इश्क - Marathi love stori

User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

Re: इश्क - Marathi love stori

Post by rangila »

11
राधाचा निश्चय पक्का होता. कबिर काही मार्ग काढो नाही तर न काढो, तिला इथुन निघणं क्रमप्राप्त होतं. तिला आपल्या आयुष्याकढुन काय अपेक्षा आहेत हे स्पष्ट होते, आणि कुण्या कबिर नामक व्यक्तीसाठी, ज्याची ओळख फक्त काही दिवसांची होती, त्याच्यासाठी ती आपले स्वातंत्र्य पणाला लावण्यास कदापी तयार नव्हती.
कबिरला सोडुन ती आपल्या खोलीत आली. सोफी-ऑन्टीचा जाताना निरोप घेता येणार नाही ह्याचं मात्र तिला राहुन राहुन वाईट वाटत होत. महीन्याभरातच त्यांचे आणि राधाचे खुप छान संबंध जुळले होते.
“एका अर्थाने, झालं ते बरंच झालं, कदाचीत त्यांचा निरोप घेण जास्त अवघड झालं असतं. शेवटी इथे थोडं नं आपण कायमचं रहाणार होतो? ४ दिवसांनी जायचं, ते आज…”, बॅग भरताना राधाने विचार केला. तिने खोलीतला दिवा बंद करुन टाकला आणि अंधारात ती बसुन राहीली.
कबिरबद्दल तिच्या मनात काय होते ते तिलाच सांगता येत नव्हते. दोन दिवसांच्या ओळखीतच कबिर आपल्याला इतका का जवळचा वाटतोय हा विचार तिला सतावत होता. दोन दिवसांच्या ओळखीवरच त्याने तरी आपल्याला “आय लव्ह यु..” म्हणायची काय गरज होती? जसं त्याची नजर काहीही न बोलुनही खुप काही बोलुन जाते, कदाचीत आपले डोळेही आपल्याला तसाच तर दगा देत नसतील ना? असाही एक विचार तिच्या मनात येऊन गेला.
खुप विचार करुनही उत्तर सापडेना तसा तिने कबिरचा विचार मनातुन काढुन टाकला..
दीड तास उलटुन गेल्यावर राधा हळुच खोलीचं दार उघडुन बाहेर आली. दुरवर लॉनवर पेटवलेली शेकोटी विझलेली होती, परंतु गरम निखार्यांचतुन धुर अजुनही निघत होता. कबिर खुर्चीतच डोकं मागे रेलुन बसला होता. काही मिनीटं तेथेच थांबुन कबिरला झोप लागली असल्याची तिने खात्री केली आणि मग पॅसेजमधल्या फोनवरुन तिने कॅबला फोन केला.
तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि कसलाही आवाज न करता बॅग घेऊन राधा बंगल्याच्या बाहेर पडली. पुन्हा एक नविन सुरुवात, नविन लोकं, नविन जागा.. कदाचीत ह्याच आयुष्याची आपण आस धरली होती.. कदाचीत हेच ते आयुष्य ज्यासाठी आपण सुखनैव जीवन मागे सोडुन बाहेर पडलो होतो.
राधा कॅबने स्टेशनवर पोहोचली. अर्थात स्टेशनवर तिचं काहीच काम नव्हते, पण तिला खात्री होती की कबिरला ती निघुन गेली हे कळल तर कसंही करुन तो तिचा मार्ग काढायचा प्रयत्न करेल आणि कदाचीत स्टेशनपर्यंत पोहोचेल.. शेवटी काहीही झालं तरी गुन्हेगारी कथांचा लेखंक ना तो…
कबिरचा विचार मनात येताच राधाला आपसुकच हसु आलं. कबिरशी झालेली भेट.. त्याला चुकीचं समजुन त्याच्याच डोळ्यात स्प्रे मारुन तेथुन काढलेला पळ.. दुसर्याे दिवशी सकाळी हॉटेलमध्ये त्याच्याशी झालेली भेट, सगळं तिच्या मनात एका क्षणात फ्लॅश होऊन गेलं…
कॅब निघुन गेली ह्याची खात्री पटताच राधाने स्टेशनवरची दुसरी रिक्षा पकडली आणि बिचकडे मोर्चा वळवला.
इतक्या रात्री बीचवर जायला सांगणारी, आणि ते पण एकटी मुलगी बघुन रिक्षावाल्याने तिला आपादमस्तक न्ह्याहाळलं, पण तिला त्याची पर्वा नव्हती. व्यवहारी जगताशी कदाचीत तिचा हा शेवटचा संबंध होता. सर्व पाश, सर्व गुलामगिरी, सर्व रितीभाती मागे सोडुन ती आपलं आयुष्य हिप्पी जिवनशैलीला समर्पीत करत होती.
रिक्षावाल्याला पैसे चुकते करुन ती बीचवर आली. अंधारात समुद्राच्या लाटांचा आवाज अधीकच घनगंभीर भासत होता. चांदण्याच्या प्रकाशात खडकांवर आदळणार्याय समुद्राच्या फेसाळ लाटा अधीकच चंदेरी दिसत होत्या. समुद्राची रेती रात्रीच्या थंडीत अजुनच गार पडली होती. गार वार्यााचा एक झोत राधाला स्पर्शुन गेला तशी राधाने ओढणी अंगावर पांघरली आणि ती वाळुतुन आपली बॅग ओढत ओढत चालत राहीली.
साधारण किलोमीटर भर चालल्यावर तिला हसण्या-खिदळण्याचे आवाज ऐकु येऊ लागले. लांबवर अजुनही शेकोटी पेटलेली होती. शेकोटीच्या प्रकाशात २-४ आकृत्या नृत्य करत होत्या.
हेच ते स्वातंत्र्य जे राधाला अपेक्षीत होते. रात्रीच्या दोन वाजता सुध्दा सो-कॉल्ड सभ्य वर्तनाला अनुसरुन खोलीत गपचुप झोपुन रहाण्यापेक्षा मनाला वाटेल तसे, वाटेल ते करण्यातला आनंद काही औरच असतो हे राधाला पुन्हा एकदा जाणवले.
राधाने आपल्या चालण्याचा वेग वाढवला आणि ती झपझप पावलं टाकत त्या शेकोटीपाशी जावुन पोहोचली.

राधाला पहाताच त्या ग्रुपमधील एक मुलगी पट्कन उठुन तिच्याजवळ आली, आणि राधाच्या हातातल्या बॅगेकडे बघत म्हणाली…
“फायनली?”
“येस.. फायनली…”, राधा मिस्कील हसत म्हणाली
“बरं झालं तु आलीस, नाही तर आम्हाला मिस केलं असतंस…”
“का?”
“आजची गोव्यातली शेवटची रात्र, दोन-चार तासात आपण निघतोय….”
“वॉव्व.. कुठे??”
“ओम बिच.. गोकर्ण… चल तुझी ओळख करुन देते..” असं म्हणुन ती मुलगी राधाला घेऊन ग्रुपमध्ये गेली.
राधाला आलेली पहाताच सगळ्यांनी त्यांच नाच-गाण थांबवलं..
“गाईज.. धिस इज राधा.. आजपासुन आपल्याबरोबर असेल.. राधा.. धिस इज चार्ली..” थोड्या उंच खडकावर बसलेल्या एका खुरट्या दाढीवाल्या मुलाकडे बोट दाखवत ती मुलगी म्हणाली.. “धिस इज जॉन… रिटा.. रॉकी, शॉन, मेहेक…”
एक एक करत सगळ्यांची ओळख करुन दिल्यावर ती म्हणाली.. “अॅुन्ड अॅ ज यु नो.. आय एम शिना…”
मग ती परत सगळ्यांना म्हणाली, “राधा मला लास्ट विक परेराच्या पार्टीमध्ये भेटली होती.. मस्त आहे एकदम.. मला खुप आवडली.. आपल्या ग्रुपमध्ये पण मस्त मिक्स होईल.. वेलकम राधा…”
सगळ्यांनी टाळ्या, गिटार, बेंजो.. जे हाताला लागेल ते वाजवुन राधाचं स्वागत केलं. राधाने कमरेत वाकुन सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्विकार केला आणि ती कोपर्यारत शिना जेथे बसली होती तिच्या जवळ जाऊन बसली.
थोड्यावेळाने परत नृत्य सुरु झालं..
“सो हु इज डुईंग द डान्स टुनाईट?”, चार्ली मध्येच म्हणाला…
“राधा नविन आहे.. तिलाच करु दे की..”, दुसरा एकजण म्हणाला…
“नको.. ती नविन आहे.. तिला जरा सेटल तरी होऊ देत, रिटा.. यु अप फ़ॉर धिस?”, शिनाने विचारले…
“बाय ऑल मिन्स..”, रिटा खिदळत म्हणाली.. त्याबरोबर इतरांनीही शिट्या वाजवुन तिला प्रोत्साहन दिले…
“हे.. आय एम ओके विथ डान्स..”, राधा हळुच शिनाला म्हणाली..
“नो यु वोन्ट बी.., तुला माहीत नाहीए हा प्रकार अजुन.. जस्ट वेट अॅवन्ड सी…”

रस्त्यावर थोड्या अंतरावर एक ट्रक थांबल्याचा आवाज आला, आणि थोड्यावेळाने एक अगडबंब माणुस झोकांड्या खात त्यांच्या ग्रुपमध्ये दाखल झाला…
“हिया दोस्त.. कैसा है?”, चार्लीने उठुन त्याला अलिंगन दिले…
“कितने लोग?”, तो गिड्या माणुस म्हणाला…
“बस हमेशाके… दस-बारा..”, चार्ली ग्रुपकडे बोट दाखवत म्हणाले…
“पाच हजार लगेगा… चेक-पोस्ट है बिचमै..”
“क्या यार.. अब इतना पैसा होता तो खुदकी गाडी न खरीदते..”, स्वतःच्या दाढीवरुन हात फिरवत चार्ली म्हणाला… “बैठ.. दारु पी.. तुझ्यासाठी आज डान्स आहे..”
“रिअली??”, डान्सचं नाव काढताच त्या गिड्याचे डोळे चमकले..पोटावरुन खाली सरकलेली आपली अर्धी चड्डी सावरत तो लडखडत शेकोटीच्या शेजारी येऊन बसला.. कुणीतरी त्याला गोवा-स्पेशल फेणी आणुन दिली..

राधाला ह्या ‘डान्स’ प्रकाराचे फारच अप्रुप होते, जेंव्हापासुन ती ह्या ग्रुप मध्ये जॉईन झाली होती, तेंव्हापासुन प्रत्येकजणच ह्याबद्दल बोलत होता. काहीतरी भारी प्रकार असला पाहीजे ह्या विचाराने राधा वाट बघत होती. शेवटी थोड्या वेळाने रिटा रंगीत झिरमीळ्या लावलेला शॉर्ट ड्रेस घालुन टेंन्ट मधुन बाहेर आली आणि तिने शेकोटीभोवती फेर धरुन नाचायला सुरुवात केली.
२-३ मिनीटं झाल्यावर तिने अंगातले जॅकेट काढुन त्या गिड्याच्या दिशेने भिरकावले.. तसा ग्रुपमधुन टाळ्यांचा कडकडाट झाला…
“गो फॉर इट रिटा.. यु आर द मॅन…”
“उउह्ह.. कान्ट वेट… डु इट फ़ास्ट…”
शिनाने हसत हसत राधाकडे बघीतलं.. “कळलं?”
“नाही! काय झालं..”, राधा गोंधळुन म्हणाली
“ईट्स अ स्ट्रिप्टीज स्ट्युपीड..”, शिना म्हणाली.. “रिटा विल सुन बी डांन्सींग नेकेड..”
“व्हॉट???”, जोरदार शॉक बसल्यासारखी राधा म्हणाली.. “पण का?”
“कारण आपल्याला फुकट कोण प्रवास करु देणार.. आय टोल्ड यु ना.. आपण गोकर्णला चाललोय.. त्याच्या ट्रकमधुन..”, शिना त्या ट्रकवाल्याकडे बोट दाखवत म्हणाली..
“मग?”
“मग.. त्यासाठी हे…”, शिना रिटाकडे बोट दाखवत म्हणाली.. रिटा एव्हाना अर्धनग्न झाली होती, पण तिला कश्याचीही तमा नव्हती.. ती आपल्याच तालावर नृत्य करण्यात मग्न होती..
“हे बघ राधा.. दॅट्स द वे इट इज.. अॅतन्ड इट्स फन.. इथे कुणाला कश्याची लाज नाही.. वु आर नॉट रिच अॅ्न्ड फेमस.. तो ट्रकवाला खुश.. आपण खुश.. आपलं काम झाल्याशी मतलब..”
“शिना.. माझ्याकडे आहेत पैसे थोडे.. इफ़ यु वॉन्ट..”, राधा आपली पर्स काढत म्हणाली..
“किती आहेत?”
“शेवटचे ७-८ हजार उरले असतील..”
इतके पैसे ऐकल्यावर शिनाचे डोळे विस्फारल्यासारखे झाले.. पण मग ती म्हणाली.. “श्शsss.. राहु देत आत्ता तुझ्याकडेच, आत्तापुरती तर सोय झालीय.. पण हे बघ.. कुणाला बोलु नकोस तुझ्याकडे इतके पैसे आहेत ते.. ओके?” अत्यंत हळु आवाजात ती म्हणाली..
“हम्म.. ओके…”, राधा रिटाकडे बघत म्हणाली जिने एव्हाना अंगावरचा एकमेव कपडा काढुन टाकला होता..

सामानाची सगळी बांधाबांध करुन, ट्रक मध्ये टाकुन निघेपर्यंत पुर्वेकडे फटफटायला लागलं होतं. सगळेजण ट्रकच्या मागच्या बाजुला बसले जेथे आधीच कसल्या-कसल्या सामानाची खोकी भरली होती.
“बॉर्डर-पोस्टच्या आधी मी सांगेन तेंव्हा कोपर्याघत ती ताडपत्री अंगार घेऊन ५-१० मिनीटं लपुन रहा…”, ट्रक चालु करताना तो गिड्या माणुस चार्लीला म्हणाला..
“क्यो बे.. तु तर म्हणला सगळे पोलिस ओळखीचे आहेत तुझ्या?”, चार्ली
“अरे हो.. पण कधी कधी साहेब लोकं पण असतात..”, ट्रकवाल्याने ट्रक गेअरमध्ये टाकला तसा लोकांनी गिटार, बेंजो बाहेर काढले आणि गाणी सुरु केली, तर दुसर्या कोपर्या्त रिटा आणि जॉन भल्या पहाटे स्मुचींग मध्ये मग्न झाले…
ट्रक हायवेवरुन वेगाने धावत होता.. कोवळ्या उन्हाची किरणं अंगाला सुखावत होती. राधा आपले दोन्ही हात फैलावुन वेगाने वहाणारा वारा अंगावर झेलत होती. क्षणाक्षणाला ती स्वतःला अधीकाधीक स्वैर.. हलकं, मुक्त अनुभवत होती.
“सो टेल मी मोअर अबाऊट यु..”, चार्ली राधाजवळ येऊन म्हणाला….
“आय एम नोबडी…”, ट्रकच्या तो मोठा आवाजाच्या वर ओरडुन राधा म्हणाली..
“वा.. लवकर शिकलीस की…”, चार्ली हसत म्हणाला.. “दॅट्स द फ़न ऑफ़ बिईंग हिप्पी.. वुई आर नोबडी..”

