अशी मी आशा बाळगतो. माझे हे चौथे पुस्तक ‘रोड-ट्रीप’ वर आधारीत आहे. एक कपल आपल्या अॅ नीव्हर्सरीनिमीत्त ट्रीपला निघते आणि मग वाटेत काही घटना घडतात. मर्डर, किडनॅपींग, रोमॅन्स सर्व काही ह्या पुस्तकात आहेच…”
कबीर मुक्तपणे आपल्या पुस्तकाची तारीफ करत होता इतक्यात त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला.
कबीरने एस.एम.एस उघडला, रोहनचाच होता…
“कबीर.. फार पाल्हाळ लावू नकोस, जमली आहेत ती पण लोकं जातील.. पट्कन उरकुन वरती ये, मेहता साहेब तुझी वाट बघत आहेत…”
कबीरने वरती बघीतले, दुसर्याो मजल्यावरच्या व्हरांड्यात गुटगुटीत, जुन्या काळच्या अजय-देवगणसारखी हेअर-स्टाईल असलेला गोरा-गोमटा रोहन उभा होता. रोहन.. म्हणाल तर कबीरचा जिवाभावाचा मित्र, म्हणाल तर कबीरचा मॅनेजर. त्याचे पब्लीकेशन्स, त्याच्या मिटींज्स, मिडीआ-कनेश्कन्स सगळं तो एकहाती सांभाळायचा.
त्याने कबीरला पटकन वरती यायची खुण केली आणि तो निघुन गेला.
“फ्रेंड्स, फक्त आजच्या दिवसापुरती ह्या पुस्तकावर ३०% डिस्काऊंट आहे, शिवाय.. मी अर्धा तास इथेच आहे, जे कोणी पुस्तक विकत घेतील त्यांना माझी साईन्ड कॉपी मिळेल ह्याची व्यवस्था आहे.. सो गाईज.. हिअर वुई गो…”
निळ्या साडीतील त्या दुसर्याद संयोजक युवतीने मरुन-रंगाच्या वेस्टनमध्ये गुंडाळलेले पुस्तक कबीरच्या हातात दिले. कबीरने काळजीपुर्वक वेस्टन उघडले आणि आपले पुस्तक उंच धरले.
घेतलेल्या पैश्याला जागण्यासाठी संयोजक मंडळींनी जोरदार टाळ्या वाजवल्या, बाकी प्रेक्षकांमधुन काही मोजके सन्माननीय अपवाद वगळता फारसा कोणी उत्साह दाखवला नाही.
प्रकाशन संपवुन कबीर कोपर्यावतील टेबलावर जाऊन बसला.
जित टेबलापाशी येऊन कबीरच्या कानाशी म्हणाला, “सर बुक-रिडींग करणार होतात ना? आय मीन पुस्तकातील काही मोजकी पानं तुम्ही वाचणार असं रोहनने कळवलं होतं.. तसं सांगीतलंय आपण..”
“लुक अराऊंड जित.. कुणाला इंटरेस्ट नाहीये… अर्धी लोकं उठुन गेली सुध्दा.. लेट्स कॅन्सल इट..”, कबीर म्हणाला
“ओके सर.. “, असं म्हणुन जित तेथुन निघुन गेला
अख्या गर्दीतील (!) फक्त दोन तरुणींना एक पुस्तक खरेदी करताना कबीरने पाहीले. त्या दोघीही स्वताच्या गप्पांमध्येच मग्न होत्या. बोलत बोलतच त्यांनी पुस्तक कबीरच्या टेबलावर ठेवले. कबीरने काही बोलण्यासाठी तोंड उघडले पण त्यांचे त्याच्याकडे लक्षच नव्हते.
कबीरने गुमान सही ठोकली, तसे ते पुस्तक घेऊन दोघी निघुन गेल्या.
कबीरने मोबाईल काढुन रोहनला फोन लावला.
“हॅलो.. रोहन.. अरे काय हे.. कसला थंडा रिस्पॉन्स… फक्त एकच पुस्तक विकलं गेलं..”, कबीर
“ते सोड.. तु वरती ये आधी.. मेहता सर थांबलेत..”, रोहन
“अरे पण.. मी सांगीतलं होतं ना त्यांना, त्यांची ऑफर मी आत्ता घेऊ शकत नाही म्हणुन…”, कबीर..
“हे बघ कबीर.. चिडू नकोस, पण आपलं तिसरं पुस्तक फारसं चाललं नाही.. आणि चौथ्याकडुनही मला फारश्या आशा नाहीत..”, रोहन
“अरे पण का? पहीली दोन पुस्तक किती मस्त प्रॉफीट देऊन गेली..”
“का? अरे एका तिसर्याु माणसाच्या नजरेतुन तु तुझं पुस्तक वाचं. पुर्ण टाईप-कास्ट झाला आहेस तु. तेच खुन, त्याच मारामार्याअ, संधीसाधू बाई, माफीया, एखादा गरीब बेचारा परीस्थीती-का-मारा क्लर्क/मॅनेजर, प्रेडीक्टेबल झालंय अरे.. हे पुस्तक नाही गेलं विकलं तर तुला माहीती आहे का, आपल्याला केवढा मोठ्ठा लॉस होणारे..??”
“हो.. पण ते नंतर बघु ना, आत्ता त्या मेहताला घालवून दे…”
“हे बघ कबीर.. अर्धा तास झाला, त्यांच्यासारखा मोठ्ठा माणुस तुझी वाट बघत थांबलाय, निदान त्याची कदर म्हणुन तरी तु भेट.”
“पण यार, मला लव्ह-स्टोरी लिहीण्यात काडीचाही इंटरेस्ट नाहीये.. माझा जॉनरच नाहीये तो..”
“हे सगळं आपण समोरा-समोर बसुन नाही का बोलु शकत?.. तु वरती ये आधी..” असं म्हणुन रोहनने फोन बंद केला.
एव्हाना समोरची गर्दी पांगली होती. संयोजकांनीही फारसा पेशन्स नं दाखवता आवरा-आवरीला सुरुवात केली होती.
कबीरने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो क्रॉसवर्डच्या दुसर्या मजल्यावर गेला.
समोरच्याच सोफ्यावर साधारणपणे साठीच्या आसपासचे, चंदेरी केस असलेले एक गृहस्थ बसले होते. रोहन त्यांच्याच शेजारी बसला होता.
कबीरला येताना पहाताच ते गृहस्थ, मेहता, उठुन उभे राहीले..
“वेलकम यंग मॅन.. वेलकम.. ग्रिटींज्स फ्रॉम मेहना-एन-मेहता पब्लीकेश्नस ऑन युअर न्यु बुक..”
“थॅक्स अ लॉट सर…”, कबीर त्यांच्याशी हात मिळवत म्हणाला.. “प्लिज बसा ना सर.. “
दोघंही सोफ्यावर बसले…
“कॉफी?”, रोहनने विचारलं…
“नो.. थॅंक्स रोहन.. बसं..”, कबीर म्हणाला, “बोला मेहता सर, काय काम काढलंत?”
“काम वेगळं काहीच नाही”, कोटाची बटणं काढुन रिलॅक्स होत मेहता म्हणाले, “तेच, जे मागे आपण बोललो होतो…” असं म्हणुन त्यांनी कोटाच्या खिश्यातुन एक पांढरे एन्व्हलोप काढुन कबीरला दिले
“काय आहे हे..?”, कबीरने प्रश्नार्थक नजरेने मेहतांना विचारले.
“सि इट युअरसेल्फ..”, मेहता
कबीरने ते पाकीट उघडले, आतमध्ये त्याचं नाव घातलेला एक लाख रुपायाचा चेक होता.
“अॅ डव्हॅन्स आहे, बाकीच्या टर्म्स मी रोहनशी बोललो आहे.. तो सांगेल सगळं…”
“पण सर, लव्ह-स्टोरी.. मला नाही जमायची.. आणि त्यात माझी पर्सनल लाईफ..”
“हो.. मला रोहनने सांगीतलं सगळं.. पण मला वाटतं, तुम्ही नक्की लिहु शकाल. तुमची लेखन शैली मला खुप आवडली. मला वाटतं तुम्हाला सुध्दा एका हिटची गरज आहे…”
“मी.. मी थोडं विचार करुन सांगतो मेहता सर..”, कबीर म्हणाला
“मला आत्ता कमीटमेंट हवीय कबीर. मी खुप दिवस थांबलो. येस… ऑर नो…”, मेहता निर्वाणीच्या सुरात म्हणाले..
“टेक ए ब्रेक कबीर.. कुठल्या तरी दुसर्याद गावी जा, जिथे तु फक्त तु असशील, सगळ्यांपासुन दुर… तुझ्या इथल्या पर्सनल प्रॉब्लेम्सपासुन दुर.. कदाचीत तुझी लव्ह-स्टोरी तुला तिकडे सापडेल.. मेहता इज रेडी टु स्पॉन्सर युअर ट्रीप”, रोहन म्हणाला
“ओके हिअर इज अ डिल..”, कबीर म्हणाला.. “आय विल गिव्ह-इट-अ-ट्राय… से ३ आठवडे, पण त्यामध्ये काहीच कंस्ट्रक्टीव्ह नाही झालं तर वुई-विल कॅन्सल धिस डिल.. आणि मी हा चेक रिटर्न करेन, एक्स्पेट द टुर एक्स्पेन्सेस.. मेहता विल बेअर दोज.. ओके?”,
“डील..”, काही क्षण विचार करुन मेहता म्हणाले
“ग्रेट देन… बुक मी ए व्हिला इन माथेरान.. पुर्ण शांतता आहे तेथे..”, कबीर म्हणाला..
“माथेरान? अरे तुला लव्ह-स्टोरी लिहायची आहे, मेडीटेशनवर बुक नाही..”, हसत हसत मेहता म्हणाले, “माथेरान किती अंधारलेले, बंद-बंद गाव आहे.. यु निड टु गो टु सम लाईव्हली प्लेस.. कलरफुल.. फुल्ल ऑफ युथ प्लेस.. यु आर गोईंग टु गोवा.. उद्या सकाळपर्यंत मी प्लेन टिकीट्स आणि हॉटेल बुकिंग डिटेल्स रोहनला मेल करतो..ओके?” मेहता सोफ्यावरुन उठत म्हणाले…
“थॅंक्यु सो मच सर..”, रोहन आणि कबीर मेहतांना म्हणाले…
“फॉल इन लव्ह यंग मॅन.. अॅसन्ड मेक अस फॉल इन लव्ह विथ युअर स्टोरी…”, कबीरच्या खांद्यावर दोन बोट वाजवत मेहता म्हणाले आणि मागे वळुन निघुन गेले…
“वन लॅक्स?”, कबीर डोळे उडवत रोहनला म्हणाला..
“मग ! सांगत होतो तुला.. अरे हा तर अॅ डव्हान्स आहे.. चल कॉफी घेऊ आधी.. मी तुला बाकीचे डिटेल्स ब्रिफ करतो..”, रोहन म्हणाला..
दोघं जण क्रॉसवर्डच्या कॉफी कॉर्नरकडे निघाले.
[क्रमशः]
User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

