इश्क - Marathi love stori

User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

Re: इश्क - Marathi love stori

Post by rangila »


21
“काय रोहन शेठ.. कशी होती कालची संध्याकाळ?”, रोहन ऑफ़ीसला येताच कबीर म्हणाला..
“मस्त.. कबीर.. तु खरंच चिडला नाहीस ना?”, रोहन
“नाही अरे.. मी का चिडु? खरंच मला आनंद झाला.. तुम्ही दोघंही अनुरुप आहात एकमेकांना..”
“आम्ही ठरवलं होतं तुला सांगायचं.. पण समहाऊ योग्य अशी वेळच मिळत नव्हती..”
“असु दे अरे.. तुम्ही दोघं खुश आहात ना.. मग झालं…”
“बरं आमचं जाऊ देत.. तुझं बोल.. तुझी संध्याकाळही चांगली गेलेली दिसतेय.. ती बरोबरची छानच होती.. रती ना?”, रोहन
“हम्मं.. खरंच छान आहे अरे ती.. इतकी मस्त बोलते ना.. खरं तर तिनेच माझी संध्याकाळ छान बनवली..”, असं म्हणुन कबीरने त्या संध्याकाळबद्दल रोहनला सांगीतलं..
“तुला आवडलीय ती .. हो ना?”, कबिरकडे बघत रोहन म्हणाला..
“मला काय.. मला सगळ्याच आवडतात…”, कसंनुसं हसत कबीर म्हणाला..”पण खरंच, कुणालाही आवडावी अशीच आहे ती…”
“मग कसली वाट बघतो आहेस.. हो पुढे बिनधास्त.. राधाला विसरुन जा.. तिने तिच्या आयुष्याचा मार्ग निवडला आहे.. आणि तिचा आणि तुझा मार्ग कधी एकच असेल असं मला तरी वाटत नाही..”
“हो रे.. पण राधा जातच नाही मनातुन.. काय करु…?”
“थोडा मिक्स हो लोकांमध्ये.. रतीशी संपर्क वाढव.. राधा म्हणजे जग नव्हे.. जग खुप सुंदर आहे कबीर.. आज प्रेमात पडल्यावर माझ्या हे लक्षात आलेय.. इथे कोणी कुणासाठी थांबत नसतं..”
“खरं आहे.. रती म्हणाली आहे तसंही.. पुन्हा भेटुया…”
“अरे व्वा.. ए मग एक भारी आयडीया आहे.. लेट्स हॅव अ डबल-डेट..”, खुर्चीतुन आनंदाने उठत रोहन म्हणाला..
“म्हणजे?”
“अरे म्हणजे.. मी-मोनिका.. तु आणि रती.. मस्त जाऊ ना एखाद्या छानश्या रेस्तॉरंटला.. मज्जा येईल…”
“चालेल भेटुया.. पण रतीला असं एकदम विचाराणं बरोबर दिसणार नाही.. मी तिला आधी इनफॉर्मली भेटतो.. आणि मग तेंव्हा विचारेन..”
“डन देन.. सांग मग कधी.. कुठे ते…”

कबीरला वाटलं होतं, रती फोन करेल, पण ४ दिवस वाट पाहुनही तिचा फोन नाही आला.. शेवटी कबीरनेच तिला फोन लावला..
“हाsssssय कबीर…कसा आहेस??”,रती म्हणाली..
रतीच्या आवाजामध्ये एक फ्रेशनेस होता.. उत्साहाचा खळाळता झरा होता…
“मी मस्त…कुठे गायब आहेस..?”, कबीर
“मी कुठे गायब.. तुच गायब आहेस.. म्हणलं आज फोन करशील.. उद्या करशील..”
“हो का? बरं बरं.. सांग कधी भेटुया?”
“कश्याला?”
रतीच्या प्रश्नाने कबीर एकदम स्टंप्ड झाला..
“ओके ओके.. सॉरी.. मस्करी केली रे.. मी संध्याकाळी ७.३० नंतर मोकळी होते.. उद्या भेटुया?”
“चालेल.. पण पाशा नको.. ह्यावेळेस माझं कार्ड-पेमेंट असेल.. परवडणार नाही पाशा..”, हसत हसत कबीर म्हणाला..
“बरं..तसं असेल तर मग मला थोडा उशीर होईल..”
“का?”
“का काय अरे.. मी साडी घालुन येऊ का तुझ्याबरोबर दुसरीकडे.. इथे पाशामध्ये चाललं असतं..”
“ओके.. ९.३०?”
“१० ला भेटु.. हायवे वर रंगला-पंजाब नावाचा ढाबा आहे.. मस्त असतं पंजाबी.. आणि उशीराच सुरु होतो तो.. चालेल?”
“पळेल.. भेटु उद्या..”
“बाsssssय…”
फोन ठेवल्यावर कबीर स्वतःशीच विचार करत होता.. किती सहज एकरुप झालो आपण हिच्याशी.. असं वाटतंय खुप वर्षांपासुनची ओळख आहे..हिच्याशी बोलायला लागलं की सगळं टेन्शन खल्लास होऊन जातं. असं खुप स्पेशल वाटतं… रोहनच्या म्हणण्याचा विचार करावा का? राधाला विसरुन… पण रतीबद्दल तरी काय माहीती आहे आपल्याला? कश्यावरुन ती सिंगल असेल? कदाचीत असेलही तिच्या आयुष्यात कोणी. पण मग तसं असतं तर ती बाहेर जेवायला यायला लगेच तयार झाली नसती.. कदाचीत आढे-वेढे घेतले असते..
शट्ट.. एक गोष्ट कधी सरळ घडत नाही आपल्या आयुष्यात..
कबिर स्वतःवरच चरफडला..

रंगला पंजाब ढाबाच्या थिमनी सजलेलं एक रेस्तॉं होते. कबीर नेहमीच्याच वापरातले कपडे घालुन आला होता.. निळ्या रंगाची जिन्स आणि पांढर्यां रंगाचा शर्ट. तर रतीसुध्दा नेहमीच्याच पेहेरावात होती. गुलाबी रंगाची स्लॅक, गुलाबी रंगाच्याच फ्लॉवरी प्रिंटेड पॅटर्नचा स्लिव्हलेस कुर्ता, केसांना गुलाबी रंगाची रिबिन आणि हातात भरपुर बांगड्या.
“हॅल्लो..” दोघांनी एकमेकांना ग्रीट केलं
“टेबल घ्यायचं? का ह्या बाहेर मांडलेल्या कॉट्स?”, कबीरने विचारलं
“कॉट्स.. एनीटाईम.. टेबलवार तर आपण नेहमीच जेवतो..”, गार्डनमधल्या एका कॉटवर बसकण मारत रती म्हणाली..
“आधी ऑर्डर करु आणि मग गप्पा मारु.. खुप भुक लागलीय…”, कबीर मेन्युकार्ड चाळत म्हणाला..
“एस्क्युज मी.. लिकर-चं कार्ड…”, वेटरला हात करत कबीर म्हणाला..
“ए.. लिकर काय.. त्यापेक्षा जलजीरा घेऊ.. अरे फार मस्त मिळतं.. भारी चॅट-मसाला आणि खारी बुंदी वगैरे टाकुन देतात..”, कबीरला थांबवत रती म्हणाली..
कबीरला रतीचं मनातल्या मनात हसूच आलं. आयुष्यात कधी ड्रिंक्स म्हणुन आपण जलजीरा घेऊ असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं, पण रतीखातर त्याने ते मान्य केलं. बाकीची ऑर्डर देऊन झाल्यावर रती म्हणाली..
“कबीर.. तुला काहीतरी दाखवायचं होतं…”
“हम्म.. दाखवं की..”
“चिडणार नाहीस ना?”, पर्सध्ये हात घालत रतीने विचारलं..
“ते काय आहे त्यावर अवलंबुन आहे..”,हसत हसत कबीर म्हणाला.
रतीने पर्समधुन कबीरचेच पुस्तक बाहेर काढले..
“हे काय? माझंच पुस्तक काय मला दाखवतेस…”, कबीर आश्चर्याने म्हणाला..
“अरे एक मिनिटं.. हे बघ..”, पुस्तक उलट करुन मागचं पान दाखवत रती म्हणाली
कबीरने उत्सुकतेने पुस्तकाच्या मागच्या पानावर नजर टाकली. जिथे त्याचा फोटो छापला होता तो भाग रती त्याला दाखवत होती. रतीने त्या फोटोला पेनने दाढी-मिश्या काढल्या होत्या..
“हे काय? ऑफ़ीसमध्ये वेळ जात नव्हता म्हणुन असले उद्योग करतेस का तु?”
“अरे.. चं.. निट बघ ना.. छान दिसतेय तुला दाढी.. म्हणजे अशी फ़ार नाही.. पण थोडी खुरटी.. मस्त रफ़ लुक दिसेल की तुला…”, रती पुन्हा फोटोकडे बोट दाखवत म्हणाली
रतीने त्याचा.. त्याच्या लुकचा विचार केला हा विचारच कबीरला सुखावणारा होता..
“खरं का?” आपल्या हनुवटीवरुन हात फिरवत कबीर म्हणाला
“हे बघ.. तसंही तुझा ब्रेक-अप झालाय नं.. मग असा ब्रेक-अप झाल्यावर लुक चेंज करायचा असतो अरे..आणि अशी दाढी वगैरे तर म्हणजे अगदीच साजेसा होईल..”
कबीर काहीच बोलला नाही..
“ओके सॉरी.. तु हर्ट झाला असशील तर.. पण मी ही अशीच आहे.. प्रत्येक गोष्टीत काहीतरी पॉझीटीव्ह शोधणारी.. एकदम ऑप्टीमिस्टीक.. बरं ब्रेक-अपचं जाऊ देत.. पण खरंच चांगली दिसेल तुला थोडी-खुरटी दाढी.. ट्राय तर करुन बघ..”, रती समजावणीच्या स्वरात म्हणाली.
“बरं बघु.. मी पण तुझ्यासाठी काही तरी आणलंय..”,खिश्यातुन एक छोटी डब्बी काढत कबीर म्हणाला..
“अरे व्वा.. सुधारलास की.. मी म्हणलं मागच्या वेळेसारखा हात हलवतच येतोस की काय?”, त्याच्या हातातुन ती ड्बी घेत रती म्हणाली..
रती ती डबी उघडत असताना कबीर तिच्याकडे निरखुन बघत होता.. एखाद्या निरागस मुलीसारखी प्रचंड उत्सुकता तिच्या चेहर्याकवर होती. क्षणाक्षणाला तिच्या चेहर्यारवरचे भाव बदलत होते..
रतीने ती डबी उघडली.. आतमध्ये केशरी आणि मोरपंखी रंगाच्या शेड्सचे दोन नेलपेंट्स होते…
“वॉव.. मिक्स-अॅमन्ड मॅच.. लव्ह्ड इट…”, रती दोन्ही रंग निरखुन बघत म्हणाली
“तु आणलेस?”
“म्हणजे काय?”
“म्हणजे.. तु दुकानात जाऊन आणलेस.. आपले आपले..?”
“हो.. सेंन्ट्रलला गेलो होतो.. तिथुन आणलेत..बिल दाखवु का???”
“नको नको.. राहु देत.. ए पण मस्तच आहेत…”
दोघांच्या गप्पा चालु असतानाच ऑर्डर आली…
टेबलावर खाण मांडुन वेटर गेल्यावर रती म्हणाली.. “कबीर मला मोनिका.. आणि राधा दोघींबद्दल ऐकायचं आहे.. सांग ना मला सगळं…”
“का? तुला का सांगु मी?”, कबीर
“म्हणजे काय.. तुझ्या पुस्तकातली पात्र आहेत ती.. आणि मी ती कॉन्टेस्ट-विनर आहे.. त्या दिवशी आपलं बोलणं पुर्ण झालं नाही.. मला अजुन जाणुन घ्यायचं आहे त्या दोघींबद्दल.. म्हणजे रिअल-लाईफ़मध्ये त्या दोघी कश्या आहेत.. अगदी पुस्तकात लिहीले आहे तसेच का?”
“ओय.. झालं ती पार्टी संपली तिथेच.. आता कसलं विनर आणि कसलं काय? तेंव्हाच विचारायचं होतंस..”,
“फटके देईन हा कबीर.. नाटकं करु नकोस.. निट सांग पहील्यापासुन.. खाऊन देणार नाही नाहीतर मी तुला…”, डोळे मोठ्ठे करत रती म्हणाली…
“ओके.. ओके.. सांगतो…” असं म्हणुन कबीरने मोनिकाच्या भेटीपासुन सगळं सांगायला सुरुवात केली

इटलीमधील नेपल्सच्या एअरपोर्टवर राधाने पाय ठेवला तेंव्हा ती प्रचंड रोमांचीत झाली होती. गेले काही महीने.. किंबहुना काही वर्ष तिच्यासाठी वाईटच ठरली होती. अनुरागशी लग्न झाल्यानंतर काही महीन्यातच तिच्या स्वप्नांचा चक्काचुर झाला होता. गोकर्णमधुन ती थोडक्यात वाचली होती, त्यावेळेस अनुरागची आणि नंतर कबीरची मदत झाली नसती तर ती एव्हाना एकतर पोलिस-स्टेशनमध्ये किंवा पोलिस-स्टेशनच्या चकरा मारण्यात अडकली असती.
पण ह्या सगळ्यांतुन जाउन राधा आता सावरली होती.. स्वतःच्या पायावर उभी राहु पहात होती. मोठ्या कष्टाने तिने स्वतःसाठी नोकरी.. करीअरचा मार्ग निवडला होता. आपला आनंद कुणाजवळतरी व्यक्त करावा असं तिला राहुन राहुन वाटत होतं. लगेज चेकआऊट करुन बाहेर आल्यानंतर तिने फोनमधील कॉन्टॅक्ट्सवरुन नजर फिरवली. परंतु कुणाला फोन करावा असं तिला कुणी सापडतचं नव्हते. आई-बाबा, अनुराग, जवळचे मित्र-मैत्रीणी सगळ्यांनीच तिच्याशी संबंध तोडुन टाकले होते. कॉन्टॅक्ट्स स्क्रोल करताना ती कबीरपाशी येऊन थांबली.
गोकर्णवरुन परतल्यानंतर तिने कबीरला फोनच केला नव्हता आणि त्याने सुध्दा परत संपर्क करण्याचा प्रयत्न केला नव्हता. नविन नोकरी.. इटलीचा व्हिसा आणि आता नेपल्समध्ये प्रवेश ह्याबद्दल तिने कबीरला काहीच सांगीतले नव्हते.
कंपनीने राधाला फोनवर इंटरनॅशनल-रोमींग चालु करुन दिले होतेच, शिवाय फॅमीलीसाठी काही फोन मोफ़त करण्याची सुविधाही दिली होती.
तिने घड्याळात नजर टाकली, इटलीतील वेळेनुसार संध्याकाळचे सात वाजले होते, त्यानुसार भारतात साधारण रात्रीचे १०.३० वाजुन गेले असतील असा तिने विचार केला.
“काय करत असेल कबीर? करावा का त्याला फोन..? आपण इटलीतुन फोन करतो आहोत हे मोठ्ठे सप्राईज असेल? की मी फोन केला हेच त्याच्यासाठी सर्प्राईज असेल?”
शेवटी ‘दोन मिनिटं बोलायला काय हरकत आहे.. नसेल मोकळा तो तर नाही घेणार फोन…’ असा विचार करुन राधाने मोबाईलवर कबीरचा नंबर लावला..