तासभराच्या प्रवासानंतर ट्रकचा वेग थोडा हळु झाला. ड्रायव्हरच्या केबीनला लागुन असलेल्या एका सरकते-दार-वजा-खिडकीतुन तो ड्रायव्हर म्हणाला.. “चेक-पोस्ट ५ मिनीटं…” आणि त्याने ती खिडकी परत लावुन टाकली.
सगळ्यांनी आपले सामान एका कोपर्या त गोळा केले आणि अगदी एकमेकांना चिकटुन ट्रकच्या एका कोपर्याोत अंगावरुन ती ताडपत्री ओढुन बसुन राहीले. ग्रुपमधल्या त्या तरुणांचा स्पर्श राधाच्या अंगावर शहारे आणत होता. कित्तेक वर्षांनी परपुरुषांच्या इतक्या जवळ राधा होती. तिने नजरेच्या कोपर्याततुन मागे पाहीले तेंव्हा चार्ली तिच्याकडेच बघत होता.
राधा स्वतःशीच हसत म्हणाली.. “नॉट अगेन…”
काही वेळातच ब्रेक लावत ट्रक थांबला..
“सलाम साब..”, ट्रकवाला…”आज आप कैसे क्या पोस्ट पे..”
“क्या है पिछे…”, पलिकडुन जरबीचा आवाज आला..
“हमेशा का.. हम लोग तो बस वही…”
“ए जारे.. बघ काय आहे मागे…”, तो साहेब दुसर्यापवर खेकसला, तसा एक जण पळत पळत आला आणि ट्रकचं मागचं दार उघडुन ट्रकमध्ये शिरला..
कदाचीत बाकीच्यांना ह्याची सवय असावी, मात्र राधासाठी हे नविन होतं. टेंन्शनमुळे राधाचं हृदय धडधडत होतं.. नकळतपणे तिचे हात-पाय थरथरत होते. चार्लीने त्याचा हात राधाच्या खांद्यावर ठेवला आणि तिला शांत रहायची खुण केली. राधाला पहील्यांदा जाणिव झाली की ती ह्या सर्वांपेक्षा कित्ती वेगळी भासत होती. तिचे कपडे, तिची बॅग.. कुठल्याही रितीने ती हिप्पी वगैरे वाटतच नव्हती. नाहक पोलिसांना संशय आला असता आणि तिची ओळख उघड झाली असती तर मोठ्ठी.. पंचाईत होती..
दोन-तिन मिनीटं उचकाउचकी करुन ट्रकमध्ये चढलेला तो पोलिस निघुन गेला..
कागदपत्र चेक करुन झाल्यावर, ट्रकवाल्याने ट्रक चालु गेला आणि बॉर्डर क्रॉस करुन ते नविन राज्यात शिरले…
“सब ठिक है..”, थोड्या वेळाने पुन्हा ती खिडकी उघडुन ट्रकवाला म्हणाला तसे सगळ्यांनी ती ताडपत्री फेकुन दिली आणि एकच जल्लोष केला. आणि ह्या सगळ्यांत पुढे होती ती राधा.. जणु नविन आयुष्य मिळाल्याचाच तिला आनंद होता.
आनंदाच्या भरात तिने सर्वांना कडकडुन मिठ्या मारल्या. चार्लीला मिठी मारुन ती बाजुला होऊ लागली, पण चार्लीने तिला घट्ट पकडले होते, राधा काही बोलायच्या आधीच त्याने आपले ओठ राधाच्या ओठांवर टेकवले..
[क्रमशः]

User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

Re: इश्क - Marathi love stori

Post by rangila »

12
राधा त्या प्रकाराने क्षणभर गांगरुन गेली.. पण क्षणभरच, तिने लगेच स्वतःला सावरले, चार्लीला बाजुला ढकलण्यासाठी तिने आपले हात त्याच्या मिठीतुन सोडवण्याचा प्रयत्न केला, पण चार्लीची तिच्याभोवती मजबुत पकड होती.
राधाने तो प्रयत्न सोडुन दिला. तिने विचार केला “काय हरकत आहे? काय हरकत आहे जर एखाद्याने तिला किस्स केले?” अनुरागच्या त्या खोट्या, क्षणभराच्या खोट्या किस्सपेक्षा, चार्लीचा राकट किस तिला अधीक भावला. त्याच्या मर्दानी, नॉन-कल्चर्ड, वाईल्ड मिठीमध्ये तिने स्वतःला झोकुन दिले. तिच्या त्या कृतीला योग्य-अयोग्याच्या तराजुत तोलणारे इथे कोणी नव्हते, उंचावणार्याच भुवया नव्हत्या की पाठीमागे होणारी कुजबुज नव्हती. होते फक्त आणि फक्त स्वातंत्र्य.
एका स्पिडब्रेकरवरुन ट्रक खाड्कन गेला आणि राधा व चार्ली काही अंतर एकमेकांपासून दूर झाले. चार्लीने राधाला पुन्हा आपल्या मिठीत ओढले. राधाने आपले हात चार्लीच्या मानेभोवती गुंफले आणि ती हळू आवाजात म्हणाली, “आय लव्ह यु कबिर!!”
“कबिर? कोण कबिर?”, राधाला बाजूला सारत चार्ली म्हणाला तशी राधा भानावर आली. तिने हलकेच स्वतःला चार्लीपासुन अलग केले.
असं, नकळत आपल्या तोंडून कबिरच नाव कसं निघालं ह्याच तिला आश्चर्य वाटलं.
“आपणं कबिरच्या प्रेमात तर नाही ना पडलोय?”, असा विचार तिच्या मनात येउन गेला, पण क्षणभरच. लगेच तिने स्वतःला सावरले. आता तो विचार करून काही उपयोगही नव्हता. कबिर बद्दल काही असेलच तर ते निव्वळ एक आकर्षण होते आणि आज नाहीतर उद्या ते निघून जाईलच असा विचार तिने केला.
७०-८० कि.मी. प्रवास केल्यानंतर हायवेपासुन अलग होऊन ट्रक गोकर्णकडे वळला. गाव जवळ येऊ लागले तसे पर्यटकांचे जथे दिसु लागले. अर्थात परदेशी पर्यटकांचा सहभाग लक्षणीय होता. कुणी चालत, कुणी सायकलींवरुन तर कित्तेकजण बुलेटवरुन मनसोक्त भटकंती करत होते. ओम, हरे-कृष्ण, किंवा तत्सम प्रिंट्सचे आणि रंगेबीरंगी कपडे, डोक्याला बंडाना, गळ्यात कसल्या कसल्या माळा, अंगा-खांद्यावर टॅटु… राधाबरोबरची मंडळी अगदी त्यांतलीच वाटत होती.
मार्केटकडे न वळता ट्रक समुद्रकिनार्यावला लागुन असलेल्या खडबडीत रस्त्याने धावु लागला. बर्या च वेळानंतर समुद्रावरुन येणारा खारा वारा नाकात शिरला तसा सगळ्यांच्या उत्साहाला उधाण आले. ड्रायव्हरच्या केबीनला लागुन असलेल्या छोट्या खिडकीतुन चार्ली ड्रायव्हरला रस्ता सांगत होता. एक उंच टेकडी चढुन ट्रक उंचावर आला, तसा दुरवर, अथांग पसरलेला निळाशार समुद्र दृष्टीस पडला. चार्लीने खुण केली, तसे आपले इतरत्र पसरलेले सामान मंडळी गोळा करु लागली.
छोटा घाट उतरुन ट्रक एका आडवळणाला येऊन थांबला तसे सगळे आपलं सामान घेऊन खाली उतरले. ट्रक आल्या मार्गाने निघुन गेला आणि सगळे आपलं सामान उचलुन चार्लीच्या मागुन चालु लागले. उन्हं वर आल्याने थंडी पळुन गेली होती. समुद्राची उबदार वाळु पायाला सुखावत होती. थोड्यावेळ समुद्रकिनार्या वरुन चालल्यावर चार्ली पुन्हा पायवाट पकडुन चालु लागला. काही अंतर चालल्यावर एक टेकडी आली आणि मग दुसरी आणि मग तिसरी.
राधाला ह्या सगळ्याची खुप मज्जा वाटत होती. कॉलेजच्या दिवसांत केलेल्या ट्रेकींग्जची तिला आठवण झाली. दोन्ही हात पसरुन तिने आनंदाने एक स्वतःभोवती एक गिरकी घेतली आणि ती परत इतरांबरोबर चालु लागली.
साधारण तासभर सर्वजण चालत होते. बरोबर नेहमीच्या सामानाबरोबरच घेतलेले खाण्यापिण्याचे सामान, टेन्ट्स सारखे अवजड साहीत्यही होते. पण कुणाच्याही चेहर्यारवर थकावट नव्हती. होता फक्त आनंद. अखेर एका उंच टेकडीच्या टोकावर पोहोचायच्या काही अंतर आधी चार्लीने सगळ्यांना थांबवले.
“तुम्हा सर्वांचे स्वर्गात स्वागत आहे..”, चार्ली सगळ्यांना म्हणाला.. “आपण इतके अंतर चाललो त्याचे फळ आता आपल्याला मिळणार आहे… तुम्ही आता जे काही बघणार आहात तशी जागा, ती प्रायव्हसी तुम्ही आधी बघीतलीच नसेल. आय बेट, इथे राहील्यावर तुम्हाला इथुन कुठे जावेसेच वाटनार नाही…” असं म्हणुन चार्लीने सगळ्यांना पुढे बोलावले.
उत्सुकतेने सगळे टेकडीच्या टोकावर पोहोचले आणि विस्फारलेल्या नजरेने खाली दिसणारे दृष्य पाहु लागले.
दोन उंच टेकड्या समुद्रात थोड्या आतपर्यंत गेल्या होत्या आणि त्यामुळे खाली एक इंग्रजी अक्षर ‘C’ प्रमाणे बीच तयार झाले होते. जणु त्या दोन टेकड्यांची टोकं म्हणजे ‘C’ अक्षराची दोन टोकं, आणि मधली रिकामी जागा म्हणजे ते प्रायव्हेट बीच. दुरुन कुणालाही तेथे काही असेल असे वाटले नसते. कारण लांबुन कुणालाही ती एक अखंड टेकडीच वाटली असती. परंतु त्या दोन्ही टेकड्या एकमेकांना जोडलेल्या नसल्याने मध्ये एक जणु खाजगी बीचच तयार झाला होता.
ती सुंदर जागा बघून अनेकांनी आनंदाने किंकाळ्या फोडल्या आणि सामान उचलुन टेकडीच्या उतारावरून सगळेजण धावत सुटले. राधा खाली पोहोचेपर्यंत बहुतांश मंडळींनी आपले सामान वाळूत फेकून दिले होते आणि कपडे काढून समुद्राच्या पाण्यात धाव घेतली होती. राधाने सुध्द्दा आपले सामान ठेवले आणि ती इतरांबरोबर सामील झाली.
तासभर सगळेजण पाण्यात मनसोक्त डुंबत होते. एकमेकांवर पाणी उडव, वेगाने येणाऱ्या लाटेवर उड्या मार असे प्रकार चालु होते. सकाळपासूनचा प्रवास आणि त्यानंतरचा काही किलोमीटरचा वॉक ह्यामुळे आलेला थकवा निघून गेला होता, पण आता पोटात भुकेने कावळे ओरडायला लागले होते. हळू हळू सगळेजण पाण्यातून बाहेर पडले आणि स्वतःला वाळून झोकून दिले. काही कर्तव्यदक्ष मंडळींनी टेण्ट्स उभारायला सुरुवात केली, तर काहींनी स्वयंपाकासाठी लागणारी आग पेटवायला लाकडं गोळा करायला धाव घेतली
जोपर्यंत लाकडं जमुन स्वयंपाक सुरु होत होता तोपर्यंत काहींनी बारीक बारीक खेकडे आणि काही मासे पकडून आणले होते, तर काहीनी ताट म्हणून वापरता येतील अशी मोठ्ठी झाडाची पान गोळा करून आणली होती.
राधाने सुध्दा स्वयंपाक करण्यात हातभार लावला. वेगवेगळे पदार्थ तयार करायला, किचेनमध्ये काम करायला राधाला नेहमीच आवडायचे. परंतु अनुरागशी लग्न झाल्यावर ते अचानक आउट-ऑफ-स्टेटस असल्याने बंद झाले. घरात नोकर-चाकर कामाला असताना राधाने किचेन मध्ये असणे अनुरागला आवडायचे नाही, आणि त्यामुळे इच्छा असूनही राधाला काही करता यायचे नाही.
पण इथे, इथे अनुराग नव्हता आणि हे त्याचे घरही नव्हते.
आपण जो निर्णय घेतला तो योग्यच घेतला ह्या निर्णयावर पुन्हा एकदा राधाने शिक्कामोर्तब केले आणि शिनाबरोबर फिश करी करण्यात ती मग्न झाली. तयार झालेले जेवण अगदीच बेचव होते. कश्यात मीठ जास्त, तर कश्यात मसाला, काही कच्च तर काही अजून काही. पण कुणाला त्याची फिकिरच नव्हती. सगळे त्यावर तुटून पडले. राधाला मात्र त्या खाण्याची सवय नसल्याने तिने जमेल तितपत खाण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी ती एका खडकावर बसून केसांमध्ये अडकलेली वाळू काढण्यात मग्न होऊन गेली.
जेवणं उरकल्यावर शिना राधा शेजारी येउन बसली.
“केसांची पूर्ण वाट लागलीय”, केसांचा गुंता सोडवत राधा म्हणाली.
“मस्त केस आहे तुझे राधा”, राधाच्या केसांमधून हात फिरवत शिना म्हणाली, “पण तुला त्याची निगा राखण कठीण होणारे”
“हो ना, आपण मार्केट मध्ये गेलो कि घेईन मी शाम्पू”, राधा
“ओ मैडम, आपण पिकनिकला नाही आलोय आणि किती दिवस तुला तुझे पैसे पुरणारेत?”, शिना
……..
“व्हाय डोन्ट यु कट इट?”, अचानक शिना ने विचारले
“आर यु मैड?”
“हे बघ राधा, इथे रोजच्या आंघोळीचे वांदे, शाम्पू आणि कंडीशनर तर फार लांबची गोष्ट. तुला माहिते आणि मला हि माहिते केसांची निगा राखायला काय काय करायला लागते.”
“अग हो पण…. ”
एव्हाना बाकीचे सगळे पण त्यांच्याभोवती जमले होते.
“कट इट..”
“कट इट..”
“कमॉन राधा…. डू इट …… ”
“यु शुअर चांगले दिसेल?”, राधाने शिनाला विचारले
“ऑफकोर्स’
“आय हेव समथिंग फॉर यु”, रीटाने आपल्या पर्समध्ये हात घालून काहीतरी बाहेर काढले आणि तो हात राधासमोर धरला
“बीड्स!! वॉव !!, मला केंव्हापासून बीड्स घालायचे होते केसांमध्ये”, राधा आनंदाने उडी मारून म्हणाली
“इट्स युअर्स नाऊ”
राधाने एकदा सर्वांकडे बघितले आणि कुणीतरी पुढे केलेली कात्री घेतली आणि आपले लांबसडक केस कापायला सुरुवात केली.

काही दिवसांतच राधा त्या ग्रुपचा एक हिस्सा होऊन गेली. काही नियम नाहीत, काही बंधन नाहीत, ज्याला जसे वाटेल त्याने तसे वागावे. ह्या दिवसांमध्ये राधा स्वतःला नव्याने ओळखत होती.
सर्व काही राधासाठी जणू स्वप्नवत चालले होते, पण ती संध्याकाळ मात्र अपवाद ठरली.
सूर्य मावळतीला झुकला होता. शेकोटी पेटवून सगळेजण गप्पा मारत बसले होते तेंव्हा सकाळपासून गायब असलेला चार्ली हसत हसत त्यांच्यात सामील झाला.
“चार्ली यार किधर था सुभसे?”
“कोई लडकी का चक्कर चला रहा क्या?”
“व्हाय आर यु स्मायलिंग सो मच?”
एक ना दोन, त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार होत होता.
“सांगतो, सांगतो, बसा सगळे”, एका खडकावर बसत चार्ली म्हणाला
सगळेजण बसल्यावर चार्लीने आपल्या जैकेटच्या खिश्यात हात घालून, काही पुड्या बाहेर काढल्या आणि हवेत नाचवत तो ओरडला “गाइज इट्स विड्स…..”
त्याचबरोबर सगळ्यांनी एकच आरोळी ठोकली.
“काय आहे ते?”, राधा
“ड्रग्ज बेबी ड्रग्ज”, चार्ली हसत हसत म्हणाला
“ओह माय गॉड, इज इट लीगल?”, राधा
“चार्ली कुठलीच गोष्ट लिगली करत नाही, आणि कुणाच्या बापाला भीत नाही”, शर्टाची कॉलर ताठ करत चार्ली म्हणाला
“पण, पण ह्याने व्यसन वगैरे लागते ना?”, राधा डोळे मोठे करत प्रश्न विचारात होती
“डोन्ट-वरी, आम्ही खूप वेळा वापरलेय, काही होणार नाही, ट्राय कर… “, चार्ली
“शिना, इज इट ओके ?”, राधाने शिनाला विचारले
“ऑफकोर्स, बिनधास्त घे”
चार्लीने आणि ग्रुप मधल्या काहींनी सगळ्यांसाठी चिलीम बनवल्या, त्यात चार्लीने आणलेल्या पुड्यांमधील पूड भरली आणि प्रत्येकाला दिली. रीटाने राधाला काय आणि कसे करायचे ते समजावून सांगितले आणि थोड्याच वेळात सगळेजण त्या स्वर्ग-सुखात बुडून गेले.
काही वेळातच सगळ्यांवर त्याची झिंग चढु लागली होती. राधाला तर अगदी पिसासारखे हलके झाल्यासारखे वाटत होते. जगातली सगळी दुःख नाहीशी झाली आहेत आणि सर्वत्र फक्त आणि फक्त आनंदच भरला आहे असे तिला वाटत होते. कुठलेसे हिंदी गाणे ती स्वतःशीच गुणगुणत होती. गाणं म्हणता म्हणता मध्येच ती उठुन स्वतःभोवती नाचु लागली.
“यु नो चार्ली.. आय एम गोईंग टू डु द नेक्स्ट डान्स..”, गुंगीतच ती बोलत होती.
“हे चार्ली.. यार अजुन पाहीजे रे हे..”
“गपा रे.. काय फुकट मिळते का विड्स.. किती महाग आहे ठाऊक आहे ना?”
“हाऊ मच मनी यु वॉंन्ट.. राधा हॅव लॉट्स ऑफ़ मनी…”, पेंगुळलेल्या अवस्थेत शिना म्हणाली..
“येस्स.. आय हॅव लॉट्स ऑफ़ मनी.. हाऊ मच यु वॉंन्ट?”, असं म्हणुन राधाने पर्समधुन आपली पैश्याची गड्डी काढली आणि चार्लीकडे फ़ेकली.
त्या ड्रग्जच्या नशेत आपण काय करतोय ह्याचं तिला भानच नव्हतं. पण इतके सारे पैसे बघताच चार्ली भानावर आला.
“शिना… राधा कोण आहे? इतके पैसे कसे आले तिच्याकडे?”
पण शिना अजुनही गुंगीतच होती… “आय डोन्ट नो…”
“शिना.. जागी हो…”, तिच्या दंडाला धरुन गदागदा हलवत चार्ली म्हणाला..
“आऊच.. चार्ली.. यु आर हर्टींग मी..”, शिना
चार्लीने तिला बाजुला ढकलले आणि तो राधाकडे गेला.
“”राधा.. हे बघ.. आपल्याला एव्हढे पैसे पुरणार नाहीत.. थोडे अजुन लागतील.. अं.. तुझे आई-बाबा.. कोण आहेत? देतील ते पैसे?”, गोड आवाजात चार्ली म्हणाला..
“आई-बाबा? हॅ.. उलट मी पळुन आलीय.. त्यांना कळता कामा नये ओके? नाही तर ते मला परत माझ्या नवर्यानकडे पाठवतील.. पण हं.. त्याच्याकडे आहेत खुप पैसे..”, राधा वाळुवर चित्र काढत म्हणाली..
“छानच की मग.. कोण? कोण आहे तुझा नवरा…”, चार्ली..
“अनुराग दिक्षीत..”
“कोण अनुराग दिक्षीत?”, चार्ली..
पण राधा पुन्हा गाणं म्हणण्यात गुंग होऊन गेली.
चार्लीने आपला फोन उचलला आणि एक नंबर फिरवला..
“हॅल्लो.. मित्रा.. एक काम कर ना.. अरे जरा नेट वर अनुराग दीक्षीत कोण आहे बघुन सांगतोस का?”