Re: इश्क - Marathi love stori

Post by rangila »

2

कबीर गोवा एअरपोर्टच्या बाहेर आला आणि समुद्राचा खारा, दमट वारा त्याच्या नाकात शिरला. कबीरने डोळे बंद करुन तो वारा शरीराच्या नसा-नसांत भरुन घेतला. शहरांतला तो पेट्रोलचा, पोल्युशन्सचा, कचर्याकचा, कोंदलेल्या श्वासांचा, गल्लोगल्ली उभारलेल्या हातगड्यांवरील खाद्यपदार्थांचा.. सर्वा-सर्वांपेक्षा वेगळा…
काही क्षणच कबीर त्या स्वर्गीय अनुभुतीत होता. त्याची तंद्री भंगली ती टुरीस्ट-टॅक्सीवाल्यांच्या आवाजांनी.
“पणजीम..पणजीम.. म्हाप्सा.. म्हाप्सा..” च्या आवाजांनी परीसर गजबजुन गेला.
कबीरने एक दीर्घ श्वास घेतला, आपली ट्रॉली बॅग ओढली आणि तो टॅक्सीत जाऊन बसला.

“सर, फर्स्ट टाईम गोवा?”, ड्रायव्हरने टॅक्सीच्या आरश्यात कबीरकडे बघत विचारलं.
कबीर स्वतःशीच हसला आणि मानेनेच त्याने नाहीची खुण केली.
कबीरला त्याची शेवटची, सहा महीन्यांपुर्वीची गोवा-ट्रीप चांगलीच लक्षात होती. त्याच्या चार मित्र-मैत्रीणींबरोबर तो गोव्याला आला होता..त्यापैकी एक होती मोना.. मोना, अर्थात मोनिका, कबीरची गर्लफ्रेंड.. तेंव्हाची. एक महीन्यापुर्वीच कबीर आणि मोनिकाचं ब्रेक-अप झालं होतं.
मोनिका, एकदम स्मार्ट, आऊटगोईंग, व्यवसायाने एक प्रो-फोटोग्राफर, तर कबीर मात्र काहीसा एकलकोंडा, स्वमग्न, स्वतःच्या आणि पुस्तकांतील पात्रांच्या सहवासात रमणारा.
पुस्तकाच्या कव्हरपेजच्या फोटोशुटच्या वेळी कबीर आणि मोनाची भेट झाली. म्हणतात ना, ‘ऑपोझिट अॅसट्रअॅ्क्ट्स’ त्याप्रमाणे कबीर आणि मोना एकमेकांकडे ओढले गेले. मोनिका सतत बडबड, तर कबीर कानसेन. तिची दिवसभराची बडबड तो आवडीने ऐकायचा. तिचे क्लायंट्स, फोटोशुट्सच्या गमतीजमती, फोटोग्राफीतील गिमिक्स ती सांगायची, तो ऐकायचा. दोघांचं चांगलं जमायचं. दिसायला सुध्दा दोघंही एकमेकांना अनुरुप होते. पण सतत शांतच असणार्याो कबीरचा काही दिवसांनी मोनिकाला कंटाळा यायला लागला. बोलुन बोलुन सर्व विषय संपले तसे दोघांमधील संवाद कमी होऊ लागला. फोटोग्राफीला लाभलेल्या ग्लॅमरमुळे बाकीही अनेक स्मार्ट-डॅशींग लोकांशी मोनिकाच्या नविन ओळखी होत होत्या, त्यांच्यापुढे तिला कबीर खुपच लो-प्रोफ़ाईल वाटायला लागला. आणि मग दोघांमध्ये बारीक-बारीक गोष्टींवरुन कुरबुरी सुरु झाल्या. महीन्याभरातच दोघांमधली भांडणं विकोपाला गेली आणि दोघांमध्ये कायमचे ब्रेक-अप झाले.
मोनिका त्या ग्लॅमरस जगात सहज मिसळुन गेली, पण आधीच एकलकोंडा असलेला कबिर मात्र अजुनच स्वतःमध्ये गुरफटत गेला. कदाचीत हे सुध्दा एक कारण असेल की कबिरचं तिसरं पुस्तक म्हणावं तितकं प्रसिध्द होऊ शकलं नाही.
कबिरने मोबाईलची फोटो-गॅलरी उघडली आणि मोनिकाचे फोटो बघण्यात तो गुंग होऊन गेला.

“सर, गोवाऩ इंटरनॅशनल, तुमचं हॉटेल आलं..”, ड्रायव्हर कबिरला म्हणाला..
कबिरने मोबाईलमधुन आपलं डोकं काढलं आणि त्याने टॅक्सीच्या खिडकीतुन बाहेर बघीतलं. समोर अवाढव्य पसरलेले ’गोवाऩ इंटरनॅशनल’ हॉटेल उभे होते. आवारात वेगवेगळ्या रंगाचे झेंडे वार्यासबरोबर फडफडत होते. विस्तीर्ण लॅन्ड्स्केपमध्ये तर्हेततर्हेभची झाडं, फुलं डौलाने डुलत होती. ट्रॅडीशनल ड्रेसेसमध्ये दरबान आपल्या झुपकेदार मिश्या सांभाळत उभे होते.
कबीरने मिटर पे केला आणि तो हॉटेलच्या लॉबीमध्ये गेला. पाठोपाठ ड्रायव्हर त्याचे लगेज घेऊन आतमध्ये आला.
“गुड-इव्हनिंग सर, हाऊ मे आय हेल्प यु?”, मेकॅनिकल आवाजात रिसेप्शनिस्टने कबिरला विचारलं.
“आय हॅव्ह अ बुकिंग, कबिर द नेम..”, नाकावर घसरणारा चष्मा पुन्हा सरळ करत कबिर म्हणाला..
“जस्ट अ सेकंद सर..”, असं म्हणुन त्या रिसेप्शनिस्टने आपली लांबसडक बोटं संगणकाच्या किबोर्डवर फिरवायला सुरुवात केली.
काही क्षण गेल्यावर तिने कबीरकडे पाहीलं आणि म्हणाली, “जस्ट ए मोमेंट सर”, आणि ती मॅनेजरच्या केबीनमध्ये गेली.
कबीर चलबिचल करत तेथेच उभा राहीला. दीड-तासाची का असेना, फ्लाईटच्या प्रवासाने त्याला थकवा आला होता. मस्त हॉट-टब बाथ घेण्याची स्वप्न रंगवत तो उभा होता.
थोड्याच वेळात रिसेप्शनिस्ट आणि पाठोपाठ एक सुटाबुटातला माणुस बाहेर आला. त्रासिक नजरेने त्याने संगणकावर नजर फिरवली.
“चेक फॉर द सुट्स..”, मॅनेजर म्हणाला
“आय हॅव ऑलरेडी सर.. उद्या सकाळी एक व्हेकंट होईल, आत्ता तरी…”
“एनी प्रॉब्लेम?”, कबिरने त्या रिसेप्शनिस्टला विचारलं.
“सर.. द रुम दॅट वॉज अॅ्लोकेटेड टु यु इज हॅविंग सम प्लंबिंग प्रॉब्लेम…, बाथरुम इज नॉट वर्कींग अॅान्ड रुम इज फिल्ड विथ वॉटर..”, चेहरा पाडत रिसेप्शनिस्ट म्हणाली
“ओह, दॅट्स ओके, गिव्ह मी अनदर रुम, आय विल पे एक्स्ट्रा..”, खिश्यातुन पाकीट काढत कबिर म्हणाला..
“यु डोन्ट हॅव टु पे सर, प्रॉब्लेम इज फ़्रॉम अवर साईड, वुई विल अपग्रेड यु टु सुट्स विदाऊट एनी एक्स्ट्रा चार्ज.. बट..”, रिसेप्शनिस्ट
“बट? बट व्हॉट..”
“सर.. सुट्स सगळे फुल्ल आहेत, इन्फॅक्ट ऑल रुम्स आर ऑक्युपाईड, सुट कॅन बी अॅ्रेंज्न्ड टुमारो मॉर्निंग ओन्ली..”, मॅनेजर..
“सो.. आय मीन.. मग मी आत्ता काय करु?, संध्याकाळचे ८.३० होतं आलेत..”, कबिर आवाज चढवुन म्हणाला..
“आय एम सॉरी सर, बट द प्रॉब्लेम इज बियॉन्ड अवर कंट्रोल..”, मॅनेजर
“अरे पण मग मी काय करु तोपर्यंत? गिव्ह मी बुकिंग इन सम अदर हॉटेल्स देन..”
“सॉरी सर, पण आमचं कुठल्या हॉटेलबरोबर टाय-अप नाहीए..”, मॅनेजर..
“धिस इज रिडीक्युलस…अॅंन्ड अनप्रोफ़ेशनल.. आय वॉन्ट टु कॅन्सल माय बुकिंग इमीडीयटली.. प्लिज रिटर्न द अमाऊंट पेड..”, कबिर
“वुई अंडरस्टॅंन्ड युअर कन्सर्न सर.. बट…”
“नो यु डोन्ट अंडरस्टॅंन्ड, माझं बुकिंग रद्द करा लगेच..”, कबीर काऊंटरवर हात आपटत म्हणाला
“ओके सर.. प्लिज बी सिटेड..”, रिसेप्शनिस्ट लॉबितल्या सोफ्याकडे हात दाखवत म्हणाली.
कबिरचे डोकं संतापाने भडकले होते, एव्हढं ‘इंटरनॅशनल’ नाव दिलंय हॉटेलला आणि साधे प्लंबींगचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होत नाहीत म्हणजे काय. तो जवळच उभा असलेल्या ड्रायव्हरकडे वळला.
“लगेज टॅक्सीमे रखो, हम दुसरा हॉटेल चलेंगे..”, कबीर म्हणाला..
“का सर? काय झालं?”, ड्रायव्हर
कबिरने झालेला किस्सा त्याला सांगीतला…
“सर, बुकिंग कॅन्सल मत करो.. चाहीए तो आज की रात के लिए कही रह लो.. अभी सिझन है तो बुकिंग मिलना मुश्कील है बाकी जगह..”
“अरे काय.. उलट ऑफ सिझन आहे.. पावसाळा सुरु होईल आता.. कुठेतरी मिळेलच ना..”, कबिर
“सर, आजकाल पावसाळ्याला पण फुल्ल गर्दी असते गोव्यात..”
“सर.. युअर रिफंड..”, दोघांच बोलणं चालु होतं तेंव्हा रिसेप्शनिस्ट एक पांढर पाकीट पुढे करत म्हणाली..
कबिर तणतणत काऊंटरवर गेला आणी त्याने ते पाकीट घेतले आणि तसाच माघारी फिरला.