“पण मग आता राधा आहे कुठे सध्या?”, कबीरचे बोलुन झाल्यावर रतीने विचारले
कबीर काही बोलणार एव्हढ्यात त्याचा फोन वाजला..
“नेम द एन्जल अॅवन्ड एन्जल अॅ पीअर्स…”, मोबाईल रतीला दाखवत कबीर म्हणाला..
राधाचा फोन बघुन रतीच्या चेहर्या्वरील क्षणभरासाठी का होईना बदललेले भाव कबीरने टिपले.
“घे ना फोन..”, रती म्हणाली
“नको.. जाऊ देत..”, कबीर फोन सायलंट मोडवर करुन परत खिश्यात ठेवत म्हणाला..
“का? अरे घे.. एक महीन्याने फोन करतेय ना ती..”
“म्हणुनच नको.. आज आपली डेट..” आणि कबीर एकदम थांबला..
“ओह.. ही डेट होती का?”, काहीसं हसत रती म्हणाली…
“दॅट रिमाईंड्स मी.. रोहन म्हणत होता की आपण चौघ भेटुयात कुठेतरी.. म्हणजे आपण दोघं आणि तो आणि मोनिका.. व्हॉट से?”
“अं.. रोहन म्हणतोय ना.. मग मी रोहनला सांगते हो की नाही ते.. “, पुन्हा एकदा हसत रती म्हणाली..
“तु काय नेहमी माझी खेचायलाच बसलेली असतेस का? बर मी विचारतोय तुला.. जायचं का?”, कबीर खजील होत म्हणाला..
“मला चालेल… पण मी दोघांनाही फारसं ओळखत नाही रे.. एक काम कर ना, व्हॉट्स-अॅ,पवर एक ग्रुप बनव आपला चौघांचा.. म्हणजे जरा ओळखपण होईल..”
“वोक्के… चल निघुयात?”
“चलो…”
दोघंही बिल भरुन हॉटेलमधुन बाहेर पडले..

कबीरच्या फोनवर राधाचा चार मिस्ड-कॉलनंतर पाचव्यांदा फोन वाजत होता.
[क्रमशः]
User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

Re: इश्क - Marathi love stori

Post by rangila »


22
“काय म्हणतेय तुझी कोका-कोला गर्ल?”, रोहनने ऑफिस मध्ये येताच कबीराला विचारले
“कोका-कोला गर्ल?”
“अरे तिच रे ती, त्या दिवशी तुझ्याबरोबर होती ती”
“कोण? रती का?”
“हां , रती”
“मग कोका-कोला गर्ल काय?”,
“अरे तू ती कोका-कोलाची जाहिरात नाही पाहिलीस का? सिद्धार्थ मल्होत्रा वाली.. त्यातली ती काउंटरवरची मुलगी, रती अगदी तशीच दिसते की”, रोहन
“हो रे… तरीच मी विचार करत होतो, कुठे तेरी बघितल्यासारखे वाटतेय हिला”
“बरं बोल, विचारलस का तिला? भेटायला तयार आहे का ती?”
“हो, हो विचारलं ना, पुढच्या विकेंडला चालेल म्हणाली.. आपण संध्याकाळी भेटू शकतो”
“लै भारी, मी लग्गेच मोनिकाला सांगतो, खूप मज्जा येईल आपण सगळे भेटलो की…”,
“अरे पण मग तु एव्हढा उदास का?”
“रतीचा बॉयफ़्रेंड आहे….”, रोहनची नजर टाळत कबीर म्हणाला.
“कोण म्हणलं?”
“तिच म्हणाली स्वतः.. ती म्हणाली की जनरल भेटायचं असेल तर येते.. पण इट्स नॉट अ डेट.. आय हॅव अ बॉयफ़्रेंड..”
“काय नाव बॉयफ़्रेंडचं?”
“पिटर..”
“पिटर.. काहीही.. मला नाही वाटत.. फ़ेकत असेल ती..”
“अरे नाही खरंच.. मॅरीएटमध्ये तो म-या-मी पब आहे ना.. तेथे बाऊंन्सर आहे म्हणे…”
“हॅ.. फ़ेकतेय ती..”
“अरे पण का? का फ़ेकेल?”
“का म्हणजे..? अरे ती ओळखतेच किती तुला? २-४ भेटींमध्येच आपण तिला डेट साठी विचारतोय.. ती बॅक-फुटवर जाणारच ना.. जगातल्या ९९% मुली पहील्यांदा हेच सांगतात…”
“मला नाही वाटत.. तिच्याकडे बघुन वाटलं नाही तेंव्हा ती खोटं बोलत होती…”
“तिने फोटो दाखवला दोघांचा?”
“असं कसं मी सरळ विचारु.. दोघांचा फ़ोटो दाखवं..”
“बरं असु देत.. सध्यातरी येतेय म्हणलीय ना.. मग बघु पुढचं पुढे..”…
असं म्हणून रोहन तेथून निघून गेला

रोहन गेल्यावर काबिरचे मन पुन्हा राधाकडे वळले. आजूबाजूला लोकं असताना, कामात असताना कबिर राधाला विसरून जायचा, पण एकटेपणात मात्र नकळतच त्याचे मन पुन्हा राधाच्या विचारात गुंगून जायचे
“कश्याला फोन केला असेल राधाने?”
“मी फोन घ्यायला हवा होता का?”
“फोन घेतला नाही म्हणून राधाने काय विचार केला असेल?”
“परत तिला कॉल -बैक करावा का?”
एक ना अनेक विचार त्याच्या मनात घोळत होते.
शेवटी मोठ्या प्रयत्नाने त्याने राधाला फोन करायचा विचार मनातून काढून टाकला.

नेपल्समध्ये येऊन राधाला दोन आठवडे उलटुन गेले होते. राधासाठी हा अनुभव खुपच थ्रिलींग होता. पर्यटकांबरोबर फ़िरता-फ़िरता तिचेही मस्त फ़िरणे होत होते.
एके दिवशी संध्याकाळी साईटसिईंग वरुन रुमवर परतत असतानाच अवंतीचा.. राधाच्या बॉसचा फोन आला..
“हॅल्लो मॅम…”, राधा..
“ए.. मॅम काय.. अवंतीच म्हण.. इतकी मोठी आहे का मी?”
“ओके.. अवंती..”, हसत राधा म्हणाली..
“कशी काय चालली आहे टुर? टीम कडुन सहकार्य मिळतयं ना व्यवस्थीत..”
“खूप मस्त.. सगळी टीम छान आहे.. मी नविन आहे तर मस्त सांभाळुन घेतात.. खूप शिकायला मिळतंय..”
“आणि नेपल्स? आवडलं का?”
“म्हणजे काय? ऑसम्मच आहे.. ४ दिवसांनी ही टुर संपतेय, पण असं वाटतंय, इथुन परतुच नये कधी..”
“नेकी ऑर पुछ पुछ.. वेल.. थोड्या काळासाठी मी तुझा तिथला स्टे वाढवु शकते अजुन.. दोन महीन्यांसाठी..”
“वॉव.. रिअली? कसं काय?”
“अगं.. नेपल्सला खुप मस्त एन्कॉयरी मिळत आहेत.. एक लेडीज-स्पेशल टुर करायची म्हणतेय.. थोडी मोठी बॅच असेल साधारण ५० जणांची.. तर तु आणि पूनम.. दोघी तिथेच थांबा.. आणि थोडं अजुन हॉटेल्स शोधा.. इतकं लार्ज बुकींग आहे.. थोडं डिस्काऊंट वगैरे बोलुन घ्या आणि आयटेनिअरी प्लॅन करा लेडीज-स्पेशलसाठी नेहमीच्या टुरपेक्षा वेगळं काय देता येईल वगैरे..”
“मस्तच.. साऊंड्स इंटरेस्टींग आणि पूनम सारखी सिनीअर ऑपरेटर असेल बरोबर तर काहीच प्रश्न नाही..”
“गुड गुड… मी पूनमशी बोलते तसं.. ही टुर संपली की आपण तिघी एक स्काईप-कॉल घेऊ मग, आणि बाकीचं प्लॅन करु.. ओके?”
“ओके.. अवंती.. अॅबन्ड थॅंक्यु सोssss मच.. धिस मिन्स अ लॉट टु मी…”
“बाय राधा.. टेक केअर…” असं म्हणुन अवंतीने फोन ठेवुन दिला..
फोन ठेवल्यावर राधाने एक उंच उडी मारुन झालेला आनंद व्यक्त केला आणि पूनमशी बोलायला ती तिच्या रुमकडे गेली.

कबिरने ठरल्याप्रमाणे व्हॉट्स-अॅरपवर चौघांचा ग्रुप बनवला होता. त्यामुळे प्रत्यक्ष नसली तरीही, अप्रत्यक्ष का होईना, रतीची इतरांशी ओळख झालेली होती.
शुक्रवारच्या संध्याकाळी ‘प्रोव्होक’ हॉटेलमध्ये डिनरला भेटायचं चौघांचं.. कबीर, रती, रोहन आणि मोनिकाचं.. ठरलं. हॉटेल शहरापासुन थोडं लांब असल्याने सगळ्यांनी कबीरच्या कारमधुन जायचा प्लॅन केला.
कबीरने सगळ्यांना पिक-अप केले आणि साधारण नऊच्या सुमारास सर्वजण रेस्तॉरंटमध्ये पोहोचले.
“तु मेरीयटमध्ये आहेस कामाला तर कित्तेक सेलेब्रेटी दिसत असतील नै”, मोनिकाने रतीला विचारले..
“हो..भरपुर.. खूप लोकांची ये जा असते तेथे..”
“आणि आय.पी.एलच्या टीम्स पण तेथेच असतात ना?”, रोहन
“हो.. माझा विराट बरोबर सेल्फ़ी आहे..”, असं म्हणुन रतीने आपल्या सेल मधला तिचा फ़ोटो सगळ्यांना दाखवला..
“सो लकी यार…”, मोनिका
“आणि वरती तो म-या-मी लाऊंज.. तेथे पण बर्यासच पेज-थ्री पार्टीज असतील नै?”, रोहनने मुद्दाम म-या-मीचा विषय काढला तसा त्याची आणि कबीरची नजरानजर झाली.
“हो.. पण म्हणजे तो पब जरा टीन-एज किंवा थोड्या यंग लोकांसाठी आहे.. सो सेलेब्स पेक्षा त्यांची पोरं दिसतात जास्ती…”
“आणि मग फुल्ल दंगा होत असेल.. कसं आवरतात ह्या लोकांना..?”, रोहन जाणुन बुजुन बाऊंन्सर्स आणि त्या योगाने पिटरचा विषय निघतोय का हे पहात होता, पण तेवढ्यात स्टार्टर्स आले आणि तो विषय तेथेच थांबला.
चौघांचं खाणं-गप्पा चालु होत्या तेंव्हा कोपर्या तल्या टेबलवर बसलेला एक तरुण मुलगा सारखं त्यांच्याकडे बघत होता. शेवटी बर्या च वेळानंतर तो उठला, कबीरपाशी आला आणि म्हणाला.. “सर.. तुम्ही ‘इश्क’ पुस्तकाचे लेखक कबीर का?”
“हो..”, कबीर इतरांकडे बघत म्हणाला..
“सर.. तुमचं ते पुस्तक मला खूपच्च आवडलं.. मी कॉलेजमध्ये सगळ्यांना दिलं माझं वाचुन झाल्यावर.. सगळ्यांना खुप्पच आवडलं…”
“वेल.. थॅंक्यु..” आपल्या आवाजातली एस्काईटमेंट दाबुन ठेवत कबीर म्हणाला…
“सर.. पुढे काय होतं मिराचं? पुस्तकाचा पुढचा भाग येणार आहे ना? कधी येईल?”
“काम चालु आहे.. लवकरच मी अनाऊंन्समेंट करेन…”
“प्लिज सर.. लवकर येउ द्या त्याचा पुढचा भाग.. आम्ही सगळे वाट पहातोय..”
“नक्कीच नक्कीच..” कबीरला रतीसमोर त्याला मिळणारे प्रेम, प्रसिध्दी फ़ार फ़ार मोठ्ठे वाटत होते..
“सर.. एक सेल्फ़ी मिळेल?”
“शुअर.. व्हाय नॉट?”
कबीरने आपले स्पोर्ट्स जॅकेट निट केले आणि केसांमधुन एक हात फ़िरवला. कबीरबरोबर एक सेल्फ़ी घेऊन तो तरुण निघुन गेला…
“माय माय.. आपल्याबरोबर पण एक सेलेब आहे बरं का..” रती हसत हसत म्हणाली..
“प्रश्न आहे का?”, शर्टची कॉलर निट करत कबीर म्हणाला..
“ए पण खरंच.. काय झालं पुढे मला पण खूप उत्सुकता आहे.. कुठे आहे सध्या राधा?”
राधाचा उल्लेख झाला तसा कबीर काही क्षण खायचं थांबला.. आणि मग म्हणाला.. “माहीत नाही..”
“माहीत नाही? अरे पण मग तुझं पुस्तक पुढे कसं जाणार? का पुढची सगळी गोष्ट काल्पनीकच…”, रती
“हो रे कबीर.. खरंच बरेच दिवस झाले, तुझ्याकडुन राधाबद्दल काही ऐकलं नाही.. आहे कुठे ती?”, रोहन
“अरे खरंच माहीत नाही, तिने फोन नाही केला आणि मी पण…”, कबीरने राधाचा येऊन गेलेल्या फोनबद्दल कुणालाच काही सांगीतले नव्हते..
“मला राधाला बघायचंय.. कुणाकडे आहे तिचा फोटो?”, रती
सगळ्यांनीच नकारार्थी माना डोलावल्या..
“ए काय रे तुम्ही लोकं.. कबीरने इतकं मस्त वर्णन लिहीलंय मिराचं पुस्तकात.. मला बघायचीय खर्याक आयुष्यात मिरा दिसते कशी…”
“आम्ही भेटलोय सगळे तिला.. पण फोटो असा नाहीए कुणाकडे…”, रोहन
“पण व्हॉट्स-अॅडपवर असेल ना ती.. डीपी तरी असेलच की तिचा…”, रती सोडायलाच तयार नव्हती
कबीरने नाईलाजाने फोन काढला आणि राधाचा डीपी उघडला..
“वेलकम टू नेपल्स, इटली”, अश्या साईनबोर्डसमोर राधाचा फोटो होता…
“आई-शप्पथ.. ही इटलीला कधी गेली?”, आश्चर्याने कबीर उद्गारला..
“बघु बघु…”, असं म्हणुन रतीने फोन कबीरच्या हातातुन काढुनच घेतला..”वॉव्व.. शी इज प्रिटी यार.. लकी यु..”, कबीरच्या खांद्याला आपल्या खांद्याने ढकलत रती म्हणाली..
“ए, आपला ग्रुप फोटो काढुन पाठवं ना तिला..” अचानक मोनिका म्हणाली.. तिच्या मनात अजुनही राधाबद्दल थोडी जेलसी, थोडा राग होता. समहाऊ आपण अजुनही कबीरच्या आजुबाजुला आहे हे तिला राधाला दाखवायचं होतं..
“कश्याला उगाच.. माझा काही कॉन्टॅक्ट नाहीए तिच्याशी..”, कबीर
“असं कसं.. पुस्तकाची हिरॉईनना ती.. आणि रिअल-लाईफ़ मध्ये पण…”
“मोना प्लिज…”, तिचं वाक्य तोडत कबीर म्हणाला.. रतीसमोर त्याला राधा आणि त्याच्या लाईफ़-बद्दलचा उल्लेख टाळायचा होता. जे काही घडलं होतं तो भूतकाळ होता.. आणि तो आता मागे सारुन कबीर नविन मार्ग शोधत होता
“बरं बरं ठिके.. पण फोटो पाठवायला काय हरकत आहे.. तुझा संपर्क नसेल तिच्याशी तर निदान ह्यामुळे होईल तरी..”, रती.
दोघीही ऐकायला तयार नव्हत्या.. त्यामुळे शेवटी नाईलाजाने त्याने सगळ्यांचा एक हॅप्पी फोटो काढुन राधाला व्हॉट्स-अॅ प केला..