“अबे तुला काय करायचेय.. मी होल्ड करतोय.. मला सांग लगेच…”

“ओके ओके.. नेक्स्ट टाईम एक विड्स तुला नक्की देऊन.. पण आत्ता सांग…”
काही क्षण शांततेत गेली..
“आर यु शुअर?”
..
“अं.. त्याच्या बायकोची काही माहीती मिळतेय का बघ…”

“… राधा म्हणालास का? ओके.. थॅंक्स ड्युड..”
चार्लीच्या डोक्यातील चक्र वेगाने धावु लागली होती. त्याने शिनाला ओढत कडेला घेतले आणि तिच्या दोन-चार मुस्काडात लगावल्या..
“वेक-अप शिना… वेक-अप…”, पण शिना अजुनही ग्लानीत होती.
चार्लीने तिला फरफटत समुद्र-किनारी न्हेले आणि लाटांमध्ये ढकलुन दिले. थंडगार पाण्याचा स्पर्श होताच.. शिना चरफडुन जागी झाली..
“व्हॉट द हेल चार्ली.. काय करतोयेस..”
“शिना.. तुला माहीते ही राधा कोण आहे?”
“नाही.. आणि माहीती असण्याचं कारणच नाही.. का? काय झालं?”
“शिना, राधा एका करोडपतीची बायको आहे…”
“असेल.. मग?”
“ओह गॉड.. शिना.. थिंक.. ती आत्ता घरातुन पळुन आलीय.. ती कुठे आहे, कुणाबरोबर आहे.. कुणालाच ठाऊक नाही.. शी इज अ सिटींग डक..”
“काय बोलतो आहेस तु चार्ली..”
“आपण जर तिला किडनॅप केले तर?”
“आर यु मॅड?”, शिना अचानक किंचाळत म्हणाली..
“श्श…. ओरडु नकोस..”, चार्लीने मागे वळुन बघीतले.. पण लाटांच्या आवाजात शिनाचा आवाज दबला गेला होता..
“हे बघ शिना.. आपण कित्तीतरी पैसे लाटू शकतो.. थिंक.. इथे इतक्या लांब कुणाला माहीती पण नसेल ती इथे आहे ते.. इट्स इझी जॉब फ़ॉर अस… विचार कर.. इतके सारे पैसे.. आपण हा ग्रुप सोडुन पळुन जाऊ.. लांब कुठेतरी.. नव्याने सुरुवात करु.. व्हॉट्स से…?”
“पण किडनॅप करायचं म्हणजे नक्की काय करायचं?”, शिना
“दॅट्स द बेस्ट पार्ट. राधाला कळनार पण नाही की आपण तिला किडनॅप केलंय. तिला रोजच्यासारखंच राहु द्यायचं आपल्या बरोबर.. फक्त कुठे नजरेआड नाही होऊ द्यायचं. मी अनुरागला फोन करुन सांगणार की त्याची बायको आपल्या ताब्यात आहे, इतके इतके पैसे दे.. आणि बायकोला घेऊन जा.. पैसे दिले.. की राधा त्याच्या ताब्यात.. जोपर्यंत त्याला कळेल की राधाला किडनॅप केल नव्हतंच.. आपण खुप कुठेतरी लांब गेलो असु.. सॉल्लीड प्लॅन आहे की नाही?”
“माय गॉड चार्ली.. यु आर ब्रिलियंट…”, चार्लीला मिठी मारत शिना म्हणाली.
दोघं एकमेकांच्या मिठीमध्ये भविष्याची स्वप्न बघण्यात बुडुन गेले होते इतक्यात त्यांना लांबुन राधाच्या ओरडण्याचा आवाज आला.
लांब, शेकोटीभोवती काहीतरी ओरडाआरडा चालु होता.
दोघे पळत पळत तिकडे गेले.. जवळ गेले तेंव्हा त्यांना दिसलं.. की रॉकीने राधाला खाली पाडले होते आणि पॅंन्टची बटण काढत तो तिच्याकडे जात होता..
“स्टॉप इट रॉकी..” चार्ली रॉकीला थांबवत म्हणाला
पण रॉकीने त्याला बाजुला ढकलले आणि तो राधावर ओणवा झाला..
राधा एव्हाना अर्धवट शुध्दीवर आली होती.
“रॉकी.. डोन्ट डू दॅट.. ऐक माझं…”, चार्ली
“डोन्ट ट्राय टु स्टॉप मी चार्ली..” असं म्हणुन रॉकी ने पॅन्टच्या खिश्यातुन एक लांबसडक सुरा काढुन चार्लीला दाखवला..”यु नो.. आय एम गुड अॅ ट इट.. डोन्ट यु..”
“रॉकी ऐक.. डोन्ट हर्ट हर.. शी मिन्स करोड रुपीज टु अस..”, राधाला काहीही होणं चार्लीला परवडण्यासारखं नव्हतं, आणि रॉकीला थांबवण, विशेषतः त्याच्या जवळ त्याचा लाडका सुरा असताना अशक्य होतं. रॉकीला विश्वासात घेणं महत्वाचं होतं आणि म्हणुनच चार्लीने त्याला सगळं एका दमात सांगुन टाकलं..
अर्धवट शुध्दीत आलेली राधा हे सगळं ऐकत होती. अर्थात तिला निटसं काही कळालं नाही, पण समहाऊ जे काही चालु होते ते योग्य नव्हते आणि त्याचा अनुरागशी काहीतरी संबंध येणार होता हे तिला कळुन चुकलं.
रॉकी आणि चार्ली बोलत असताना तिने हळुच इकडे तिकडे नजर टाकली. तिच्या हातापासुन काही अंतरावरच एक दगड पडलेला तिला दिसला. सावकाश-सावकाश पुढे सरकत तिने तो दगड घेतला आणि घट्ट पकडुन ती संधीची वाट बघु लागली.
“ऑलराईट चार्ली.. यु बेटर गेट दॅट मनी फास्ट.. मी फ़ार दिवस राधापासुन लांब राहु शकणार नाही..”, असं म्हणुन रॉकी राधाला निदान किस्स करावं म्हणुन खाली वाकला आणि राधाने संधी साधली. हातात पकडलेला दगड तिने थाड्कन रॉकीच्या तोंडावर मारला.
रॉकीच्या नाकातुन रक्ताची एक चिळकांडी उडाली आणि राधाचा चेहरा रक्ताने माखला गेला..
तळमळत रॉकी मागे सरकला. त्याच्या कानातुनही रक्त वाहात होते.
“यु बिच!”, असं म्हणुन त्याने त्याचा सुरा उचलला आणि तो पुन्हा राधाकडे धावला. परंतु राधा आधीच उठुन बसली होती आणि रॉकीला सुरा घेउन येताना बघताच तिने मागे धुम ठोकली.
काय होतेय हे लक्षात येताच चार्लीसुध्दा राधाला पकडायला धावला.
राधा जिवाच्या आकांताने धावत होती. अंधार पडायला लागल्यामुळे आधीच निट दिसत नव्हते, त्यात अनोलखा प्रदेश. परंतु कश्याचीही पर्वा न करता राधा धावत होती आणि तिच्यामागोमाग चार्ली आणि रॉकी…

येतानाचा मार्ग आठवुन राधा धावत होती. एक टेकडी, मग दुसरी, मग पायवाट.. जे आठवेल तसे ती पळत होती. त्या ड्र्ग्जची नश्या अजुनही तिच्या अंगात भिनलेली होती. पण म्हणतात ना, मारणार्याेपेक्षा मरणारा अधीक वेगाने धावतो, तसंच राधाचं झालं होतं.
तास-दोन तास कधी लपुन दम खात, तर कधी धावत राधा एकदाची गोकर्णच्या रस्त्याला येऊन लागली. पायात चपला नसल्याने असंख्य काटे-कुटे पायात घुसुन, पाय रक्तबंबाळ झाला होता. झाडा-फांद्यांमध्ये अडकुन अंगातले कपडे ठिकठिकाणी फाटले होते. तिच्या अंगातली सगळी ताकद संपली होती.
राधाने रस्त्याच्या मधोमद बसकण मारली. चार्ली आणि रॉकी सुध्दा काही वेळातच तेथे येऊन पोहोचले. असाहाय्य स्थितीतील राधाला बघुन त्यांच्या जिवात जीव आला. आणि ते एकमेकांना टाळ्या देत राधाच्या जवळ येऊन पोहोचले. पण राधाला पकडणे त्यांच्या नशीबात नव्हते कारण त्याच वेळी तेथुन एक पेट्रोलिंगची पोलिस-जीप जात होती.
तिघं-जण आयतेच पोलिसांच्या ताब्यात सापडले होते. ड्रग्जच्या नशेत झुलणारी राधा, त्यात कपडे फाटलेले, चेहर्‍यावर वाळलेल्या रक्ताचे डाग, रॉकीच्या हातातला सुरा पाहुन त्यांना फारसा विचार करावा लागला नाही. हिप्पी लोकं आणि त्यांचे राडे त्या पोलिसांना नविन नव्हते. तिघांनाही त्यांनी जिपमध्ये बसवले आणि ते पोलिस-स्टेशनला घेऊन आले.

“चला, बोला पटा-पटा, काय झालं…”
“दॅट बिच, शी ट्राईड टु किल मी व्हाईल ड्रंक..”, रॉकी आधी राधाकडे आणि मग स्वतःच्या फुटलेल्या चेहर्या कडे बोट दाखवत म्हणाला..
“नो सर, आय वॉज जस्ट ट्राईंग टु सेव्ह मायसेल्फ़, ही वॉज ट्राईंग टु रेप मी..”, राधा त्याचं वाक्य अर्धवट तोडत म्हणाली..
“शट-अप.. एकेकाने बोला…”
“सर.. मी खरंच सांगतेय.. आय वॉज नॉट ट्राईंग टु किल हीम.. वॉज जस्ट ट्राईंग टु सेव्ह मायसेल्फ़.. आणि तो दुसरा.. चार्ली.. तो मला किडनॅप करणार होता..”
“करणार ‘होता’? म्हणजे, असं ठरतं वगैरे का? चला आता आपण किडनॅप किडनॅप खेळू..”
“एनिवेज.. इन्स्पेक्टर… सगळ्यांचे ब्लड सॅंम्पल्स घ्या आणि टेस्टला पाठवा.. बघा ड्रींक्स आहेत का ड्रग्ज्स..”
“ईट्स ड्रग्ज्स सर.. मी पहील्यांदाच ट्राय केले.. आय एम नॉट अ जंकी सर..”, स्वतःच्या गळ्याची शप्पथ वगैरे घेत रडकुंडीला आलेली राधा म्हणाली.
“इन्स्पेक्टर.. कस्टडीत घ्या तिघांनाही.. आणि ह्यांची बाकीची पलटण पण कुठेतरी असणार.. बघा कुठल्या बिळात लपलेत आणि घेऊन या सगळ्यांना…”
“सर प्लिज.. आय डोन्ट वॉंन्ट टु गो इन कस्टडी..”, हात जोडत राधा म्हणाली… “मी एक फोन करु शकते का?”
“फोन? कुणाला कमीशनरना करायचाय की काय?”, हसत हसत सिनीयर इ. म्हणाले.
“काय सांगता येत नाही सर.. ओळखत असेल कमिशनरला..”, डोळे मिचकावत दुसरा इन्स्पेक्टर म्हणाला
“नो सर.. मी माझ्या नवर्याकला फोन करतेय.. पण तो ओळखतो कमीशनरना..”
“अरे व्वा.. तुमचा नवरा पण असतो की काय? हं? काय नाव काय नवर्यािचं..?”
“मिडीया टायकुन अनुराग दिक्षीत…”, असं म्हणुन राधाने टेबलावरचा फोन पुढे ओढला आणि नंबर फिरवायला सुरुवात केली.
दोन्ही इन्स्पेक्टरची ‘अनुराग दिक्षीतचे’ नाव ऐकताच नजरानजर झाली. राधा फोनवर काय बोलते आहे ते काही क्षण कान देऊन ऐकु लागले आणि मग राधा खरं बोलते आहे असं लक्षात येताच ते एका कोपर्याआत गेले.
“इन्स्पेक्टर.. टीव्ही.वर यायचंय का?”, सिनीयर इन्स्पेक्टर दुसर्यातला म्हणाला..
“हो सर.. पण कसं..?”
“कसं म्हणजे..? मिडीयाला जर बातमी मिळाली की ‘अनुराग दिक्षितची’ बायको ड्रग्ज्स च्या अंमलाखाली ‘अॅंटेंप्टेड टु मर्डर’ च्या केसमध्ये आपल्या ताब्यात आहे तर…”
“पण सर, मला वाटतं ती खरं सांगतेय.. तिने स्वतःला वाचवण्यासाठीच..”
“च..च.. अहो ते कोर्टाला ठरवुद्या.. आपण जरा हवा देऊ की.. ड्रग्ज्स आणि ‘अॅ्टेंप्टेड टु मर्डर’ दोन्ही चार्जेस द्या टाकुन तिच्यावर, म्हणजे जरा जास्त बाईट्स देता येतील.. त्या अनुरागचे बिझीनेस-रायव्हल्स असतीलच की.. त्यांना पण मिळेल काहीतरी चघळायला, आणि आपल्याला प्रसिध्दी.. काय?”
“ओके सर.. मी लगेच चॅनल-९ ला फोन करतो…”
“पण एक मिनीट, बातमी आपण दिली हे उघड करु नका म्हणावं.. नाही तर नस्तं अंगाशी येऊल आपल्या…”
“ओके सर..”
“आणि जरा त्या फाईली आवरा टेबलावरच्या, कसं दिसेल ते टीव्हीवर.. हं?” असं म्हणुन एकमेकांना टाळ्या देत हसत हसते दोघंजण एकमेकांच्या कामाला निघुन गेले.