पुढचा दिड तास कबीर टॅक्सीमधुन फिरत होता, परंतु ड्रायव्हर म्हणाला तसे खरोखरच हॉटेल्स फुल्ल होते.
कबिरने घड्याळात नजर टाकली, एव्हाना साडे-दहा वाजत आले होते.
“ड्रायव्हर.. कोई छोटा हॉटेल है तो देखो रात के लिए, कल सुबह ढुडेंगे अब, थक गया हु मै..”, वैतागुन कबिर म्हणाला
“जी सर, मेरे एक पैचानवाला है, देखता हु..”, ड्रायव्हरने आपल्या एका मित्राला फोन लावला.. दोन मिनिट बोलल्यावर तो कबिरला म्हणाला, “चलिए सर, कल शामतक एक रुम मिल जाएगा”
कबिरच्या परवानगीची वाट न बघताच ड्रायव्हरने टॅक्सी वळवली.
अर्ध्या तासानंतर टॅक्सी थोडी गावाच्या बाहेरच आली होती. सर्वत्र बर्यामपैकी शांतता आणि अंधार होता. छोट्या मोठ्या गल्लींमधुन फिरल्यानंतर टॅक्सी एका निळसर जुनाट इमारतीपाशी येऊन थांबली. मळकट झालेल्या ट्युबलाईट्सचा पिवळट-अंधुक प्रकाश रस्त्यावर पसरला होता. आजुबाजुला सामसुमच होती. इमारतीच्या खाली एक छोटेसे मेडिकल-शॉप चालु होते.
कबिरने प्रश्नार्थक नजरेने ड्रायव्हरकडे बघीतले.
“कल शाम तक साब..दुसरा अब नही मिलेगा.. सुबह दुसरा ढुंड लेना…”, ड्रायव्हर म्हणाला
“नसिब ही खराब है साला..”, कबिरने लाथेनेच दार उघडले, परंतु ते इतक्या जोरात उघडले गेले की ज्या वेगाने ते उघडले होते त्याच वेगाने ते पुन्हा कबिरवर आदळले.
कबिर टॅक्सीतुन उतरतच होता, तोच ते दार येऊन कबिरच्या डोक्यावर आपटले.
कबिर डोकं धरुन खाली बसला…
“सर.. आप ठिक तो हो..”, खाली पडणार्याल कबिरला सावरत ड्रायव्हर म्हणाला.
कबिरच्या डोक्याला हलकीशी जखम झाली होती.
“सर.. खुन निकल आया है थोडा, रुको मै मेडिकलसे पट्टी लेता हु..”, ड्रायव्हर म्हणाला..
“रहने दो.. मै ठिक हु.. लेता हु मै.. मिटर कितना हुआ?”, कबिर डोक चोळत म्हणाला…
कबिरने टॅक्सीचे बिल भरले तसा टॅक्सीवाला तेथुन निघुन गेला.

कबिरने आपली बॅग उचलली आणि तो जिने चढुन हॉटेलमध्ये गेला. दारातच लॉबीवजा छोट्याश्या कोपर्यामत मोडकळीस आलेल्या टेबलावर एक पोर्या बसला होता. कबिरला बघताच तो बाहेर आला.
“रुम नै है साब..”, कबिरला तो म्हणाला..
“अरे.. अभी वो टॅक्सीवालेने फोन करके बोला था ना?”
“कौन? हेन्रीने भेजा क्या आपको.. हा.. आओ साब..”, त्या पोर्या्ने कबिरची सुटकेस घेतली आणि तो हॉटेलमध्ये गेला
एका क्षणासाठी अडकलेला श्वास सोडत कबीर त्या पोऱ्याच्या मागोमाग हॉटेलमध्ये शिरला
हॉटेलचे अंतरंग सुध्दा बरेचसे जुनाटच होते, नावापुरते असलेले फर्नीचर सुध्दा जुने, मोडकळीस आलेले होते.
त्या पोर्यारने कबिरला त्याची रुम दाखवली आणि तो परत निघुन गेला.
कबिर चरफडत रुममध्ये शिरला, आपली बॅग कोपर्या त ढकलली आणि बाथरुममधल्या आरश्यासमोर जाऊन उभा राहीला.
कपाळावर बारीकसे खरचटले होते आणि टेंगुळ आल्यासारखे सुजून कपाळाचा तो भाग काळानिळा पडला होता. कपाळाला काहीतरी लावणे गरजेचे होतेच, पण एक पेन-किलर पण आवश्यक होती, नाहीतर रात्री झोपेचे खोबरे नक्की होते.
कबीरने खोलीचे दार ओढून घेतले आणि तो खालच्या मजल्यावर असलेल्या मेडिकल-शॉप मध्ये गेला.

मख्ख चेहऱ्याचा, साठीकडे झुकलेला एक गृहस्थ दुकानाची आवरा-आवर करत होता. कबीरला येताना पाहून त्याने कपाळावर आठ्या चढवल्या.
“एक बैन्डेड देता का?”, कपाळावरील जखमेकडे बोट दाखवत कबीर म्हणाला, “आणि एक पेन किलर पण द्या, डोकं दुखीवर”
त्याने ड्रोवर मधून बैन्डेड आणि दोन गोळ्या काढून कबीरकडे दिल्या.
कबीर तिथल्याच एका बाकावर बसून बैन्डेड कपाळावर लावतच होता इतक्यात एक मुलगी दुकानात घुसली. निळ्या रंगाने रंगवलेले केस, पांढरा टी -शर्ट आणि त्यावर मळलेले जीन्सचे जैकेट, पांढरट पडलेली निळ्या रंगाची जीन्सची शॉर्ट, हातात रंगेबिरंगी डझनभर बांगड्या आणि पाठीला एक छोटी सैक. ओठांवर भडक लाल रंगाची लिपस्टिक होती, गडद काळ्या रंगाचे आय-लायनर आणि पापण्यांवर हलक्या गुलाबी रंगाचे शेडींग.
तोंडावर हात दाबतच ती दुकानात शिरली.
“काय पाहिजे?”, दुकानदार म्हणाला
“मळमळतय , पटकन गोळी द्या…”
दुकानदाराने ड्रावर मधून एक गोळी काढून तिच्या हातात दिली
“हि नको, काल घेतली होती मी, पण आज परत मळमळतय”, ती तरुणी तोंड दाबत म्हणाली
दुकानदाराने ती गोळी परत घेतली आणि दुसरी दिली.
“हि पण नको, सकाळी घेतली होती, अजून दुसरी आहे कुठली?”, ती तरुणी म्हणाली
“नक्की काय होतंय तुम्हाला?”, दुकानदाराने वैतागुन विचारलं.
“खूपच मळमळतय, डोकं जड झालंय, अंग दुखतंय… चक्कर करतेय कालपासून..”, ती तरुणी बोलत होती.
त्या दुकानदाराने एकदा कबीरकडे पाहिले आणि त्या तरुणीला जवळ बोलावून तिच्या कानात हळूच म्हणाला, “पिरिएड मिस झालेत का?”
“एक्स्क्युज मी?”, ती तरुणी काहीशी संतापुन म्हणाली, पण तिच्या चेहऱ्यावर किंचितशी भीतीची एक लकेर पसरून गेली. तिने भीतीने एक आवंढा गिळला.
दुकानदाराने मागच्या कपाटातून एक खोकं काढून तिच्याकडे दिले आणि म्हणाला, “मागे बाथरूम आहे, प्रेग्नंसी चेक करा..”
त्या तरुणीने ते खोकं कबिरला दिसु नये म्हणुन पट्कन हिसकाऊन घेतलं आणि दुकानदाराने दर्शवलेल्या दरवाज्याकडे पळाली.
“हम्म.. तुम्हाला काय हवंय अजुन?”, दुकानदाराने कबिरला विचारलं.
“नाही, काही नाही..”, कबिर
“मग, निघा की आता..”
“नाही ते.. त्यांच काय होतंय बघितलं असत तर..”
“कश्याला नसत्या चौकश्या तुम्हाला? निघा..”
“हो.. निघतो..”, असं म्हणुन कबिर उठुन निघतंच होता, तोच ती तरुणी परत धावत धावत आली, हातातलं खोकं तिने काऊंटरवर ठेवलं आणि पळत दुकानाच्या बाहेर गेली.
दुकानदारही तिच्या मागोमाग गेला. रस्त्याच्या कोपर्यानवर ती तरुणी उलट्या करत होती.
कबिरने पट्कन टेबलावर पडलेले ते प्रेग्नंन्सी किट उघडुन बघीतले.. रिझल्ट निगेटीव्ह होता.
कबिरने ते किट परत टेबलावर ठेवले आणि तो दुकानाच्या बाहेर पडला. त्याने एकवार त्या तरुणीकडे बघीतले. झाडाला टेकुन ती उभी होती. कबिरने रुमकडे जायला जिना चढायला सुरुवात केली. चार-पाच पायर्याोच चढला असेल तोच दुकानदाराने त्याला हाक मारलेली ऐकु आले.
“ओ.. इकडे या पट्कन..”, तो दुकानदार कबिरला हाक मारत होता. मगाशी झाडाला टेकुन उभी असलेली ती तरुणी एव्हाना जमीनीवर कोसळली होती.
कबिर धावत धावतच त्यांच्याकडे गेला.
“काय झालं?”
“चक्कर येऊन पडल्यात ह्या…”
“अरे बापरे.. दवाखान्यात फोन करा पट्कन..”
“इथं कुठं आला दवाखाना.. २०-२५ किमी वर जवळपास काही नाही इथं..”
“मग? आता काय करायचं?”
“तुम्ही वरती हॉटेलमध्येच रहाताय ना?”
“हो..”
“मग एक काम करा, हिला घेऊन जा वरती, मला वाटतं अशक्तपणामुळे चक्कर येऊन पडल्यात.. १५-२० मिनीटांत येतील शुध्दीवर..”
“अहो काही तरी काय? मी ओळखत पण नाही हिला..”, कबिर वैतागुन म्हणाला.
“१० मिनिटांचा प्रश्न आहे.. येतील त्या शुद्धीवर”, दुकानदार समजावत म्हणाला, “मला आधीच उशीर झालाय, शेवटची बस गेली तर घरी जायचा प्रश्न होईल.. नाही तर मी थांबलो असतो इथं..”
“नाही नाही, मला नाही जमायचं ते.. तिचा अवतार बघा.. कॉल-गर्ल वगैरे वाटतेय, मी नाही न्हेणार तिला हॉटेलवर…”, कबिर निर्धाराने म्हणाला
“राहु द्या मग हिला इथंच.., शुध्दीवर येईल तेंव्हा जाईल..”, दुकानदार त्या तरुणीला तेथेच ठेवुन दुकानाकडे जाऊ लागला
“अहो पण.. असं रात्री हिला इथं रस्त्यावर सोडायचं म्हणजे…”, कबिर
“मग तेच तर म्हणतोय मी… तुम्हीच ऐकेना..”, दुकानदार नव्या जोमाने म्हणाला….
“बरं बर.. धरायला मदत करा तिला, जिन्यावरुन एकट्याला नाही न्हेता यायचं मला..”
“कोण बघतंय तुम्हाला इथं.. उलट गोव्यात तुमच्याबरोबर कोणी नसंल तर लोकं बघतील… घ्या उचला हिला..”, असं म्हणुन दुकानदाराने त्या तरुणीला उभं केलं
कबिर आणि त्या दुकानदारानं तिला कसंबसं उचललं आणि जिन्यावरुन कसरत करत करत कबिर तिला आपल्या हॉटेलच्या रुममध्ये घेऊन आला.