दहा वाजुन गेले तसे डीजे ने धांगडधींगा गाणी बंद केली आणि सॉफ़्ट, रोमॅन्टीक गाणी चालु केली..
“वॉव.. काय मस्त गाणी लागली आहेत..लेट्स डान्स..”, मोनिका म्हणाली..
“ए.. नाही .. निघुयात.. घरी आई-बाबा वाट पहात असतील.. साडे अकरा वाजतील घरी जाईस्तोवर..”, रती
रोहन, मोनिका आणि कबीरला हे अभीप्रेत होते. त्यांनी प्लॅनच त्याप्रमाणे बनवला होता..
“ओह.. बरं मग मी आणि मोनिका थांबतो.. कबीर तु सोड तिला घरी..”, रोहन आधी ठरल्याप्रमाणे म्हणाला..
“अरे पण.. तुम्ही येणार कसे घरी मग?”, कबीर
“त्यात काय एव्हढं.. ओला-कॅब बोलावतो ना आम्ही.. काहीच प्रॉब्लेम नाहीए.. खरंच जा तुम्ही, आम्ही थांबतो अजुन थोड्यावेळ..”, रोहन
रती आणि कबीरला थोडा एकांत मिळावा ह्या दृष्टीने त्यांनी आधीच हे प्लॅन करुन ठेवले होते. मला बाराच्या आत घरी परतायचे आहे हे रतीने त्यांना सांगीतले होते, त्यावरुनच त्यांनी मुद्दाम लांबचे हॉटेल निवडले होते.
“ओके देन.. बाय.. एन्जॉय…”, कबीर..
“बाय गाईज…”, रतीने पण दोघांना बाय केले आणि ती कबीरबरोबर बाहेर पडली.
आधीच शहराबाहेरचे हॉटेल.. त्यात शेजारुन वाहणारी नदी.. त्यामुळे हवेत चांगलाच गारठा पसरला होता.
“आय एम सॉरी.. माझ्यामुळे तुला लवकर निघावं लागलं…”, रती
“इट्स ओके.. तसेही मी थांबुन काय केले असते तेथे..”, कबीर
चालता चालता रती अचानक थांबली.
“तुझ्यात आणि राधात खरंच काही नाही?”, रती
“नो.. खरंच काही नाही.. आमच्या संपर्क पण काहीच नाही नंतर..”
“पण का कबीर.. मला माहीतीए तु वेडा आहेस तिच्यासाठी.. तिचे हसणे, बोलणे, तिचे कानामागे केस अडकवताना हळुच तुझ्याकडे बघणे..तिचा तो बासरीचा टॅट्टू.. सगळ्यासाठी.. तुझ्या लेखनातुन ते जाणवते कबीर. तु तिला कध्धीच विसरु शकणार नाहीस.. गो फ़ॉर हर.. खरंच सांगतेय..”, रती कबीरच्या डोळ्यात डोळे घालुन पहात म्हणाली..
कबीर गाडीत बसेपर्यंत काहीच बोलला नाही.
“रती.. आर यु हॅप्पी?”, गाडी सुरु केल्यावर तो म्हणाला..
“म्हणजे? ऑफ़कोर्स आय एम हॅप्पी..”
“नाही म्हणजे.. असं सॅटीसफ़ाईड अबाऊट लाईफ़.. आयुष्याकडुन आपल्याला जे जे हवंय ते सगळं मिळालय.. किंवा मिळतंय.. त्या टाईप्स हॅप्पी?”
“कबीर.. आय एम नॉट इव्हन थर्टी.. हे असं आयुष्याबद्दल मी आत्ताच कसं बोलु..? मी अजुन आयुष्य बघीतलंच कुठे आहे…? बट एनीवेज.. विषय चांगला बदललास..”, हसत हसत रती म्हणाली
कबीर हलकेच हसला आणि गाडी पार्कींगमधुन बाहेर काढुन घराकडे वळवली..

काय असेल रतीच्या मनात.. हा जो कोण तिचा बॉयफ़्रेंड आहे म्हणतीय पिटर.. तो खरंच असेल? का फ़क्त तिने रोहन म्हणतो तशी थाप मारली असेल?
कबीरबरोबर फोटोमधली ही नविन मुलगी बघुन राधा कशी रिअॅ्क्ट होईल?
कबीरच्या मनात काय चालु असेल?
एकमेकांत गुंफ़लेली ही पात्र आणि त्यांची नात्यांची गुंतागुंत सुटेल का अजुनच वाढत जाईल..?



User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

Re: इश्क - Marathi love stori

Post by rangila »

23
नेपल्सच्या आकाशातली निळाई कमी होऊन गडद लाल, गुलाबी, केशरी रंगांची मुक्तहस्ते उधळण झाली होती. दिवसभर मवाळपणे तळपणारा सुर्य़ मावळतीकडे झुकला होता. समुद्रकिनारी जाणार्या. रस्त्याच्या काही किलोमीटर आधी असलेल्या अरुंद रस्त्यांच्या कडेने उभारलेल्या कॅफेंमध्ये बाहेर रस्त्याच्या कडेला लावलेल्या खुर्च्यांवर बसुन राधा पुनमबरोबर ग्रिल्ड सॅंन्डविच आणि कॉफी घेत होती. बरोबरची ट्रिप आदल्या रात्रीच परतली होती आणि ती आणि पुनम, अवंतीकाने सांगीतल्याप्रमाणे महीना दोन महीने तेथे थांबुन रेकी करणार होत्या.
“राधा.. तो शेफ़ बघ नं.. कसला हॉट आहे ना?”, पुनम आतल्या काऊंटरकडे बोट दाखवत म्हणाली..
“हो ना अगं.. नाही तर आपल्या इथले.. दोन-चार सन्माननीय अपवाद सोडले तर…”
“तो बघतोय मगाच पासुन तुझ्याकडे…”, राधाला चिडवत पुनम म्हणाली..”चल बोलुयात त्याच्याशी..”
“गप गं.. उगाच काय बोलायचं..”
“चल तर.. त्यात काय होतंय.. मे बी.. एखादी वाईनची बॉटल देईल तो..कॉम्लमेंटरी..”, पुनम राधाला ओढत म्हणाली..
“नको.. जा तुच.., मला खुप भूक लागलीय… मला एक पास्ता घेऊन ये येताना…”
शेवटी पुनम एकटीच निघुन गेली.
राधाने मोबाईल उचलला आणि मेसेज बघत असतानाच तिला कबीरने पाठवलेला फोटो दिसला. रोहन आणि मोनिकाला ती चेहर्या ने ओळखत होती, पण कबीरच्या शेजारी बसलेली ती मुलगी, रती, कोण हे काही तिला उमजेना.
कबीरच्या ऑफ़ीसमध्ये कोणी मुलगी असल्याचे तिच्या ऐकीवात नव्हते. कबीरला बहीण असल्याचेही तो कधी काही बोलला नव्हता.
“राधा.. तुझं नाव विचारत होता तो…”, टेबलावर पास्ताची डिश ठेवत पुनम म्हणाली..
“हम्म..”
“अगं हम्म काय? फ़िदा आहे बहुतेक तुझ्यावर तो.. संध्याकाळी बिचवरच्या शॅक्समध्ये डिनरला भेटायचं का विचारत होता..”
“ओके..”
“बरं, तुला विचारायचं राहीलं, तुला पास्ता रेड सॉस मधला हवा होता का व्हाईट?”, राधासमोर पास्ताची डीश ठेवत पुनमने विचारलं
“हम्म..”
“एsssss.. मी वेडी आहे का एकटीच बडबडायला? काय ते फोन मध्ये डोकं खूपसुन बसली आहेस.. आण तो फोन इकडे…” असं म्हणुन पुनमने राधाच्या हातातला फोन काढुन घेतला.
राधाच्या मोबाईलवरचा तो फोटो पाहुन पुनमने विचारलं, “कुणाचा फोटो आहे हा?”
राधाने काहीच न बोलता पास्ताची डीश पुढे ओढली, पण तिचं खाण्यात लक्षच नव्हतं, चमच्याने ती पास्ता नुसताच इकडे तिकडे करत बसली होती.
“राधा.. काय झालंय? का डिस्टर्ब झालीस एकदम? ह्या फोटोशी काही संबंध आहे का त्याचा?”
“अगदीच असं काही नाही.. सोड ना, खूप मोठ्ठी कहाणी आहे ती..”, राधा..
“मग आपल्याला आता उद्या सकाळपर्यंत तरी काय काम आहे?.. आय एम ऑल ईअर्स..”
“ठिक आहे.. आधी हा पास्ता संपवु, मस्त कॉफ़ी ऑर्डर करु आणि मग तुला सगळं सांगते..”
“बरं.. ह्या शेफ़चं काय करायचं? त्याला आजच्या ऐवजी उद्या संध्याकाळी भेटू म्हणुन सांगते.. ओके?”
“हम्म ओके…”
पुनम त्या शेफ़शी बोलायला निघुन गेली
राधाने कबीरचा मेसेज उघडला.. तिला काय रिप्लाय करावा काहीच सुचत नव्हतं.. उघड उघड “ही मुलगी कोण?”, असं विचारणंही तिला बरोबर वाटेना..
तिने फ़क्त “थंब्स अप.. मस्त दिसताय तुम्ही सगळे..”, एव्हढाच मेसेज पाठवुन दिला

राधा आणि पुनमच्या गप्पा संपल्या तेंव्हा संध्याछाया जाऊन अंधार पडला होता. त्या गल्लीचं तर रुपडंच पालटुन गेलं होतं. सर्व रेस्तॉरंट्स रंगेबीरंगी दिव्यांच्या माळा आणि मंद दिव्याच्या प्रकाशाने उजळली होती. काही ठिकाणी सिस्टीमवर तर काही ठिकाणी चक्क लाईव्ह बॅड्स संगीत वाजवत होते.. बिकीनी मध्ये फ़िरणार्यान ललना आता रात्रीच्या वन-पिस पार्टीवेअर्समध्ये आपापल्या बॉय-फ़्रेंड्स, नवर्यां्बरोबर फ़िरत होत्या.
“हम्म.. तर असं आहे सगळं…” थोडा वेळ शांततेत गेल्यावर पुनम म्हणाली.. “बट यार.. ग्रेट आहेस तु.. खरंच मानलं तुला.. स्वप्नांचा पाठलाग कसा करावा हे तुझ्याकडुन कुणी शिकावं…”
“जिंदगी बडी होनी चाहीए, लंबी नही.. हो ना? मला त्या त्या वेळेला जे वाटलं ते केलं.. त्याचे भविष्यात काय परीणाम होतील ह्याचा विचार सुध्दा केला नाही..”, राधा
“पण मग हा जो कोणी कबिर आहे, त्याचं काय? तुला तो आवडतो? का नाही?, नाही म्हणजे त्याचा दुसर्याा मुलीबरोबरचा फोटो बघुन तु डिस्टर्ब झालीस म्हणुन विचारतेय..”, पुनम
“मी स्वतःच खूप कन्फ़्युस्ड आहे त्याच्या बाबतीत.. म्हणजे.. तसा तो चांगला आहे.. मला कधी कधी त्याच्याबद्दल फ़िलिंग्स वाटल्याही.. पण कदाचीत माझं ध्येय स्पष्ट होतं..मला रिलेशन्सच्या भानगडीतच पडायचं नव्हतं.. त्यामुळे त्याच्याबद्दल इतका.. आणि त्या दृष्टीने कधी विचारच केला नाही..”
“पण त्याला तु आवडतेस.. ना?”
“दोनशे टक्के..”, हसत हसत राधा म्हणाली..
“तुझ्याजागी मी असते ना, तर कदाचीत मी निदान विचार करायला वेळ तरी घेतला असता.. लगेच नक्कीच नाही नसते म्हणले.. म्हणजे तुझ्याकडुन जे ऐकले त्यावरुन तरी साधा-भोळा वाटतोय.. दिसायला ही क्युट आहे.. आणि मुख्य म्हणजे तुझ्यावर प्रेम करतोय.. त्या प्रेमाखातर त्याने अख्खं एक पुस्तक लिहीलंय..”, पुनम
“अगं पण आम्ही दोघं दोन वेगवेगळे ध्रुव आहोत. तो अगदीच साधं, निरस आयुष्य जगणारा.. मला असं सतत काहीतरी नविन, रोमांचक लागतं. कधी मला अस्ं वेड्यासारखं भटकावंस वाटतं.. कधी वाटतं एखादा रॉक बॅंड जॉईन करावा.. कधी वाटतं दुर कुठेतरी निर्जन ठिकाणी तंबु ठोकुन रहावं.. तो ह्यातलं कध्धीच काही करणार नाही..”
“बरोबर आहे तुझं.. पण मला वाटतं तु फ़क्त वर्तमानकाळाचाच विचार करतेस.. भविष्याच्या दृष्टीने कधी विचार केलाएस..म्हणजे.. आज तुला जे करावंस वाटतंय ते तु करु शकतेस कारण तुझं शरीर तुला साथ देतंय.. तुझं मन खंबीर आहे.. तुझ्यात पोटा-पाण्यासाठी काय वाट्टेल ते करण्याची धमक आहे.. पण..”
“कुठ्लं भविष्य पुनम.. उद्या कुणी बघीतलाय.. त्या उद्यासाठी आजचं आयुष्य निरस.. बोअरींग करायचं.. आणि तो उद्या आलाच नाही तर? कुणी सांगावं मी प्रवास करणारं एखाद्या प्लेन-क्रॅश होईल, रस्त्याने जाताना एखादा ट्रक उडवेल.. हार्ट-अॅवटॅक येईल.. काहीही होऊ शकतं ना..”, पुनमचं वाक्य तोडत राधा म्हणाली..
“पण तो उद्या येणारंच नाही.. असंही नाही ना.. समजा तो उद्या आला तर? तर काय करशील?”, पुनम..
“एनीवेज.. हे कोंबडी आधी की अंड असं झालं.. जाऊ देत.. आपण ह्या सुंदर संध्याकाळी कश्याला उगाच फिलॉसॉफीकल गप्पा मारतोय.. चलं.. सोड.. ह्या फोटोचं काय करु ते सांग..”
“हे बघ.. मला वाटतंय, त्याने हा फोटो तुला मुद्दाम पाठवलाय.. तु त्याला तिच्याबद्दल आत्ता काहीच विचारु नकोस.. बघु काय करतोय..”, पुनम म्हणाली..
“बरं..आता काय करायचं? जेवायला तर मला आत्ता आज्जीबात भूक नाहीए..”, राधा
“चल.. नाईट-आऊट्स साठी रेकी करु अजुन..”, पुनम
“नको प्लिज.. खूप झालंय आज काम.. त्यापेक्षा ड्राईव्ह-इन ला जाऊयात का.. ओपन स्क्रिन थिएटर्स आहेत.. मस्त कार मध्ये बसुन पिक्चर टाकु एखादा..”, राधा
“नको गं.. तिकडे सगळे कपल्स असतात.. आपण दोघी..”
“मग काय झालं.. विचारलं तर सांगु लेस्बो आहोत.. चल.. निर्लज्जं सदा सुखं..”, पुनमला उठवत राधा म्हणाली…
दोघींनी बिल भरले आणि कारमध्ये बसुन डाऊनटाऊनच्या रस्त्याला वळल्या..