दुसर्याे दिवशी, पोलिस-स्टेशनचा परिसर न्युज-रिपोर्टर्स, कॅमेरामॅन.. ओबि-व्हॅन्सने भरुन गेला होता.. आणि नॅशनल टी.व्ही.वर ब्रेकींग-न्युज झळकत होती..
“गोकर्ण पोलिस-स्टेशनमै राधा दिक्षीत नशे-के-हालत मे धुत…विथ अॅमटेंप्टेड मर्डर अंडर हर नेम…..”
[क्रमशः]

User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

Re: इश्क - Marathi love stori

Post by rangila »


13
राधाचा फोन येऊन गेल्यावर अनुरागने चक्र वेगाने फिरवली. राधाच्या जामीनीची पुर्तता त्याने काही फोन-कॉल्सवरच करुन टाकली आणि तो स्वतःचे हेलिकॉप्टर घेउनच गोकर्णला गेला. गोकर्णचे एक बिझीनेसमन त्याच्या ओळखीचे होते,त्यांच्या फार्म-हाउसवरच्या हेलीपॅडवर उतरुन त्यांच्याच कारने तो पोलिस-स्टेशनला पोहोचला. पोलिस-स्टेशनवर जणु जगातले सगळे पत्रकार, सगळे टीव्ही चॅनल्स आपापल्या ओबी-व्हॅन्ससहीत जमले होते. अनुरागने आधीच फोनवरुन तंबी देऊन ठेवली होती, त्यामुळे त्याची कार पोलिस-स्टेशनवर पोहोचताच पोलिसांनी त्याला गराडा घातला आणि त्याला सुरक्षीत आत घेऊन गेले.
अनुरागकडुन बाईट्स मिळवण्यासाठी सगळ्यांची चढाओढ चालली होती, पण पोलिसांपुढे कुणाचाच निभाव लागत नव्हता..
“आता कळेल साल्याला मिडीया मागे लागली की काय होते ते…”
पोलिस-स्टेशनच्या पायर्याा चढताना कुणाचेतरी वाक्य अनुरागला ऐकु आले, त्याने चिडुन मागे वळुन बघीतले, पण त्या प्रचंड गर्दीत तो आवाज कुणाचा होता शोधणं अवघड होते.
कमीशनरचा फोन येऊन गेल्यामुळे जामीनाची सगळी कागदपत्र टेबलावर तयारच होती. काही कागदपत्रांवर सह्या ठोकुन, राधाला घेउन अनुराग गाडीतुन हेलिकॉप्टरपाशी आला आणि लगेचच परतीला निघाला.
घरी पोहोचेपर्यंतचा तो दीड-तास राधासाठी अत्यंत विचीत्र होता. हेलिकॉप्टरमध्ये अनुराग तिच्याशी एका शब्दाने बोलला नाही. बंगल्यावर परतल्यावर अनुरागने त्याच्या पर्सनल सेक्रेटरीला फोन लावला.
“रौनक.. सॉरी लेट कॉल करतोय.. माझं बिझीनेस-क्लासचं ‘एअर-फ़्रान्सचं’ बुकींग कर, रात्रीच्या फ्लाईटचं, एक बिझीनेस कॉन्फरंन्स आहे तिकडे, ती करेन अॅिटेंन्ड..”
….
“हो.. मी जाणार नव्हतो.. पण तु बघीतलं असशीलच टी.व्ही.वर.. हम्म..इथे थांबलो तर उगाच मिडीयाच्या प्रश्नांना सामोरं जावं लागेल.. ७ दिवसांनी रिटर्नचं करं ओके? कन्फर्म झालं की फोन करं.. थॅक्स..”
अनुराग फोनवर बोलत असताना राधाच्या मनात विचारांच कल्लोळ माजला होता. ‘सॉरी’ म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. जे काही घडलं ते तिच्या आयुष्याचा भाग होता.. तिचे निर्णय होते.. पण निदान ’थॅंक्स’ म्हणण आवश्यक होतं. तिच्या एका फोन-कॉलवर अनुराग लगेच आला नसता तर ती आत्ता तुरुंगात असती.
अनुरागचा फोन संपला तशी ती अनुरागच्या समोर गेली.
“अनुराग….”
अनुरागने पहील्यांदा तिला निट बघीतलं. विचीत्र शोल्डर-कट, मध्येच हायलाईट्स, तर मध्येच बिड्स.. फाटलेले कपडे, मळकटलेला चेहरा, नोजरिंग, थिक-आयलाईनरने काळवंडवलेल्या डोळ्यांच्या कडा, हातापायावर, चेहर्याेवर ओरखडण्याच्या खुणा…
कधीकाळी त्याला आवडलेली राधा ही नक्कीच नव्हती.
इतका-वेळ दाबुन धरलेला राग त्याला असह्य झाला आणि त्याने कसलाही विचार न करता उलट्या तळहाताने राधाच्या कानफाडात लगावली आणि तो ताडताड पावलं टाकत तेथुन निघुन गेला.
राधाला त्याच्या ह्या कृतीचे काहीच दुःख, किंवा आश्चर्य वाटले नाही. काही क्षण ती तेथेच एकटी उभी राहीली आणि मग चेहर्याावर आलेले केस बाजुला सारुन ती आपल्या बेडरुममध्ये आली. बराच दिवस खोली बंद असल्याने खोलीचे दार उघडताच एक कुबट वास तिच्या नाकात शिरला.
खोलीत आल्यावर तिने दार लावुन घेतले आणि बेडच्या कोपर्यानशी ती बसुन राहीली.. किती वेळ झाला असेल कुणास-ठाऊक. जणु एखाद्या ब्लॅक-होल मध्ये असल्यासारखे तिला वाटत होते. डोक्यात कसलेच विचार नाहीत, मनामध्ये कसल्याही भावना नाहीत, आजुबाजुच्या परिस्थीतीचे भान नाही. कदाचीत कित्तेक तास उलटुन गेले असतील. पायाला मुंग्या आणि पाठीला रग लागल्यावर शेवटी ती उठुन उभी राहीली आणि तिने खोलीतला दिवा लावला. समोरच्याच ६ फुटी मोठ्या आरश्यात तिने इतक्या दिवसांनंतर प्रथमच स्वतःला पाहीले. काही क्षण तिने स्वतःला ओळखलेच नाही. शेजारच्याच भिंतीवर तिचं एक तैलरंगातलं मोठ्ठ पोश्टर लटकलं होतं. त्यातली राधा आणि आरश्यातली राधा मध्ये जमीन-आस्मानाचा फरक होता.
का कुणास ठाऊक पण तिला पहिल्यांदाच स्वतःची शिसारी आली. उद्वीग्न अवस्थेत तिने केसांमध्ये अडकवलेले ते रंगीत मणी काढुन जमीनीवर फेकुन दिले. नाकातली ती नोजरिंग काढुन भिरकावुन दिली. डोळ्यांचे ते आयलायनर मनगटाने पुसुन टाकण्याचा प्रयत्न केला पण त्यात ते अर्धवट पसरले आणि राधाचं रुप अधीकच भयावय दिसु लागलं.
तिने कपाट उघडलं, घरातले कपडे, टॉवेल घेतला आणि ती बाथरुममध्ये गेली.
अंगावर गरम पाण्याचा शॉवर घेतल्यावर तिला थोडं बरं वाटलं. अनेक उंची शॅम्पु, महागडे साबण वापरुन तिने दहादा अंग घासुन घासुन धुतले. अर्धा-एक तास आंघोळ केल्यावर तिला थोडं हलकं वाटलं. बाहेर येऊन तिने आपला नेहमीच्या वापरातला पिंक-किटीचा पायजमा आणि रंगेबिरंगी हार्टसची चित्र असलेला पांढरा टी-शर्ट अंगात चढवला आणि ए/सी चालु करुन ती आपल्या बेडमध्ये शिरली. नकळत कधीतरी तिच्या डोळ्यांतुन वाहणा‌र्याए उष्ण अश्रुंच्या धारांनी उशी भिजुन गेली, आणि त्या अश्रुंच्या सोबतीनेच राधा झोपुन गेली.

अनुराग गोकर्णच्या पोलिस-स्टेशनवर पोहोचल्याचं आणि नंतर राधाला घेऊन गाडीतुन गेल्याचं लाईव्ह-फुटेज त्या ब्रेकिंग न्युजमध्ये चालु होते. शॉक-बसल्यासारखा कबिर अजुनही त्या टीव्हीपुढे बातम्या वाचण्यात मग्न होता. कबिरचा मॅनेजर.. रोहनही एव्हाना तेथे येऊन पोहोचला होता.
“तुला राधाचा फोटो बघायचा होता ना.. आता लाईव्हच बघ तिला…”, अनुराग राधाच्या दंडाला धरुन ओढत जात होता तेंव्हा हताश होत कबिर रोहनला म्हणाला..
“मी त्या दिवशीच तिला थांबवायला पाहीजे होते.. माझीच चुक आहे सगळी, त्या दिवशी मी तिला थांबवले असते, तर कदाचीत ही वेळ आज तिच्यावर आली नसती..”
“लुक कबिर.. तु उगाच स्वतःला दोष देऊ नकोस..”, रोहन कबिरला समजावत होता. आणि दोघांच्या बोलण्याचा काहीच कॉन्टेक्स्ट माहीत नसल्याने मोनिका दोघांकडे स्तंभीत होऊन आळीपाळीने बघत होती.
बर्यायच वेळानंतर बातम्या बदलल्या आणि तिघंजणं पुन्हा आपल्या टेबलावर परतले.
“कोण आहे ही राधा? आणि कबिर तु कसं ओळखतोस तिला?”, शेवटी न रहावुन मोनिकाने विचारले.
“मोनिका प्लिज.. आय रिअली डोन्ट वॉन्ट टु टॉक अबाऊट इट..”, थोडंस इरिटेट होत कबिर म्हणाला
कबिरचे ते इरिटेटेड एस्क्प्रेशन्स मोनिकाला नविन नव्हते. इतक्या प्रयत्नांनंतर ती कबिरच्या थोडी जवळ गेली होती. तिला ते परत बॅक-टु-झिरो करायचे नव्हते.
“ऑलराईट…व्हेनएव्हर यु फिल लाईक… मी निघते मग.. मला थोड्या फोटोच्या प्रिंट्स कलेक्ट करायच्या आहेत.. कॉल मी..”, असं म्हणुन मोनिका तेथुन निघुन गेली.

“मला अजुनही विश्वास बसत नाहीए ती ‘राधाच’ होती..”, बर्यायच वेळानंतर कबिर म्हणाला
“सोड ना.. हे बघ.. मला वाटतं दॅट्स व्हॉट राधा ऑलवेज वॉन्टेड.. आय मीन.. नॉट द पोलिस स्टेशन.. पण बिईंग-हिप्पी वगैरे.. कदाचीत तिला त्यातले चांगले वाईट आता समजले असेल..”, रोहन म्हणाला.
“रोहन मला भेटायचंय तिला.. आत्ता…”, अचानक टेबलावरुन उठत कबिर म्हणाला
“हे बघ कबिर.. मला वाटतं ही वेळ योग्य नाही. तिची काय मानसीक परिस्थीती असेल, तिच्या घरी काय वातावरण असेल आपल्याला माहीत नाही. तु असा अचानक तिच्या समोर गेलास तर.. त्यापेक्षा लेट्स वेट.. ती पण ह्याच शहरात आहे.. आणि तु पण.. आज नाही तर नंतर भेटशीलच…
“हो रे.. पण तो पर्यंत ती परत पळुन गेली तर…??”, कसनुसे हसत कबिर म्हणाला..
रोहनला मात्र त्याच्या त्या बालीश प्रश्नामुळे हसु आवरणे खरंच कठीण होतं होते.
“सो हाऊ वॉज द डेट विथ मोनिका?”, विषय बदलत रोहन म्हणाला
“ए प्लिज.. डेट वगैरे काही नव्हती ही.. आम्ही आपलं कॅज्युअली भेटलो..”, कबिर
“तु असशील कॅज्युअली, ती नव्हती. तु बघीतलं नाहीस किती मस्त आवरुन, तयार होऊन आली होती ती?”, रोहन
“बुल्शीट, मोनिका नेहमीच अशी झकपक असते…”, कबिर म्हणाला..
….
“रिअल्ली?” काही वेळ विचार केल्यावर तोच पुन्हा म्हणाला
“आय थिंक देअर इज समथींग कुकींग कबिर.. मी सुध्दा चांगलं ओळखतो मोनिकाला… मला अजुनही वाटतं, मोनिका इज युअर फ्युचर… मान्य आहे राधा तुला आवडते अॅलन्ड ऑल.. बट आय गेस इट्स टु लेट.. ती परत घरी आलीय तिच्या..” टीव्हीकडे बोट दाखवत रोहन म्हणाला…
टीव्हीवर अनुराग-राधा एअर-पोर्टवरुन घरी परतत असतानाचे फुटेज चालु होते. कबिर पुन्हा टीव्हीला चिकटला आहे हे पहाताच रोहन उठुन उभा रहात म्हणाला..
“बरं चल, तुझं हे गर्ली कॉफी-कुकिज वगैरे खाऊन झालं असेल तर जरा मॅनली ड्रींक्स घेऊया? ते नविन बार्बेक्यु-नेशन सुरु झालेय तेथे कॉम्लीमेंट्री टकीला शॉट्स आहेत.. व्हॉट्स से?”
“नो यार.. बार्बेक्यु इतकी भुक नाहीये…”, कबिर
“ऑलराईट्स, जस्ट ड्रिंक्स देन? कॅफे-इस्टवुडस?”, रोहन झोमॅटोवर जवळपासची लोकेशन्स बघत म्हणाला..
“साउंड्स गुड… पण मी थोडा चेंज करुन येतो पट्कन.. गाडी आहे ना तुझी?”, कबिर..
“यप्प.. ये पट्कन, मी थांबतो”, रोहन
काऊंटवर बिलाचे पैसे देऊन कबिर शेजारच्या बिल्डींगमधील त्याच्या घरी कपडे बदलायला गेला.

कबिर गेल्यावर इतका वेळ व्हायब्रेट-मोड्वर वाजणारा फोन शेवटी रोहनने उचलला.
मोनिका इतका वेळ आपल्याला फोन का करत आहे हे त्याला कळत नव्हते, पण तो फोन नक्कीच कबिर संबंधी आहे हे त्याला ठाऊक होते आणि समहाऊ कबिरसमोर तो फोन घेणे त्याला शक्य नव्हते म्हणुन तो फोन उचलत नव्हता. पण कबिर नजरेआड होताच रोहनने फोन उचलला.
“हम्म मोनिका.. बोल..”
“कबिर नाहीए ना तेथे…?”, अधीरतेने मोनिकाने विचारले
“नाहिए..”
“हे बघ रोहन.. तु आम्हा दोघांचा जवळचा मित्र आहेस.. म्हणुन विश्वासाने मी तुला काही सांगु आणि तुझ्याकडुन काही मागु शकते?”, मोनिका
“ऑफकोर्स.. गो अहेड..”
“रोहन.. ती राधा कोण आहे… तिला बघुन कबिर असा हायपर का झाला ह्याच्याशी खरं तर मला काही घेणं देणं नाही. मी आणि तो मध्ये काही काळासाठी एकत्र नसताना ती किंवा दुसरं कोणी त्याच्या आयुष्यात होतं का ह्याबद्दलही मला काही माहीती नकोय. पण एक गोष्ट नक्की आहे की.. आय वॉन्ट टु विन बॅक कबिर…”
….
“माझ्याकडुन काही चुका झाल्या मला मान्य आहे, आणि मला त्या सुधारायच्या आहेत.. विल यु हेल्प मी?”, मोनिका
“आय डोन्ट वॉन्ट टु कमीट एनीथींग मोनिका..,कबिरच्या मनात काय आहे, हे मलासुध्दा ठाऊक नाही. तो सध्या तरी एका वेगळ्याच मनस्थीतीत आहे.. सो मला त्याला प्रेशराईज नाही करायचंय, पण एक नक्की, शक्य ती सगळी मदत मी तुम्हा दोघांनाही करीन…”, रोहन
“थॅंक्स रोहन.. आय कुडंट आस्क यु मोर दॅन धिस.. बाय…” असं म्हणुन मोनिकाने फोन ठेवुन दिला.
तेव्हढ्यात समोरुन कबिर रस्ता क्रॉस करुन येताना त्याला दिसला..
“देवदास रे.. खरंच देवदास.. दोन-दोन मुली हाताशी असुनही हा मात्र एकटाच..”, स्वतःशीच हसत रोहन म्हणाला..

त्या घटनेला एक आठवडा उलटुन गेला होता, पण एक दिवसही राधा कबिरच्या मनातुन गेली नव्हती. आणि दोघंही एकाच शहरात म्हणल्यावर कबिर कधीही, कुठेही जाताना सतत राधा कुठे दिसते का हेच पहात होता. परंतु राधा त्याला ह्या दिवसांत तरी कधीच दिसली नाही. राधाने ते ७-८ दिवस स्वतःला घरातच, किंबहुना खोलीतच कोंडुन घेतले होते. अनुराग फ्रांन्सला निघुन गेल्यावर त्या मोठ्या व्हिलामध्ये ती एकटीच पडली होती. गरजेपुरतीच ती खोलीतुन बाहेर पडे. घरातल्या नोकर-चाकरांसमोरही जायची तिला इच्छा होत नव्हती. अनुराग आणि त्याच्या फॅमीलीबरोबर कित्तेक वर्ष काम केल्याने, त्याच्याशी लॉयल असलेले ते राधाचा द्वेष करु लागले होते.
“रोहन…”
“कबिर..राधाविषयी बोलणार नसलास तरंच बोल..”, संगणकावर काम करता करता रोहन म्हणाला, तसं तोंड बारीक करुन कबिर पुन्हा आपल्या केबिनकडे निघाला..
“ओके.. सॉरी.. बोलं..”, कबिरला थांबवत रोहन म्हणाला..
“रोहन.. मला भेटायचंच आहे राधाला.. एकदाच.. मग भले तिने मला ओळख नाही दाखवली तरी चालेल, किंवा मला तुला भेटायचं नाही किंवा अजुन काहीही म्हणाली तरी चालेल.. पण एकदाच…”
“अरे हो.. हो.. इतका हायपर का होतो आहेस… करु काही तरी आपण ओके…?”
इतक्यात कबिरचा फोन वाजला.. कबिरने वैतागुन स्क्रिनवरचा नंबर बघीतला आणि फोन बंद करुन टाकला…
“काय रे? घेतला का नाहीस फोन?”, रोहन
“ह्या मोनिकाने एक वैताग आणलाय.. दिवसांतुन ४-५दा फोन करते..”, कबिर
“का?”
“काही नाही.. असंच..”
“हे बघ कबिर…”, रोहन खुर्चीतुन उठत म्हणाला..
“आता तु मोनिकाची बाजु घेऊन मला समजावण्याचा प्रयत्न करणार असशील तर बोलु नकोस..”, हसत हसत कबिर म्हणाला..