कोण होती ती तरुणी? कबिरच्या आयुष्यात काय घडणार असेल? नियतीच्या मनात नक्की काय होतं?
जाणुन घेण्यासाठी वाचत रहा, इश्क-भाग ३ लवकरच ब्लॉगवर…
[क्रमशः]
User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

Re: इश्क - Marathi love stori

Post by rangila »

3
त्या तरुणीला सोफ्यावर ढकलुन तो दुकानवाला निघुन गेला.

कबिरचं डोकं सॉल्लीड ठणकत होतं, त्यातच त्या तरुणीला जिना चढवुन आणल्याने त्याला सॉल्लीड धाप लागली होती. डोक्याला हात लावुन तो खुर्चीत बसतच होता तोच त्याचा फोन खणखणु लागला. चार शिव्या हासडत त्याने फोन उचलला..

“कबिर सर.. रोहन बोलतोय…, काय म्हणतंय गोवा…”
धाप लागल्याने कबिरला निट बोलताच येत नव्हते.. “ठिक.. ठिके.. ठिके गोवा…”

“अरे काय रे? काय झालं?”, रोहनने काळजीच्या सुरात विचारलं..”अश्या धापा का टाकतोयेस…? एव्हरीथिंग ऑलराईटना?”
“एक मिनीटं थांब, मी जरा पाणी पितो आणि मग बोलतो ओके?”, कबिर..
“ओके.. ओके, मी होल्ड करतो..”, रोहन म्हणाला

टेबलावरचा पाण्याचा जग कबिरने तोंडाला लावला, गटागटा पाणी प्यायल्यावर त्याला थोडी हुशारी आली..

हनुवटीवर ओघळलेले पाणी हाताने पुसत त्याने परत फोन कानाला लावला..”हं..बोल..”
“काय झालं.. सगळं ठिक आहे ना? हॉटेल मस्त आहे कि नै..”, रोहन
“तोंड उघडायला लावु नको माझं त्या हॉटेलचं नाव काढुन..”, कबिर संतापाच्या स्वरात म्हणाला…
“म्हणजे..?”
“सांगतो.. सगळं सांगतो..”, असं म्हणुन गोव्याला आल्यापासुन ते त्या तरुणीला खोलीमध्ये आणेपर्यंतचा सगळा वृत्तांत त्याने रोहनला ऐकवला..

“च मायला.., म्हणजे ती तरुणी आत्ता तुझ्या रुम मध्ये आहे?”, रोहन
“हो ना.. अरे तो म्हातारा ऐकायलाच तयार नाही.. आणि तिला असं रस्त्यावर एकटीला सोडुन येणं…”
“ते ठिके रे.. पण.. कशी आहे दिसायला.. म्हणजे..”
“सोड ते.. मला तर कॉल गर्ल वाटतेय.. नकोच ती ब्याद.. शुध्दीवर आली की लगेच देतो घालवुन..”
“लेका.. नशिबाने संधी दिलीय.. घाई करु नकोस.. मी काय म्हणतो..”

“ओह शिट्ट..”, कबिर अचानक किंचाळलाच…
“काय रे.. काय झालं असं ओरडायला..”, रोहन
“अब्बे.. काही तरी झोल आहे.. तिचे केस…”, कबिर खुर्चीवरुन हळुच उठत म्हणाला…
“काय झालं तिच्या केसांना?”,

एव्हाना कबिर त्या तरुणीच्या जवळ गेला होता…
“अबे खोटे आहेत ते केस..”
“कश्यावरुन..”, रोहनची उत्सुकता ताणली गेली होती..
“अरे कश्यावरुन काय.. ते निळसर केस एका बाजुने निघाल्यासारखे वाटताएत..आणि…”
“अरे असा थांबु नको.. आणि काय…?”
“आईच्या गावात रोहन.. गळ्यात मंगळसुत्र आहे.. पायात जोडवी… च्यायला मॅरीड आहे कोण तरी..”, कबिर
“कबिर, मला वाटतं घरातुन पळुन वगैरे आलेली केस आहे.. कोणी ओळखु नये म्हणुन हा असला गेट-अप केला असेल..”
“असेल रे.. मला पण तसंच वाटतंय..”, कबिर
“कबिर, मला वाटतं, तुला तुझी स्टोरी सापडली.. स्टे विथ हर… बघ काय झोल आहे..”, रोहन

“ए प्लिज.. असला फालतु पणा मला जमणार नाही, आणि मला ‘दिल है के मानता नही’, ‘जब वुई मेट’ वगैरेंसारखी कथा तर बिलकुल लिहायची नाहीए..”, कबिर भडकुन म्हणाला..
“कबिर.. एक काम कर.. तिची पर्स उघड.. बघ लायसन्स वगैरे काही आहे का? तिचं नाव, गाव, पत्ता वगैरे कळेल तरी..”, रोहन
“गुड आयडीआ.. होल्ड कर…”

फोन कान आणि खांद्याच्या मध्ये अडकवुन कबिर सावकाश त्या तरुणीपाशी गेला.. तिची पर्स सोफ्याच्या खालीच पडली होती. कबिरने ती पर्स अलगद उघडली आणि तो आतमध्ये लायसन्स शोधु लागला. त्याचवेळी ती तरुणी अचानक उठुन बसली. कबिर फोनवर बोलत असतानाच ती तरुणी शुध्दीवर येत असलेली कबिरला दिसलेले नव्हते.

थाड्कन तिन कबिरच्या हातातली पर्स हिसकावुन घेतली. कबिर काही बोलणार ह्याच्या आतच त्या तरुणीने पर्समधुन एक स्प्रे-सदृश्य बाटली बाहेर काढली आणि कबिरच्या डोळ्यात फवारली.

लक्षावधी मुंग्या डोळ्याला चावाव्यात तश्या वेदना कबिरला झाल्या आणि तो किंचाळत मागे सरकला. त्या तरुणीने त्याला जोरात भिंतीवर ढकलले आणि पर्स उचलुन तिने खोलीच्या बाहेर पळ काढला.

बेसावध कबिरचे भिंतीवर जोरात डोकं आपटलं आणि त्याची शुध्द हरपली..

नक्की काय घडतंय ह्याचा अंदाज नसलेल्या रोहनचा फोनवर “हॅलो.. हॅलो कबिर.. आर यु ओके?.. कबिर.. काय झालं कबिर..” एव्हढाच आवाज त्या शांत खोलीमध्ये ऐकु येत होता.


“कबिर, अरे बोल काहीतरी, असा मख्खा सारखा नको बसुन राहुस नुसता…”, मोनिका कबिरला म्हणत होती
“मग काय करु म्हणतेस? तुझ्यासारखा आक्रस्ताळेपणा करु?”, कबिर..
“आक्रस्ताळेपणा? कबिर मी जस्ट बोलतेय तुझ्याशी..”, मोनिका
“इट्स वन अ‍ॅन्ड द सेम..”, कबिर

“कबिर प्लिज.. खरं सांग काय प्रॉब्लेम आहे तुझा? का वागतो आहेस असा तु? माझं काही चुकलं असेल तर तसं सांग… गप्प राहुन प्रश्न सुटणार नाहीएत कबिर..”
“खरं आहे मोना, गप्प राहुन प्रश्न सुटणार नाहीत.. पण मला प्रश्न सोडवायचेच नाहीएत. माझं काही चुकलं असेलच तर, मी इतके दिवस गप्प राहीलो, पण…”
“ओह, म्हणजे तुला म्हणायचंय काही चुकलं असेल तर माझं.. तु १००% बरोबर.. असंच ना?”

“कोण चुक? कोण बरोबर.. मला ह्यात पडायचं नाहीए मोना. जसं मी तुला समजुन घेतो तसंच तु मला घ्यावंस एवढीच माझी अपेक्षा आहे. मान्य आहे, बर्‍याचदा तुझ्या पार्टींमध्ये मी एकटाच कोपर्‍यात बसुन असतो. पण मी एक लेखक आहे मोना.. बर्‍याचदा पुढची कथा मला काळ-वेळ न ठरवता सुचते. अश्यावेळी मला खरंच एकांत हवा असतो. कित्तेकदा आपण फिरायला जातो तेंव्हा तु काही सुंदर गोष्टी असतील तर फोटो काढण्यात मग्न होतेसंच ना? इतकी की तुला माझा विसर पडतो.. मग तेंव्हा मी दोष देतो का तुला? नाही.. कारण आय कॅन अंडरस्टॅन्ड कॅमेरा इज युअर फिल्ड..”