राधाचा रिप्लाय बघुन कबीरचं मन खट्टू झालं.. त्याची अपेक्षा होती की राधा रतीबद्दल विचारेल.. पण तिने तसं काहीचं केलं नव्हतं. कबीरने तो विषय तेथेच सोडुन दिला. राधानेही नंतर तो विषय मनातुन काढुन टाकायचं ठरवलं.

एके दिवशी रोहन आणि कबीर ऑफ़ीसमध्ये गप्पा मारत बसले होते.
“सो.. काय म्हणतीय रती.. आजकाल जोरदार भेटताय तुम्ही एकमेकांना.. हम्मं?”, रोहन
“रती.. खूपच मस्त आहे ती ह्यात वादच नाही. तिच्याशी गप्पा मारायला लागलं की वेळेचं भानंच रहात नाही. विषय कुठलाही चालतो अरे आम्हाला.. आणि आम्ही कश्यावरही तासंतास बोलु शकतो..”, कबीर
“हात्तीच्या.. म्हणजे अजुन तुमचं गप्पांमध्येच अडकलं आहे.. मला वाटलं.. पुढे काही तरी घडलं असेल..”, रोहन
“अरे खरंच आहे तिचा बॉयफ़्रेंड तो कोण पिटर का कोण.. मध्ये बोलताना मध्येच कधीतरी त्याचा विषय निघाला होता.. तिच्या बोलण्यावरुन तरी वाटत नाही, ती खोटं बोलत असेल असं…”
“बरं.. एक काम करु चलं.. खरंच एक पिक्चरचा प्लॅन करु.. आपण चौघं.. आणि त्या पिटरलापण बोलावु.. बघु तरी तो खरंच कोणी असेल तर येईल.. नसेलच कोणी तर रती काहीतरी कारण सांगेल.. काय बोलतोस?”, रोहनने शक्कल लढवली.
“ठिक आहे चल.. तु म्हणतोएस तर.. पण आपल्याला एकदम शेवटच्या शो ला वगैरे जावं लागेल, ११.३० वाजता वगैरे.. पिटरची ड्युटी असते ना बाऊंसरची…”
“आय एम ओक विथ इट.. तु बोल रतीशी आणि तिकीटं काढुन टाक…”

ठरल्याप्रमाणे सिनेमाचा प्लॅन ठरला. पिटरला बोलावण्याबाबत रती म्हणाली, “तो वेळेवर सुटला ड्युटीवरुन तर येईल.. त्याला लेट हो असेल तर नाही जमायचं.. सो तिकिट्स आधी नको काढुस..ऐन वेळी काढु…”
कबीर मनोमन खुश झाला होता. मनात कुठेतरी त्याला रोहनचं बोलणं खरं वाटु लागलं होतं. रती नक्कीच फ़ेकतेय.. कोणी पिटर वगैरे नाहीए.. ऐनवेळी सांगेल त्याला उशीर होतोय निघायला म्हणुन… अशी आशा मनात धरुन तो थिएटरमध्ये पोहोचला होता.
रोहन आणि मोनिका आधीच पोहोचले होते.
थोड्याच वेळात रती पण पोहोचली. ह्यावेळी फ़क्त कबीरच नाही, तर रोहनसुध्दा तिच्याकडे पहात राहीला.. आणि रोहनच का.. थिएटरमधले बरेच तरुण तिच्याकडे बघत होते.
ऑलीव्ह रंगाचा.. आणि त्यावर रंगीत मोठ्या फुलांचा पॅटर्न असलेला स्लिव्हलेस फ़्रॉक तिने घातला होता. केस मोकळे सोडले होते आणि केसांची एक बाजु छोट्या पिन्स लावुन घट्ट बसवली होती. चंदेरी रंगाचे कानातले छोटेसे झुमके तिच्या गोर्यार वर्णावर चमकुन दिसत होते. पायातल्या ग्लॅडीएटर स्टाईल्सच्या सॅन्डल्स तिच्या नाजुक पायांभोवती नक्षी करुन बसल्या होत्या. रती जवळ येताच एक मंद परफ़्युमचा सुगंध कबीरच्या नाकात शिरला.
“लुकींग ब्युटीफ़ुल..”, नकळत कबीर म्हणाला..
“थॅंक्स..”, रती..
“पिटर येणार आहे ना?”, रोहनने विचारलं.
“काय माहीती आता काय करतोय.. मी मगाशी फोन केला होता तर त्याने उचलला नाही.. बघु थोड्यावेळ वाट नाहीतर आपलं आपण जाऊ..”, वैतागुन रती म्हणाली
१०-१५ मिनीटं शांततेतच गेली.. कबीर मनोमन प्रार्थना करत होता की हा कोण जो पिटर आहे तो येउच नये.. तो अस्तीत्वातच असु नये… पण कबीरची प्रार्थना व्यर्थ ठरली कारण तेव्हढ्यात रतीचा फोन वाजला…
“हुश्श.. बरं झालं वेळेवर आलास.. कित्ती वेळ अरे…”, रती फ़ोनवर बोलत होती..
“हो मला माहीते.. तु कामावर होतास.. ..बरं सॉरी.. आता आपण फोनवर भांडत बसणारे का?… हम्म ये.. आम्ही फ़र्स्ट लेवलवर आहोत…”, रती
“आला बाबा एकदाचा..”, फोन ठेवल्यावर रती म्हणाली.
कबीरच्या हृदयातली धडधड वाढत होती. प्रत्येक सेकंदागणीक त्याची अस्वस्थता वाढत होती.
थोड्याच वेळात एक बलदंड शरीरयश्टीचा तरुण त्यांच्यात येऊन मिसळला. साधारण ६ फुटाच्या जवळपास असलेली उंची.. गोरापान.. आखुन रेखुन केलेली दाढी, जेल लावुन घट्ट बसवलेले स्पाईक्स.. कानात चमचमणारा डायमंड स्टड.. एकुणच आकर्षक व्यक्तीमत्व होतं. रती त्याच्यासमोर एखाद्या बाहुलीसारखी भासत होती.
“गाईज.. धिस इज पिटर..”, रतीने सर्वांशी ओळख करुन दिली..
रोहनची आणि कबीरची नजरानजर झाली…
“सो कुठला मुव्ही बघतोय आपण?”, पिटरने विचारलं…
“लास्ट विकला तो एक रोम-कॉम लागलाय.. फ़ार मस्त आहे म्हणे तो…”, रती म्हणाली..
“ए प्लिज.. उगाच सेंन्टी वगैरे नको हा.. त्यापेक्षा आज रिलीज झालेला तो झोंबी मुव्ही बघुयात…”, पिटर..
“ए नको रे.. फ़ार ब्लड-शेड असते झोंबी मुव्हीज मध्ये.. ह्या दोघी घाबरतील उगाच…”, कबीर म्हणाला..
“घाबरायला काय लहान आहेत का? दर वेळी आपणच का अॅयडजस्ट करायचं त्यांच्या आवडीचे मुव्ही बघुन…?”, पिटर..
कबीरने सगळ्यांवरुन नजर फ़िरवली.. कुणीच काही बोलले नाही.. शेवटी त्याने नाईलाजाने तिकीटं काढली..
सिनेमा त्याच दिवशी रिलिज झाल्याने बर्याैपैकी गर्दी होती.. त्यामुळे सर्वांना एकाच रांगेत तिकीट्स मिळाली नाहीत. चार तिकिटं एका रांगेत.. आणि दोन समोरच्या रांगेतली होती…
कबीरने ती दोन तिकीट्स रती-पिटरला दिली, आणि तो, रोहन आणि मोनिका त्यांच्याच मागच्या रांगेत बसले.
सिनेमा अपेक्षेप्रमाणे फ़ालतु… किळसवाणाच होता.. थिएटर किंकाळ्या, गोळ्यांचे आवाज.. हाणामार्याय.. टेंन्शन.. ब्लड-शेड्सने भरुन गेले होते. कबीरचे तर सिनेमाकडे लक्षच नव्हते. तो सतत समोर बसलेल्या रती-पिटरकडेच बघत होता.. अर्थात रतीलाही तो सिनेमा आवडलेला नव्हताच. पिटर मात्र सिनेमाचा मनसोक्त आनंद घेत होता. काही भयाण प्रसंगांमध्ये रती डोळे झाकुन पिटरला बिलगत होती ते पाहुन तर कबीरचा अधीकच जळफ़ळाट होत होता.
सिनेमामध्ये झोंबिंची एक मोठ्ठी लाट शहरावर आक्रमण करुन जाते तो सिन सुरु होता आणि सिनेमाचा हिरो तलवार, बंदुक जे सापडेल त्याने सपासप झोंबिंना मारत होता. कुणाचं डोकं फुटत होतं.. कुणाचं पोट फुटुन आतुन आतडी बाहेर येत होत्या.. रतीला तो सिन असह्य झाला आणि ती उठुन बाहेर पडली.. पण जाताना तिने कबीरकडे एक कटाक्ष टाकला.
कबीरने काही सेकंद थांबुन पिटरचा अंदाज घेतला.. तो सिनेमात पुर्णपणे रममाण झाला होता. शेजारुन रती निघुन गेल्याचेही त्याला भान नव्हते ते पाहुन कबीरही हळुच बाहेर पडला.
रती बाहेर कॉफ़ी काऊंटरपाशी कॉफ़ी घेत होती.. कबीरला येताना पाहुन तिने अजुन एक कॉफ़ी ऑर्डर केली..
“हॉरीबल मुव्ही ना..?”, रती
“हम्म..”
“आय एम सॉरी.. उगाच आमच्यामुळे संध्याकाळची वाट लागली तुमच्या.. उगाच आलो आम्ही.. त्यापेक्षा तुम्ही दुसरा एखादा सिनेमा बघीतला असतात..”
“ए प्लिज.. इट्स ओके… एक वेगळा अनुभव..”, हसत हसत कबीर म्हणाला..
“माझ्या आणि पिटरच्या आवडी-निवडी खुप वेगळ्या आहेत.. त्यामुळे आमच्या बहुतेक डेट्सचे रुपांतर भांडणातच होते..”, कसंनुस हसत रती म्हणाली.. “पण तो चांगला आहे.. मुडमध्ये असतो तेंव्हा खुप काळजी घेतो माझी.. त्याच्याबरोबर खुप सेफ़ वाटते मला..”
कबीरला अचानक राधाची आठवण झाली. त्यालाही जाणवलं की आपलं आणि राधाचं पण अस्संच आहे.. दोघांच्याही आवडी निवडी दोन टोकांच्या. जर कधी राधा-कबीर दोघं एकत्र आलोच तर आपलं पण अस्संच होईल का? भांडणंच जास्ती?
दोघं बाहेरच गप्पा मारत बसले होते.. दहा मिनिटं झाली असतील तोच पिटर बाहेर आला..
“ए.. तु इथं काय करतीएस..”, काहीसा चिडुन आणि मग कबीरकडे संशयाने बघत पिटर म्हणाला..
“पिटर..प्लिज.. अरे कसला बोअरींग आहे मुव्ही तो… मी नाही बघु शकत अजुन..”
“मग काय झालं.. मी नाही तुझे रडके मुव्हीज बघत?”
“कुठे बघतोस.. लास्ट टाईम आपण नटसम्राटला गेलो होतो तर अर्ध्यातच निघुन गेलासच की मला एकटीला सोडुन तिथे..”
“मग काय… म्हातार्यांाचे सिनेमे बघायचं वय ए का आपलं… बरं एनिवेज.. चल जाऊ यात आपण..”
“कुठे?”
“अगं, रॉनीचा फ़ोन आला होता.. ‘हार्ड-रॉक-कॅफ़े’ मध्ये पार्टी आहे.. तिकडे जायचंय..”, पिटर
“आणि सिनेमा?”
“जाऊ देत.. मी नंतर डाऊनलोड करुन बघेन.. चल..”
“अरे पण इतरांच काय.. तुझ्यासाठी ते तो सिनेमा बघताएत ना..?”
एव्हाना रोहन आणि मोनिका पण बाहेर आले होते..
“कुठे कोण बघतंय.. सगळेच तर बाहेर आहेत…”, पिटर..
“प्लिज रे.. मला बोअर होतो तुमचा तो ग्रुप.. तुम्ही नुसते पित बसता…”
“मग तु घे ना कोल्ड्रींक.. तेथे मसाला दुध मिळत नाही..नाही तर तेच दिले असते तुला..”, मोठ-मोठ्यांदा हसत पिटर म्हणाला.. पण रती हर्ट झाल्याचं त्याच्या लक्षात आलं.. “ओके ओके.. सॉरी.. चल जाऊ यात? बाय गाईज..”
“बरं निदान घरी जाऊन चेंज तरी करते.. हे असे छोटे कपडे घालुन येऊ का तिकडे..?”
“त्यात काय झालं..? इथं आली होतीसंच की..”
“अरे पण थिएटर आणि हार्ड-रॉक मध्ये काही फ़रक ए की नाही.. त्यात तेथे सगळे तुझे मित्र असे बघतात की..”
“चल गं..मी आहे ना.. बघतो मी कोण काय म्हणतंय..”
“रती.. तुला पाहीजे तर.. माझं स्पोर्ट्स जॅकेट घेऊन जा बरोबर..”, आपलं जॅकेट काढुन रतीला देत कबीर म्हणाला..
“थॅंक्स..”, असं म्हणुन रती नाईलाजाने सगळ्यांना बाय करुन पिटरसोबत बाहेर पडली.
“आता काय करायचं?”, दोघं निघुन गेल्यावर कबीर म्हणाला..
“हो ना.. आम्हाला काही तो उरलेला सिनेमा बघण्यात उत्साह नाहीए.”, मोनिकाकडे बघत रोहन म्हणाला..
“हो.. त्यापेक्षा जेवायला जाऊया कुठेतरी..”, मोनिका
“एक काम करा.. तुम्ही दोघं जा जेवायला.. मी उगाच कश्याला मध्ये.. आधीच आपली संध्याकाळ बोंबललीए..”, कबीर
“ए.. मध्ये काय त्यात.. तु काय नविन आहेस् का आम्हाला?”, रोहन
“तसं नाही रे.. पण खरंच जा तुम्ही दोघं.. मला तशीही फ़ारशी भूक् नाहीए”, कबीर..
“नक्की? नाही तर खरंच आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीए तु आलास तर..”, मोनिका
मोनिकाची मनोमन इच्छा होती की कबिरने बरोबर यावं.. कबीर तिच्या मनातले भाव तिच्या डोळ्यात वाचु शकत होता..आणि म्हणुनच त्याला जायचं नव्हतं.. मोनिका आता रोहनची होती.. आणि कबीर त्यांच्याबरोबर असता तर कदाचीत मोनिका पुर्णपणे रोहनकडे लक्ष देऊ शकली नसती असा काहीसा विचार त्याच्या मनात आला.
“खरंच नक्की.. जा तुम्ही..”, कबीर
एकमेकांचा निरोप घेऊन तिघेही बाहेर पडले.