“बरं.. सॉरी.. हे बघ.. तु म्हणतोस ना.. तसंच कदाचीत मोनिकाच माझं फ्युचर असेल.. पण जोपर्यंत मी राधाला भेटत नाही, तिच्याशी बोलत नाही तो पर्यंत मी मोनिकाबद्दल विचारच करु शकत नाही.. आय वॉंन्ट टु सी दॅट डोअर क्लोज्ड रोहन.. मला राधाने सरळ सरळ सांगावं.. मगच मी राधाला विसरायचा प्रयत्न करेन. माझी आणि राधाची शेवटची भेट..ती काहीही बोलत नसतानाही तिची खुप काही बोलणारी नजर मी विसरु शकत नाही रोहन.. आय नो जशी मला ती आवडते तसाच मी सुध्दा तिला आवडतो…”
“असेल ना.. पण त्यावेळची परिस्थीती वेगळी होती कबिर.. तेंव्हा राधा एकटी होती, स्वतंत्र होती…”
“अॅेग्रीड.. म्हणुनच तिला एकदा का होईना मला भेटणं महत्वाचं आहे.. पण कसं हेच कळत नाहीए…”
“ओके हे बघ.. तुला राधा म्हणाली होती ना की तुझं पुस्तक पब्लिश झालं की ती नक्की वाचेल?”, थोडावेळ विचार करुन रोहन म्हणाला.
“हो.. म्हणाली होती…”, कबिर..
“बरं, मग एक काम कर.. तुझ्या पुस्तकाच्या शेवटी एक नोट टाक.. लिही की हा पुस्तकाचा शेवट नाही, पण पुस्तकाचा शेवट जाणण्यासाठी कथेचा नायक अजुनही ‘मिरा’ची वाट बघतोय.. तुझा फोन नंबर तर असतोच पुस्तकावर… म्हणजे बघ.. आशय असा लिही, बाकी शब्द काय वापरायचे तुच जास्त जाणतोस.. पण राधाने हे पुस्तक वाचलं तर तिला नक्कीच कळेल की हे पुस्तक तुम्हा दोघांच्या गोष्टीचं आहे.. नशिबात असेल तर ती नक्की फोन करेल..”
“वॉव्व.. दॅट्स ग्रेट आयडीया रोहन.. जर राधाने फोन केला ना मला.. तर तुला काय वाट्टेल ते देईन मी…”
“बाकी आपण पुस्तकाची पब्लिसीटी दणकुन करु.. तुझं पुस्तक लॉंच झालंय हे राधापर्यंत पोहोचलं पाहीजेच.. आणि आपण ते पोहोचवुच..”, रोहन कबिरच्या दंडावर थोपटत म्हणाला..

कबिरचं पुस्तक रोहन म्हणाला तसं खरंच दणक्यात लॉंच झालं. क्रॉसवर्डमध्येही ह्यावेळेस चांगली गर्दी झाली होती. रिडींगच्या वेळेस कबिरची नजर सतत राधाचाच शोध घेत होती..
“कुठे आहेस तु राधा?…प्लिज एकदा.. फक्त एकदा भेट…”, कबिरचे मन आक्रंदत होते..
पब्लिसीटीमध्ये कोणतीही कसर ठेवण्यात आली नव्हती. होर्डींग्ज, लिडींग न्युजपेपर्समध्ये जाहीरात, इव्हन रोहनने कबिरची एक छोटी मुलाखत पण लोकल रेडीओ-एफ-एम वर आयोजीत केली. रेडीओवर पुस्तकाबद्दल बोलताना कबिर प्रचंड नर्व्हस झाला होता. कदाचीत.. कदाचीत त्याचं बोलणं कुठेतरी राधा ऐकत असेल…..
“द हिरो ऑफ द स्टोरी इज स्टील वेटींग फ़ॉर मिरा.. होपींग टु गेट ए कॉल फ़्रॉम हर वन डे…”, शो संपताना सुचक शब्दात कबिर म्हणाला होता.
जे काही शक्य होतं ते दोघांनी मिळुन केलं होतं. आता सर्वकाही नशीबाच्या हातात होतं.

पुस्तक लॉंच झाल्यापासुन साधारण दोन आठवड्यांनी रोहन आनंदाने काही पेपर्स घेऊन कबिरच्या केबिनमध्ये आला..
“कबिर गुड न्युज.. आपली फर्स्ट एडीशन विकली गेली आहेस कुठे?? यु रॉक मॅन.. दुसरी एडीशन ऑन इट्स वे….”
पण कबिरच्या चेहर्याावर फारशी उत्सुकता नव्हती…
“तु का असा तेराव्याला आल्यासारखा तोंड करुन बसला आहेस…”, कबिरचा मख्ख चेहरा बघुन रोहन म्हणाला
“मग काय करु.. दोन आठवडे होऊन गेले….”
“तरीही राधाचा फोन नाही.. असंच ना? अरे पुस्तक वाचुन पुर्ण व्हायला तरी वेळ देशील की नाही तिला. असं काय लहान मुलासारखं करतोएस. तुला काय वाटतं, पहिल्याच दिवशी जाऊन तिने तुझं पुस्तक विकत घेतलं असेल आणि एका दिवसांत संपवुन लगेच तुला फोन करायला हवा का?”
“पण मग बाकिच्या लोकांचे कसे फोन येतात मला.. आतापर्यंत शेकडो ‘मिरा’ मला फोन करुन गेल्या.. ऑल फ़ेक.. म्हणे मी मिरा बोलतेय.. तुझ्या पुस्तकातली तुझी मिरा.. ओळखलंस का? एका प्रश्नाचं उत्तर कुणाला देता आलं नाही पण.. काय टाईम-पास वाटतो का लोकांना हा..”
“हा हा हा हा.. हे मात्र फार भारी हं.. लेका सेलेब्रेटी झालास तु…” असं म्हणुन रोहन निघुन गेला.
दिवसांमागुन दिवस जात होते. प्रत्येक दिवसांगणिक कबिरची निराशा आणि फ्रस्ट्रेशन वाढत चालले होते आणि एका दिवशी दुपारी त्याचा फोन किणकीणला…
तो आधीच प्रचंड वैतागलेल्या मुड मध्ये होता.. मोनिकाला प्रत्येक वेळी भेटायला नाही म्हणणं त्याला अवघड होतं होतं आणि शेवटी कंटाळुन त्या संध्याकाळी हॉटेलमध्ये भेटायचं त्याने मनाविरुध्द कबुल केलं होतं.
“आता हा फोन जर कुणा खोट्या मिराचा असेल तर तिचं काही खरं नाही..”, मनोमन कबिर म्हणाला आणि त्याने फोन उचलला..
“हॅल्लो…..कोण बोलतंय?”
“मिरा…”, पलिकडुन आवाज आला…
का कुणास ठाऊक, पण कबिरच्या सर्वांगावर शहारा आला. अचानक त्याचे स्नायु आखडले गेले, ह्रुदय दुप्पट वेगाने ब्लड पंप करु लागले, कानाच्या पाळ्या गरम झाल्या….
काहीश्या साशंक स्वरात तो म्हणाला… “राधा?”
पलिकडुन काही क्षण शांततेत गेली आणि मग आवाज आला… “हम्म.. राधा बोलतेय..”
[क्रमशः]



User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

Re: इश्क - Marathi love stori

Post by rangila »


14
कबिरला पुढे काय बोलावं तेच सुचेना. तो नुसताच फोन कानाला लावुन बसुन राहीला..
“हॅल्लो.. आहेस का?”
“हो.. आहे आहे..”, राधाच्या आवाजाने तो भानावर आला
बहुदा राधाला सुध्दा पुढे काय बोलायचे हे सुचेना, त्यामुळे काही क्षण शांततेत गेले.
“कशी आहेस?”, कबिरने विचारले
“टी.व्ही. बघतोस ना? मग माहीती असेलच की मी काय काय दिवे लावलेत ते..!”, काहीसं हसुन राधा म्हणाली..
“तुझीच चुक आहे.. काय गरज होती त्या दिवशी असं अचानक निघुन जायची. मला थोडा वेळ दिला असतास तर….”
“हे बघ कबिर.. जुन्या गोष्टींबद्दल बोलुन काय उपयोग.. जे झालं ते झालं.. लेट्स मुव्ह ऑन…”
“राधा, मला भेटायचंय तुला.. प्लिज नाही म्हणु नकोस.. तु म्हणशील तेथे, म्हणशील त्या हॉटेलमध्ये…”
“मला पब्लिक-अटेंन्शन नकोय कबिर.. भेटुयात.. पण हॉटेलमध्ये नको…”
“ऑलराईट.. मग कुठे?”
“अं.. तुझ्या घरी? चालेल?”
“येस चालेल.. कधी?”
“आज संध्याकाळी? साधारण ७ वाजता?”
“डन.. मी वाट बघेन..”
“ठिके मग.. व्हॉट्स-अॅ पवर मॅप पाठव.. भेटु संध्याकाळी..”
“ओके.. बाय..”
“बाय….”
फोन बंद झाला तरीही कबिर बर्याणच वेळ फोन कानाला लावुन बसला. त्याने घड्याळात पाहीले. ३.३० वाजुन गेले होते. कबिरला त्याची लिव्हींग रुम आठवली. प्रचंड पसारा, अस्ताव्यस्त पसरलेले कपडे, पुस्तक, चार्जर्स.. पूर्ण घर एक कचराकुंडी झाली होती.
कबिरने लॅपटॉप बंद केला आणि तो तडक घरी पोहोचला. बाहेरचे कपडे बदलुन त्याने घरातले कपडे घातले आणि घर आवरायला सुरुवात केली. घरातल्या प्रत्येक वस्तुचा त्याला अचानक राग येऊ लागला होता..
“ही.. ही खुर्ची.. ही काय खुर्ची आहे.. गेल्या महीन्यात त्या प्रदर्शनात काय मस्त रिक्लायनर्स होत्या.. त्या घेतल्या असत्या तर..”
“बिन-बॅगमधले थर्माकॉलचे बॉल्स चेपुन ती पुर्ण चपटी झाली होती..”
“कधीकाळी मोनिकाच्या आवडीने घेतलेले सोफा आणि कुशन कव्हर्स फारच भडक आणि ऑड वाटत होते”
“भिंतींवरच्या मॉडर्न-आर्ट्स पेंन्टींग्सच्या फ्रेम्स अगदीच थिल्लर वाटत होत्या..”
“सेंटर-टेबलाचे टवके उडल्याने ते अधीकच जुनाट वाटत होते..”
कबिरला सगळे सामान फेकुन द्यावेसे वाटत होते, पण हे सगळं करायला आज्जीबात वेळ नव्हता. जेव्हढं शक्य होईल तेव्हढं करत त्याने लिव्हींग रुम साफ़ केलं. कोपर्यालवरच्या फ्लोरीस्टकडुन केशरी आणि पिवळ्या रंगाच्या जर्बेराच्या फुलांचा एक गुच्छ आणलाआणि सेंटर-टेबलावरच्या फुलदाणीत सजवला. अनेक दिवस वापराविना पडुन राहीलेलं रुम-फ्रेशनरचा फवारा मारला. सिडी-प्लेयरवर ‘जगजीतच्या’ गाण्यांची एक सिडी लावली आणि बर्यारपैकी कपडे करुन तो तयार झाला.
वेळ कसा गेला ते कबिरला कळालेच नाही. घड्याळात ७ वाजुन गेले होते. वातावरणात जणु एक प्रकारचा दबाव असल्यासारखं त्याला वाटत होतं. घड्याळ्याच्या सेकंद काट्याचा आवाज सुध्दा स्पष्ट ऐकु येत होता.
“हाथ छूटे भी तो.. रिश्ते नहीं छूटा करते… वक़्त की शाख से… लम्हे नहीं टूटा करते…”
जगजीतसिंगच्या मॅजीकल आवाजाने तो पुरता सुखावला गेला. रेलींगचेअरवर आरामात बसुन डोळे मिटून तो त्या गाण्याचा आनंद घेत होता.
साधारणपणे ७.२०च्या सुमारास त्याच्या दारावरची बेल वाजली तसा तो खाड्कन खुर्चीतुन उठला. बुलेट-ट्रेनपेक्षाही अधीक वेगाने त्याच्या छातीचे ठोके पडत होते. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि दरवाजा उघडला. समोर राधा उभी होती. लाल-पांढर्याा चेक्सचा शर्ट आणि फिक्कट निळ्या रंगाची जिन्स असा साधाच पेहराव तिने केला होता. पण कबिरला ती तितकीच सुंदर भासली जशी त्याला त्या दिवशी हॉटेलमध्ये वाटली होती.
पाठीमागे धरलेल्या हातातल्या फुलांचा गुच्छ कबिरला देत ती म्हणाली.. “तुझ्या पुस्तकाच्या सस्केसबद्दल अभिनंदन…”
त्या फुलांकडे हसुन बघत कबिर म्हणाला… “जर्बेरा…!!”
“हो ! का? हसायला काय झालं?”
दारातुन बाजुला होत, कबिरने सेंटर टेबलाकडे बोट दाखवले..
“छान आहे की रे घर तुझं..” लिव्हींग रुम न्याहाळत राधा म्हणाली.. “मला वाटलं लेखकाचं घरं म्हणजे असं उगाचंच साहीत्य संबंधीचे म्युरर्ल्स, विवीध मान्यवर लेखकांची किंवा त्यांच्या कोट्सच्या फ्रेम्स वगैरे असेल…”
“बस.. काय घेणार?”, कबिरने विचारलं
“काय आहे? स्कॉच?”, राधा
“आहे.. सोडा चालेल?”
“नको, एकच सिक्स्टी कर, ऑन द रॉक्स…”
कबिरने फ्रिजमधुन बर्फ काढला आणि दोन ग्लास आणि स्कॉचची बॉटल घेऊन तो राधाच्या समोरच्या खुर्चीत बसला.
“कसं वाटलं पुस्तक?”, पेग भरुन राधाकडे देत कबिर म्हणाला
“खुप छान. खरंच आवडलं मला, मस्त लिहीलं आहेस. म्हणजे असं उगाच काय म्हणतात ते.. शब्दबंबाळ लेखन न करता नेहमीच्याच, ओघवत्या भाषेत लिहीलंस त्यामुळे वाचायला छान वाटलं…”
“आणि मीरा? आवडली??”
“खुपच लक्ष ठेवुन होतास की तु माझ्यावर.. अगदी माझ्या बारीक-सारीक सवयी पण छान टिपल्या आहेस.. म्हणजे असं मी मला स्वतःला एक त्रयस्थ म्हणुन अनुभवत होते…”
“मग..लेखक म्हणल्यावर ते करावंच लागतं…”
“जे घडलं ते तर तु व्यवस्थीत उतरवलं आहेसच, पण जे नाही घडलं ते पण.. म्हणजे तो किसिंग सिन खरचं इंटेन्स होता बरं का…”
कबिर थोडासा शरमला.. “आय मीन.. कथेसाठी थोडं फार रोमॅन्टीक काही तरी हवंच ना! नाहीतर तेंव्हा तसा रोमांन्स काही नव्हताच तेथे…”
“अहं. अहं.. हा टॉन्ट होता का?”, हसत हसत राधा म्हणाली..
रेकॉर्डरवर ’झुकी झुकी सी नजर’ चालु होते..
राधाने डोळे मिटुन मान मागे करुन काही क्षण त्या गाण्याचा मनमुराद आस्वाद घेतला…
“काय आवाज होता यार.. अॅहबस्युलेटली मॅजीकल.. खरंच रोमांच येतात कधी कधी अंगावर…”
..
“इफ़ यु डोन्ट माईंड, थोडा मोठा करु आवाज…”
“कर की.. विचारायचं काय त्यात..”
राधाने गाण्याचा आवाज थोडा मोठा केला..
“यु नो व्हॉट.. माझ्या काही मेमोरीज आहेत ह्या गाण्याच्या.. कॉलेजला असताना ना, रंगपंचमीला, रंग खेळुन झाल्यावर मी, माझा मित्र.. आमच्या दोघांच्या गर्ल-फ्रेंड्स आणि इतर काही मित्र-मैत्रीणी.. आम्ही बाईकवरुन डॅमवर गेलो होतो पाण्यात खेळायला… माझ्या मित्राची गर्लफ्रेंड सॉलीड हॉट होती आणि तिचा आवाजपण इतका मस्त गोड होता. मस्त गाणी म्हणायची..
तर तेथे पाण्यात खेळुन झाल्यावर, सगळे तिला गाणं म्हण, गाणं म्हण म्हणुन मागे लागले होते. मी तेंव्हा ना जरा शाय टाईप्स होतो. जास्ती बोलायचो नाही. मी आपला मान खाली घालुन उभा होतो.
तर ती एकदम माझ्याकडे बघुन म्हणाली.. “ठिके ह्याच्यासाठी मी एक गाणं म्हणते..” आणि तिने तेंव्हा ’झुकी-झुकी सी नजर..’ म्हणलं होतं.
“व्वा.. एक तर एखाद्या हॉट मुलीनं गाणं म्हणावं आणि ते पण.. मित्राच्या गर्लफ्रेंडने.. तु तर एकदम सातवें आसमॉं पर वगैरे असशील की…”
“हो ना… अजुनही हे गाणं लागलं की तो प्रसंग जश्याच्या तसा माझ्या डोळ्यासमोर उभा रहातो..”
“सो त्या दिवशी….”, कबिर पुढे काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला.. कबिरने कुणाचा फोन आहे बघीतला आणि कट करुन ठेवुन दिला..
“का रे? घे की फोन…”, राधा म्हणाली
“नथिंग इंम्पॉर्टंट..”
“बघ बघं.. कुठल्यातरी मीराचा असेल फोन…”, राधा हसत म्हणाली..
“खरंच अगं, इतके फोन येत होते नंतर.. त्या दिवशी तुझा फोन आला.. आय वॉज लाइक.. आता हा फोन तुझा नसेल आणि दुसरीच कोणी असेल.. तर तीचं काही खरं नव्हतं…”
“हम्म.. बरं तु काही तरी म्हणत होतास…..”
“हो.. तर त्या दिवशी….”, इतक्यात कबिरचा फोन पुन्हा वाजला..
“अरे खरंच घे फोन.. महत्वाचा असेल…”, राधा..
कबिरने वैतागुन फोन कट केला आणि फोन बंदच करुन टाकला..
“नाही गं.. हेच नेहमीचे स्पॅम कॉल्स.. तर मी म्हणत होतो की त्या दिवशी.. तु गेल्याचं लक्षात आल्यावर.. तुला खुप शोधलं.. बस स्टॅंडपर्यंत जाऊन आलो….”, कबिर
“तु गेला होतास बस स्टॅंडवर…ओह गॉड.. आय वॉज सो राईट..”, राधा
“म्हणजे?”, गोंधळुन कबिर म्हणाला..
“मला माहीती होतं.. तु मला शोधायचा प्रयत्न करशील.. म्हणुन मी मुद्दामच आधी बस-स्टॅंडला गेले आणि तेथुन टॅक्सी बदलुन दुसरीकडे…”, स्वतःवरच खुश होत राधा म्हणाली..
“व्हेरी स्मार्ट..”, काहीसा चिडुन कबिर म्हणाला..
“ए बाय द वे.. सोफी ऑन्टी कश्या आहेत.. त्यांना लिहीलेल पत्र दिलेस का त्यांना? कश्या आहेत त्या? बर्या आहेत का आता? तेंव्हा अॅनक्सीडेंट झाला होता…”
“हम्म.. दिलं मी पत्र.. पण त्या ओके होत्या.. बहुतेक त्यांना माहीती होतं तु कधी ना कधी अशी अचानक जाणार म्हणुन..”
“हम्म.. मी फोन करेन त्यांना उद्या..”
“एनिवेज.. बाकी? अनुराग काही म्हणला का भेटल्यावर..?”
“हो.. म्हणाला ना.. बरंच काही म्हणाला.. म्हणजे डायरेक्ट नाही काही बोलला पण..”
“पण? पण काय?”
“तो फ्रांन्सला आहे सध्या.. इथे त्याला माझ्यामुळे फ़ार एम्बॅरस झालं असतं.. सो तो काहीतरी कारण काढुन फ्रान्सला गेला.. आणि वकिलाबरोबर नोटीस पाठवली…”
“कसली?”, खुर्चीच्या काठावर सरकत कबिर म्हणाला..
“डीव्होर्स…”
काही क्षण शांततेत गेले..
“आय डोंन्ट नो व्हॉट टु से? पण आत्ता खरं त्याने तुझ्या पाठीशी रहायला हवं होतं.. म्हणजे त्याचा राग स्वाभावीक आहे.. पण असं एकदम एक्स्ट्रीम होण…”
“कबिर.. अॅ क्च्युअली डीव्होर्सचं कारण वेगळंच आहे..” काहीसं अस्वस्थ होत राधा म्हणाली
“तु त्याला सोडुन गेलीस.. असं पोलिस केस वगैरे हेच ना?”, कबिर
“नाही.. आय मीन तो एक त्याला बहाणा मिळाला, पण.. सोड ना.. सांगीन कधीतरी.. इट्स बिट मोअर पर्सनल…”
“मग? आता?”
“म्हणजे तो आत्ता लगेच केस फाईल करणार नाहीए.. कदाचीत हे प्रकरण निवळलं की.. नाहीतर आत्ता ही डिव्होर्स केस त्याच्या विरोधात जाईल.. रागाच्या भरात घेतलेला निर्णय न्यायालयात मान्य नाही होणार… पण मी आता त्या घरात नाही राहु शकत…”
“तु परत गायब होणार की काय मग?”
“आय विश कबिर.. पण ते शक्य नाहीए.. माझ्यावर ’अॅाटेम्प्ट ऑफ़ मर्डरची’ केस आहे, मला पोलिस-स्टेशनला दोन आठवड्यातुन एकदा रिपोर्ट करायला सांगीतलं आहे.. शिवाय.. पोलिसांच्या परवानगीशिवाय मला शहर सोडता येणार नाहिए.. सो आय एम रिअली स्टक…”
“दॅट्स सॅड राधा.. पण हे नक्की झालं कश्यामुळे…?”
कबिरला सोडुन बाहेर पडल्यानंतरपासुन ते आत्तापर्यंतचा सगळा प्रवास राधाने कबिरला ऐकवला. कधी आनंद, कधी एस्काईटमेंट, कधी भिती, कधी चिंता.. राधाच्या चेहर्याावरचे भाव क्षणाक्षणाला बदलत होते.. आणि कबिर??..
कबिर अधीकाधीक तिच्या प्रेमात बुडत चालला होता.
अनुरागच्या घरी आल्यानंतर तिला किती एकटं वाटत होतं आणि घरातले नोकर-चाकर कसं तिला हिडीस-फिडीस करत होते हे ऐकल्यावर कबिरला राहावलंच नाही, त्याने आतातला ग्लास खाली ठेवला, उठुन राधाच्या जवळ गेला आणि आवेगाने तिला मिठीत घेतलं…
“स्टॉप राधा.. प्लिज स्टॉप.. मी अधीक नाही ऐकु शकत.. प्लिज स्टॉप…”
महीन्यानंतर राधाला पहिल्यांदा कुणी जवळ घेतलं होतं. तिचा नवरा.. तिचे आई-वडील.. तिचे सो-कॉल्ड हाय-सोसायटीमधले मित्र-मैत्रीणी, सगळ्यांनी तिच्याशी संबंध तोडले होते. राधा खरोखरंच एकटी पडली होती. कबिरची ती उबदार मिठी ती झिडकारु शकली नाही. तिच्या डोळ्यांतुन अश्रु वाहु लागले आणि त्याच वेळी लिव्हींग रुमचं दार उघडल्याचा आवाज आला.
दोघांनीही मागे वळुन बघीतलं.. दारामध्ये ऑलीव्ह रंगाचा पार्टी-वेअर घातलेली एक छोट्या चणीची मुलगी उभी होती…
“मोनिका???”, कबिर आश्चर्याने म्हणाला..