“इनफ़ कबिर.. आय गेस.. आपण ह्यावर कित्तेक महीने, वर्ष वाद घालत बसु आणि त्यातुन निष्पन्न मात्र काही होणार नाही.. सो आय गेस.. आपण इथेच थांबाव.. तुला तुझा मार्ग मोकळा आहे.. मला माझा…”

कबिरच मन आतुन आक्रंदत होतं, मोनाला थांबवावं, तिला नेहमीप्रमाणे समजावुन सांगावं, तिला मिठीत घ्यावं.. तिच्या कुरळ्या कुरळ्या केसांमध्ये आपली बोटं गुंतवावीत.. पण त्याला हे सुध्दा माहीती होतं की, कदाचीत नेहमीप्रमाणे ह्या वेळेस सुध्दा मोना थांबेल.. त्यांच्यातले हे भांडण मिटेल.. पण पुन्हा कधीतरी दोघांमधील स्वभावातला फरक भांडणांच्या रुपाने उफाळुन येणारच. गेले काही महीने ह्या ना त्या कारणाने दोघांमधल्या कुरबुरी वाढल्याच होत्या आणि त्यासाठी दुसरा कुठलाच मार्ग कबिरला आता सुचत नव्हता..

कदाचीत.. कदाचीत मोना म्हणत होती तोच योग्य मार्ग होता..

कबिर काहीच बोलला नाही.

“ऑलराईट मिस्टर रायटर… गुडबाय देन…”

मोनिकाने घराचे दार उघडले, एकवार कबिरकडे पाहिले आणि धाडकन दार लावुन ती निघुन गेली.


दाराच्या आवाजाने कबिर एकदम जागा झाला. आपण कुठे आहोत त्याला काहीच सुधरत नव्हते. भिंतीवर डोकं आपटुन शुध्द हरपल्यावर कबिर आत्ता शुध्दीवर आला होता. त्याचं डोकं अजुनही ठणकत होतं.

“सर.. ब्रेकफास्ट रेडी आहे..” बाहेरचा दरवाजा अजुनही वाजत होता..
“हम्म.. येस.. येतो मी..”, कबिर जमीनीवरुन उठुन बसला. डोळ्यात तिखटाचा स्प्रे गेल्याने डोळे भयानक चुरचुरत होते.

भिंतीचा आधार घेत कबिर बेसिनपाशी गेला आणि थंड पाण्याचे ५-६ सपकारे त्याने चेहर्‍यावर मारले.

त्याने घड्याळात नजर टाकली, सकाळचे ८.३० वाजुन गेले होते. रुम सोडायला फक्त २ तास उरले होते. गोव्यात आल्यापासुन एक गोष्ट धड होतं नव्हती. आधी त्या सो-कॉल्ड इंटरनॅशनल हॉटेलमधला घोळ, मग इथे ते टॅक्सीचे दार डोक्यावर काय आपटले.. ती चित्र-विचीत्र फॅशन केलेली तरुणी.. तिच्या भल्यासाठी म्हणुन कबिर तिला रुम वर घेऊन येतो काय, ती कबिरच्या डोळ्यात तिखटाचा स्प्रे मारते काय, कबिर भिंतीवर आपटुन बेशुध्द होतो काय आणि आता २ तासात आवरुन पुन्हा रुम शोधण्याच्या तयारीला लागतो काय.

कुठुन त्या मेहता आणि रोहनचं ऐकुन इथं आलो असं त्याला क्षणभर वाटुन गेलं.

भराभर आंघोळ उरकुन कबिर बाहेर आला. परंतु तेथील एकूणच तेथील स्वच्छता आणि खाद्यपदार्थ बघुन त्याने ब्रेकफास्ट न करताच रुम सोडली आणि आपलं सामान घेऊन तो टॅक्सीसाठी रस्त्यावर येऊन थांबला. पोटात भुकेचा डोंब उसळला होता. गोव्याला आल्यापासुन त्याने काही खाल्लं पण नव्हतं. आधी पेटपूजा आणि मग हॉटेलशोध असं ठरवुन त्याने मिळालेली रिक्षा पुन्हा मार्केटकडे घेतली.

सकाळी काही तरी मस्त, चमचमीत खाण्याची कबिरची इच्छा कुठलं फ़ाईव्ह-स्टार हॉटेल पुर्ण करण्याची शक्यता नसल्याने त्याने वाटेतलं एक बर्‍यापैकी छोटे, पण निटसे हॉटेल बघुन कबिर आतमध्ये शिरला.

आतमध्ये तुरळकच गर्दी होती. रंगेबिरंगी आणि चित्रविचीत्र फॅशनच्या पर्यटकांचीच वर्दळ बहुतांश होती. कबिरने अगदीच कोपर्‍यातलं एक टेबल पकडलं आणि त्याने फटाफट जे सुचेल त्याची ऑर्डर देऊन टाकली.

ब्रेकफास्ट गपागप हाणल्यावर कबिरचं भणभणणार डोकं थोडं शांत झालं. पोटात उसळलेली आग कमी झाली. कबिरने स्ट्रॉंग कॉफीचे दोन कप रिचवले आणि मग तिसरा मग घेऊन तो खुर्चीत रेलुन बसला. दोन क्षण त्याने डोळे मिटून घेतले. त्याची तंद्री भंगली ती पडलेल्या भांड्यांच्या आवाजाने. त्याने डोळे उघडुन बघीतलं हॉटेलच्या दरवाज्यातुन एक तरुणी येताना वेटरला धडकली होती.

“सॉरी.. सॉरी.. आय एम एस्क्ट्रीमली सॉरी..”, ती परत परत वेटरला म्हणत होती.

पिवळ्या रंगाचा फुलाफुलांची नक्षी असलेला लॉंग स्कर्ट, वरती नेव्ही ब्ल्यु रंगाचा शॉर्ट शर्ट, खांद्यापर्यंत रुळणारे कुरळे केस.. डोळ्यावर नर्ड स्टाईलचा जाड फ़्रेमचा काळा चश्मा, खांद्याला एक छोटीशी सॅक आणि पेपर्सचा गठ्ठा असलेली एक फाईल.

कबिर तिच्याकडे बघतच राहीला.

“कर दे अपने इश्क मै मदहोश इस तरह की,
होश भी आने से पहले इजाजत मांगे..”

व्हॉट्स-अप वर फॉरवर्ड आलेली नुकतीच वाचलेली एक शायरी कबिरला आठवली.

वार्‍याने उडणारे केस सरळ करायला तिने आपला हात मागे घेतला इतका वेळ स्कर्टला खेटुन बसलेला तिचा शॉर्ट शर्ट किंचीतसा वर उचलला गेला आणि नेव्हल भागावर काढलेला टॅटू कबिरच्या नजरेस पडला.

राधा…

बासरीला बिलगुन बसलेली ती अक्षरं कबिरला वेड लावुन गेली..

“राधा.. कबिरची राधा..”, कबिर स्वतःशीच पुटपुटला.

तिचे थोडीशी घारी छटा असलेले डोळे… उफ़्फ़ ! कबिरला वाटलं, आपण तिच्या डोळ्यांत बघत बसलो तर दोन मिनीटांत आपण स्वतःला विसरुन जाऊ. वार्‍याच्या हलक्याश्या झुळुकीने उडणारे तिचे केस.. कबिरच्या हृदयाची धडकन जणु त्या केसांच्या उडणार्‍या लयीवर होत होती.

कबिरला आपला श्वास अडकल्यासारखे झाले, पाण्याचा घेतलेला घोट त्याच्या घश्यातच अडकला. आजुबाजुचे विश्व जणु `स्टॅच्यु’ केल्यासारखे जागच्या जागी थिजुन गेले होते.

किती वेळ.. किती वेळ उलटून गेला होता कुणास ठाऊक. त्या पिवळ्या स्कर्टला लटकलेले गुलाबी रंगाचे लोकरीचे गोंडे, त्याच्यावर लावलेली छोटीशी किणकिण करणारी घुंगरं, हातातल्या चंदेरी रंगाच्या बांगड्या, कानातलं, गळ्यातलं पेंडंट, नाकातली ती छोटीशी नोज रिंग.. कित्ती कित्ती गोष्टींच कबिरने त्या काही क्षणात लक्ष वेधुन घेतलं होतं.

तिने अचानक कबिरकडे पाहीलं. वेगाने जाणारी ट्रेन अचानक ’सडन जॉल्ट’ घेउन थांबावी आणि त्या लयीत भान हरपलेले आपण क्षणार्धात भानावर यावं, तसं कबिरचं झालं.

कबिरने पट्कन आपली नजर दुसरीकडे वळवली.

परंतु डोळ्यांच्या कॉर्नरवरुन कबिरने ताडलं ती तरुणी कबिरच्याच दिशेने येत होती.

“च्यायला, ही मला ओळखते वगैरे की काय? आय मीन.. अफ़्टर ऑल, आय एम अ रेकग्नाईझ्ड रायटर…”, कबिरच्या मनात विचार येऊन गेला.

कबिर सावरुन बसला.

[क्रमशः]
User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

Re: इश्क - Marathi love stori

Post by rangila »

“एक्सक्युज मी..”, कबिर बसला होता त्या टेबलाच्या समोर उभी असलेली तरुणी म्हणाली.

कबिरने जणू लक्षच नव्हते अश्या अविर्भावात वर पाहीलं..

“येस?”, कबिर
“अम्म.. इथे कोणी बसलेलं नसेल, तर मी इथं बसु का?”, तरुणी
“हो.. व्हाय नॉट.. प्लिज..”

ती तरुणी समोरची खुर्ची सरकवुन बसली. हातातल्या फाईल आणि कागदपत्र कडेला ठेवली आणि कबिरला म्हणाली.. “मी राधा…”
“आय नो..”, कबिर पट्कन म्हणुन गेला..

“अं..” आपले घारे डोळे मोठ्ठे करत ती म्हणाली..”हाऊ डू यु नो?”
कबिरला पट्कन आपली चुक लक्षात आली.. तो टॅटू आपण मगाशी पाहीला होता हे कबिर बोलु शकत नव्हता..

“आय मीन.. तुच म्हणालीस नं आत्ता,…”, कबिर आपली चुक सावरत म्हणाला..
“ओह हं… हिहिहिहिहि..”, विचीत्र हसत राधा म्हणाली..
“मी कबिर…”, कबिर म्हणाला..