कबीर घरी आला, बुट कोपर्याडत भिरकावले आणि तो बेडवर सुन्नपणे बसुन राहीला.. साधारण १० मिनिटंच झाली असतील तो त्याचा मोबाईल नविन मेसेज-साठी किणकिणला.
रतीचा मेसेज होता.
“कॅन यु पिक-मी अप फ़्रॉम कोरेगांव पार्क.. सिनेमा हॉलमध्ये नसशील आणि बिझी नसशील तर प्लिज कॉल..”
कबीरने लगेच फ़ोन लावला..
“कुठेस कबीर..?”, काहीशी मुसमुसत रती म्हणाली..
“घरीच आहे.. का? काय झालं..?”, कबीर..
“प्लिज मला पिक-अप करतोस का? मी कोरेगाव-पार्कला आहे..”
“हो करतो.. पण पिटर कुठे आहे?”
“तो मला सोडुन गेला इथेच रस्त्यात.. ते नंतर बोलते.. पण प्लिज पटकन ये.. मी एकटीच आहे इथे..”, रती
कबीरने घड्याळात नजर टाकली.. १२.३० होऊन गेले होते. कोरेगाव-पार्क, शहराबाहेरचा तसा निर्जन भाग होता.. ह्यावेळ रती अशी एकटीच रस्त्यावर.. ते पण अश्या कपड्यात… त्याच्या काळजात धस्स झालं..
“रती.. हे बघ.. अशी रस्त्यावर एकटी नको थांबुस.. आजुबाजुला काही आडोसा आहे का?”
“नाहीए.. काहीच नाहीए इकडे.. मोकळा रस्ता आहे..”, रती.. “थांब एक मिनीट.. तिकडे पुढे.. श्शी.. सुलभ शौचालय आहे..”, कसंसं हसत रती म्हणाली..
“व्हेरी गुड.. तेथे आत जाऊन थांब.. मी लग्गेच येतोय..”, कबीर
“श्शी.. वेडा आहेस का.. अरे पब्लिक टॉयलेट आहे ते.. काही तरी काय.. किती घाण असेल तेथे..”, रती
“हे बघ रती.. मी लगेच पोहोचतोय.. अशी रस्त्यावर एकटी नक्को थांबुस प्लिज ऐक.. मला व्हॉट्स-अॅकपवर तुझं लोकेशन पाठवं.. तु आत थांब. मी निघालोय…” असं म्हणुन कबीर लगेच बाहेर पडला.. जाताना दोन-तिन पर्फ़्युमच्या बाटल्या बरोबर घेतल्या आणि त्याने गाडी वेगाने रतीच्या दिशेने वळवली..
रात्रीची वेळ असल्याने रहदारी तुरळक होती. २० मिनिटांत कबीर तेथे पोहोचला.. कबीरला बघताच रती धावत धावत आली आणि त्याला बिलगली..
“मी.. मी.. आतमध्ये उलटी केलीय..”, रती रडत रडत म्हणाली..
“ईट्स ओके.. इट्स पर्फ़ेक्टली ओके..”, तिची पाठ थोपटत कबीर म्हणाला..
त्याने गाडीतुन पाण्याची बाटली आणि पर्फ़्युम्स तिला दिले.. रडुन रतीच्या आयलायनर्सची वाट लागली होती.. गालांवर काळे ओघळ पसरले होते. केस विस्कटले होते.
रती जरा नॉर्मल झाल्यावर कबीरने तिला गाडीत बसवले आणि त्याने गाडी माघारी वळवली.
“काय झालं?”, कबीर..
“नेहमीप्रमाणे आमची भांडणं झाली.. मला नव्हतं जायचं कबीर त्याच्या त्या मित्रांच्या ग्रुपमध्ये.. त्यात तो तुमच्याशी जे वागला त्याचा मला राग आला होता… आमचं दोघांचही भान सुटलं.. मी म्हणलं चिडून त्याला.. सोड मला इथंच.. तर त्याने खरंच मला गाडीतुन उतरवलं आणि निघुन गेला…”, रती..
“काय मुर्खपणा आहे हा… मग? काय केलंस तु?”, कबीर..
रतीने आपला मोबाइल चालु केला आणि त्यातला सेंन्ट फ़ोल्डरमधला एक मेसेज उघडुन कबीरसमोर धरला..
“पिटर.. आय एम ब्रेकींग-अप विथ यु.. प्लिज उद्यापासुन माझ्या समोर येऊ नकोस..”
तो मेसेज पाहुन कबीरचे डोळे चमकले तसं रती म्हणाली.. “मी तुझ्यामुळे त्याच्याशी ब्रेक-अप केलंय असं समजु नकोसं हा…”
“छे.. मी कुठं तसं म्हणालो..”, कबीर..
रतीने कबीरच्या गाडीतल्या डॅशबोर्ड्सवरील पॅनलकडे नजर टाकली.
“काय झालं?”, कबीर
“पेट्रोल किती आहे बघतेय..”, रती
“आहे बरंच.. का?”, कबीर…
“जिकडे फ़िरवायची आहे गाडी तिकडे फ़िरव.. मला आत्ता आज्जिब्बात घरी जाण्याचा मुड नाहीए..”, असं म्हणुन रतीने गाण्यांचा आवाज वाढवला, सिट-बेल्ट लावला आणि सिट थोडं मागे करुन ती डोळे झाकुन आरामशीर बसली..
“युअर विश.. माय कमांड मॅम..ड्रायव्हर कबीर अॅजट युअर सर्व्हीस..”, असं म्हणुन कबीरने गाडी सिटी-एक्झिटला वळवली..
[क्रमशः]


User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

Re: इश्क - Marathi love stori

Post by rangila »


24
“अशक्य आहे अरे हे सगळं.. असं कसं कोण करु शकतं..”, कबीरने आदल्या रात्रीचा किस्सा ऐकवल्यावर रोहन म्हणाला..
“हो ना अरे.. रात्रीचं असं निर्जन रस्त्यावर सोडुन गेला निघुन सरळ, काही वेडं वाकडं झालं असतं तर?”, कबीर
“नंतर काय केलंत मग? कुठे फ़िरलात?”, रोहन
“खोपोलीपर्यंत जाऊन आलो न मग.. सॉल्लीड भुक लागली होती, खरं तर मस्त धाब्यावर जाऊन जेवायचा विचार होता, पण एक तर रात्रीची वेळ, त्यात हिचे असे तोकडे कपडे.. एकट्याने ढाब्यावर जायची हिम्मत होईना.. मग फ़ुड-मॉलला हादडलं…”
“बरं केलं तिने ब्रेक-अप केला पिटरशी..तु तर खुशचं असशील..”, रोहन
“हो.. पण अरे.. मला थोडं असं इम्मॅच्युअर बिहेव्हिअर वाटलं तिचं.. आय मीन.. पिटरने जे केलं ते चुकीचंच होतं.. पण असं तडका-फ़डकी ब्रेक-अप म्हणजे..”, कबीर थोडा विचार करुन म्हणाला.
“म्हणजे काय अरे? कोण सहन करेल असला फ़ालतुपणा.. आणि तुला काय माहीत ह्या एका गोष्टीमुळेच तिने ब्रेक-अप केले असेल.. कदाचीत आधीपासुनच्या अनेक गोष्टी असतील साठलेल्या मनात.. हे एक कारण झालं.. एव्हढंच..”, रोहन
“असेलही.. पण ती थोडी अल्लड, इम्मॅच्युअर वाटते मला..”,कबीर
“आणि तु काय फ़ार मॅच्युअर वगैरे समजतोस का स्वतःला.. स्वतःचच बघ काय चाललंय.. आधी मोनिकाला सोडलंस..”
“एक मिनिटं, मी नाही मोनिकाला सोडलं.. तिनेच सोडलं होतं मला..” रोहनचं वाक्य तोडत कबीर म्हणाला..
“बर नंतर राधा…”
“ते ही मी नाही.. आधीच क्लिअर करतो.. ती नाही म्हणाली..”, कबीर..
“अरे हो.. मी कुठे म्हणालो तु ब्रेक-अप केलेस.. पण राधा मनात असतानाच..आता तुला रती पण आवडतेय..”
“मग? तुझं म्हणणं आहे.. एकदा राधा आवडली.. की मला कुणीच आवडु नये.. आणि राधा तर नाही म्हणालीय मला..मग काय मी तिची वाट बघत.. आयुष्यभर एकट्याने बसायचं का? माझ्याकडे का बोटं दाखवता..? तुम्हा कुणाला एक असताना दुसरी आवडत नाही का? नॅचरल आहे ते..”
“बर.. बरं.. ओके.. चिडु नकोस..जाऊ दे तो विषय.. आज संध्याकाळी एका पब्लीशरबरोबर मिटींग आहे.. ४.३० ला वगैरे.. कन्फ़र्म करु ना?”
“हम्म.. कर फ़ायनल..”, लॅपटॉपमध्ये डोकं खुपसत कबीर म्हणाला..

चार-पाच दिवसांनी, साधारणपणे बुधवारी रतीचा कबीरला फोन आला..
“शनिवारी सकाळी काय करतोएस?”, रती
“काही विशेष नाही..का?”
“घरी येतोस?”
“तुझ्या?”
“हो.. मग कुणाच्या?”
“का?”
“अरे सहज.. आपण एकमेकांना इतके दिवस ओळखतोय.. मी जनरली बोलवते माझ्या मित्र-मैत्रीणींना घरी…”
“ओके.. येतो.. ११.३० ठिक आहे?”
“चालेल, मी वाट बघते…”