मोनिकाने एकवार राधाकडे बघीतलं आणि मग ती कबिरला म्हणाली.. “ओह सॉरी.. मी डिस्टर्ब केलं का?”
कबिर काहीच बोलला नाही..
“सांगायचंस ना मग तसं.. मी निदान वाट तरी नसते बघत बसले…”, मोनिका
“तु माझी वाट बघत होतीस?”
“कुल.. सो आज आपली डेट होती हे पण तु विसरलास का? आणि ते पण हिच्यासाठी…” राधाकडे बोट दाखवत मोनिका म्हणाली.. “ब्लडी जंकी आणि क्रिमीनल बिच…”
“स्टॉप इट मोनिका.. यु ओन्ली नो हाफ़ ट्रुथ…”, कबिर चवताळुन म्हणाला..
“तरीच म्हणलं हा फोन का बंद करुन बसलाय…. यु रिअली डोन्ट डिझर्व्ह मी कबिर.. गुड बाय.. आणि हो.. ही तुझ्या फ्लॅटची किल्ली जी इतकी वर्ष मी जपुन ठेवली होती.. आय गेस.. मला आता त्याची गरज नाही..”
कबिर काही बोलायच्या आधीच मोनिका दार आपटुन निघुन गेली….
“तुझी गर्लफ्रेंड?”, राधा
“होती.. आम्ही लिव्ह-इन मध्ये होतो काही वर्षांपुर्वी, देन वुई ब्रोक-अप..”, कबिर
“पण आत्ता तुमची डेट होती ना..”
“मला तसंही जायची इच्छा नव्हतीच.. पण खरं तर मी विसरुन गेलो होतो..”
“दॅट्स नॉट गुड कबिर.. जा थांबव तिला.. मी.. जातेय… बाय…”
“थांब राधा..मोनिका गेली तर जाऊ देत, तसंही आमच्यात आता काही नाहीए, आणि भविष्यात काही होईल असेही वाटत नाही.. इट्स गुड फ़ॉर हर खरं तर….”
“हे बघ कबिर.. विषय निघालाच आहे तर बोलते.. आपल्या दोघांतही तसं काही नाहीए, आणि भविष्यात काही होईल असेही वाटत नाही.. सो.. इट्स गुड फ़ॉर यु अलसो टु नो इट…”
“पण का राधा? आता तर तु आणि अनुराग सुध्दा वेगळे होताय.. मग काय प्रॉब्लेम आहे..”
“कबिर, हे सगळं बोलण्याची ही वेळ नाही, मला असं वाटतंय की तु मोनिकाला थांबव.. निदान तिची माफ़ी माग. इट्स नॉट गुड टु किप अ गर्ल वेटींग अॅ,न्ड देन कॅन्सल द डेट.. बी अ जेंटलमन.. मे बी ती माफ़ करेल.. मे बी तुम्ही एकत्र याल.. माझ्यामुळे तुमच्यात भांडणं नकोत.. आपण नंतर बोलु… ” असं म्हणुन कबिरला पुढे काही बोलु न देता राधा बाहेर पडली..
कबिरला काय करावं तेच कळेना.. मोनिकाच्या मागे जाऊन तिला थांबवावं का राधाच्या?
कोपर्याकतल्या बारवर ठेवलेली स्कॉचची बॉटल कबिरला अधीक खुणावत होती..
“कम टु मी डिअर.. यु निड मी मोर दॅन एनीथींग एल्स…”
कबिरने हताशपणे हवेत हात हलवले आणि त्याने स्कॉचची बॉटल तोंडाला लावली.
स्ट्रॉंग स्कॉच कबिरचा घसा जाळत पोटामध्ये उतरत होती..
बट देअर वॉज समथींग एल्स दॅट वॉज बर्निंग मोर दॅन हीज थ्रोट.. इट वॉज हीज हार्ट…
[क्रमशः]


User avatar
rangila
Super member
Posts: 5698
Joined: 17 Aug 2015 16:50

Re: इश्क - Marathi love stori

Post by rangila »


15
“गुड मॉर्निंग रोहन..”, ऑफीस मध्ये आल्यावर कबिर म्हणाला..
रोहनने मात्र काही उत्तरच दिले नाही, संगणकावर तो काम करण्यात मग्न होता.
“रोहनss… गुड मॉर्नींग…”, कबिर पुन्हा एकदा म्हणाला..
“गुड मॉर्निंग…”, रोहन
“का रे? असा उदास का? काय झालं?”, कबिर
“काही नाही असंच..”
“तब्येत बरी आहे ना?”
“हम्म…”
“बरं.. आपल्या पुस्तकाच्या सेल्सचा रिजनल रिपोर्ट घेउन जरा केबिनमध्ये येतोस का?.. बघु अजुन कुठे कमी सेल्स असेल तर तेथे प्रमोट कसं करता येईल…”, कबिर
“मी मेल करतो फाईल..”, रोहन
कबिरने जरावेळ रोहनकडे रोखुन कडे बघीतले आणि मग तो ठिक आहे म्हणुन केबिन मध्ये निघुन गेला.
रोहनचे काय बिनसले होते कुणास ठाऊक, पण त्याला मुळपदावर यायला दोन दिवस लागले. काहीतरी फॅमीली प्रॉब्लेम असेल म्हणुन कबिरनेही त्याला नंतर फारसे छेडले नाही.
एके दिवशी कबिर नुकताच ऑफीसमध्ये आला होता तोच त्याचा फोन वाजला. राधाचा फोन बघताच त्याला एकदम आश्चर्याचा धक्काच बसला.
“हायsss.. प्लिजंट सप्राईज..”, कबिर
“हाय..! काय करतोएस?”, राधा
“नथिंग, अॅ ज युजवल.. जस्ट आलोय ऑफिसला.. तु बोल..”
“अम्म.. दोन दिवस फ्रि आहेस का?”
“दोन दिवस???”
“हम्म.. म्हणजे काही महत्वाचं काम असेल तर राहु देत.. पण जनरल.. आज आणि उद्या?”
“तसं महत्वाचं काही नाहीए, बोल काय काम आहे?”
“मला गोकर्णला जायचंय.. ऑफीशीअल आयडेंटीफिकेशनसाठी.. म्हणजे ज्यांनी त्या दिवशी मला…अं…. त्यांची ओळख पटवायची आहे.. तस्ं तेथे तासाभराचच काम आहे.. पण इट्स लॉंग जर्नी.. ड्रायव्हर आहे.. पण एकट्याने जायचा कंटाळा आलाय.. तु फ्रि असशील आणि बरोबर यायची इच्छा असेल तर…”
“व्हाय नॉट.. तेवढाच बदल होईल मला पण.. आणि तुझी कंपनी असेल तर…”
“प्लिज.. उगाच फ्लर्ट करु नकोस..”
“नाही खरंच.. मी येतो बरोबर.. कधी जायचं आहे?”
“तासाभरात? तु सांग कुठे पिक-अप करु.. आत्ता निघालो तर संध्याकाळी ४ पर्यंत पोहोचु तेथे. मग तेथलं काम संपलं की लेट्स हेड टु गोवा.. सोफी ऑन्टीकडे आजची रात्र राहु.. तेव्हढीच भेट पण होईल त्यांची.. उद्या दुपारी जेवणं करुन निघु.. संध्याकाळ पर्यंत परत…”
“फॅंन्टास्टीक.. येतो मी, एक काम कर, घरापाशीच ये.. मी पट्कन हॅन्डबॅंग भरुन ठेवतो…”
“ओके देन, सी-यु अॅ ट १०?”
“१० इज फ़ाईन..”
“बाय..”
“बाय..”
फोन ठेवल्यावर कबिरला काय करु आणि काय नको असं झालं होतं. अख्खे दोन दिवस त्याला राधाची सोबत मिळणार होती. त्याने पट्कन लॅपटॉप बंद केला, रोहनला दोन दिवसाचा प्लॅन सांगीतला आणि बॅग भरायला तो घरी पळाला..