ती सुध्दा आता आय नो म्हणेल.. मग मी तुमच्या लेखनाची फॅन आहे वगैरे म्हणले असं त्याला वाटत होतं…

“मला वाटतं, तु मला ओळखलेलं दिसत नाही”, राधा..
“नाही.. म्हणजे, आपण आधी कधी भेटलो आहे का? आय एम सॉरी, पण मी खरंच नाही ओळखलं..”, कबिर आपले नेहमी ई-मेल करणारे फॅन्स, पब्लिकेशनच्या वेळी भेटलेली लोकं ह्यांबद्दल विचार करत होता. पण त्यात राधा नावाचं असं कोणीच नव्हतं. शिवाय तिला आधी कधी पाहीलं असेल तर विसरणं अशक्यच होतं.

“ओके.. नेव्हर माईंड.. मला तुमची माफी मागायची होती…”, राधा
“माझी माफी? पण का?”, कबिर पुरता गोंधळुन गेला होता..
“काल रात्री.. ते मेडीकल स्टोअर.. तुमची रुम.. तुमच्या डोळ्यात तिखट.., ती.. ती तरुणी मीच होते..”

“काय?”, जवळ जवळ किंचाळत कबिर म्हणाला…
“कुल डाऊन.. कुल डाऊन.. आय सेड आय एम सॉरी..”, एम्बारस होत ती तरुणी म्हणाली..

“हाऊ डेअर यु..? एक तर तुला मी रात्री रस्त्यावर एकटी सोडायला नको म्हणुन रुमवर घेऊन आलो आणि तु.. तु…”, संतापाने कबिरच्या तोंडुन शब्द बाहेर पडत नव्हते..

“आय एम.. रिअली.. रिअली सॉरी कबिर.. खरंच गैरसमज झाला.. अ‍ॅक्च्युअली जेंव्हा तुम्ही मला तुमच्या रुमवर न्हेलेत तेंव्हा मी बेशुध्दावस्थेत होते, जेंव्हा जाग आली तेंव्हा तु असा.. अर्धा माझ्यावर झुकलेला… मला वाटलं.. की..”, राधा
“काय वाटलं.. मी काय तुझा रेप करणारे..?”, कबिर.

“हो.. म्ह्णजे..”, राधा
“हो?? गेट लॉस्ट.. गेट लॉस्ट फ़्रॉम हिअर..” कबिर खुर्चीतुन उठत म्हणाला..

“कबिर प्लिज.. मी खरंच मनापासुन सॉरी म्हणतेय..”, कबिरच्या हातावर हात ठेवत राधा म्हणाली

तिच्या एका स्पर्शाने कबिरचे सर्व सेन्सेस एकदम शांत झाले. जणु गार वार्‍याचा एक झोका कबिरच्या अंगावरुन वाहत गेला…

“..पण तु विचार कर ना.. अशी मी अर्धवट शुध्दीत होते.. त्यात ती अंधारी खोली, समोर अनोळखी असा अर्धवट माझ्यावर वाकलेला तरुण.., मी.. मी खरंच खुप गोंधळुन गेले….”, राधा

“हम्म.. इट्स ओके..”, कबिर शांतपणे खाली बसत म्हणाला

“पण तुला कळलं कसं हा सगळा प्रकार?”, कबिर..
“त्याच काय झालं..”, राधा अडखळत म्हणाली
“हा बोला.. अजुन काय घोळ घातला होतास?”, कबिर

“आज सकाळी मी पोलिसांना घेऊन लॉजवर आले होते.. कालची कंम्प्लेंट केली मी सकाळी पोलिस स्टेशन मध्ये…”, राधा
“हाईट्ट आहे ही.. सिरीयसली.. यु आर जस्ट हॉरीबल..”, कबिर कपाळावर हात मारुन घेत म्हणाला

“हो मग.. असंच मोकळं सोडायचं होतं का मी.. सो मी पोलिसांना घेऊन गेले तेथे.. तर तो खालचा मेडीकलवाला भेटला, त्याने झाला प्रकार सांगीतला आणि मग मी कंम्प्लेट लगेच मागे घेतली.. मग हॉटेलमध्ये कळलं की तु सकाळीच चेक-आऊट केलंस… मग विचार केला, कदाचीत तु सकाळचा ब्रेकफास्टसाठी असशील कुठेतरी. त्यातल्या त्यात हे हॉटेल ह्या एरीयामध्ये टॅक्सीवाले रेकमेंड करतात.. सो थॉट टू चेक हिअर..”, उसनं हासु आ्णत राधा म्हणाली

“आणि समजा तो मेडीकलवाला भेटलाच नसता तर..??”, आवंढा गिळत कबिर म्हणाला
“तर आत्ता पोलिस तुझ्या मागावर असते..”, राधा
“धन्य.. लक्ष लक्ष धन्यवाद त्या मेडीकलवाल्याचे.. पोलिसांनी मला पकडल्यावर माझ्यावर थोडं न विश्वास ठेवला असता त्यांनी.. आत्ता कदाचीत आपल्या कृपेने मी तुरुंगात असतो..”

“रिअली सॉरी वन्स अगेन.. काय आहे ना, जगातील चांगुलपणावरचा विश्वास उडाल्यासारखा झालाय माझा..”, राधा काहीश्या निराशेच्या स्वरात म्हणालि

“ए पण.. रिअली, मी ओळखलंच नाही तुला.. काल आय मीन.. शॉर्ट कलर हेअर, शॉर्ट्स.. तो अवतार ! आणि आज एकदम डिसेंट लुक..??”
“ओह.. अरे विग होता तो.. आणि कॉन्टॅक्ट्स घातल्या होत्या.. बाकीचं म्हणशील तर.. असंच..!!”

“पण का असं? उगाचं?”, कबिर
“कधी भेटलो सावकाशीत तर सांगीन निवांत.. बिट पर्सनल..”

पर्सनल वरुन कबिरला आठवण झाली तिच्या मंगळसुत्राची. कबिरने पट्कन तिच्या गळ्याकडे बघीतलं, पण कालचे ते मंगळसुत्र गळ्यात नव्हते..

“आय जस्ट होप, बाकीच्या त्या अवतारासारखंच तिचं ते मंगळसुत्र पण तेवढ्यापुरतंच असेल..”, कबिर मनातल्या मनात म्हणाला..

“एनिवेज.. गॉट टु गो…”, खुर्चीवरुन उठत राधा म्हणाली, ती माघारी वळणार इतक्यात तिचं लक्ष कबिरच्या सुटकेसकडे जाते.

“यु लिव्हींग गोवा?”, राधा
“नाह.. अ‍ॅक्च्युअली कालच तर मी गोव्याला आलो.. निदान ३ आठवडे तरी मी इथे असेन, सो सध्या जागा शोधतोय..”, कबिर
“ओह.. अ‍ॅक्च्युअली सगळं आत्ता अरे जॅम पॅक्ड असेल.. कशी आणि कुठे पाहीजे जागा..? म्हणजे एनी प्रेफ़रंन्सेस?”, राधा..

“नॉट अ‍ॅक्च्युअली, पण जनरली, मला थोडी शांत जागा पाहीजे.. आय एम हिअर टू राईट अ बुक…”, कबिर
“वॉव.. तु पण लिहीतोस…?”, राधा परत खुर्चीत बसत म्हणाली.
“तु पण म्हणजे..? अजुन कोण लिहीतं?”, कबिर

“मी..!!” आपले खांद्यावर आलेले केस, हाताने मागे ढकलत, डोळे मोठ्ठे करुन राधा म्हणाली.

“रिअल्ली.. काय लिहीतेस?”
“अं.. नाही म्हणजे.. लिहायचा प्रयत्न करतेय.. बरं झालं तु भेटलास.. ए मला सांग ना.. म्हणजे.. मला पण कादंबरी लिहायचीय.. तर कशी लिहु? म्हणजे सुरुवात कुठुन करायची? कादंबरी लिहायला काय काय लागतं??”

कबिर स्वतःशीच हसला..

“सांगेन तुला, सध्या तरी मला जागा शोधणं फार महत्वाचं आहे… मी आहे ३ आठवडे किमान गोव्यात, सो सावकाशीत भेटू आणि बोलु.. ओके?”

“चालेल.. वाय द वे, तुझा जागेचा प्रॉब्लेम मी सोडवु शकते..”, राधा..
“म्हणजे तुला चालणार असेल तर.. होम-स्टे आहे एक.. मी तिकडेच रहाते सध्या..”

“हो का? कुठेशी आहे..”, कबिर

“ओल्ड गोवा. तशी मी खुप सेल्फिश ए, सो कुणाला मी बोलले नव्हते.. बट इफ़ यु प्रिफ़र होम-स्टे.. सध्या फ़क्त मी आणि सोफी ऑन्टी.. ज्या ओनर आहेत.. दोघीच रहातो तिथे, पण खुप स्पेशीअस असं.. टीपकल फ्रेंच स्टाईलचं घरं आहे, शांतता आहे, मागे नदी, हिरवी गार झाडी.. मस्त आहे.. बघ एकदा.. आवडलं तर वेल एन गुड…”

“साऊंड्स टेम्प्टींग, बघायला काहीच हरकत नाही..आणि बेगर्स डोन्ट हॅव एनि चॉईस.. नाही का?”, वेटरला बिल आणण्याची खुण करत कबिर म्हणाला
“हे काय? बिल? एव्हढा मोठ्ठा तुझा प्रश्न सोडवते आहे मी! आणि एक साधी कॉफी पण नाही ऑफर करणार?”, आपले गाल फुगवत राधा म्हणाली..

“ओह सॉरी.. कर की ऑर्डर.. “, वेटरला थांबवत कबिर म्हणाला
“ईट्स ओके.. माझी कॉफी तुझ्यावर उधार ..”, वेटरला यायची खूण करत राधा म्हणाली.

“तसंही, सोफी ऑन्टी वाट बघत असेल, सकाळी इतक्या गडबडीत बाहेर पडले, त्यात ते पोलिस वगैरे. ती काळजी करत असेल.. चल तुला घर दाखवते…” बिलाच्या खालची गोड बडीशेप खात राधा म्हणाली

जागा मिळण्यापेक्षा कबिरला ती जागा आत्ता राधाच्या आजुबाजुला रहायला मिळण्याचा आनंद अधीक होता.