ठरल्यावेळेप्रमाणे कबीर रतीच्या घरी पोहोचला. डेनिमची शॉर्ट आणि फ़िक्कट गुलाबी रंगाचा टी-शर्ट अश्या साध्या घरातल्या ड्रेसमध्येच रतीने दार उघडले.
“गुड मॉर्नींग..” चेहर्यादवर गोड हास्य पसरवत रती म्हणाली.. “वेल-कम..”
कबीरने हातातल्या पिवळ्या फुलांचा बुके रतीच्या हातात दिला.
हॉलमध्ये रतीचे आई-बाबा सुध्दा बसलेले होते.
“वेल-कम यंग मॅन..”, रतीचे बाबा सोफ़्यावरुन उठुन कबीरशी हास्तांदोलन करत म्हणाले.
कबीर खुर्चीवर बसेपर्यंत रती पाणी घेऊन आली.
“कबीर .. तुझी ओळख करुन देते.. हे माझे आई-बाबा.. आणि आई-बाबा.. हा कबीर..”, रतीने एका वाक्यात दोघांची एकमेकांशी ओळख करुन दिली.
“सॉरी कबीर.. आम्ही काही तुझी पुस्तकं वाचलेली नाहीत.. पण रतीकडुन खूप ऐकालंय त्याबद्दल.. खुप काही काही सांगत असते.. सिम्स लाईक यु आर अ गुड ऑथर..”, रतीचे बाबा म्हणाले.
“थॅंक्यु सर..”, कबीर कसंबसं म्हणाला…
“कबीर, रतीने त्या रात्रीबद्दल सांगीतलं.. थॅंक्स टु यु.. तु तेथे पोहोचलास…”
“ओह नॉट अ बिग डील, माझ्या जागी दुसरं कोणी असतं तरी ही तेच केलं असतं..”
“एनीवेज.. रती.. जा तुझी रुम दाखवं कबीरला…”
“काय ओ बाबा.. रुम काय दाखवं.. तो काय मला लग्नासाठी बघायला आलेला मुलगा आहे का?”
“नाही का? मग बघं आता…”, रतीचे बाबा हसत हसत कबीरला म्हणाले.. तसं रतीने सोफ़्यावरची उशी बाबांना फ़ेकुन मारली आणि कबीरला घेऊन तिच्या वरच्या मजल्यावरच्या खोलीत घेऊन गेली.
रतीची खोली अगदी तिच्यासारखीच होती, एकदम कलरफ़ुल. गडद निळ्या रंगांच्या भिंती, पुर्व-दिशेकडे उघडणारी मोठ्या काचेच्या तावदानांची खिडकी, त्यावर लटकलेले गुलाबी, पर्पल रंगाचे ड्रिम-कॅचर.. पानं,फुलं, पक्ष्यांच्या स्टिकर्सने रंगलेल्या भिंती, एका बाजुला पुस्तकांची मोठ्ठीच्या मोठ्ठी रॅक, रंगीत-फ़्रेश फुलदाणी, पिसांची रंगीत पेनं, टेडी-बेअर्सने सजलेला रायटींग-डेस्क, एका भिंतीवर एल.ई.डी.लाईट्सची माळ आणि मधोमध चिकटवलेले अनेकविवीध फोटो.. पायाखाली मऊ-मऊ कार्पेट.. एखाद्या स्वप्नील जगात गेल्यासारखा कबीर त्या खोलीत हरखुन गेला.
“मस्त सजवली आहेस खोली..”, कबीर रॅकमधील पुस्तकं न्हाहाळत म्हणाला..
“थॅंक्स.. बसं ना..”, खिडकीशेजारील खुर्चीकडे हात करत रती म्हणाली..
“गाणी लाऊ? कुठली आवडतात तुला?”, रती
“माझं असं काही विशेष आवड-निवड नाहीए.. काहीही चालतं.. अगदी मेटॅलीका-हार्ड-रॉक पासुन.. मराठी शास्त्रीय संगीतापर्यंत…तुला?”, कबीर..
“अं.. मी खूप चुझी आहे गाण्यांच्या बाबतीत.. पण त्यातल्या त्यात जगजीतची गझल्स.. मराठी नाट्य/शास्त्रीय संगीत, हिंदीमध्ये शक्यतो अरजीत सिंगच.. बाकी पार्टीजमधला धांगडधिंगा तेव्हढ्यापुरता बरा वाटतो.. कट्यारची लावु गाणी?”, रती..
“व्वा.. का नाही.. घेई छंद लाव.. फ़ार भारी ए..”
“रतीने ड्रॉवरमधुन कट्यारची सिडी काढली आणि प्लेअरमध्ये ढकलली..”
गाणं सुरु होईस्तोवर रतीच्या आईने सरबंत आणि खाण्याचे पदार्थ आणुन ठेवले..
“रती.. मी आणि बाबा.. मार्केटमध्ये जातोय.. आणि मग बाहेरच जेऊन नाटकाला जाऊ म्हणतोय.. चालेल ना तुला?”, रतीच्या आईने विचारलं..
“हो आई.. चालेल…”, रती..
“कबीर… जेऊनच जा.. रती चांगला स्वयंपाक बनवते.. सकाळपासुन स्वयंपाक-घरातच होती बघ…” असं म्हणुन, खोलीचं दार लावुन तीची आई निघुन गेली…
शंकर-महादेवनच्या स्वर्गीय सुरांनी खोलीचा कोपरां-कोपरा मधुर होऊन गेला होता. गाणी संपेस्तोवर अर्धा-पाऊण तास कसा निघुन गेला कळालेच नाही. कबीर वेळ-काळ-स्थळ सगळं विसरुन गेला होता. डोळे मिटुन तो ती गाणी ऐकण्यात रममाण होऊन गेला होता. इतकं शांत त्याला गेल्या कित्तेक महीन्यांत.. वाटले नव्हते. हा केवळ गाण्यांचा प्रभाव होता? की रतीची त्या खोलीतली त्याला लाभलेली साथ ह्याच्या त्याला पत्ता लागेना..
त्याने डोळे उघडले तेंव्हा तळहातावर हनुवटी टेकवुन रती त्याच्याकडेच हसत बघत होती.
“काय झालं?”, भानावर आल्यावर कबीर म्हणाला..
“काही नाही.. कुठेतरी हरवला होतास तु…”, रती
“खरंय गं.. काय गाणी आहेत मस्त… खरंच मी हरवलो होतो कुठेतरी…”, कबीर..
“आई-बाबा गेले?”, काही वेळ शांततेत गेल्यावर कबीर म्हणाला..
“केंव्हाच…”, रती अजुनही कबीरकडेच बघत होती…
काय होत्ं तिच्या नजरेत? काय म्हणायचं होतं तिला? तिचे ते टप्पोरे डोळे कबीरला खुणावत होते.. पण काय? कश्यासाठी?
“कबीर.. एक विचारु?”, रती
“हो.. विचार की…”, कबीर..
“पण त्यातुन काही अर्थ काढु नकोस हं.. सहजचा प्रश्न आहे.. सहजच, पण खरं खरं उत्तर दे..”
“बापरे.. काय विचारणार आहेस असं?”
“..तु मोनिकाबरोबर लिव्ह-ईन मध्ये रहात होतास?”
“हम्म..”
“कधी तिच्याबरोबर सेक्स..”
“हो.. पण खरं तर मला नाही वाटत त्यात रोमांन्स असा काही होता.. इट वॉज वन ऑफ़ दोज क्रेझी नाईट्स.. रोमॅन्सची माझी व्याख्या खुप वेगळी आहे..”, कबीर
“म्हणजे कशी..”
“म्हणजे असं मुसळधार कोसळणार्या पावसात हातात हात धरुन फ़िरणं… कडाडणार्या विजा.. सोसाट्याच्या वार्याहत एकमेकांना किस्स करणं मला जास्ती पॅशनेट वाटतं..”, कबीर..
“मग मोनिकाबरोबर रहाताना असा कोसळणारा वारा.. कडाडणार्याट विजा आल्या नाहीत का कधी?”, हसत हसत रतीने विचारलं..
कबीर नुसताच हसला…
“आणि राधाबरोबर?”, अचानक गंभीर होत रती म्हणाली…
“नाही..”, क्षणाचाही विलंब न करता कबिर म्हणाला.
“पण कधी तसं वाटलं तरी असेल ना?”, रती..
“पण तु हे का विचारते आहेस..?”, कबीर..
“आधी उत्तर दे…”
“नाही वाटलं.. पण तेंव्हा मुसळधार पाऊस.. कडाडणार्या विजा असत्या तर…”.. कबीर अचानक थांबला..
“तर काय कबीर?”
“एनिवेज.. जाऊ देत तिचा विषय…”, कबीर थोडासा अनकंफर्टेबल होतं म्हणाला..
“बरं, चल, जेऊयात? तुला न जेवता सोडलं तर आई रागावेल मला..”, तोंड फ़ुगवुन रती म्हणाली..
“आई रागावेल का?”, कबीर गालातल्या गालात हसत म्हणाला..
“हो..”
“आणि तु? तु नाही रागावणार?”, रतीच्या नजरेला नजर देत कबीर म्हणाला..
“बघं बरं.. मी रागावले ना.. तर मला मनवताना तुला ब्रम्हांड आठवेल..”
कबीरने खिडकीतुन बाहेर बघीतलं.. मे महीना संपत आला होता आणि आकाशात काळ्या ढगांचे पुंजके अधुन-मधुन डोकावत होते. अश्याच एका ढगाने आग ओकणार्याण सुर्याला झाकुन बाहेर मळभ आणला होता…
“मुसळधार पाऊस येणार बहुतेक…”, काही मिनिटांपुर्वीच्याच मुसळधार-पावसाचा संदर्भ घेत कबीर म्हणाला..
रतीला त्याच्या बोलण्यातला अर्थ कळाला आणि ती खळखळून हसली..
“मग काय होतं कबीर.. मुसळधार पाऊस आला तर?”, रती अजुनही खोलीच्या दारातच थांबली होती..
“धरणं भरतात.. सगळीकडे हिरवं गार होतं..”, कबीर
“आणि..”
“आणि.. उन्हाळ्याची गर्मी जाऊन सगळीकडे सुखद गारवा होतो..”
“ते जाऊ देत.. तुला काय होतं कबीर?”
रतीच्या आवाजातला कंप कबीरला जाणवत होता..
कबीर रतीच्या जवळ जाऊन थांबला. त्याच्या शरीराचा स्नायुं-स्नायु रतीला बाहुपाशात समावुन घेण्यासाठी आसुसलेला होता. त्याने एक पाऊल पुढे टाकले असते तरी रतीने त्याला थांबवले नसते. पण ह्यावेळी त्याला रतीबद्दल शंभर-टक्के स्वतःकडुन खात्री हवी होती. त्याला रती आवडत होती हे शंभर टक्के खरं होतं.. पण त्याच्या मनातुन राधा गेलेली नव्हती हे ही तितकेच खरं होतं आणि तो रतीला कुठल्याही प्रकारे फ़सवु इच्छीत नव्हता.
मोठ्या कष्टाने त्याने स्वतःला सावरले..
“एनिवेज.. चल जेऊयात.. खुप भुक लागली आहे..”, कबीर..
रतीने अविश्वासाने वळुन एकवार कबीरकडे पाहीले आणि मग ती जेवायचं वाढायला स्वयंपाक-घरात निघुन गेली.

कबीर घरी परतला तेंव्हा त्यच्या मनामध्ये विचारांचे काहुर उठले होते.
“आपण केलं ते बरोबर केलं का?”
“रतीला काय वाटलं असेल?”
“आपण एक चांगली संधी गमावली का?”
“पण रती काय संधी नाहीए.. आत्ता भावनेच्या भरात काही करुन तिला भविष्यात दुखावायची आज्जीबात इच्छा नव्हती.”
“आपण असं स्वतःला थांबवले ह्याचे एकमेव कारण राधा आहे का? आपण अजुनही तिच्यावर प्रेम करतोय? अजुनही तिच्या परत येण्याची वाट बघतोय? का? कश्यासाठी?”
एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात थैमान घालत होते. त्याची तंद्री भंगली ती फ़ोन वाजण्याचा आवाजाने.
कबीरच्या बाबांचा फोन होता..
“हा बाबा.. बोला..”, कबीर..
“कबीर.. ह्या मंथ-एंडला मी आणि तुझी आई येतोय तिकडे..”
“अरे व्वा.. का? सहज?”
“नाही अरे.. श्रेयाचं (कबीरच्या चुलत बहीणीचं) लग्न ठरलंय”
“ऑं? कधी? आणि इतक्या लगेच?”
“हो अरे.. तिचा होणारा नवरा संगणक क्षेत्रातला आहे.. अमेरीकेत असतो तो.. त्याला जास्तं सुट्टी नाहीए, अनायसे इथेच होता.. भेटीगाठी झाल्या.. दोघंही एकमेकांना पसंद पडले आणि असं तडकाफ़डकी लग्न करायचं ठरलंय..”
“पण मग बाकीचे…?”
“सगळेच येतोय.. बसेस केल्यात दोन-तिन.. आम्ही तुझ्या घरीच येऊ…”
“ओ्के…”
“कबीर!!”
“हां बाबा..”
“एव्हरीथींग ऑलराईट..?”, कबिरच्या आवाजात लग्नाचा किंवा सगळ्या नातेवाईकांना भेटण्याचा कसलाच उत्साह नव्हता..
“हम्म.. एव्हरीथींग ऑलराईट..”
“कबीर.. मी बाप आहे तुझा… काय झालंय..एखादी मुलगी वगैरे…”
“हम्म.. पण एक नाही दोन..”, कबीर कसंनुसं हसत म्हणाला..
“अरे बापरे… मला वेळ आहे आत्ता.. बोलायचंय?”
पुढच्या दहा-पंधरा मिनिटांत कबीरने बाबांना राधा आणि रतीबद्दल सगळं सांगुन टाकलं..
“मलाच कळत नाहीए.. मला कोण जास्ती आवडतं.. राधा? का रती? आणि राधा आवडत असेल.. तरीही.. तिच्या मनात काय आहे काही कळत नाहीए.. ती परत येईल.. नाही येणार.. ह्याचाही काही भरवसा नाही.. आणि समजा, ती येणार नाही म्हणुन रतीला आपलंसं केलं..आणि राधा समोर आली तर.. तर काय होईल हे सुध्दा मला ठाऊक नाही..”, कबीर…
“हे बघ कबीर.. माझं तरी असं मत आहे की आपण पळत्याच्या मागे न लागता.. जे हातात आहे तेच गोड मानुन घ्यावं.. राधाची न्युज आम्हीपण टी.व्ही. वर पाहीली होती.. अर्थात शेवटचा निर्णय सर्वस्वी तुझा आहे…”

“एक काम कर.. लग्नात रतीला पण घेऊन ये.. जमेल?”
“हो.. येतो घेऊन.. ठेवु फोन मग?”
“हम्म.. चल बाय.. आणि उगाच देवदास होऊन बसु नकोस.. पुस्तकाच्या पुढच्या भागावर काम चालु करं, इथे सगळे विचारायला लागलेत पुढचा भाग कधी येणार म्हणुन..”, कबिरला चिअर-अप करत त्याचे बाबा म्हणाले…
“मी लाख लिहीन हो पुढचा भाग.. पण शेवट मलाच सापडत नाहिए त्याचं कायं?..”, कबीर स्वतःशीच म्हणाला आणि त्याने फोन ठेवुन दिला.

नेपल्समध्ये काढलेले अनेक सुंदर सुंदर फोटो पोस्ट करण्यासाठी राधाने बर्या च दिवसांनी फ़ेसबुक उघडलं..
पहील्या काही पोस्ट स्क्रोल केल्यानंतर एका फोटोपाशी राधा घुटमळली. रतीने तिचा कबीरबरोबर काढलेला एक सेल्फ़ी फ़ेसबुकवर कबीरला टॅग करुन पोस्ट केला होता.
“कोण आहे ही रती? आणि कबीर तिच्या बेडरुममध्ये काय करतोय..?”, तो फ़ोटो एन्लार्ज करुन बघत राधा स्वतःशीच म्हणाली..
“दाल मै कुछ काला है..” मागुन लॅपटॉपवरचा तो फोटो बघत पुनम म्हणाली..
“चुप गं चुडैल.. काही काला वगैरे नाहीए..”, राधा
“कमऑन राधा.. यु आर अ वुमन.. रतीच्या चेहर्या वरचे.. डोळ्यातले भाव बघुनच तु सांगु शकतीस.. कश्याला फ़सवतेस स्वतःला..”, पुनम
“एनिवेज.. आपण चाललोच आहे इंडीयात मंथएंडपर्यंत… गेल्यावर कळेलच खरं काय आणि खोटं काय…”, राधा..
“आणि समजा हे खरं असेल.. तर काय? आणि खोटं असेल.. तर काय?”, पुनम
“माहीत नाही..”, राधा..
“अॅहक्सेप्ट इट राधा.. तुला कबीर आवडतो.. आणि तु चक्क जळती आहेस.. त्याला दुसर्या, मुलीबरोबर बघुन.. हो ना?”
“असेल.. पण पुनम, माझ्या स्वप्नांचं काय? माझ्या आयुष्याकडुन ज्या अपेक्षा आहेत त्याचं काय? मी कबीरला ‘हो’ म्हणुन एक तर त्याच्या.. किंवा माझ्या आयुष्याला न्याय देऊ शकणार नाही हे खरं आहे ना? आणि कॉम्प्रमाईज करुन त्यावर बेतलेली रिलेशनशीप मला नकोय..”
“विचार कर राधा.. निट विचार कर.. अजुन दोन आठवडे आहेत तुझ्या हातात.. इंडीयात आपण परत जाऊ तेंव्हा एकदाचा काय तो सोक्ष-मोक्ष लावुन टाक.. इस्स पार.. या उस्स पार.. तु स्वतःही त्यात अडकली आहेस.. आणि कदाचीत कबीरही..”
राधाने लॅपटॉप बंद केला आणि डोळे मिटुन टेबलावर डोकं ठेवुन राधा विचारात गढुन गेली…..
[क्रमशः]