साधारणपणे १०.२०ला राधाचा कबिरला फोन आला की ती खाली गाडीमध्ये त्याची वाट बघतेय.
कबिरने त्याची हॅन्डबॅग उचलली आणि तो खाली उतरला. दारासमोरच एक काळ्या रंगाची ‘सी-क्लास मर्सिडीज’ उभी होती. काचा काळ्या रंगाच्या फिल्मने झाकलेल्या असल्याने आतमधले काही दिसत नव्हते. कबिरने मागची डिक्की उघडली, आपली बॅग आतमध्ये टाकली आणि मागचे दार उघडुन तो आतमध्ये शिरला.
मागच्या सिटवर राधा बसली होती. काळ्या रंगाचा सॅटिनचा लो-नेक शर्ट, काळ्या रंगाची फॉर्मल पॅंन्ट, वर क्रिम-कलरचा ओव्हरकोट, हाय-हिल शुज, डोळ्यावर मोठ्या काचांचा गॉगल आणि शेजारी लेपर्ड-स्किनची महागडी पर्स. तिच्या प्रत्येक गोष्टींतुन श्रीमंती ओसंडुन वाहात होती.
कबिर तिच्या शेजारी बसताच एक मंद पर्फ्युमचा सुगंध त्याच्या नाकात शिरला.
“तु पोलिस-स्टेशनला चालली आहेस का सेलेब-पार्टीला?”, कबिरने न राहवुन विचारले
“ऑफकोर्स पोलिस-स्टेशनला.. पण तेथे इंप्रेशन नको का पडायला? दे शुड नो हु आय एम! मी कोणी चिप रस्त्यावरची स्लट नाहीए हे कळालं पाहीजे त्यांना. ही राधा आणि ती राधा वेगळी आहे…”
“ओके ओके.. पण निदान तो गॉगल तरी काढ.. मला फार ऑकवर्ड होतेय…”
हसत राधाने गॉगल काढुन ठेवला..
“आय मीन.. अजुन तरी मी अनुरागचीच बायको आहे ना बाहेरच्यांसाठी…”, ड्रायव्हरला ऐकु जाणार नाही अश्या हळु आवाजात ती म्हणाली..
“राधा.. आपण माझ्या गाडीतुन जाऊयात का? मला चालवायला काही प्रॉब्लेम नाही.. फोर्ड-इको-स्पोर्ट आहे माझी..”, कबिर
“का? काय झालं? मर्सिडीज आवडत नाही का?”
“नाही, तसं नाही.. पण आपल्याला असं सारखंच हळु आवाजात बोलावं लागणार असेल तर अवघड आहे..” हळु आवाजात ड्रायव्हरकडे बोट दाखवत कबिर म्हणाला…
“हम्म खरं आहे.. पण मग तु मर्सच चालव ना, येईल नं चालवता.. फोर्डमध्ये माझे हे कपडे जरा….”
“ठिके ठिके.. लै कौतुक तुझ.. चालवीन मी मर्सिडीज…”
ड्रायव्हरला तसंही राधाबरोबर येण्यात काहीच उत्साह नव्हताच. पडत्या फळाची आज्ञा मानुन तो लगेच गाडीची किल्ली तिच्या हाती सोपवुन निघुन गेला.
राधा आणि कबिर पुढच्या सिटवर येऊन बसले.
“शुड वुई?”, कबिरने गाडी सुरु करत विचारलं.
“येस प्लिज…”, राधाने ए/सी चालु केला आणि सिट मागे सरकवुन रिलॅक्स होत म्हणाली..
कबिरने गाडीचा एस्कीलेटर दोन-तिनदा दाबुन फायरिंगचा आनंद घेतला आणि मग गाडी गेअरमध्ये टाकुन गोकर्णकडे प्रस्थान केले…

शहर मागे टाकुन गाडी एक्स्प्रेस-वे वरुन वार्यायच्या वेगाने पळत होती.
१००-१२०-१४०-१६०
“सुप्पर ए यार, म्हणजे आधी बसलो होतो मर्सीडीजमध्ये पण चालवण्याचा अनुभव काही वेगळाच.. १६० आणि कसली स्टेबल आहे अजुनही…”
“क्रुज-कंट्रोल चालु कर, सगळे कंट्रोल ऑटो सेट होतात..”, डॅशबोर्डवरच्या एका बटनाकडे बोट दाखवत राधा म्हणाली… “.. पैसा सर्वकाही नसतो मान्य.. पण काही गोष्टींचा आनंद पैसा असल्याशिवाय घेता येत नाही हे ही खरं.. नाही का?”
“अगदी.. थॅंक्यु अनुराग फॉर धिस…” हाताची दोन बोट आधी ओठांना आणि मग आकाशाकडे बोट दाखवत कबिर म्हणाला.
“ए .. त्या दिवशी काय झालं मग? तु भेटलास मोनिकाला?”, अचानक काहीतरी आठवल्यावर राधा म्हणाली
“नाही..”
“का??? मी सांगीतलं होतं ना तुला?”, डोळे मोठ्ठे करत राधा कबिरवर ओरडली
“आणि मी पण तुला सांगीतलं.. आमच्यात काही नाहीए..”
“पण मग डेट कश्याला कबुल केलीस तिच्याशी.. हाऊ मीन ऑफ़ यु कबिर…”, राधा अजुनही चिडली होती.
तिच्या त्या रागाच कबिरला खुप कौतुक वाटत होतं. राधा त्याची असती तर तिला जवळ, मिठीत घेऊन तिला मनवायचा त्याने प्रयत्न केला असता पण…पण राधा त्याची नव्हती.. निदान सध्या तरी..
“ती ऐकतच नव्हती.. मी दहा वेळा नाही म्हणालो तिला..”
“मग अकराव्यांदा पण म्हणायचंस..”
“जाऊ देत ना सोड.. जे झालं ते बरंच झालं…”
“गोव्यात, तु बोलला नाहीस मला तुला गर्लफ्रेंड आहे ते..”
“कधी बोलणार? आपण दोन दिवसांतच गायब झालात.. आणि तेंव्हा ती माझी गर्लफ्रेंड नव्हती.. आमचा ब्रेक-अप आधीच झाला होता..”
“ओके ओके.. टॉन्टींग ची एक संधी सोडू नकोस.. बर सांग ना.. कधीपासुन एकत्र होतात तुम्ही? का ब्रेक-अप झालं? तुच काही तरी केलं असशील…..”
पुढचा अर्धा-पाऊण तास कबिर तिला मोनिका आणि त्यांच्याबद्दल सांगत होता.
“आमच्या रिलेशनशीपमध्ये सुरुवातीचा काही काळ सोडला तर ती आणि मी नव्हतोच.. फक्त मी आणि मीच होतो..”
“तु असे साधे कपडे का घालतोस?”
“पार्टीमध्ये कुणाशी जास्त मिक्स का नाही होत?”
“माझ्या सगळ्या फ्रेंड्सना तु बोअरींग वाटतोस.. तु असा कुल आणि ट्रेंडी का नाही राहात?”
“मी कित्तीदा तिला सांगुन बघीतलं. अनेकदा तिला माझ्या फॅन-मेल्स दाखवल्या. जितक्या तुझ्या मैत्रीणी नसतील त्याच्या दहापट अधीक मुलींनी मला ई-मेल / फोन करुन मी त्यांना आवडतो, माझं लिखाण त्यांना आवडतो सांगीतलं होतं हे दाखवुन दिलं..”
“मग?”
“मग काय? तिला तात्पुर्त पटायचं.. परत ये रे माझ्या मागल्या. तिला मी तिला आवडण्यापेक्षा इतरांना आवडणं जास्त महत्वाच वाटायचं..”
“जस्ट द सेम विथ मी.. अनुरागही काही वेगळा नव्हता…”
“तु बदललंस का स्वतःला अनुरागसाठी? मी तरी थोडाफार प्रयत्न केला…”
“अरे, पण ते एकच कारण नव्हतं अनुरागबद्दल.. मला हवं असलेलं स्वातंत्र्य तो मला कधीच देऊ शकला नसता. तु जे काही सांगीतलंस मला, निदान त्यावरुन मोनिका, ती एक गोष्ट सोडली तर.. सिम्स टु बी नाईस गर्ल… दिसायला पण चिकनी आहे रे…”
“ह्म्म.. मोना तशी आहे चांगली. आमच्या ब्रेक-अप नंतर मी खरंच डिप्रेस होतो.. त्यातच मला ते लव्ह-स्टोरी लिहायची ऑफर आली. मी तयारच नव्हतो, पण एक तर माझं तिसरं पुस्तक इतक हिट नाही झालं.. वुई अॅयज अ युनिट आम्हाला सक्सेसची गरज होती, रोहनने खुपच पर्स्यु केलं आणि मी गोव्याला पोहोचलो…”
“उउउउह्ह्ह.. ‘मोनिका’वरुन एकदम ‘मोना’… समवन सिम्स टु बी स्टिल इन लव्ह…”
“प्लिज……”, काहीसा लाजत कबिर म्हणाला..
“लेट मी सी.. लेट मी सी.. आर यु ब्लशींग?”, कबिरच्या दंडाला धरुन त्याला मागे सरकवत राधा म्हणाली…
“धिस कॉल्स फॉर अ चिअर्स..”, असं म्हणुन तिने थंड ग्लोव्ह-कंपार्टमेंटमधुन बडवायजर बिअरचे दोन कॅन काढले आणि एक कबिरला दिला..
“नो थॅंक्स.. आय़ डोंन्ट ड्रिंक व्हाईल ड्राईव्ह…”
“ए काय नाटकं रे तुझी? बिअर काय ड्रिंक आहे का? स्पार्कल्ड वॉटर आहे ते…”
“थॅंक्स पण नको…”
“थांब..मोनालाच फोन करते.. सांगते कसा बोअरींग आहेस तु…”, कबिरच्या खिश्यातुन मोबाईल ओढुन घेत राधा म्हणाली…
“ओके.. ओके… दे इकडे”, असं म्हणुन राधाने फोडलेला बिअरचा कॅन घेउन कबिरने तो तोंडाला लावला…
“तु तिला लव्ह-लेटर्स वगैरे सॉल्लीड लिहीली असशील ना? लेखकच तु.. हो ना?”
“हो म्हणजे.. लिहीली होती थोडीफार….”
“वॉव्व.. ए.. सांग ना.. काय काय लिहीलं होतंस…”
“प्लिज…”
“प्लिज काय.. सांग.. जे आठवतेय ते सांग.. म्हणजे असं कविता वगैरे करायचास का?”
“मला नाही आठवत ए.. सोड ना राधा.. मोनिका तुझ्यासाठी विनोदाचा विषय असेल.. माझ्यासाठी नाही..”, गंभीर होत कबिर म्हणाला..
“ओके.. सॉरी.. हर्ट केलं असेल मी तर.. रिअली सॉरी…”
गाडी मुंबई-गोवा हायवेला लागली. राधा आणि कबिर गप्पांमध्ये बुडुन गेले होते जणु एकमेकांना गेली कित्तेक वर्षांपासुन ओळखतात. गप्पांचा विषय अक्षरशः काहीही असत. एखाद्या गाण्यावरुन.. एखाद्या सिनेमावरुन सुरु झालेली चर्चा अगदी जागतिक राजकीय विषयांपर्यंत पोहोचायची.
“तुला गुलजारची शायरी आवडते?”, राधा
“म्हणजे काय?”
“थांब, पेन-ड्राईव्ह मध्ये आहे एक फोल्डर…”, राधाने एंटरटेंमेंट-सिस्टीममधील गाण्याचा फोल्डर बदलला..
गुलजारच्या धिर-गंभीर आवाजातली शायरी सुरु झाली..
बेबस निगाहों में है तबाही का मंज़र,
और टपकते अश्क की हर बूंद
वफ़ा का इज़हार करती है……..
डूबा है दिल में बेवफाई का खंजर,
लम्हा-ए-बेकसी में तसावुर की दुनिया
मौत का दीदार करती है……….
ऐ हवा उनको कर दे खबर मेरी मौत की… और कहेना,
के कफ़न की ख्वाहिश में मेरी लाश
उनके आँचल का इंतज़ार करती है……….
दोघांनीही ती शायरी एकत्रच म्हणली.. जणु वर्षांनुवर्ष ऐकत आले होते..
“उफ़्फ़.. काय आवाज आहे यार.. यु नो व्हॉट.. माझा टर्न-ऑन पॉईंट काय आहे?”, राधाने विचारलं
“काय?”
“आवाज.. समोरच्या व्यक्तीचा आवाज चांगला असेल ना.. बस्स.. मला पटवण्याची आधी लढाई तो उसने तभी जित ली..”
“सो यु टर्न ऑन बाय गुलजार?”, हसत कबिरने विचारलं
“व्हाय नॉट? गुलजार.. जगजीत सिंग.. अमीताभ बच्चन.. इव्हन नसरुद्दीन शहा.. एज हार्डली मॅटर्स…”
“हम्म ट्रु..”
“व्हॉट अबाऊट यु.. मुलींमध्ये तुला काय आवडतं सर्वात? आय मीन.. ‘बट-ऑब्व्हीयस’ गोष्टी सोडुन सांग..”, डोळे मिचकावत राधा म्हणाली
“डोळे.. डोळे जर चांगले असतील ना..”, कबिर राधाच्या डोळ्यात बघत म्हणाला आणि पुढचं वाक्य अर्धवटच राहीलं..
कबिरच पुढंच वाक्य अर्धवट का राहीलं हे लक्षात येताच.. “उप्प्स.. सॉरी..” असं म्हणुन राधाने डोळ्यावर तो मोठ्ठा गॉगल चढवला आणि खिडकीकडे तोंड करुन येणारं हासु दाबण्याचा प्रयत्न करु लागली…
“हम्म.. दॅट्स बेटर..”, असं म्हणुन कबिरने गाडीचा वेग वाढवला…