“एव्हढी सुंदर मुलगी आजुबाजुला रहात असेल तर कुणाला रोमॅन्टीक स्टोरी नाही सुचणार?”, कबिरच्या मनात एक विचार येऊन गेला

त्याने हॉटेलचे बिल भरले, खुशीत वेटरला टीप ठेवली आणि तो सामान उचलुन राधाबरोबर हॉटेलच्या बाहेर पडला.


“ओ अनुराग सर…अहो कुठं चाललात गडबडीत?, एक तरुण गाडीत बसणार्‍या दुसर्‍या एका तरुणाला हाक मारुन थांबवत होता.
त्याचा आवाज ऐकुन, अनुरागने मागे वळुन पाहीलं.

“अरे मनिष.. सॉरी लक्षच नव्हतं माझं..”, अनुराग
“चालायचंच, मोठी लोकं तुम्ही, करोडोंचे बिझीनेस सांभाळायचे म्हणजे…”, मनिष
“छे रे, म्हणुन मित्र मित्रच असतात ना, खरंच लक्ष नव्हतं. बोल काय म्हणतोस?”, अनुराग
“मी मस्त मज्जेत.. तु बोल.. आणि वहीनी कुठं दिसत नाहीत त्या? एक दोनदा मध्ये येऊन गेलो घरी, तर घराला कुलुप. माहेरी गेल्यात की काय?”, मनिष

अनुरागचा चेहरा काहीक्षण उतरला आणि मग चिडून म्ह्णाला, “तसं झालं असतं तर बरंच झालं असतं”
“म्हणजे?”, मनिष
“अनु घर सोडून गेलीय..”, अनुराग संतापुन म्हणाला…
“काय? कधी? कुठे?”, मनिष

“आता तुझ्यापासुन काय लपवायचं? झाले ३ आठवडे.. सगळ्या मैत्रीणींकडे, नातेवाईकांकडे शोधलं. तिच्या माहेरी पण काही पत्ता नाही अनु कुठे गेली आहे ते…”, अनुराग

“अरेच्चा.. अरे मग पोलिस कंम्प्लेंट वगैरे केलीस का? चुकुन माकुन काही बरं वाईट..”, मनिष
“बरं वाईट वगैरे काही नाही. धडधडीत चिठ्ठी लिहुन घर सोडून जाते आहे सांगुन गेली आहे..”, अनुराग
“पण का? काही भांडण वगैरे झाली का तुमची..”, मनिष

“आता तुच सांग मनिष, नवरा बायको मध्ये कधी भांडण होत नाहीत का? थोडे-फ़ार चालायचेच. पण निट बसुन बोललं की होतंय सगळं…”, अनुराग
“मग आता?”, मनिष

“आता काय? बघू वाट अजुन काय करणार !, फोन पण लागत नाहीए तिचा…”, अनुराग

“ओह्ह.. सॉरी टू हिअर यार..”, मनिष
“डोन्ट बी.. बिकॉज आय एम नॉट.. एनिवेज.. चल पळतो मी कंपनीत.. उशीर झालाय..”, घड्याळात बघत अनुराग म्हणाला..
“येस सर.. काही कळलं अनुचं तर नक्की सांग..”, मनिष

“बाय..”
“बाय”


अनुराग ज्या वेळी कारमध्ये बसत होता, त्यावेळी राधा आणि कबिर टॅक्सीमधुन खाली उतरत होते. कबिरने समोर बघीतले, साधारण १९१० वगैरे काळातले एक टुमदार बंगलावजा बसके घर समोर उभे होते.

“सी..ssss आय टोल्ड यु.. तुला बघताक्षणीच घर आवडेल म्हणुन..”, राधा म्हणाली.

कबिरने टॅक्सीच्या डीक्कीतुन आपली बॅग बाहेर काढली आणि बंगल्याचे गेट उघडुन तो राधाच्या मागोमाग आतमध्ये शिरला.

[क्रमशः]
User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

Re: इश्क - Marathi love stori

Post by rangila »

5

“आई-शप्पथssss.. सौल्लीड शॉक बसला असेल ना तुला?”, रोहन फोनवर खो-खो हसत म्हणाला
“अरे मग काय तर.. दुसरं कोणी असतं तर थोबाडच लाल केलं असतं.. पण यार खरंच, इतकी मस्त आहे ना राधा….”, कबिर

“बsssर.. चांगली प्रगती आहे, दोन दिवस नाही झाले गोव्याला जाऊन तर..करा एन्जॉय करा.. आणि हो स्टोरी घे लिहायला …”, रोहन
“हो रे.. सुचायला तर हवं काही तरी…”, कबिर

“अरे अख्खी कादंबरी आहे तुझ्याजवळ.. मला नक्की खात्री आहे, तुझी गोष्ट तुला राधामध्येच मिळेल…”, रोहन
“लेट्स सी.. बरं चल, ठेवतो.. करेन फोन नंतर…”, कबिर
“येस्स सर.. बरं यार, एक फोटो पाठव नं त्या राधाचा.. तु इतकं छान वर्णन केलं आहेस.. फ़ार बघायची इच्छा आहे बघ…”, रोहन
“चं-मारी.. अरे एक दिवसाची ओळख माझी, बघतो, कधी चान्स मिळाला तर काढतो एखादा सेल्फी तिच्याबरोबर… बाय देन..”, कबिर
“बाय..”


“हाऊ आर यु माय सन?”, कबिर ने फोन ठेवलेला बघुन साधारण एक सत्तरीकडे झुकलेली स्त्री, सोफी ऑन्टी, खोलीत आली. शरीर थकलं असलं तरी चेहर्‍यावर प्रचंड प्रसन्नता होती. वार्धक्याने पांढरे झालेले केस वार्‍याच्या झुळकीने हलकेच उडत होते. केसांत सजवलेली पिवळी फुलं त्या चंदेरी केसांमध्ये उठुन दिसत होती. पांढर्‍या-गुलाबी फुलांची नक्षी असलेला मिडी, सोफी ऑन्टींना अधीकच खुलुन दिसत होता.

नकळत कबिरने खाली वाकुन सोफी ऑन्टींना नमस्कार केला.

एजींग-विथ ग्रेस म्हणतात ते हेच असेच काहीसे कबिरला वाटुन गेले.

“आय एम गुड सोफी ऑन्टी”, कबिर म्हणाला.
“राधाने मला सगळा काल-रात्रीचा गैरसमज सांगीतला.. आय वॉज एक्स्टीमली वरीड फ़ॉर हर जेंव्हा रात्र-भर ती आली नाही… बट थॅंक्स टू यु.. गॉड ब्लेस यु…” भिंतीवरील जिझसच्या फोटोकडे बघुन एकवार कपाळाला आणि मग छातीवर डावी-उजवीकडे हात लावुन नमस्कार करत सोफी ऑन्टी म्हणाल्या..

“हो ऑन्टी, ते ब्लेसींग वेळेवरच मिळाले म्हणायचे, नाही तर मी आत्ता तुरुंगाची हवा खात असतो..”, हसत हसत कबिर म्हणाला.
“राधा म्हणाली, तु पुस्तकं लिहीतोस म्हणुन ! आणि गोव्यात नविन गोष्ट लिहायला आला आहेस…”
“हो ऑन्टी.. नशिबाने ही जागा मिळाली, नाही तर आजच्या दिवसात परत निघावंच लागलं असतं..”
“बरं झालं की नाही, राधा तुला मिळाली ते??”
“ऑन्टी.. मिळाली नाही.. भेटली…”, सोफी ऑन्टींच्या खांद्यावर आपला तळहात ठेवुन त्यावर हनुवटी टेकवत राधा म्हणाली..
“हो हो.. तेच.. माझं मराठी काही इतकंस चांगलं नाही.. आमचो आपला कोंकनी ठिक असा…”, सोफी ऑन्टी हसत हसत म्हणाल्या खर्‍या, पण त्यांच्या त्या “राधा तुला मिळाली”, ह्या एका वाक्याने कबिरच्या सर्वांगावर रोमांच उभे केले…

“इथं तुला पाहीजे तश्शी शांतता मिळेल पुस्तक लिहायला.. इथुनच मागे थोड्या अंतरावर छान विस्तीर्ण नदी आहे, छोटी बोट पण आहे तुला येत असेल चालवायला तर.. राधा दाखवेल तुला… आणि काही हवं असेल तर सांग. खायला बाकी काही लगेच तयार नसले तरी वाईनचे केक मात्र कधीही मिळतील…”

“वॉव्व.. वाईनचे केक.. प्रचंड भुक लागलीय.. मी फ्रेश होऊन येतो.. ८-१० केक चे पिसेस आणि मस्त गरम कॉफी मिळाली तर…”, कबिर

“मी टाकलीय कॉफी, तु ये फ्रेश होऊन..”, राधा म्हणाली
काही सेकंद राधाची आणि त्याची नजरानजर झाली आणि मग राधा आणि सोफी ऑन्टी खोलीच्या बाहेर निघुन गेल्या.

कबिर अजुनही संमोहीत झाल्यासारखा राधा गेलेल्या दिशेने बघत उभा होता.


“हॅल्लो इन्स्पेक्टर भोसले, अनुराग बोलतोय..”, फोनवर नेहमीच्याच आपल्या हुकुमत गाजवणार्‍या आवाजात अनुराग बोलत होता
“गुड अफ़्टरनुन सर…”
“अहो कसलं गुड-अफ़्टरनून करताय, अनुचा काही शोध लागला का? ३ आठवडे झाले माझी बायको मिसींग आहे, आणि तुम्हाला एक सुध्दा लिड मिळत नाही म्हणजे काय? अहो मिडीआला याची कुणकुण लागली तर किती हंगामा होईल ह्याची कल्पना आहे का तुम्हाला?”
“येस सर.. आमचा तपास चालु आहे सर.. तुम्ही दिलेला मोबाईल नंबर आम्ही ट्रॅकींगला टाकला आहे, पण फोन बंद असल्याने लोकेशन डिटेक्ट होत नाहीए सर…”
“मी कमीशनरशी बोलु का? तुम्हाला अजुन काही सपोर्ट हवा असेल तर..”
“त्याची काही आवश्यकता नाहीए सर, फक्त कसं आहे, प्रकरण थोड सावधानतेनं हाताळावं लागतंय, उघड-उघड पण तपास नाही करता येत ना सर.. म्हणुन थोडा उशीर होतोय एव्हढचं..”
“ठिक आहे, पण काही जरी लिड मिळालं तरी लग्गेच मला कळवा, माझा डायरेक्ट नंबर दिलेला आहे तुम्हाला…”
“येस सर…. हॅव अ…”

परंतु फोन आधीच कट झाला होता..