User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

Re: इश्क - Marathi love stori

Post by rangila »


25
कबीरची झोप मोडली ते केंव्हापासुन वाजणार्यान फोनच्या आवाजाने. आदल्या दिवशी रात्री नातेवाईकांचा सगळा गोतावळा लग्नासाठी येऊन थडकला होता. सगळ्यांना भेटून, गप्पा-टप्प्पांमध्ये कबीरला झोपायला मध्यरात्र उलटुन गेली होती. त्याने घड्याळात बघीतले, ८च वाजत होते.
काही सेकंदांनी पुन्हा फोन वाजु लागला.
वैतागुन त्याने फोन उचलला…
“कबीर.. ए कबीर.. अरे झोपलाएस का?”, पलीकडुन राधा फोनवर ओरडत होती..
“राधा? हा कुठला नंबर आहे तुझा…?”, कबीर राधाचा आवाज ऐकताच खडबडुन जागा झाला..
“काय करतो आहेस?”, त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन राधा म्हणाली..
“झोपलोए.. सकाळी झोपेतच असतात बहुतेक लोकं..”
“पेपर बघीतलास आजचा?”, राधा
“मी झोपलोय म्हणलं तर! झोपेत वाचेन का पेपर…”
“बरं बरं.. व्हेरी गुड.. एक काम कर, पट्कन एम.जी.रोड वर ये.. तुला काही तरी दाखवायचंय..”
“राधा.. अगं मी अजुन बेडमध्येच आहे.. वेळ लागेल मला.. काय काम आहे बोल नं..”
“ते तु इथे आल्याशिवाय कसं सांगू? ये पट्कन, मी वाट बघतेय.. मार्झोरीन समोर थांब..”, असं म्हणुन कबीरला बोलायची संधी न देता राधाने फोन बंद करुन टाकला..
“काय मुलगी आहे ही.. अशी एकदम गायब होते.. एकदम कुठुन तरी अवतरते.. काही कॉन्टेक्स्ट नाही.. एम.जी.रोडला ये म्हणे…”, चरफडत आणि स्वतःशीच बडबड करत कबीर अंथरुणातुन उठला आणि फ़्रेश व्हायला बाथरुममध्ये गेला..

कबीरने एम.जी.रोडच्या कॉर्नरला पोहोचताच राधाला फोन केला. काही वेळातच राधा कुठुनतरी धावत धावत येऊन कबीरच्या समोर येऊन थांबली..
“पाहीलंस?”, राधा
“काय?”, गोंधळुन कबीर म्हणाला..
“चं.. अरे ते बघ ना समोर…”, समोरच्या एका जाहीरातीच्या फलकाकडे बोट दाखवत राधा म्हणाली..
समोर ‘स्ट्रॉबेरी ट्रॅव्हल्स’च्या जाहीरातीचा फ़लक होता.. आणि जाहीरातीत राधाचा मोठ्ठा फोटो.. “कम व्हिजीट युरोप” वगैरे म्हणत..
“ऐल्ला.. तु मॉडेलींग वगैरे चालु केलेस की काय?” कबीर डोक्याला हात लावत म्हणाला..
“अरे नाही.. मी मागच्या आठवड्यात इटलीवरुन परत आले.. ऑफ़ीसमध्ये गेले तेंव्हा अवंतिका.. माझी बॉस आणि अॅेड एजंसीची हेड समीरा.. दोघींचा काहीतरी वाद सुरु होता.. टुरीझमचा सिझन सुरु होतोय आणि आम्हाला युरोप मार्केट करायचं होत.. त्यासाठी आधीच खूप उशीर झाला होता आणि त्या दिवशी फोटो-शुट होतं आणि ती मॉडेल कुठे तरी गायब झाली होती.. तिचं म्हणे ब्रेक-अप झालं आणि ती डिप्रेशन मध्ये गेलीय वगैरे वगैरे काहीतरी चालु होतं..”, राधा सांगत होती..
“मग?”, कबीर..
“समीराने अजुन दोन-तिन मॉडेल्सचे फोटो आणलेले.. पण अवंतीला एकतर कुठले आवडले नाहीत.. आणि त्या लगेच अव्हेलेबल पण नव्हत्या.. अजुन १-२ दिवस शुट पुढे जात होतं.. मी कॉलेजच्या दिवसांत काही असेच फोटो काढले होते..गुगल-ड्राईव्हवर होतेच ते अपलोड केलेले.. ते दाखवले अवंतीला.. तर तिला आवडले.. कदाचीत अगदीच मनाप्रमाणे नसतील.. पण दुसरा पर्याय पण नव्हता.. समीराने पण मान्यता दिली मग काय.. लगेच त्याच दिवशी दुपारी शुट-ड्न.. थोडं फोटो-शॉप एडीटींग, प्रिटींग करुन एका आठवड्यात.. हिअर आय एम..”, समोरच्या फलकाकडे हात दाखवत राधा म्हणाली..
“धन्य आहेस तु.. कधी कुठे काय करशील तुलाच माहीत…”, कबीर
“अरे इथेच काय.. अजुन बर्यााच ठिकाणी लागतील हे बोर्ड्स.. आज सगळ्या लिडींग पेपर मध्ये पण अॅलड आहे आमची..”, राधा अभिमानाने बोलत होती..आणि कबीर डोळ्याची पापणीही न हलवता तिच्यातला तो खळाळता उत्साहाचा झरा न्हाहाळत होता.
“कबीर..”, अचानक गंभीर होत राधा म्हणाली.. “त्या दिवशी तु प्रसंगावधान राखुन गोकर्णमध्ये मला वाचवलं नसतंस तर कदाचीत मी आजही कोर्टाच्या फ़ेर्यांहमध्येच अडकले असते.. माझं हे नविन आयुष्य केवळ तुझ्यामुळे.. थॅंक्स अ लॉट वन्स अगेन..”
बोलता बोलता राधाने कबीरच्या हातावर हात ठेवला..
“..आणि म्हणुनच मी तुझ्यासाठी काही तरी करायचं ठरवंलय..”
“आता काय करते आहेस…”, कबीर
“मी ना.. ह्या अॅ ड चे पैसे नाही घेतले..”
“माझ्यासाठी?”
“ऐक तर…. ते पैसे मी घेतले नाहीत.. त्या ऐवजी.. ह्या महीना अखेरीस आम्ही स्विझरलॅडला चाललो आहोत.. ८ दिवसांसाठी.. आणि तु येतो आहेस आमच्याबरोबर..”
“म्हणजे?”
“अरे म्हणजे.. त्या पैश्यांऐवजी मी तुझ्यासाठी स्विसची टुर बुक केलीय…”
“व्हॉट??? आणि म्हणजे तुला एव्हढे पैसे मिळत होते त्या अॅीडचे..”
“नाही रे.. पण हे बघ.. टुरची कॉस्ट जी आम्ही जाहीरात करतो ती अर्थात मार्जीन धरुन असते.. खरी कॉस्ट कमीच असते.. शिवाय मी एम्प्लॉई.. थोडा डिस्काऊंट मिळवला.. ते केलंय मी अॅसडजस्ट.. पुढच्या आठवड्यात मी सांगेन ते डॉक्युमेंट्स दे.. तुझा व्हिसा टाकु लगेच प्रोसेसिंगला…ओके?”
“हम्म ठिक आहे..”
“बरं चल.. ब्रेक-फ़ास्ट केला आहेस?”
“नाही.. कार्यालयातच करेन..”
“कार्यालयात?”
अचानक कबीरला आठवले आज लग्न आहे.. त्याने घड्याळात नजर टाकली.. ९ वाजुन गेले होते.. १०.३० ला त्याला रतीला घेऊन कार्यालयात पोहोचायचे होते..
“ओह डॅम्न.., राधा मला जायला हवं..”, कबीर
“का? काय झालं?”
“अगं.. लग्न आहे श्रेयाचं.. माझ्या चुलत बहीणीचं.. मी अजुन तयार पण नाही… मला आवरायचंय.. रतीला पिक-अप करायचंय..मेलो मी..”, कबीर
“रती? रती कोण?”, रतीच नाव ऐकताच राधा सावध झाली..
कबीरला काय बोलावं सुचेना..
“रती.. अं फ़्रेंड आहे माझी…”
“ओह तीच का ती.. तु फोटो पाठवला होतास त्यात तुझ्या शेजारी होती ती?”
“हम्म तिच..चल पळतो मी..”
“एssss उर्मट.. तुझ्या बहीणीचं लग्न आहे आणि मला इन्व्हाईट पण नाही?”
“अगं तु नव्हतीस इथे.. मग मी काय करणार..?”
“पण आता आहे ना?”
“ओह येस.. ये ना मग…”
“ये ना मग?? हे असं इन्व्हाईट.. नको त्यापेक्षा.. जाऊ देत.. असं बळंच नको..स्वतःहुन म्हणाला असतास तर विचार केला असता..”
“ए आता उगाच नाटकं नको करुस.. खरंच ये.. उशीर झाला ना.. गडबडीत सुचलं नाही.. ये नक्की वाट बघतोय.. पत्ता पाठवतो व्हॉट्स-अॅ पवर..”, असं म्हणुन कबीर निघुन गेला..

कबीर रतीकडे पोहोचला तेंव्हा ११ वाजुन गेले होते.. एव्हढ्या वेळात दहा वेळा रतीचा फोन येउन गेला होता.. आणि कबीर फ़क्त आल्यावर बोलु एव्हढंच बोलत होता..
कबीर रतीच्या घरी पोहोचला तेंव्हा रती पार्कींगमध्ये येऊन थांबली होती.
गुलाबी रंगाचा त्यावर सोनेरी रंगाची नक्षी केलेला घागरा-चोली तिने घातला होता, पायात किंचीत हाय-हिल्स असलेले चंदेरी रंगाचे चमचमते सॅंन्डल्स, ड्रेसला साजेसा गालावर फ़िक्कट गुलाबी रंगाची छटा असलेला मेक-अप तिने केला होता. डोळ्यात हलकेसे काजळ आणि आयलायनरने डोळ्यांच्या रंगवलेल्या कडांमुळे आधीच सुंदर असलेले तिचे डोळे अधीकच सुंदर भासत होते.
हातातल्या डझनभर बांगड्या आणि खांद्यावरुन पाठीमागुन हातांवर गुंडाळलेली ओढणी सांभाळत रती गाडीमध्ये बसली..
“कशी दिसतेय?”, रती..
“सिंड्रेला…”, कबीर नकळत बोलुन गेला…
“अं?”
“खूप मस्त दिसतेस..”
“चं.. काय रे.. लेखक आहेस ना तु..? काही तरी मस्त कॉम्लीमेंट दे की.. काय आपलं तें तेच नेहमीची वाक्य..”, हसत हसत रती म्हणाली..
“बरं.. मग लिहुनच पाठवीन रात्री व्हॉट्स-अॅरप वर.. आत्ता निघुया?”
“हो चला.. आधीच उशीर झालाय… ए.. पण का उशीर झाला एव्हढा?”
कबीरने गाडी सुरु केली आणि तो स्विझरलॅड-ट्रिप चा भाग वगळुन राधाच्या भेटीबद्दल रतीला सांगीतले..
“ती पण येतीय लग्नाला..”, शेवटी कबीर म्हणाला
रती काहीच बोलली नाही, पण तिला राधाचं लग्नाला येणं समहाऊ आवडलं नसावं असं कबीरने ताडलं..