जेवणासाठीचा अर्धा-पाऊण तासाचा छोटासा ब्रेक घेऊन ते लगेच पुढे निघाले…
“तु सोफी ऑन्टींना फोन करुन सांगीतलंस आपण येतोय ते?”
“हम्म.. कालच रात्री केला होता फोन.. खुप खुश झाल्या..”
गोकर्ण ४० कि.मी. वर आलं तसं राधा थोडी टेन्स असल्याचं कबिरला जाणवलं.
“राधा.. डोन्ट वरी.. सगळं ठिक होईल..”
“हम्म.. होप सो.. मागच्या वेळी मी तेथे होते.. दॅट वॉज टेरीबल.. आय जस्ट होप.. की ही फक्त फॉर्मॅलीटीच असेल आणि तासाभरात आपण बाहेर पडु..”
“नक्कीच.. मी आहे तुझ्याबरोबर.. रिलॅक्स…”, कबिरने राधाला धीर देण्याचा प्रयत्न केला
गाडी पोलिस-स्टेशनच्या आवारात आली तसं राधाने एकदा आरश्यात बघुन चेहरा ठिक केला आणि कपडे निट करुन ती पोलिस-स्टेशनमध्ये शिरली. कबिरही गाडी लॉक करुन तिच्या मागोमाग शिरला.
चिफ़-इन्स्पेक्टरच्या जागेवर दुसराच कोण तरी थोडासा वयस्कर पोलिस इन्स्पेक्टर बसला होता.
राधाला पहाताच तो उठुन उभा राहीला.
“अं.. मी राधा.. ते इन्स्पेक्टर…”
“ते आता नाहित इथे.. त्यांची ट्रांन्स्फर झालीय.. त्यांच्या जागी आता मी आहे.. तुमची केस माझ्याकडेच आहे…” तो वयस्कर इन्स्पेक्टर म्हणाला..
“ओह..”
“त्यांचा शहाणपणा नडला त्यांना.. तुमची फ.आय.आर नाही, चार्जशीट नाही, कसली फारशी चौकशी नाही आणि त्यांनी सरळ बातमी मिडीयाला लिक केली.. वरच्यांना ते आवडलं नाही… त्यात तुमचे मिस्टर…”
“एनिवेज.. मी थोडी गडबडीत आहे.. आपण फॉर्मैलीटी उरकुयात का?”, राधाने विषय मध्येच तोडत विचारलं.
चेहर्याववरुन ती बराच कठोरपणाचा आव आणत होती.. पण मनातुन प्रचंड घाबरली होती..
“हो हो नक्कीच.. आणा रे त्यांना..”, असं म्हणुन इन्स्पेक्टरने एका हवालदाराला आत पिटाळलं..
राधा खुर्चीत सरळ होऊन बसली. तिच्या मानेच्या नसा ताणल्या गेल्या होत्या. हाताच्या मुठी घट्ट आवळुन ती वाट बघत बसली.
थोड्याच वेळात चार्ली, रॉकी आणि इतर गुन्ह्यांत पकडलेले ४-५ कैदी तिच्यासमोर येऊन ठाकले.
चार्ली आणि रॉकी मान खाली घालुन उभे होते. राधाला वाटले होते, दोघं जण प्रचंड चिडलेले असतील, तिला बघताच तिच्या अंगावर धावुन येतील वगैरे. पण तसं काहीच नव्हतं हे पाहुन राधाच्या जिवात जीव आला.
“ह्यांच्यापैकी कोण होते?”, तो वयस्कर इन्स्पेक्टर म्हणाला
राधा काही बोलणार एव्हढ्यात कबिरने तिला थांबवले आणि तो त्या इन्स्पेक्टरला म्हणाला, “इन्स्पेक्टर साहेब, ह्या केसमधुन बाहेर पडण्याचा काही मार्ग..”
कबिरचे बोलणे ऐकुन सगळ्यांनी वळुन त्याच्याकडे बघीतले.. जणु काही सगळ्यांना तेच हवे होते.
“म्हणजे??”, इन्स्पेक्टर म्हणाला
“म्हणजे… त्या दिवशी जे काही झाले.. अर्थात दुर्दैवीच होते.. पण ती एक घडलेली चुक होती. कुणाकडुनच जाणुन-बुजुन घडलेला गंभीर गुन्हा नव्हता…”, कबिर म्हणाला
“असं कसं.. दोघांनीही एकमेकांविरुध्द गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.. नाही कसं म्हणता..”
“हो.. मान्य आहे.. पण कदाचीत त्यावेळेस तेथे पोलिस पोहोचले आणि…”
“मग तेच तर.. त्यावेळेस तेथे पोलिस पोहोचले नसते, तर अॅहटेंप्टेड मर्डर किंवा रेप पैकी एक काहीतरी नक्कीच झाले असते.. नाही का..”
“अगदी खरं आहे.. पण समजा.. समजा आज ह्या ओळख परेड मध्ये राधा-मॅडमनी दोघांनाही ओळखलेच नाही तर???”
“कबिर अरे पण त्या दिवशी तेथे पोलिस नसते आले तर खरंच…”, राधा खुर्चीतुन उठत म्हणाली..
“एक मिनीट राधा.. हे बघ त्या दिवशी जे काय झालं ते झालं.. पण त्याच्यामुळे पुढे अनेक महीने.. किंवा वर्ष तुम्हाला कोर्टाच्या.. पोलिस-स्टेशनच्या फेर्याल माराव्या लागणार आहेत.. मान्य आहे का तुला??”
राधा काहीच बोलली नाही..
“जर राधा मॅडमने ओळखलेच नाही.. किंवा हे ते दोघं नव्हेतच असं स्टेटमेंट दिलं तर मग प्रश्नच मिटला.. पण त्यांच्या केसंच काय.. जी राधावर त्यांनी फाईल केली आहे.. त्यांच्या केसनुसार तर राधा तेथेच होती ना!. कॉन्ट्रडीक्ट होतात स्टेटमेंट. राधा म्हणते, हे दोघं ते नव्हेत.. ते म्हणतात राधाच होती ती.. शिवाय आमच्या पोलिसांनी दोन्ही पार्टीजना एकत्र पकडलं आहे.. त्याचं काय? तिघांच्याही ब्लड-सॅंपलमध्ये ड्रग्ज सापडले.. त्याचं काय?”
“मला बोलु तर द्या.. सांगतो.. कदाचीत त्या दिवशी असं झालेलं असु शकतं. राधा तिकडे फिरायला गेली होती.. एकटीच.. हे लोकं तिकडेच होते.. ड्रग्जच्या नशेत.. त्यांनी राधाला बघीतलं.. तिला जबरदस्ती ड्रग्जचं इंजेक्शन दिलं.. पण राधा तेथुन निसटली.. ह्यांनी तिचा पाठलाग केला.. पुढे पोलिसांनी त्यांना पकडलं…”
“म्हणजे सगळी चुक आम्ही कबुल करायची आणि ही फुकटची सुटणार.. ते शक्य नाही.. आम्ही अडकलो तर ही पण अडकणार..”, रॉकी चवताळुन म्हणाला..
“अरे राजा.. जरा बोलु देशील मला?”, कबिर त्याला थांबवत म्हणाला…
“तु काही बोल.. आम्ही अडकलो तर ही पण अडकणार हे नक्की..”, रॉकी..
“हं.. तर त्यावेळेला राधाला जे ‘जबरदस्तीने’ ड्रग्ज दिले होते.. त्यावेळी ती नशेतच होती.. त्यामुळे आता तिला काही केल्या आठवतच नाहीये तेंव्हा नक्की काय घडलं, कुणी केलं वगैरे.. सो.. ती ओळखु शकत नाहीये ह्यापैकी कोणी होतं किंवा नव्हतं. आणि ह्या दोघांच म्हणाल.. तर त्यांची चुक ते मान्य करतील.. त्यांचा गुन्हा इतकाच ठरतो की त्यांनी ड्रग्जचं सेवन केल, राधाला दिलं आणि काही कारणामुळे ते तिला पकडायला धावले. अर्थात कुठल्या कारणामुळे ते त्यांनाही आठवत नाहीए आता. पळता पळता हा.. रॉकी.. पडला.. दगडावर तोंड आपटलं.. त्याला लागलं..” जसं काही अगदी साधंच काहीतरी घडलं असावं अश्या आवेशात कबिर डोळे बारीक करुन हातवारे करत बोलत होता..
“पोलिसांना बघीतल्यावर दोघं जण घाबरले.. आणि आपली चुक त्यांनी राधावर ढकलायचा प्रयत्न म्हणुन तिच्यावर काहीतरी केस फाईल केली..”
“अरे पण….”, रॉकी पुढे काही बोलणार एव्हढ्यात चार्लीने त्याला थांबवले आणि तो म्हणाला.. “ह्याबदल्यात आम्हाला काय मिळणार?”
“आत्ता कसं.. मुद्याचं बोललास…” हळुवार, एखाद्या वकिलाप्रमाणे टाळ्या वाजवत कबिर म्हणाला… “आता ड्रग्ज तर रक्तात सापडले तुमच्या.. सो तोच एक गुन्हा नक्की आहे.. त्याबदल्यात तुम्हाला तुरुंगात तर जावं लागेलच.. पण ह्याबाजुला हिप्पी लोकं आणि ड्रग्ज काही नविन नाही.. कित्ती तरी लोकं अशी येतात आणि जातात.. तुम्ही राधावरची केस मागे घ्या आणि किती पैसे घेणार ते बोला…”
चार्ली, रॉकी… इन्स्पेक्टर कबिर.. कबिर राधा.. सगळे एकमेकांकडे आळीपाळीने बघत होते.
कबिरने सांगीतलेला प्लॅन तसा बरा होता..
“पण मिडीया? त्यांना काय सांगायचं?”, इन्स्पेक्टर ने विचारलं..
“हेच.. जे आपण आत्ता बोललो ते…”, कबिर
“पण त्यांना ते पटायचं का? उगाच गोंधळ व्हायचा…”
“अहो आहे कुणाला वेळ ह्या केसकडे बघायला. तेथे दिल्ली युनिव्हर्सीटीत गोंधल चालु आहे..त्यात बजेट.. मग क्रिकेटसच्या टुर्नामेंट्स.. आय.पी.एल.. मिडीआ फुल्ल बिझी आहे सगळ्यात.. असे कित्तेक मोठ्ठाले घोटाळे आले आणि गेले.. हे तर किरकोळ आहे.. आणि समजा कुणी विचारलंच तर आपण जे बोललो तेच सत्य आहे.. आणि पटण्यासारखे नसले तरी.. कुणाकडे काही पुरावासुध्दा नाहीए…”
“दहा लाख..”, बराच विचार करुन चार्ली म्हणाला..
“ए.. चड्डीत राहुन बोल..”, कबिर म्हणाला… “एक विसरु नको.. आत्ता राधा बाहेर आहे आणि तु अजुनही तुरुंगात.. असा तुरुंगात खितपत पडुन रहायला हिप्पी झालायेस का? जा ना बाहेर.. खा.. पि.. गाणी म्हण.. पोरी फिरव.. ऐश कर..”
चार्ली आणि रॉकीने एकमेकांकडे पाहीले
“पाच लाख…”
“एनिवेज इन्स्पेक्टर, आपण ओळख परेड चालु करुयात.. जर राधाने दोघांना ओळखलं तर मग मात्र तुम्हाला काही करता येणार नाही.. नाही का?”
इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर ने खिश्यातुन रुमाल काढुन आपल्या कपाळावरचा घाम टिपला. त्याला आपली जवळ येत चाललेली निवृत्तीची तारीख दिसत होती. कसंही करुन त्याला ह्या केसमधुन बाहेर पडायचं होतं.
“हो अगदी बरोबर.. मग मात्र मी काहीच करु शकणार नाही…”, चेहरा गंभीर करुन इन्स्पेक्टर म्हणाला..
“दोन लाख.. फायनल..”, चार्ली म्हणाला..
“एक लाख.. फायनल.. टेक इट ऑर लिव्ह इट…”, कबिर निग्रहाने म्हणाला
रॉकी आणि चार्लीने एकमेकांत बरीच कुजबुज केली. एक लाख सुध्दा त्यांना काही कमी नव्हते. शंभर रुपायांसाठी सुध्दा तरसणारे ते.. लाख-रुपये खुप जास्ती होते..
“ड्न..”, दोघंही एकदम म्हणाले..
“इन्स्पेक्टर साहेब.. तुमंच काही??”, कबिर
“छे छे.. मला त्यातला एक रुपायाही नको.. दोन महीन्यांत मी रिटायर होतोय.. उगाच मी पैसे घेऊन हे केलं कुठं निघालं तर…”
“ओके ओके..” कबिर हसत म्हणाला..
पण मला माझ्या सिनीयर्सशी आधी बोलायला हवं.. त्यांना योग्य वाटलं तर…
“शुअर…”, कबिर म्हणाला
इन्स्पेक्टर दार उघडुन आपल्या केबिनमध्ये फोन करायला निघुन गेले..
राधा दोन्ही हातांची बोट क्रॉस करुन मनातल्या मनात प्रार्थना करत होती. अगदी अनपेक्षीतपणे कबिरने तिचं आयुष्य वेगळ्याच वळणावर येऊन थांबवले होते. ती जरका ह्या केसमधुन बाहेर पडु शकली असती तर.. एक नविन.. स्वच्छंद आयुष्य तिची वाट पहाणार होते.
ती खुर्चीतुन उठुन चार्लीपाशी गेली.
“शिना कशी आहे? इथेच आहे अजुन”, राधाने विचारले.
“नाही.. इथे नाहीएत.. पोलिसांनी सगळ्यांना पळवुन लावले. कोस्टल-कर्नाटका साईडला गेलेत सगळे..”, चार्ली म्हणाला..
“हम्म.. इथुन सुटलात तर तुम्ही तिकडेच जाणार?”
“हम्म..”, चार्ली म्हणाला.
राधाने रॉकीकडे पाहीलं, पण तो चेहरा दुसरीकडे करुन उभा होता.
जवळ जवळ १५-२० मिनीटांनंतर इन्स्पेक्टर बाहेर आले.
“कमीशनर साहेब तयार आहेत.. पण तुम्हाला दोघांनाही स्टेटमेंट्स लिहुन द्यावी लागतील. राधा मॅडम.. इथुन बाहेर पडल्यावर प्लिज बाहेर कुठे ह्याची वाच्यता करु नका.. विशेषतः मिडीयाशी काही कम्युनिकेशन नकोय याबद्दल.. ओके?”
राधाने बोटांची चिमटी करुन ओठांवरुन फिरवत तोंडाला कुलुप लावल्याची खुण केली.
“चार्ली-रॉकी… एक महीना.. इथे तुरुंगात रहावं लागेल.. हवालदार घेऊन जा ह्यांना…”, इन्स्पेक्टर
“तुमचे पैसे.. कुठे पाठवायचे?”, कबिर
“इथेच.. हातात पैसे पडल्याशिवाय कुठल्याही स्टेटमेंटवर आम्ही सह्या करणार नाही”, रॉकी म्हणाला..
“अरे.. आम्ही काही लाखरुपये बरोबर घेउन फिरतो का?”, कबिर वैतागुन म्हणाला..
“कबिर.. आय गॉट धिस.. आहेत माझ्याकडे..”, असं म्हणुन राधा कारमधुन तिची पर्स घेऊन आली.
कबिर तिचे पैसे देऊन होईपर्यंत डोळे फाडुन तिच्याकडे बघत होता.
इन्स्पेक्टरने दोन चार फॉर्म्स त्यांच्याकडुन भरुन घेतले.. हवालदारने दोघांचे स्टेटमेंट्स लिहून घेतले. आणि मग जशी कबिरने सांगीतली तशी ‘क्लिन-चीट’ सही शिक्यासहीत इन्स्पेक्टरने राधाच्या हातात ठेवली.
“सो.. ऑल डन?”, हातातल्या कागदाकडे बघत राधा म्हणाली…
“ऑल डन.., आपण सगळेच सुटलो नाही का?”, कसनुस हसत इन्स्पेक्टर म्हणाला.

कबिर आणि राधा बाहेर निघाले तसं राधा म्हणाली, “कबिर, दोन मिनीटं थांबतोस.. मी पट्कन गाडीत चेंज करते.. खुप हेवी झालंय हे.. आणि गरम पण खुप होतंय..”
“शुअर..” कबिर म्हणाला..
राधा गाडीच्या मागचं दार उघडुन आत गेली आणि दहा मिनीटांनी कपडे बदलुन बाहेर आली..
“लेट्स गो..कबिर…”,असं म्हणुन ती पुढच्या सिटवर जाउन बसली..
कबिरही ड्रायव्हिंगसीटवर बसला आणि गाडी सुरु करुन ते पोलिस-स्टेशनच्या बाहेर पडले.
पुढची दहा मिनीटं कुणीच कुणाशी बोलत नव्हते.
“राधा? इतकी छान गोष्ट घडली.. काहीच बोलत नाहीएस…”, कबिर शेवटी न रहावुन म्हणाला..
“बोलते.. पण त्याआधी.. इथुन पुढे कुठेतरी बीच-साठी एक्झीट आहे का बघ.. मला समुद्र किनार्याडवर जायचं आहे..”, राधा म्हणाली..
“ओके..”, असं म्हणुन रस्त्यावरचे बोर्ड बघत कबिरने गाडी वळवली.
दहा-पंधरा मिनीटांनंतर एक छोट्याश्या वाटेवर त्याने गाडी वळवली आणि ते समुद्रकिनारी येऊन पोहोचले.
गाडी थांबताच राधाने दार उघडले आणि कबिरची वाट न बघता ती धावत धावत समुद्रापाशी गेली. कबिरही तिच्या मागोमाग गेला.
राधा समुद्राच्या लाटांपाशी पोहोचली. लाटांचा घनगंभीर आवाज आसमंतात भरुन राहीला होता. राधाने डोळे बंद केले.. दोन्ही हात आडवे पसरले आणि अनपेक्षीतपणे ती टाहो फोडुन जोरात किंकाळी मारली.. आणि परत एक.. परत एक.. आणि परत एक..
इतके दिवस मनात साठुन राहीलेला राग, चिंता, दुःख, भिती तिच्या ओरडण्यातुन बाहेर पडत होतं.
समुद्राच्या लाटांच्या आवाजात तिचा आवाज लगेचच विरुन जात होता.
राधाच्या डोळ्यांतुन अश्रु वाहात होते, पण ती अजुनही जोरजोरात ओरडत होती.
घसा सोलवटुन निघाला तसं ती थांबली. कबिर तिच्या शेजारीच उभा होता.
तिने कबिरकडे बघीतलं आणि म्हणाली.. “थॅंक्स म्हणायला हवंय.. खरं तर मला नाही म्हणायचंय.. आय ऑलवेज वॉन्ट टु बी इन डेब्ट ऑफ़ धिस…”
कबिर हसला आणि मानेनेच त्याने नाही म्हणलं..
“बट नो.. आय हॅव टु गिव्ह समथींग बॅंक…सो रेडी?”
“ओके..”
“मागे आकाशात बघ कबिर.. आत्ता कसली वेळ आहे?”,
“अं.. सुर्यास्त..” मावळतीकडे झुकलेल्या सुर्याकडे बघत कबिर म्हणाला..
“ओके.. गुड..”, राधाच्या चेहर्याकवर एक मिस्टीरियस हास्य होते… “नाऊ लुक अॅ ट मी…. लुक अॅ ट माय ड्रेस…”
कबिरने राधाकडे बघीतले.. तिने गुलाबी रंगाच्या टी-शर्टवर पांढर्या् रंगाचा सी-थ्रु शर्ट आणि खाली आकाशी रंगाची स्लॅक्स घातली होती.
“हम्म मग?”
“उफ़्फ़.. काय तु…”, गाल फुगवुन राधा म्हणाली..
“हे कसलं गिफ़्ट..”, कबिर न कळुन म्हणाला…
“अं.. बरं हे बघ..”, दुसरं काहीतरी आठवल्यावर तिने वाळुमध्ये शोधुन एक दगड उचलला आणि समुद्रात भिरकावला…..आणि म्हणाली “ते बघं.. ते काय होतं..?”
“भाकर्या …”, कबिर म्हणाला…
“एक्झॅक्टली.. भाकर्यार.. भा.क.र्याु…” असं म्हणुन राधा खळखळुन हासु लागली.. आणि अचानक कबिरला साक्षात्कार झाला.. हे सर्व त्याने कुठे तरी पाहीलं होतं.. राधाचा तो ड्रेस.. सुर्यास्त.. पाण्यावर टप्पे पडत जाणारा दगड.. त्याच्या पडणार्या् भाकर्याी, राधाचं निरागस हास्य आणि…आणि राधाचा आणि कबिरचा इमॅजनेटीव्ह किस…
येस्स.. त्याच्याच पुस्तकातला तो एक प्रसंग होता.. जो आज राधाने प्रत्यक्षात आणला होता…
स्तंभीत झाल्यासारखा तो राधाकडे बघत होता…
“इज धीस फॉर रिअल?”, कबिर म्हणाला..
“क्लोज युअर आईज मिस्टर…”, कबिरच्या अगदी जवळ जात राधा म्हणाली
“आर यु गोईंग टु..”,कबिर
“आय सेड.. क्लोज युअर आईज कबिर..”
कबिरने डोळे बंद केले…
अतिव-सुखाच्या कोमात जाण्यापुर्वी कबिरला एकच गोष्ट जाणवली.. जास्मीनचा जवळ जवळ.. अगदी जवळ येत जाणारा.. बेधूंद करणारा सुगंध आणि राधाचे त्याच्या ओठांवर टेकलेले ओठ……………
[क्रमशः]


Post Reply