इन्स्पेक्टर भोसलेंनी एकवार फोनकडे रागाने पाहीले आणि थाड्कन तो टेबलावर आपटला.

“काय रे भोसले, काय झालं?”, सब-इन्स्पेक्टर कदम ने विचारलं….
“अरे काय सांगू.. तिच अनुराग सायबांची केस.. ह्यांच्या बायका कुठं तरी पळुन जाणार आणि हे आमच्यावर बरसणार… शोधा माझ्या बायकोला म्हणुन…”

“अरे पण, पळून गेली असेल कश्यावरुन?”, कदमांनी प्रश्न उपस्थीत केला
“कश्यावरुन काय? अरे त्यांच्या गल्लीतलं शेमडं पोरगं पण सांगेल… गेली एक वर्ष सतत त्यांच्यामध्ये भांडणं चालू असतात म्हणे. बाहेर-पर्यंत आवाज येतो म्हणे. त्यांच्या नोकरांना कोपर्‍यात घेतला होता तेंव्हा बोलला तो. रोज रडायच्या म्हणे त्या अनु मॅडम…”
“च्यायला.. त्या अनुरागने मारलं तर नसेल त्याच्या बायकोला? आणि उगाच पळुन गेलीचा आव आणत असेल?”, कदम

भोसले काही बोलणार इतक्यात टेबलावरचा फोन खणखणला…

“हॅल्लो.. इन्स्पेक्टर भोसले….”
“…”
“हम्म.. हम्म.. ओके.. ओह.. कधी?? अच्छा परत का…? नो प्रॉब्लेम.. किप अ वॉच अ‍ॅन्ड कीप मी अपडेटेड… थॅक्स..”

भोसलेंच्या चेहर्‍यावर हास्य पसरले.. “कदम.. जिवंत आहे त्यांची बायको.. आत्ताच काही सेकंद का होईना त्यांचा फोन ट्रेस झाला होता…चला.. ह्यावेळी सरकारी खर्चाने आपली गोवा-सहल घडणार म्हणायची.. द्या टाळी…”

“ऑ! म्हणजे त्या गोव्यात आहेत..?”
“व्हय..जी….”
“मग सांगुन टाक नं त्या अनुरागला..”
“अज्जीबात नाही.. साल्याने लै डोकं फिरवलंय माझं.. मला आधी शंभरटक्के खात्री होऊ देत.. त्याच त्या आहेत म्हणुन.. फॉल्स-अलार्म असला तर गेलोच आपण कामातुन.. बघु देत तरी गोव्यामध्ये काय चाल्लय ते.. तुला सांगतो.. ती कुठल्या-यार बरोबर पळुन गेली असेल ना, तर ह्यावेळी मीच मिडीयाला-टिप देणारे.. होऊ-देत वाभाडा साल्याच्या इज्जतीचा….”

कदम काही बोलणार त्या आधीच भोसलेंनी फोन उचलला आणि नंबर फिरवायला सुरुवात केली.


ज्यावेळी भोसले अनुरागशी फोनवर बोलत होते त्यावेळी इकडे कबिर खिडकीत बसुन गरमा-गरम कॉफीचा आस्वाद घेत होता. राधाला भेटल्यापासुन त्याला एक अशी विचीत्र बैचैनी सतत जाणवत होती. नक्की काय केल्याने आपल्याला बरं वाटेल हेच त्याला समजत नव्हते. फक्त आणि फक्त राधा हा एकच विचार त्याच्या डोक्यात होता.

“अगं असु-देत, मिळे रिक्षा मला कोपर्‍यावर..”, सोफी ऑन्टी राधाला म्हणत होत्या..
“पण कश्याला मी देते ना आणुन.. तुम्ही गेटपाशी येऊन थांबा, मी आलेच रिक्षा घेऊन”, असं म्हणुन राधा बाहेर गेली.

सोफी ऑन्टी हातातली पिशवी सांभाळत हळु हळु गेट कडे गेल्या.

कबिरला कसंही करुन राधा-बद्दल अधीक जाणुन घ्यायचं होतं. ही कोण? कुठली? त्या दिवशी ते मंगळ-सुत्र वगैरे काय प्रकार होता? त्याला ते मंगळसुत्र काही स्वस्थ बसु देईना.

त्याने खिडकीतुन बाहेर बघीतलं. राधाचा कुठेच पत्ता नव्हता. सोफी ऑन्टी सुध्दा गेटच्या बाहेर उभ्या होत्या.

कबिर पट्कन उठला आणि राधाच्या खोलीत गेला. ५ मिनीटांत जे काही दिसेल ते त्याला बघायचं होतं. फारशी उचका-पाचक न करता तो काही तरी शोधत होता. कोपर्‍यात त्याला राधाची ती झोली-बॅग दिसली.

कबिरने सावकाश ती बॅग उघडली आणि आतमध्ये हात घातला.. थोडीशी उचकापाचक केल्यावर, त्याच्या हाताला ती वस्तु लागली.. मोबाईल.

कबिरने तो मोबाईल बाहेर काढला आणि होमचे बटन दाबले.. पण फोन स्विच्ड ऑफ़ असल्याने स्क्रिनवर काहीच आले नाही.

कबिरने फोनचे स्टार्ट-बटन दाबुन धरले. आय-फोन आय-ओ-एस ऑपरेटींग सिस्टीम बुट-अप स्क्रिन समोर चमकु लागली. कबिरला फोनमधुन नक्की काय मिळेल काहीच माहीती नव्हते. कदाचीत लास्ट-डायल्ड कॉल्स, कदाचीत फोटो, कदाचीत स्क्रिनवर टॅग केलेल्या नोट्स.. काहीही…

ओ.एस. बुट होऊन.. होम-स्क्रिन आली पण स्क्रिन-नेमकी पासवर्ड प्रोटेक्टेड होती.

कबिर स्वतःशीच चरफडला.. इतक्यात राधा खोलीत शिरली. कबिरला खोलीत बघुन, काही क्षण तिच्या चेहर्‍यावर आश्चर्याचे भाव उमटले आणि त्याची जागा काही क्षणातच तिरस्काराने, रागाने घेतली जेंव्हा तिने तिचा फोन कबिरच्या हातात बघीतला.

धावतच ती कबिरपाशी गेली आणि तिने फोन हिसकावुन घेतला.

फोन चालु झालेला पहाताच, तिच्या संतापाचा अकस्मात पारा चढला. कसलाही विचार न करता थाड्कन तिने तो फोन भिंतीवर फेकला जणु फोन बंद व्हायला लागणारा वेळ सुध्दा तिला नको होता.

त्या महागड्या आयफोनचे तुकडे खोलीभर पसरले.

कबिर डोळे मोठ्ठे करुन राधाकडे बघत होता. तिचे हे रुप त्याला अनपेक्षीत होते.

“कुणी सांगीतले तुला माझ्या फोनला, माझ्या वस्तुंना हात लावायला? समजतोस कोण तु स्वतःला?”
“आय एम सॉरी.. मी फक्त…”
“काय मी फक्त काय? हु द हेल आर यु? तुला माहीते तुझ्या एका चुकीने काय झालंय? काय होऊ शकतेय?”
“मला समजलं नाही राधा.. मी …”
“नाहीच समजणार.. कुणालाच नाही समजणार.. तुम्ही सगळे एकसारखेच.. मुली म्हणजे तुमची प्रॉपर्टी आहे का? तुम्ही काहीही करा, कसंही वागा…”

“घाई घाई मध्ये ती सगळं सामान गोळा करत होती…”
“अगं पण झालंय काय? सांगशील का?”
“तु फोन चालु केला होतास?”
“हो..”
“किती वेळ झाला होता फोन चालु होऊन..”
“जस्ट चालु होतच होता राधा…”
“जस्ट म्हणजे किती वेळ..”
“हार्डली ३०-४० सेकंद्स… पण झालं काय?”

“आय हॅव टू लिव्ह…”, राधा..
“म्हणजे…”
“म्हणजे.. आय हॅव टू लिव्ह.. इंग्रजी कळत नसेल तर मराठीत सांगते.. मला निघायला हवं…”
“पण का? कुठे?”

“कुठे माहीत नाही, पण इथुन दुर.. खूप दुर…”

“प्लिज राधा.. डोन्ट गो… लुक.. आय् एम सॉरी..”
“इट डझन्ट मॅटर कबिर.. चुक माझीच होती.. फोन कॅरीच करायला नको होता मी..”
“हे बघ राधा.. काय झालंय, काय चुकलंय, तुला का जावं लागतंय, मला माहीत नाही.. पण प्लिज.. प्लिज डोन्ट गो…”

राधाचं कबिरच्या बोलण्याकडे लक्षंच नव्हतं. ती तिचं सगळं सामान भराभरा बॅगेत भरण्यात मग्न होती.

“राधा, मी काय म्हणतोय तुला कळतंय का?”, तिच्या दंडाला धरुन मागे ओढत कबिर म्हणाला.
“कबिर.. प्लिज.. हे बघ.. तुला रहायला घर मिळालंय.. तु तुझं पुस्तक लिही छान, माझ्या शुभेच्छा तुला.. बट आय हॅव टु गो नाऊ.. सोफी ऑन्टीला आल्यावर माझा निरोप सांग…”

“अगं निदान त्या येई पर्यंत तरी थांब, अशी अचानक तडकाफडकी न भेटताच जाणारेस का?”

राधाने आपली बॅग उचलली आणि ती खोलीच्या बाहेर पडली. कबिर तिच्या मागोमाग बाहेर आला.

राधाने सॅन्ड्ल्स अडकवले आणि ती घराच्या बाहेर पडली सुध्दा…

“राधा थांब प्लिज.. कसं सांगू तुला..”, कबिर आगतिकतेने म्हणत होता. असं अचानक राधाला निघुन जाताना पाहुन तो प्रचंड बैचेन झाला होता. राधा निघुन गेली तर आपल्याला वेड-वगैरे लागेल असेच जणु त्याला वाटू लागले होते.

“राधाsssss…”

राधाने एव्हाना गेट उघडले होते…

“राधा स्टॉप राधा….. आय लव्ह यु……”, कबिर डोळे बंद करुन हृदयापासुन जोरात ओरडला……

[क्रमशः]
Post Reply