कबीर कार्यालयात पोहोचला तेंव्हा बराच उशीर झाला होता, पार्कींग केंव्हाच भरुन गेले होते. कबीरने रस्त्यावरच गाडी लावली आणि रतीला घेऊन तो आतमध्ये गेला.
“अहो काय शेठ.. किती उशीर?”
“कबीर अरे काय? किती वाजले..सकाळी ब्रेकफ़ास्टला येणार होतास…”
“काय रे ब्रो? कित्ती वाट पहात होते सगळे तुझी?”
एक ना अनेक.. कबीरवर उशीरा आल्याबद्दल प्रश्नांचा भडीमार चालु होता. कबीर मात्र तडक रतीला घेऊन आई-बाबांकडे गेला.
“आई- बाबा.. ही रती.. रती.. हे माझे आई-बाबा..”, कबीरने एकमेकांशी ओळख करुन दिली..
रतीने खाली वाकुन दोघांना नमस्कार केला..
“गोड आहेस गं..”, रतीच्या ह्नुवटीला धरत कबीरची आई म्हणाली.
कबीरने हळुच बाबांकडे प्रश्नार्थक नजरेने बघीतले आणि बाबांनीही हसत हसत हळुच छान आहे अशी खुण केली.
आई आणि रतीला थोड्यावेळ गप्पा मारायला सोडुन कबीर बाहेर खुर्च्यांवर येऊन बसला.
थोड्यावेळाने रतीपण त्याच्या शेजारी येउन बसली.
अधुन मधुन कबीरच्या नात्यातले कोण-ना-कोण येऊन जात होते. कबीर त्यांची आणि रतीची ओळख करुन देत होता.. पण त्याचे लक्ष मात्र घड्याळाकडे आणि कार्यालयाच्या दाराकडे लागुन राहीले होते. मनातुन कुठेतरी त्याला राधा यायला हवी होती, तर दुसरे मन राधा नाही आली तर बरेच होईल असेही म्हणत होते.
नवरा मुलगा आणि नवरी मुलगी शेवटचे विधी संपवुन कपडे बदलायला गेले होते.
“तुम्हा मुलींची खरंच कमाल असते हां.. बघ ना.. श्रेयाचंच.. एक-दोनदा काय भेटले, एकमेकांना पसंद केलं आणि लगेच लग्न? बरं तर बरं.. असा एकदम देश सोडुन त्याच्या घरी जाणार रहायला..”, कबीर म्हणत होता..
“मला नाही वाटत ह्यामध्ये दिवसांनी काही फ़रक पडतो. कधी कधी एका भेटीतही समोरचा आपल्याला अगदी जवळचा वाटतो.. कधी कधी कित्तेक महीन्यांच्या भेटीतही नाळ जुळत नाही..”, रती
“हो बरोबर आहे.. पण आता माझं आणि मोनाचं बघ.. दोघं एकमेकांना इतकं चांगलं ओळखत होतो, एकमेकांच्या प्रेमात होतो.. एकत्रही रहायला लागलो होतो.. पण अचानक सगळं बिघडलं.. इतक्या टोकाला गेलं की..”
“कबीर.. आपण शेवटी माणसं आहोत.. रोबोट्स नाही, एकदा प्रोग्रॅम केले की लाईफ़-लॉग ठरवल्याप्रमाणे वागतील. कितीही, काहीही झालं तरी परीस्थीतीनुसार लोकं थोडीफ़ार बदलतातच.. स्वाभावीक आहे ते..”
“म्हणजे.. तुला म्हणायचंय मोना बरोबर होती, मी चुक?”
“नाही, तसं मला म्हणायचं नाहीये. माझा मुद्दा हा आहे की लग्न, नाती जमणं हा जसा नशीबाचा एक भाग आहे तसा एकमेकांशी जुळवुन घेण्याचाही. त्यामध्ये एकमेकांना किती दिवसांपासुन ओळखतो हा मुद्दा दुय्यम आहे..”
कबीरने बोलता बोलता सहज समोर बघीतले, दाराआडुन त्याचे आई-बाबा कबीर-रतीकडे बघत होते. कबीरची नजरानजर होताच दोघंही पट्कन आत निघुन गेले..
“म्हणजे तुझा लग्न-संस्थेवर विश्वास आहे तर…”, कबीर
“अर्थात. मला लग्न करायला.. आपलं घर सोडुन दुसर्याीच्या घरी जाऊन नवीन सुरुवात करायला, नवीन नाती जोडायला खूप आवडेल..”, रती
कबीर पुढे काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला.
राधाचा फोन होता..
“कबीर.. बाहेर ये ना.. मी गेटपाशी आहे…”
“हो आल्लोच..”, असं म्हणुन कबीर राधाला रिसीव्ह करायला बाहेर गेला.
रतीने नकळत आपला ड्रेस निट केला, मोबाईलच्या कॅमेरात पाहुन केस निट केले आणि उगाचच मोबाईलवरचे मेसेजेस बघण्यात मग्न होऊन गेली.
थोड्याच वेळात कबीर राधाला घेऊन रती बसली होती तेथे आला.
“रती.. मिट राधा… राधा .. ही रती..”, कबीरने दोघींची एकमेकांशी ओळख करुन दिली..
“हाय राधा…”, रती म्हणाली..
“हाय रती.. यु आर ब्युटीफुल..”, शेजारची खुर्ची ओढुन त्यावर बसत राधा म्हणाली..
“थॅंक्स.. बट यु आर गॉर्जीयस..”, रती
दोघीही हसल्या..
“सो.. सकाळी गडबडीत बोलता आले नाही.. हाऊ वॉज इटली..”, कबीर..
“इटली.. वॉव.. ऑस्समच आहे एकदम.. आम्ही खुप फ़िरलो.. आर्ट फ़ेअर्स, म्युझीअम्स..फ़ोटोग्राफ़ी एक्झीबिशन्स.. रेस्तॉरंट्स.. नेपल्सचे समुद्र किनारे तर अमेझींग आहेत.. यु शुड डेफ़ीनेटली व्हिजीट…”, राधा बोलत होती
“वॉव.. मस्त राधा.. सही लाईफ़ आहे तुझी.. मज्जा नै मस्त मस्त ठिकाणं फ़िरायला मिळतात..”, रती म्हणाली..
“हम्म..पण मी स्ट्रगल करुन ही लाईफ़ मिळवली आहे.. त्यासाठी कित्तेक गोष्टी सोडल्या आहेत, कित्तेक लोकांची मनं दुखावली आहेत.. कबीर नोज बेटर.. ना कबीर..”, राधा कबीरकडे बघत म्हणाली..
तिघं जण बोलत असताना तिकडुन कबीरची आई चालली होती.. राधाला बघुन ती परत आतमध्ये गेली आणि तिने कबीरच्या वडीलांना बाहेर बोलावलं..
“अहो, एक मिनीटं बाहेर या..”
“का? काय झालं..?”
“अहो..ती रती-कबीरबरोबर बसलीए ती.. ती राधा आहे का?”
कबीरच्या वडीलांनी त्याच्या आईला कबीरशी फोनवर झालेलं बोलणं सांगीतलं होतं..
कबीरच्या वडीलांनी हळुच डोकावुन बघीतलं..
त्यांनी राधाला टीव्हीवर बघीतलं होतं तेंव्हा ती खूप वेगळीच दिसत होती. पण साधारण चेहरा ओळखीचा वाटला तसे ते म्हणाले..
“हो बहुतेक.. तिच आहे ती..”
“अहो पण.. मग ती इथे कश्याला आलीय? कबीर आणि रती कित्ती छान दिसत आहेत एकत्र.. ही कश्याला उगाच मध्ये तिथे?”
“आता मला काय माहीत.. कबीरनेच बोलावले असेल तिला..”
“काय करावं ह्या मुलाचं..”, डोक्याला हात लावुन त्याची आई निघुन गेली.
इकडे तिघांच्या गप्पा चालु होत्या तेव्हढ्यात एक आज्जीबाई डुलत-डुलत राधापाशी आल्या आणि म्हणाल्या.. “अगं.. पेपरात ती जाहीरात आलीय त्यातली ती मुलगी तुच का?”
राधा हसली आणि म्हणाली.. “हो आज्जी मीच ती..”
“एक.. सेल्फ़ी काढू का तुझ्याबरोबर..” असं म्हणुन त्या आज्ज्जीबाईंनी राधाबरोबर एक-दोन फ़ोटो काढुन घेतले आणि त्या निघुन गेल्या.
आणि थोड्याच वेळात ती बातमी इतरत्र पसरली.. काही क्षणातच राधा सेलेब्रेटी झाली.. कोण ना कोण येऊन तिच्याबरोबर फ़ोटो काढुन घेत होते. शेवटी राधाच एका ग्रुपबरोबर फोटो काढायला तेथुन निघुन गेली..
“कबीर.. अरे तुझी गाडी कुठेय?”, कबिरचे बाबा एव्हाना तेथे आले होते..”
“बाहेरचं आहे.. आत पार्कींग नाही मिळालं..”, कबीर..
“व्हेरी गुड.. एक काम कर ना श्रेया आणि तिच्या नवर्या,ला देवदर्शनाला घेऊन जायचंय.. जवळंच आहे इथे.. पण त्यांच्या गाडीच्या मागे कोणतरी गाडी पार्क करुन गेलंय.. जातोस?”
“हो.. जातो की.. त्यात काय एव्हढं..” असं म्हणुन रतीला दोन मिनिटांत येतो सांगुन कबीर बाहेर पडला.

कबीर गेल्यावर रती एकटीच राहीली होती. मोनिकाचं महत्वाच फोटोशुट असल्याने ती आली नव्हती तर रोहन त्याच्या आज्जीची तब्येत बिघडल्याने दोन दिवसांपुर्वीच गावी गेला होता. त्यामुळे ते दोघंही नव्हते.
थोड्यावेळाने राधा रती शेजारी येऊन बसली..
“कबीर कुठे गेला?”, राधा..
“अं तो बाहेर गेलाय ते देवदर्शन करायला गाडी घेऊन गेलाय, येईलच १५ मिनीटांत”.. रती
“ओह ओके..”
एक विचीत्र संवादाची पोकळी दोघींमध्ये निर्माण झाली होती. काय बोलावं कुणालाच सुचेना.. अचानक दोघीही एकदमच म्हणाल्या..
“तु आणि कबीर…”
मग दोघीही हसल्या.. अर्थात त्यामुळे दोघींमध्ये निर्माण झालेलं टेंन्शन थोडं कमी झालं..
“नाही.. तसं काही नाहीए आमच्या दोघांत.. मी आणि कबीर एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत..”, राधा म्हणत होती..”कबीर माझ्याबरोबर माझ्या प्रत्येक कठीण प्रसंगात होता.. तो तेंव्हा नसता.. तर आज मी इथे नसते.. आय ओ हीम ए बिग थिंग.. पण खरंच आमच्या दोघांत तसं काही नाहीए.. इन्फ़ॅक्ट माझं तसं कुणाबरोबरंच काही नाहीए…”, हसत हसत राधा म्हणाली..
“का?”,रती
“म्हणजे मला माझं आयुष्य असं मोकळेपणाने जगायचंय.. मला असा कोणीतरी हवाय जो मला रिस्ट्रिक्ट करणार नाही.. तर मला मोकळीक देईल.. मला माझं आयुष्य जसं मला हवंय तसं जगु देईल..”, राधा
“माझ्या बाबतीत अगदी उलटं आहे..”,रती म्हणाली.. “उलट मला असा कोणीतरी हवाय जो सतत माझ्या आजुबाजुला असेल..जो मला दिवसांतुन पन्नास वेळा फोन करेल.. मी कुठे आहे, काय करतीएस विचारेल.. मला ना, अश्या सुखद बंधनात कायमंच अडकुन रहायला नक्कीच आवडेल..”
“मग तुझं आणि कबीरचं नक्की जमेल.. तो अगदी तुझ्यासारखाचं आहे..”, राधा
“खरंच?”, रती एकदम आनंदाने बोलुन गेली.
काही क्षण दोघी एकमेकांकडे पहात होत्या. शब्द नसले तरीही तो मुक संवाद खुप काही बोलुन गेला. रतीच्या डोळ्यांमध्ये कबीरसाठी असलेलं प्रेम राधा स्पष्ट पाहु शकत होती.
“बरं चलं, मला निघायला हवं..”, अचानक राधा म्हणाली
“अं? अग आत्ता तर आलीएस ना.. अजुन लग्न पण नाही लागलंय..”, रती
“हो गं, पण खरंच थोडं महत्वाचं काम आहे..”
“पण कबीर येईपर्यंत तरी थांब.. त्याला भेटुन जा नं..”, रती
“नाही नको.. त्याला सवय आहे माझ्या अश्या अचानक निघुन जाण्याची.. तो नाही काही बोलणार.. चल.. भेटु परत कधी..”, असं म्हणुन राधा तेथुन निघुन गेली.

पाचंच मिनिटांत कबीर आला..
“हे काय.. राधा कुठेय?”, कबीर ची नजर राधाला शोधत होती..
“जस्ट गेली ती..”, रती म्हणाली..
“म्हणजे?”
“तिला काही तरी महत्वाचं काम होतं म्हणुन गेली ती..”, रती
“अरे अशी कशी गेली.. थांबवायचं नाहीस का तु तिला..”, कबीरचा आवाज अचानक वाढला.. इतका की आजुबाजुला बसलेली लोकं त्यांच बोलणं थांबवुन कबीर आणि रतीकडे पाहु लागली
“कबीर.. मी म्हणले तिला.. कबिरला भेटुन जा.. तिने ऐकलं नाही, यात मी काय करणार..”, कबीरच्या अचानक वाढलेल्या आवाजाने रती भांबावुन गेली..
“मला फोन तरी करायचास ना..”
“मी का तुला फोन करु.. राधा तुझी मैत्रीण आहे, माझी नाही. तिने तुला फोन करायला हवा होता.. तिला वाटलं नाही करावासा.. तु मला का सांगतोएस हे..”
“किती वेळ झाला जाऊन…”
“पाचच मिनीटं…”, रती दुसरीकडे बघत म्हणाली..
कबीर धावत धावत राधा दिसतेय का बघायला बाहेर पळाला..
कबीर दिसेनासा होईपर्यंत रती त्याच्या पाठमोर्याल आकृतीकडे पहात राहीली, मग तिने आपली पर्स उचलली, कार्यालयाच्या बाहेर आली, आणि रिक्षात बसुन निघुन गेली.

राधा पुनमच्या आलिशान फ्लॅटमधील प्रशस्त टेरेसमध्ये डोकं धरुन बसली होती.
“काय घेणार? थंड बिअर आणु?”, पुनमने विचारलं
“श्शी नको.. कडवट होईल तोंड.. स्मर्नऑफ़ चालेल आणि ऑन-द-रॉक्स प्लिज…”, राधा
“ओके..”, पुनम हसुन परत आत गेली आणि येताना दोघींसाठी दोन लार्ज पेग्स आणि चिप्स घेऊन परतली
“सो अॅनज आय अंडरस्टॅंड.. तुला कबीर आवडतो.. कबीरला तु आवडतेस.. पण रतीला पण कबीर आवडतो.. मग.. मग तुला रती आवडते का?”, पुनम गोंधळुन म्हणाली..
“ओह कमऑन पुनम.. मला कश्याला रती आवडेल…”, राधा वैतागुन म्हणाली..
“सॉरी.. सॉरी.., पण मग तुम्ही दोघं एकमेकांना आवडताय, तर प्रॉब्लेम कुठे आहे? तुला कबीर हवाय? का नकोय?” पुनम
“मला कबीर हवाय पुनम.. पण माझ्या टर्म्स वर.. म्हणजे त्याला जशी मी हवीय तशी मी होऊ शकत नाही हे नक्की.. तो अॅमडजस्ट करायला तयार असेल तर.. आय मीन लुक.. दर वेळेस मुलींनीच का अॅीडजस्टमेंट करायची? त्यांच्यासाठी आपण आपली लाईफ़-स्टाईल.. आपलं करीअर त्यांच्या सोईने करायचं का? कबीर तसाही लेखकच आहे.. तो घर सांभाळायला तयार असेल तर..”
“खरं आहे तुझं.. पण आपली भारतीय मेंटालीटी बदलायला वेळ लागेल राधा.. आणि तो तयार असला तरीही त्याच्या घरच्यांच्याही काही अपेक्षा असतीलच ना एक सुन म्हणुन..”, थोडा विचार करुन पुनम म्हणाली..
“तेच तर.. कबीर ने ते ठरवावं पहीलं.. त्याला बायको हवीए का आई-वडीलांसाठी सुन..”, राधा
“तु कबीरशी बोलली आहेस ह्या विषयावर? आय मीन त्याला कधी क्लिअरली सांगीतलं आहेस की तुला पण तो आवडतो.. तु त्याच्याबरोबर एकत्र राहु शकतेस.. पण तुझ्या ह्या काही अटी आहेत वगैरे..”, पुनम
“नाही..”
“मग मला वाटतं तु त्याच्याशी हे सर्व बोलावंस.. पण हे बघ, हे असं एकदम अंगावर नको जाऊ त्याच्या तुझ्या अटी वगैरे घेऊन.. त्याला तुझ्याबाजुने करुन घे..त्याला इन्व्हॉल्व्ह कर तुझ्यात आणि मग बोल..”
“म्हणजे नक्की काय करु?”, राधा..
“इमोशन्स राधा इमोशन्स.. त्याला इमोशनल कर.. त्याच्यासमोर तु गरीब-बिचारी.. अबला..एकटी वगैरे आहेस हे भासव.. तुला त्याची गरज आहे हे त्याला इंडायरेक्टली जाणवुन दे.. मग बघ.. तो स्वतःहुन त्याचा खांदा तुला रडायला पुढे करेल..”, पुनम..
“पुनम्.. यु बिच..कसली आहेस अगं तु..”, राधा हसत हसत म्हणाली..
“सगळे पुरुष एकसारखेच असतात अगं.. दिसली दुःखी स्त्री.. की कर खांदा पुढे.. ट्राय इट.. आणि ऑल-द-बेस्ट..”
राधाने ग्लास बॉटम्स-अप केला आणि ती तेथुन बाहेर पडली..
[क्रमशः]



Post Reply